लेखांक ३४. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
पु।। राजेश्री व्यंकटराम पिला गोसावी यांस-
आसिर्वाद विनंति उपरि तुह्मी पत्री मार लिहिले त्याची उत्तरें.
काल-हास्ती तिमाना येड व बेम- राज पालेकर नारसिंव्ह ध्वज यांजला पत्रें व वस्त्रें आपण दिल्ही ती प्रविष्ट केली तिकडून जबाब वस्त्रे येणार ह्मणोन लिहिले उत्तम आहे. कलम १ |
सुभानराव यांस कार्यभाग अनुकूल करून सत्वर रवाना करावे ह्मणोन लिो त्यास मारनिल्हेस इकडून पत्र देऊन पुणियास रवाना केले आहे त्याजकडून अद्याप पत्रें आली नाहींत आल्यानंतर लेहून पाठऊ सुभराव यांचे नांवे पत्र पाठविलें तें पुणियाकडे रवाना केले. कलम १ |
जाबित्यो बमोजीब सर्व संरजाम पालखी सुध्धां तयार जाला मागाहून रवाना करितों त्यासमागमे हुजुरात नवाब अजमुल-उमरा बाहादूर व रायेरायां यांस हि जिनस पाठवितों ह्मणून लिहिलें उत्तम आहे सरंजाम रवाना करावा येथे पोहोचल्यानंतर ज्याचे त्यास पावती करून आपल्या कडील ठेवितां येईल. कलम १ |
राजेश्री रामचंद्रपंत निा भोंसले यांव जला तुमचे पत्र पावतें करून त्यासी बोलण्यांत आले मारनिलेकडून दर जबाब घेऊन पाठविला आहे. कलम १ |
पेशजी खर्चाकरितां दोनसे रुपयाचा तमसुक लिहून पाठविला होता या-दरजवाबांत आह्माकडे रवाना करावा ह्मणोन लिो त्यास कुशल-पुरी येथून गेले त्याणी मार्गीहून मनुष्याकरितां समागमे पत्र व दोनशाचा तमसुक पाठविला त्याजवरून सुभराव याचे मारफात दोनसे रुपये माणसापासी दिल्हे परंतु ऐवजाची निभावणी मार्गी होणार नाहीं सा माणसाने ऐवज समागमे न घेतां माघारा दिल्हा तमसुक सुभराव यांणी परतोन घेतला त्याजपासी आहे. कलम १ |
राजेश्री रघोत्तमराव यांस कुशल सुभराव यास पांचसे रुपये खर्चा |
९ कलमे सुध्धां सात रा छ ११ राखर हे असिर्वाद.