राजश्री विठ्ठलबावा यांचे पत्राचा लेखांक ३९. १७१४ मार्गशीर्ष वद्य १.
जाब रा छ १४ राखर.
राजेश्री विठ्ठलबावा स्वामीचे सेवेसीं-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणें विशेष तुह्मीं पत्र पा ते पाऊन सविस्तर मार समजली शरीरप्रकृतीचे वर्तमान ल्याहावें कीं संतोष होईल आमचे प्रकृतीचे वर्तमान च्यार दिवस आराम जाला होता मागती सीतज्वराचा उपद्रव जाला आहे. यावरून वैद्यास उदगिरीहून आणून उपच्यार करवितों ह्मणोन लिा तें कळलें ऐसीयास आमचे प्रकृतीस आतां कांहीं येक आराम आहे परंतु नकाहत फार उभे राहून वागण्यास आयास होतात याउपरी ईश्वरकृपेकरून आराम होईल तुह्मीहि शरीरास वैद्याचे औषध घेऊन उपचार करवावा आणि वरचेवर वर्तमान लिहीत जावें पुण्याकडील वर्तमान गोविंदराव जाऊन पोहोचले भेटी जाल्या राजेश्री नानाचा हेत कीं प्रस्तुत श्रीमंताचे सरकारासी आणि सर्वासी सलूक आहे स्वस्थतेचा समये असा मागती यावयाची नाहीं याजकरितां कासीयात्रा करून लौकर यावें तोंपरियंत राजश्री हरिपंत तात्या आटोपावयासी आहेत याप्रो निश्चये केला परंतु सर्वांचे बोलण्यांत व प्रस्तुत सुस्ती खाले पडल्याप्रो गोविंदराव यांचे लिहिण्यांत विशेष आहे वरकड यथास्थित रा छ १४ राखर हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)