Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब व्यंकटराम पिला यांचे चेना- लेखांक ३२. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
पटणास इंग्रजांचे डाकेवरून रवाना
करावयास मिस्तर किनवीस दिल्हे
छ ११ राखर.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी छ १० व छ १२ व छ २२ रविलावलचीं पत्रे पाठविली ती छ ४ व छ ८ राखरीं तीन दफेचीं पोहोचून लिहिल्याप्रमाणे सविस्तर मजकूर ध्यानास आला छ २८ माहे सफरी चिनापटणास कुशलपुरी पोहोचल्याचें लिहिल्यावरून कळलें. राजश्री नाना यांचे नावें तुह्मी आपली अर्जी व अखबार लेहून बेगोंद पाठविली ते पाहून तीन वेळाचीं पत्रें व अखबारा लाखोटे गोंद करून पुणियाकडे रवाना केले तिकडून डांकेवर उत्तरें आलीं ह्मणजे तुह्माकडे रवाना होतील वरचेवर तिकडील सविस्तर वर्तमान लिहून पाठवित जावे काळा वाळा पाठविला तो पावला कागदांत लपेटून वाळा पाठविला याजमुळें त्याचा सुगंध गेला याजकरितां वाळा तेथून पाठविणें तो कागदांत लपेटून पाठवूं नये त्याचा सुवास न जाये ऐशा बंदोबस्तानें रवाना करावा ह्मणजे उपयोगी पडेल तुमचे सेवटील पत्र आले त्यांत च्यारदफे पत्रें पाठविलीं पावलीं कीं नाहीं उत्तर पाठवावें ह्मणोन लिहिलें त्यास आह्मापासी तीन वेळाचीं पत्रे पावलीं त्याचा तपसील तारीखवार सदरी लिहिला आहे मिस्तर किनवी याजकडे आली सांगून पाठविलें कीं च्यार दफे पत्रें पाठविली ऐसे आमचे पत्रांत लिहिली असता तीन वेळाचीं पत्रे पोहोंचली एक रवानगीचीं पत्रे काय झाली याचा निरोप त्याजकडून आला की आह्मापासी पत्रे आलीं तितकी आह्मीं दिल्ही यापरतें पत्र इकडे नाहीं त्यास चौथे रवानगीचे पन्नाचा शोध तेथे करावा. रा छ ११ राखर बहुत काये लिहिणें हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब मानाजी प्यादा माडींस लेखांक ३१. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १२.
छ १० राखर.
मो मानाजी टिळेकर कामगारी मौजे खडकी यास सु।। सलास तिसईन मया व अलफ पत्र पाठविलें ते पावलें बैलाची चंदी मना झाली इतके दिवस गवत हिरवे होते चंदीचा गुमाने नवता. हाली चंदीची परवानगी अवघ्या बैलास जाल्यास उत्तम नाहीं तर च्यार बैल निबर आहेत त्याचे चंदीची आज्ञा यावी ह्मणोन लिा त्यास बाळाजी रघुनाथ पुणियाहून येतेवेळेस ते नेमून देतील जाणिजे छ १० राखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब नंदगांवकर पाटील यांस छ १० राखर. लेखांक ३०. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १२.
अजस्वारी राजश्री गोविंदराव कृष्ण ता गुरसात पागुंड मोकदम मौजे नंदगाव सा सलास तिसईन मया व अलफ अर्जदास्त पाठविली ती पोहोचून मजकूर समजला मौजे मारचा खरीफचा ऐवज सर्व वसूल करून राजश्री अंताजी निराजी यांजकडे दिल्हा ह्मणोन लिा ते कळलें पुढेंहि ऐवज वरचेवर वसूल करून पोते दाखल करणें. गांवचे कामाची बंदोबस्तीविषई अंताजीपंतास आज्ञा यावी ह्मणून लिो त्यावरून मारनिल्हेस ल्याहावयाचे ते लि।। आहे. जाणीजे छ १० राखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब नारायण देशमुख देशपांडे लेखांक २९. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १२.
पो माडीं छ १० राखर.
राजेश्री नारायण जीवनराव देशमुख देशपांडे पा मार्डी स्वामी गोसावी यांसी-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणे विशेष तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें सालमारी पर्जन्य कमी कुटुंब थोर दोन मुलीचे लग्नाची चिंता त्यांत निळकंठराव धाकटे बंधूचा काल जाला वृत्तीचा बंदोबस्त करून देणें स्वामीकडे आहे ह्मणोन तपसिले लिहिलें तें समजलें त्यास सालमारीं चहूंकडे पर्जन्याची अवस्था येकसारखी आहे तथापि पा मारीं आहे. निळकंठराव वारल्याचें वर्तमान लिहिल्यावरून वाईट वाटले ईश्वरी सत्ता यास उपाय नाहीं वृत्तीचे बंदोबस्ताचा प्रकार आह्मी पुण्यास आल्यानंतर जे वाजवी तेच समजोन करण्यांत येईल रा छ १० राखर सलास तिसईन हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
साहेब मेहरबान दोस्तों अलह्यावर लेखांक २८. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ११.
जंग बहादूर सलमहुँताला.
अज- दिल- येखलास गोविंदराव कृष्ण सलीम आंकी येथील खैर अफियेत जाणून आपली खैर खुषी हमेषा कलमी करीत जावी दिगर मजमुन पा उटकूर येथील मोकासा व बाबती व सरदेशमुखी सन १२०१ साल बाबत मामंलतीचा ऐवज फडच्या करून देण्याविषईं नवाजषनामा आपले नावें नवाब अजमुलउमरा बाहदूर यांणीं दिल्हा तो राजश्री बाजीराव बापूजी निा राजश्री रामचंद्रराव नागनाथ यांस पाठविलें आहे. तनखाचा नवाजषनामा मारनिल्हे देतील त्या बमोजीब येक महिन्याचे मुदतीत मोकासा बाबती सरदेशमुखीचा झाडून ऐवज मारनिल्हेस पावते करून रसीदा दोन सदरहू ऐवजाच्या घ्याव्या सन १२०१ साल गुजरून दुसरे साल आले अद्याप मामलतीचे ऐवजाचा फैसला नाहीं या बाबे नवाब-मवसूफ यांसी बोलणें जालें त्यावरून येका महिन्यांत ऐवजाचा फडच्या करून देण्याचा करार ठराऊन आपल्यावर नवाजषनामा तनखा करून दिल्ही त्यास या ऐवजास दिवसगत न लावितां ऐवज नगदी मारनिल्हेस पोहचाऊन रसीदा घ्याव्या या कामाकरितां नवाबांनीं खिजमतगार पाठविला आहे तनख्याचे मुदतीबमोजीब येक महिन्यांत ऐवजाचा फैसला करून देण्याचे असल्यास मारनिल्हेस ठेऊन फडच्या करून द्यावा कांहीं हरकत असल्यास नवाजषनामा फिरोन पाठवावा येथे फैसला करून घेता येईल रा छ ९ राखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
माणिकराव चिमणाजी धायगुडे. लेखांक २७. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ११.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री माणिकराव व रामराव धायगुडे मोकासी पा खंदार स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें विशेष पा मजकूर येथील जागिरीची अमीली सरदारुल मुलूक बहादूर यांजकडून राजेश्री कोन्हर हरी यांणी करून मारनिल्हे महाली आले आहेत त्यास पा मजकूरचे सन १२०१ साल बाबत मोकाशाचे ऐवजाची तोड सरदारुल-मुलूक याणीं येथे ठराविली आहे त्यास तुह्मी तालुकियांत मामलतीचे ऐवजाकरितां उपसर्ग करू नये मौजे मालेकुली तुह्माकडे चालत आहे त्याप्रो तेथील वसूल तुमचे तुह्मी घ्यावा वरकड गावगना सन १२०१ बाबत मामलतीचा तगादा करूं नये सन १२०२ साल बाबत महोली मोकाशाचा अमल सुदामत प्रा फडशा करून घ्यावा. हरयेक गैरवाजवी बोभाट येऊ नये रा छ ९ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सदरहूप्रो दोन पत्रें भोलानाथ बिन लेखांक २६. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १०.
सिद्धेश्वर शास्त्री यांजविषई दिल्हीं.
पत्रें कोन्हेर हरी आमील सरदार मुलूक-बहादूर यांणीं
मागितली त्याजवरून दिल्हीं छ ९ राखर.
गिरमाजी विठल निा धरमसिंग जाधव.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गिरमाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें विशेष बाबूराव पाटील मौजे अडगांवकर याचे गैरवाका सांगितल्यावरून मौजे मजकूर येथील नारायणजी पाटील यास मुलेंमाणसें सुद्धा तुह्मी धरून नेऊन कैद केलें मारहान नानाप्रकारें उपद्रव देतां ह्मणोन कळलें त्यास खांदार तालुकियांतील गावचे पाटलास धरून नेण्याची निसबत तुमची नसतां पाटील धरून नेऊन कैद करावयाचे कारण काय याउपरि पाटील मार यास बायेकामुले सुद्धा सोडून द्यावें येविषीचा फिरोन बोभाट येऊ न द्यावा रा छ ८ साखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक २५. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राधाजीपंत व जयरामपंत देशपांडे ता मानूर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष वेदशास्त्रसंपन्न राजेश्री भगवंतभट बिन दयारामभट चंद्रात्रे अंतापूरकर वास्तव्य नासिक यांस ता मार येथील सायेरावर रोज आठ आणे शमषुल-उमरा बाहादूर यांणीं पुत्रपौत्रादि वंशपरंपरा सनद करून दिल्ही आहे त्याप्रो सालगुदस्त रोजाचा ऐवज यांस पावला पुढें दरसाल सदरहूप्रो रोजाचा ऐवज पावता करावा भोगवट्याकरितां तुह्मी आपलें पत्र यांचें नांवाचें करून द्यावें यांचें अगत्य आह्मास में तुह्मांस माहित आहेच त्यापक्षीं विस्तारें लिहिणे न लगे अगत्य धरून रोजाचा ऐवज दिकत न घेतां पावता करीत जावा व भोगवट्यास पत्र करून द्यावें रा छ २ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
दयारामभट पुराणीक याजपासीं पत्रे लेखांक २४. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
मानूरकर जमीदारास दिल्हीं.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राधाजीपंत व जयरामपंत देशपांडे ता मानूर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष वेदशास्त्रसंपन्न राजश्री भगवंतभट बिन दयाराम भट चंद्रात्रे अंतापूरकर वास्तव्य नासिक यांस ता मजकूर येथील सायेरावर रोज आठ आणे शमषुल-उमरा बहादूर यांणी पुत्रपौत्रादिवंशपरंपरा सनद करून दिल्ही आहे त्याप्रो सालगुदस्त रोजचा ऐवज पावता करावा व भोगवट्याकरितां तुह्मीं आपलें पत्र यांचे नांवचें करून द्यावे त्यांचे अगत्य आह्मांस हें। तुह्मांस माहित आहेच त्यापक्षीं विस्तारें ल्याहावें ऐसें नाहीं अगत्यवाद धरून रोजाचा ऐवज बेदिकत पावती करून लिहिल्या प्रमाणें आपलें पत्र भोगवट्यास जरूर करून द्यावें रा छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पांडुरंग रंगनाथ नि।। सरदेशमुख . लेखांक २३. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
साहोत्रा खंदार- यांस
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पांडुरंगपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष मौजे पांडुरणी वगैरे देह साडेतीन पा खंदार येथील सरदेशमुखी व सावोत्रीयाची मामलत तुह्माकडील याचा दरसाल मामुल बमोजीब ऐवजपैकीं चाहरूम तहकूफ ठेऊन बाकी ऐवजाचा फडचा करून घ्यावा ऐसें असतां तुह्मीं दरोबस्त ऐवज घेऊन च्याहरूम तहकूफ ठेवीत नाहीं ह्मणोन बोभाट आला त्यावरून लिहिलें असे त्यास पा मजकूरचे वरकड दिगर जागीरदारास च्याहरूम तहकूफ ठेऊन फडच्या करून घेतां त्या बमोजीब यांजकडील देहातीचे मामुलापैकीं वाजबी च्याहरूमचा ऐवज मवकूफ ठेऊन फैसला करून घ्यावा फिरोन बोभाट येऊ न द्यावा रा छ २ र।।वल बहुत काये लिहिणे लोभ कीजे हे विनंति.