Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                              लेखांक ७२.                                                         १७१४ पौष शुद्ध १३.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी-बहादूर
मुतहवरुद्दौला रोबजंग बहरुलमुलूक गोसावी यांसी-
5 सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असलें पाहिजे विशेष पा अफजलपूर तालुके पागा एथें तुह्माकडील लोकांनीं उपद्रव करून गांव लुटून नेले व एक गावचे पाटलास जखमी करून वस्तभाव नेली याचा बोभाट पागेकडे आला त्यावरून अजमलमुलूक बहादूर याणी हुजुरांत अर्जी केली त्याजवरून नवाब अजमुलउमरा बहादूर यांस व आह्मास ईर्षाद जाला कीं तुह्मी बहेरी-बहादूर यांस पत्रे लेहून पा मजकूरची याद आली आहे त्या प्रो जिनसा गांवकरास देऊन रसीद घेऊन पाठवावी व पुढें असी बेज्या हरकत न करीत असें करवावे त्याजवरून नवाब मवसूफ याणी पत्र लिहिलें आहे त्यास याउपरि आपलेकडील लोकास ताकीद करून मौजे आंकलगी वगैरे गांवची लूट आणिली आहे ते यादी प्रो देऊन रसीद घेऊन पाठवावी व पुढें लोकांस ताकीद पकी असावी की कोठे उपद्रव न करीत हालीं जासूदजोडी पा आहे याज बा मवेसीची रसीद लवकर पाठवावी पुन्हा असी गोष्ट आमलांत येणे ठीक नाही रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

                                                                                              लेखांक ७१.                                                         १७१४ पौष शुद्ध १३.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी बाहादूर यांजकडील लोकानी पा अफजलपूर पागेकडील तालुक्यांत उपद्रव करून मौजे आंकलगी वगैरे गांव मारून वस्तभाव नेली याजमुळें अमजमुलमुलुक याणी हाजुरात हाजरत बंदगानआली यांस अर्जी केली त्याचा इर्षाद पत्रें ल्याहावयासी नवाब अजमुलउमरा करपरंदाज यांस जाला त्यास नवाब मवसूफ याणी आपले तर्फेने बहेरी यास खलितापत्र लिहून आम्हास पत्र ल्याहावयाविसी रुका पारसी पा व त्याजकडील जाबसालाचा अद्याप फडच्या होत नाही ह्मणोन मार लिहिला होता त्याचा जाब आह्मी लिहिला त्याची खतावनी पारसी दुजांत लिहिली आहे हिंदवी माराची पत्रें रा छ ११ जावल.

सैद मुजवरखान आमील पा                                                          लेखांक ७०.                                                         १७१४ पौष शुद्ध १३.
वसमत याचे दरखास्ते प्रो
बळवंतराव लक्ष्मण सेळूकर
याचे नावे पत्र रा छ ११ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें स्वकुशल लिहित आसावें विशेष सैदमुजवरखान याणी हाजरत बंदगानआली यांस अर्ज केला की पूर्वी मौजे वाकली पा नांदेड हा गांव मोकासदाराकडे स्वराज्याचे वाट्यास आहे तेथील मामलेदार याणी खटला करून वसमत परगण्याचे कितेक गांवची खराबी केली तेव्हां वसमतकराची व टांकलीकराची पंच्यायत नांदेडांत पडली ते समई बळवंतराव सेळूकर यांजकडील राघोपंत व रामचंद्रपंत यांचे विद्यमाने फैसला जाला या प्रसंगात माद अमीरबेगखान आमील नांदेडकरहि होते तेहि प्रस्तुत हाजर आहेत असे अस्तां सांप्रत टाकलीकरानी जमेयत जमा केली व करितात याउपरि वसमत परगण्यांत हा गांव करणार त्यास एविसीचा बंदोबस्त जाला पा ह्मणोन त्याजवरून हाजरत बंदगानआली याणी माद अमीरबेगखान यांस आह्माकडे पाठविलें व सैदमुजवरखान यांचे अर्ज केल्या प्रोहि मार सांगून पाठविला की मागे जाले त्याचा फडच्या बळवंतराव कारभारी यांचे विद्यमाने जाली हाली टांकलीकर जमाव करून वसमत परगण्यात हा गाव करणार हे ठीक नाहीं वसमत माहाल हा आमचा खालसा आहे याजकरितां त्यास लेहून मना करावें त्याज वरून हे पत्र लिहिलें असे की पहिली माहीतगारी तुह्मांस आहेच त्यास टाकलीकरास ताकीद करावी की याउपरि वसमत मुरगण्यासी खटला न करावा व पुन्हा येविसींची नालष येऊ न द्यावी खटला केल्यांत तर्फेने नुकसानी आहे रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

पत्र फत्तेसिंग भोंसले यांस अजमुलमुलक                                         लेखांक ६९.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
यानी मागीतले याजवरून दिल्हे छ ९ जावल.

राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले गोसावी यांस-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्रेा गोविंदराव कृष्ण आसीरवाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहीत असावे विशेष मौजे जेऊरगी बुा पा आबजलपूर या गांवी स्वारी करून तेथील चीजबस्त व मवेसी आपण नेली येविषईचा बोभाट माहलीहून नवाब शमषुलउमरा बाहादूर यांजकडे आला त्याजवरून नवाब मवसूफ याणी आह्माकडे सांगोन पाठविले की मोकाशाचे मामलत समंधे बाकी पा मारी कांहीं राहिली असल्यास हली पा मारचे आमीलीचे काम सिदी इमामखां यांजकडे जाले हे एथोन माहलांत गेल्या नंतर फैसला करून देवितील मवेसीची व चीजवस्त गांवची माघारी देवावी त्यावरून आपल्यास लिहिले असे त्यास मामलतीची बाकी असेल त्याचा फडशा सिदी इमामखां माहली आल्यानंतर आपल्याकडील कमाविसदाराकडे करून देण्याचा करार केल्याबमोजीब करतील मौजे मारीची चीजवस्त व मवेसी नेली असेल ती माघारी देऊन रसीद घ्यावी सिदी इमामखां लवकरच महाली येणार मामलतीचा फडशा करून देतील दिकत पडावयाची नाही आपण मवेसी नेली आसेल ती देवावी आनमान करूं नये रा छ ९ जावल बहुत काय लिो लोभ आसो दीजे हे विनंति.

पत्र अजमुलमुलक बाहादूर                                               लेखांक ६८.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
यांस छ ९ जावल.

सलाम आंकी रुका पाठविला तो पावला राजश्री फत्तेसिंग भोसले यांस पत्र देण्याविषई लिो त्यास पत्र तयार करून पाठविले आहे रवाना व्हावें व मामलतीचे फडच्याकरितां सिदी इमामखां बाहादूर यास ताकीद व्हावी ज्यादा काय लिहिणे छ ९ जावल.

नारायणराव वकील औरंगाबादकर                                                लेखांक ६७.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
यांचे नावे पत्र कोनेर बाबूराव याजविसी
रा छ ९ जावल सन १२०२.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारायणराव स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें स्वकुशल लिहित आसावे विशेष कसबे कनड वगैरे देह पांच एथील कुळकर्ण राजश्री सिवराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे त्यास अजीमुदौला बाहादूर याचा खासगत ऐवज येणे होता सबब त्याणी कुळकर्णाची जप्ती करून ऐवज घेऊन जमीदार व आमीलास बरखास्त दिल्ही या संधीत त्यांजकडील सुभेदारीचें काम दूर होऊन आहसनुदौला याजकडे काम आलें याजमुळे जप्ती तसीच वहिवाटींत आली जप्ती कांहीं एथून सरकारांतून नाही याजकरिता सांप्रत नवाब आजमुलउमरा बाहादूर याणी सुभ्याचे नावें पत्रे दिल्ही आहेत त्यास उभयताकडोन पत्रे घेऊन तुह्मांकडेस कोन्ही कनडेहून येतील त्यास सुभेदारास पत्रे नवाब मवसुफ व आमची आहेत हे देऊन जाबसाल उगऊन कुळकर्णाचे वतनाची बरखास्त करून द्यावी व पा कनेड एथील देशमुख व देशपांडियेपणाचे गुमास्तगिरीचें काम राजश्री कोनेर बाबूराव यांजकडे याचे तर्फेने माहालीं शाहाजी पा कामावर त्यास आजपावेतो नवाब अजीमुदौली बाहादूर यांचे आमलांत उपद्रव नाहीं सांप्रत पहिले गुमास्ते तेथे येऊन कुचष्टा करून सुभेदार यांचे सजावले पाटील मजकुरावर पाठऊन शंभर रुपये रोजाचे घेतले आणि सजावलास बरखास्त दिल्ही नाही ह्मणोन वर्तमान त्याजवरून हें पत्र लिहिलें असे की मारनिले आमचे पदरचे असे अस्तां हे सुभेदार याणी एकाचे सांगितल्यावरून करणे ठीक नाही याजकरितां तुह्मी नवाब आहसनुदौला बाहादूर यासी व राजश्री बाळाजी नाईक यांसी बोलून व आह्मी उभयतास पत्रे लिहिली आहेत हे देऊन शंभर रुपये रोजा बा माघारें देवऊन सजावलास बरखास्त देवावी व पो यांसी कोण्ही काविष न करीत तें करवावें र।। छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

                                                                                             लेखांक ६६.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी नाईक स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत आसिले पाहिजे विशेष कसबे कनड वगैरे देह पांच एथील कुळकर्ण राजश्री सिवराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे त्यास याजकडे अजीमुदौली यांचा खासगत ऐवज येणे होता सबब त्याणी कुलकर्णाची जप्ती करूने ऐवज घेऊन जमीदारास व आमीलास बरखास्त दिल्ही या संधीत त्यांजकडील सुभेदारीचे काम दूर होऊन आपली बाहाली जाली जप्तीचे काम तसेच बहिवाटीत आले जप्ती काही एथून सरकारांतून नाही याजकरितां सांप्रत नवाब अजमुलउमरा बाहादूर याणी तुह्मास पत्र लिहिलें आहे त्या प्रो कसबे कनड वगैरे पांच गांवचे कुळकर्ण सिबराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे याजकडे ज्यारी करून द्यावे दीमत पडों नये मारनिलें आमचे पदरचे याजमुळें यांचेहि एकविसीं साहित्य करीत जाणे हे कामे आमची खासगत जरूरीची याजकरितां लिहिण्यात येतात याचा बोभाट न ये तें करावें र।। छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

राजश्री बालाजी नाईक औरंगाबादकर                                               लेखांक ६५.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
सुभेदार यांचे नावें पत्रें
राजश्री कोनेर बाबुरावे याजविसी
रा छ ९ जावल सन १२०२.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी नाईक स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित आसिलें पाहिजे विशेष पा कनड येथील देशमुखी व देशपांडिये-पणाचे गुमास्तागिरीचे काम राजश्री अनंदराव जाधवराव यांजकडोन राजश्री कोनेर बाबूराव यांचे पुत्राचे नावें तेथील कामावर यांजकडोन शाहाजी पाटील आहे त्यास अजपावेतो नवाब अजीमुदौला सुभेदार होते त्याजकडोन कोण्हेविसी उपसर्ग जाला नाहीं सांप्रत पहिले गुमास्ते तेथें आहेत त्यांचे सांगितल्यावरून काही कागदपत्राविसी स्वार सजावल पाठऊन रोज खुराक वगैरे उपद्रव केला आहे त्यास हे गुमास्ते नवे यांस कागदपत्राची माहीतगारी नाहीं आणि माहालांत कची कमावीस तुमची जमीदाराचे स्वाधीन काय आहे तथापि मारनिले आमचे पदरचे यांचे हरएकविसी साहित्य होत असावे व यांचा आगत्यवाद धरून चालवावे असे आहे याजकरितां हे पत्र लिहिले असे की पाटील मजकूर यांजपासोन रोजाबाबत रुपये घेतले असतील ते माघारे देऊन स्वारीस बरखास्त द्यावी पुढे पहिले गुमास्ते यांचे सांगितल्यावरून उपद्रव कोण्हेविसीं न करावा पाटील मार याचे हरएकविसीं साहित्य करून हाकरुसूम वाजवी प्रो आमीलास व मुकदमास ताकीद करून देवावा आह्मास आगत्य त्यापक्षीं तुह्मीहि आगत्यवाद धरून साहित्य करीत जावें घराउ काम जाणून लिहिलें असे फिरोन बोभाट न ये ते करावें छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

गोविंदराव कोकाटे मोकासी बसिर.                                                लेखांक ६४.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
कर यास पत्र सदासीव भटोजी
आमील पा मार यांजपासी दिल्हे
छ ९ जावल.

राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावी-
 5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष पा बासर एथील जागीर कसबे मार वगैरे देह नऊ एथील राजश्री बद्रीनाथराव हरकारे यांची तेथील मोकासा मामुल प्रा तुह्मांकडे दरसाल फडच्या करून देत असतां सन ११९५ सालापासोन फडच्या करून घेऊन कौल हुजती मारनिलेस देत नाही व दस्तऐवजा प्रा वर्तणूक होत नाही ह्मणोन समजलें त्यावरून लिहिलें असे त्यास सुदामत पेशजीपासोन मामुल चालत आल्याबमोजीब फडच्या करून घेऊन कौल रसीदा सालोसालच्या सन ११९५ पासोन द्याव्या सेरी व तहरिरीचा जाबसाल माहली पंच्याणव सालापूर्वी तुमचा व जागीरदाराचा चालत आल्या प्रा चालावे गैरवाजवी दिकत करणे नीट नाही याउपरि सुरळीत फैसला मागील होऊन पुढें मामुल प्रा सन १२०२ सालचा फडच्या करून घेऊन सालोसाल कौल हुजती देत आल्या प्रा द्याव्या बोभाट नसावा आमल आलीयावर तालुक्यांत उगीच खटला होऊ नये रा छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

व्यंकटराम पिला चैनापटणकर याचें                                              लेखांक ६३.                                                           १७१४ पौष शुद्ध १०.
पत्राचें उत्तर र।। छ ८ जावल.

राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्री गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष पेशजी तुह्मी तीन वेळा पत्रे पाठविली ती पावली पुण्यास रवाना केली त्याची उत्तरें एथून आह्मी छ ११ र।।खरी टप्यावरून रवाना केलीं आहेत त्यावरून कळेल हली तुह्मा कडोन । पत्रें आली छ २७ रबिलावलचें छ १९ राखरी पावलें व छ ८ रबिसानीचे छ १९ मिनहून पावलें पत्रे व अखबारा पुण्यास रवाना केल्या उत्तर आल्यानंतर रवाना करण्यांत येतील यानंतर तुमचे लिहिण्यांत की आपले यादी प्रा सर्व सरंजाम सिद्ध आहे मागाहून रवाना करण्यांत येईल त्यास सरंजाम लौकर रवाना करावा व त्याजबराबर तीन जोड्या मर्तबानाच्या चिनीच्या वरती झांकणी कुलाबेदार कुलफी मजबूत एणे प्रा घेऊन सदरहू जिनसा बराबर रवाना करावे.

२ मर्तबानची जोडी १ आंत दीडसेर जिंनस मावे असे दोन
२ मर्तबानची जोडी १ आंत सेरभर जिंनस मावे असे दोन
२ मर्तबानची जोडी १ आंत आधसेर जिंनस मावे असे दोन
----


साहा मर्तबान चांगले घेऊन पाठवावे तुह्मी नीम अस्तीनीचा मार लिा त्यास तुमचे सांगण्यांत आले नवतें हली समजलें याउपरि तयार करावयास येईल चंगेरे दोन फुलें ठेवावयाचे जालदार लोखंडी रोगन केलेले २ व विलायती सफेद तांब्याच्या दोन चंगेर दोन एकूण च्यार चंगेरदान जरूर पाठवावे अलीकडे तुह्माकडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर वरचेवर पत्र पाठवीत जावे रा छ ८ जावल बहुत काय लिहिणें हे आसिर्वाद.