Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

ठाकर - तस्कर (a thievish tribe) = ठक्कर, ठाकर. पूर्वेतिहासकालीं तस्कर ही एक रानटी जात होती. त्यांचे वंशज ठाकर. (महिकावतीची बखर पृ. ८४)

ढोर - धिग्वण्या-योगवाज्जातः पुत्रो दुर्भरसंज्ञकः ।
स कुर्याच्चर्मपात्राणि जीवनाय निरंतरम् ॥
जातिविवेकः ॥ 
डोहरु इति ख्यातः ॥ 

धिग्वणीच्या ठाई अयोगवापासून झालेला जो पुत्र तो दुर्भर होय. तो चामड्याचीं पात्रें करितो. दुर्भर = डुहहरं = ढोर. (भा. इ. १८३४)

तांडेल-तांडा म्हणजे नावांचा किंवा नावेंतील खलाशांचा समूह. तांड्याचा जो पुढारी तो तांडेल. तांडेल-तांडेला हा धंदावाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ ) + इरः (प्रेरक, चालविणारा) = तंडकेर (तांड्याचा चालक). तंडकेर= तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी ).
( महिकावतीची बखर पृ. ८० )

तांबट [ ताम्रकुट्ट = तामउट्ट = तामुट = तामट = तांबट ] ( भा. इ. १८३२ )

तिरगूळ - अपरान्तांत म्हणजे उत्तर कोंकाणांत सह्याद्रींत त्रिकूट नगर होतें. येथील राजांना व प्रजांना त्रैकूटक म्हणत. त्रैकूटक याचा प्राकृत अपभ्रंश वृद्धि जाऊन त्रिगुडअ असा होणें शक्य आहे. त्रिगुडअ याचें स्वल्पोच्चारित रूप त्रिगुड. हा त्रिगुड शब्द पद्मपुराणकारानें योजिला आहे, व तो प्राकृत आहे. ह्या त्रिगुड शब्दाचा मराठी अपभ्रंश तिर्गुळ तात्पर्य, तिर्गुळ हे ब्राह्मण आहेत व ते त्रिकूट ऊर्फ त्रिगुड या उत्तर कोंकणांतील प्रांतांत राहणारे होते जुन्नर व त्याखालील तळकोंकण यांत तिर्गुळांची वस्ती अद्याप हि आहे. त्रिकूट येथील राजे अभीर होते व त्रैकूटक ऊर्फ त्रिगुड ब्राह्मण दुष्टाचारवान् होते. सबब पद्मपुराणकाराच्यामतें पंक्तिदूषक होते. ( भा. वार्षिक इ. १८३६)
लोकांचें नांव ऐकू येतें.

तुषार - (१) विष्णुपुराणाच्या चतुर्थांशाच्या चोविसाव्या अध्यायाच्या तेराव्या कलमांत खालील वाक्य आहे:-

" ततश्चाष्टौ यवनाः, चतुर्दश तुषाराः,
मुंडा श्च त्रयोदश, एकादश मौनाः । ''

ह्या वाक्यांतील चतुर्दश तुषार कोण व कोठील हें शोधावयाचें आहे.

परत उत्तर [ प्रत्युत्तर = परत उत्तर ] ( भा. इ. १८३४)

परत जाणें [ प्रतियानं = परत जाणें ] (भा. इ. १८३४)

परतणें १ [ प्रति + ई = परत+णें = परतणें (अकर्मक)] परतणें म्हणजे उलट निघून जाणें. तो परतला म्हणजे उलट फिरला. (भा. इ. १८३५)

-२ [ प्रति + आयय् = परतणें (सकर्मक ) ] परतणें म्हणजे उलट फिरविणें. भाकरीं परतणें, भाजी परतणें म्हणजे भाकरी किंवा भाजी तव्यावर उलटसुलट फिरावणें. ( भा. इ. १८३५ )

-३ [ प्रत्त = परत ( परतणें ) ] परतणें म्हणजे परत देणें. ही वस्तू परतून ये. ( भा. इ. १८३६ )

-४ [ प्रती (प्रति + इ) = परतणें ] परतणें म्हणजे उलट येणें. तो परतला म्हणजे उलट आला. ( भा. इ. १८३६)

-५ [ प्रत्ययनं = परतअण = परतणें ] (भा. इ. १८३४)

-६ [ वृत १. परावृत्तं = परातलें, परतलें. परातणें (अशिष्ट) ] ( धा. सा. श. )

-७ [ अय् १ गतौ. प्रति + अय् (प्रत्ययते) प्रत्ययते = परततो ] ( धा. सा. श. )

परत भेट [ प्रत्यभ्यटनं = परत भेट ] (भा. इ. १८३४ )

परता [ प्रताम् (ग्लानौ निपातः ) = परता ] (भा. इ. १८३४)

परभारा १ [ भृ १ भरणें. परं विभर्ति इति परंभर: तस्य भावः पारंभर्य - पारंभर्येण = परभारा ] परभारा म्हणजे दुसर्‍याकडून, परस्पर. ( धा. सा. श. )

-२ [ ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायांत परवाहिर शब्द आला आहे. तो परवहि: ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. परवहि: = परवहिर = परवाहिर = परभारा ] (स. मं.)

परभारें [ परिवर्हेण = परिभारें = परभारें ] परिबर्ह म्हणजे परिवार, सेवकजन. परभारें काम होईल म्हणजे खुद्द मालकाकडून नव्हे, तर सेवकजनाकडून काम होईल म्हणजे परस्पर इतरांकडून काम होईल.

६ चित्तपावन हें स्थल किंवा प्रांत कोंकणांत कोठे असावा ? हें स्थल किंवा प्रांत तो असावा कीं, जेथें किंवा ज्यांत किंवा ज्याच्या आसपास चित्तपावनांच्या साठ आडनांवांत गर्भित असलेलीं ग्रामें आहेत, साठ आडनांवांतून जीं आडनांवें गुणांवरून किंवा धंद्यांवरून पडलीं तीं गाळून बाकीचीं जीं आडनांवें उरतात तीं सर्व ग्रामांवरून निघालेलीं आहेत. हीं ग्रामें ज्या प्रदेशांत असतील तो सर्व प्रदेश चित्तपावनसंज्ञक होय. आतां, प्रस्तुतकालीं हें नांव प्रचलित नाहीं, हें स्पष्टच आहे. नाहीं तर ह्या नांवाच्या व्युत्पत्तीसंबंधानें इतका घोटाळा माजला नसता. हा घोंटाळा सह्याद्रिखंडलेखनकालापासून चालू आहे. म्हणजे, सह्याद्रिखंडलेखनकालीं हि चित्पावन हा शब्द इतका रूढ व प्राचीन होऊन गेला होता कीं, त्याचा उगम लोकांस कळेनासा झाला होता.

७ चित्पावनांच्या आडनांवांत ' साठे' असे एक आडनांव येतें; हें साष्टिक: या शब्दापासून साठिआ (एकवचन), साठिए, साठिये, साठये, साठे आशा परंपरेनें निष्पन्न झालेलें दिसतें. तेव्हां साष्टि हा प्रांत चित्तपावन प्रांतांत पुरातनकालीं मोडत असावा. ' दाबक ' हें एक चित्तपावनांचें आडनांव आहे. दापपल्ली, दापोली या शब्दांतील जो दाप तेथील राहाणारा जो तो दापक. दापकः = दावकः = दावका, अशा परंपरेनें दाबक, दाबके हें आडनांव आलेलें आहे. अशी च परंपरा आणखी कांहीं आडनांवांची दाखवितां येईल. सारांश, दापोली हरणईपासून साष्टीपर्यंतचा जो मुलूख तो पुरातनकाळीं चित्तपावन या संज्ञेनें महशूर असावा. मालशे, पोंगशे वगैरे आडनांवें माल ( मालवण), पोंग ? वगैरे प्रांतवाचक शब्दांवरून निघालेलीं स्पष्ट दिसतात. चित्पावनांच्या आडनांवांसंबंधानें एक स्वतंत्रच लेख मी लिहिणार आहें; त्यांत कोंकणस्थांच्या सर्व आडनांवांचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे.

८ आतां चित्पावन किंवा चित्तपावन ह्या शब्दाचा अर्थ काय तो पाहूं. क्षितिपावन किंवा चितिपावन या शब्दाचा अपभ्रंश चित्पावन हा शब्द आहे. 'क्ष' चा 'छ' व ' छ ' चा ' च ' होऊन

क्षितिपावन = छितिपावन
               = चितिपावन
               = चित्पावन
असा अपभ्रंश होतो. क्षितौ पावन: क्षितिपावनः । पृथ्वीवर जो सर्वांना पावन करितो तो. क्षितिपावन अथवा चिति या शब्दाचा अर्थ हि पृथ्वी असा आहे, तेव्हां चितिपावन असा हि मूळ शब्द असेल. चित्पावन याचें भारदस्त पुन्हा संस्कृतीकरण ' चित्तपावन ' हें आहे. (भा. इ. १८३३)

जिनगर - अजिनकर = जिनकर = जिनगर. ऋभुभ्योऽ जनसंधं ( मा वा. सं. ३०-१५) अजिनसंधं चर्मसंधातारं (महीधर-वेददीप ३०-१५) चर्म ऊर्फ चामडें जोडणारा जो तो अजिनकर. तात्पर्य हा शब्द वेदकालापासूनचा आहे. जिनगरांना ह्याचा अभिमान असावा. (भा. इ. १८३३)

पन्हळ १ [प्रनाळ = पन्हळ ] (भा. इ. १८३७)

-२ [ प्रणाल: = पन्हळ ]

-३ [ प्रनाल: ] ( पन्हाळ पहा)

पन्हा (कापडाचा) [ परिणाह = पनाह = पन्हा (रुंदी) ] (भा. इ. १८३३)

पन्हाळ [प्रनालः = पन्हाळ, पन्हळ ]

पन्हें [ पानकं = पानें = पन्हें ] पानकं मूत्रलं हृद्यं ( शार्ङधर संहिता ) (भा. इ. १८३४ )

पन्हेरी [पानीयनालिः = पन्हेरी ] पाणी काढून दिलेली मोरी. प्रणालिः = पन्हळ; प्रणालिका = पन्हळी.

पर [ अय् १ गतौ. परि + अय्. पर्यायः किंवा परीतिः = पर, परी ] ही पर आम्हांस मान्य नाहीं म्हणजे हा पर्याय मान्य नाही. ( धा. सा. श. )

परकर [ परिकर: = परकर, परिकर (सन्नाह) ] पूर्वी पुरुषांच्या सन्नाहाला परिकर म्हणत.

परका भाव [ पृथक् भावः = परका भाव ]

परके [ पारक्यं = परकें ]

परगणा [ प्रघणः ( part cf a house, country ) = परगणा (पाणिनि ३-३-७९). प्रघाणः = परगाणा ] पंढरपूर परगाणा, असा पाठ गांवढे म्हणतात.

परचक्र [ प्रचक्रं = परचक्र ] प्रचक्र म्हणजे स्वारी वर निघालेलें सैन्य.
शत्रूचें सैन्य ह्या अर्थाचा (पर + चक्र) परचक्र शब्द निराळा. खारीवर निघालेल्या स्वकीय सैन्याला हि परचक्र म्हणत.

परज [ परंज (तेलाचा घाणा, चरक) = परज ] परजांत टाकणें म्हणजे चरकांत घालणें, तुरुंगांत घालणें.

परजळणें [ परिजल्पनं = परजळणें, परचळणें ] ( भा. इ. १८३४)

परटी [ परिमृष्टि = परिटी = परटी ] परिटाचें कर्म. ( भा. इ. १८३५ )

परडी-डें [ प्रधिः the periphery of a wheel = परडीं-डें ] hence ground round about a house.

परडें १ [ परिधिः a fence, ground within a fence = परडें ]

-२ [ परिधि = परिडि = परडा, परडें ] घरामागील कुंपण घातलेलें परसूं, जमीन. (भा. इ. १८३६ )

परत १ [ प्रत्यक् = परत ] प्रत्यगानयत् = परत आणिलें, प्रत्यक म्हणजे उलट.

-२ [ Vaidik प्रतीत्त (प्रति + दत्त) given back = परत) प्रतीत्तं करोति = परत करतो ]

३ तेव्हां आतां ह्या शब्दाची व्युत्पत्ति ऐतिहासिक पद्धतीनेंच लाविली पाहिजे. म्हणजे एखाद्या विश्वसनीय लेखांत ह्या शब्दाचे रूप कसें येतें तें पाहून त्यावरून ह्या शब्दाचें मूळ शोधिलें पाहिजे. चित्पावन किंवा चित्तपावन हा शब्द शालिवाहनाच्या चवदाव्या शतकाहून प्राचीन अशा लेखांत किंवा ग्रंथांत आढळत नाहीं. त्यापुढें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून हा शब्द विशेष आढळूं लागतो. पेशवे चित्पावन होते, त्यामुळें ह्या शब्दाला जगप्रसिद्धि आली व चित्पावन कोण, कोठील वगैरे चिकित्सा सुरू झाली. पेशव्यांच्या आधीं या शब्दाच्या व तद्वाच्य अर्थाच्या कडे, अर्थात्, कोणीं यत्किंचितहि लक्ष दिलें नव्हतें.

४ चित्तपावन हा शब्द सह्याद्रिखंड किंवा शतप्रश्नकल्पलता या संस्कृत ग्रंथांखेरीज इतर स्वतंत्र हस्तलिखितांत सांपडतो कीं काय हें पाहात असतां, कोंकणांत अलीबागेस एका गृहस्थाच्या दप्तरांत किरवंतांच्या संबंधानें मला एक संमतिपत्र चार पांच वर्षांपूर्वी (हा लेख भा. इ. संशोधक मंडळाच्या शके १८३३ च्या इतिवृत्तांत छापलेला आहे) सांपडलें होतें, त्यांत हा शब्द आढळला. पत्र ' पूर्तकाली ' कागदावर लिहिलें आहे. हें बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत केव्हां तरी लिहिलें असावें. शक, मास, तीथ, वार वगैरे कशाचाहि उल्लेख पत्रांत नाही; त्यामुळें नक्की वर्ष सांगतां येत नाहीं.

५ संमतिपत्रांतील एक सही अशी आहे :-
" संमतोयमर्थः सदाशिव (भ) ट्ट दीक्षित चितळे चित्तपावनस्थ धर्माधिकारी ”
ह्या ओळींत चित्तपावनस्थ हा शब्द आला आहे. ह्याचा अर्थ काय, तें आपणास पहावयाचें आहे. कोंकणस्थ, देशस्थ, करहाटकस्थ, गोमांतकस्थ, गोकर्णस्थ इत्यादि सजातीय प्रयोगांत स्थ हा शब्द स्थलवाचक नामांशीं जोडलेला आढळतो. त्याप्रमाणेंच चित्तपावनस्थ ह्या समासांत चित्तपावन या स्थलवाचक नामाशीं ' स्थ ' हा शब्द जोडलेला आहे, असें म्हणावें लागतें. चित्तपावनस्थ ह्या सामासिक शब्दाचा अर्थ चित्तपावनजनस्थ असा हि होईल. परंतु कर्‍हाडे, किरवंत, पळशे, शेणवी, सुतार, पांचकळशी, अशा प्रत्येक जातीला पृथक् पृथक् धर्माधिकारी नेमण्याचा संप्रदाय आपल्या देशांत प्राचीन काळीं नव्हता व सध्यां नाहीं. तेव्हां चित्तपावन म्हणजे चित्तपावन लोक अथवा जन असा अर्थ येथें घेतां येत नाही. चित्तपावनस्थ म्हणजे चित्तपावनप्रांतस्थ किंवा चित्तपावनग्रामस्थ असाच अर्थ स्वीकारणें अपरिहार्य आहे. ह्या अर्थस्वीकाराला दुसरें हि एक प्रमाण आहे. संमतिपत्राच्या दुसर्‍या सहींत

" संमतभिदं महादेव भट्ट खरे
ग्वाहागरकर प्रांत धर्माधिकारी ”
म. धा. ३३

प्रांत धर्माधिकारी असे शब्द आहेत तेव्हां येथें धर्माधिकारित्व स्थलविशिष्ट आहे, जनविशिष्ट नाहीं, हें स्पष्ट आहे. तात्पर्य, चित्तपावन हें स्थलनाम आहे, लोकनाम नाहीं.

पत [ प्रत्ययः ( वचन Credit ) = पत = प्रतीति ] प्राणादपि प्रत्ययो रक्षितव्यः ( कौटिल्य )

पतंग [ पत्रांग = पतंग ( रक्तचंदन ) ] वृक्षविशेष. (भा. इ. १८३७)

पंती [ पणास्त्री harlot = पंती ] ही पंती दिवे लावणार this harlot will make a mess.

पत्तन [ पतन हा शब्द संस्कृत नाही. प्राकृत आहे. प्रस्थान ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश पट्टण व त्याचा अपभ्रंश पत्तन असावा. पट्टण व पत्तन हे दोन्ही अपभ्रष्ट प्राकृत शब्द पुढें संस्कृतांत जसेच्या तसे घेतले गेले, असें दिसतें. ] (भा. इ. १८३२)

पत्ती [ पक्तिः = पत्ती ] पत्तीचीं पानें म्हणजे विड्याचीं चांगलीं पक्कीं पिकविललीं पानें.

पत्नी - येथें नी हा स्त्रीलिंगी प्रत्यय लागला आहे. इंद्र ह्याचें. स्त्रीलिंग इंद्राणी. येथें नी प्रत्यय आहे. तो च नी प्रत्यय पति या शब्दाला लागून पतिनी असें पूर्ववैदिक रूप होत होतें. ह्या पतिनी शब्दाचा वैदिक अपभ्रंश पत्नी. इंद्रभर्व० इत्यादि सूत्राच्या पुढें पाणिनीनें पत्नी हा शब्द साधण्यास, खरें म्हटलें असतां, एक सूत्र द्यावयाचें होतें व तेथें असें सांगावयाचें होतें कीं, पति ह्या शब्दाला नी हा स्त्रीप्रत्यय लागतांना त्याच्या टि चा लोप होतो. (भा. इ. १८३४)

पत्राज, पत्राजा [प्रत्रसा = पत्रसा = पत्राझा = पत्राज ] पत्राज म्हणचे भय. (भा. इ. १८३४)

पथक [ पत्तीनां समूहः पत्तं । पत्तमेव पत्तकं, पत्तकं = पथक ] पथक म्हणजे पाइकांचा समूह.

पथारी [ प्रस्तारी ] ( धातुकोश-पथार पहा)

पदर [ प्रदर (प्रदृ म्हणजे प्रकर्षानें फुटणें) = पदर ] मुलीला पदर आला म्हणजे प्रदर आला म्हणजे रजःस्राव झाला. (भा. इ. १८३६)

पदोपदों [ पदे पदे = पदोपदीं ]

पंधरवडा [ पंचदशावर्त (क)=पन्हरावडअ=पंधरावडा = पंधरवडा. पंधराव्या दिवशीं ज्या कालमानांत त्याच दिवसाची आवृत्ति होते तो पंधरवडा. अशिष्ट लोक पंधरावडा असा उच्चार करतात. (भा. इ. १८३३)

पंधरा [पंचापरदशन्] ( अकरा २ पहा)

पंनास [पंचाशत्] (विंशति पहा)

कुळवाडी [ कुलपालकः (दोन बैलांनीं नांगरली जाणारी जमीन करणारा ) = कुळवाडी. कुलपालिका = कुळवाडीण ]

कोळी १ - कुपिनिन् = कुइलि = कोळी one who plies his trade of fishing with कुपिनी a bamboo instrument called खून.
-२ कूलिन् = कोळी (समुद्रतीरचा ) कोळी म्हणजे समुद्रतीरचा माणूस. कोल या शब्दापासून निघालेला कोळ शब्द व लोक या समुद्रतीरच्या कोळ्यांहून निराळे. (भा. इ. १८३५)
-३ कूलिन् = कूळी = कोळी. कूलिन् म्हणजे समुद्राच्या किंवा नदीच्या किंवा गिरिणदीच्या कांठीं राहून उपजीविका करणारा मनुष्य. ह्यावरून इंग्रजी कूली शब्द निघाला आहे. (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. २१०)

गुज्जर किंवा गुजर्र - गुह्यराज् = गुज्जराअ = गुज्जर.
गुज्जर शब्दाचें पुन्हा संस्करण गुर्जर.
गुह्यराज् हें गुह्यक लोकांनी आपणांस घेतलेलें भूषविणारें नांव. ( भा. इ. १८३५ )

गोहेल - गुहेरः (protector, guardian) = गोहेल.
गोहेल ही एक रजपुतांची कुळी आहे.

चितपावन - क्षेत्रपावन -चेत्तॅपावन (महाराष्ट्री) = चितपावन. परशुराम क्षेत्राला पवित्र करणारे ब्राह्मण ते चितपावन हीच या शब्दाची व्युत्पत्ति खरी. क्षितिपावन = चितिपावन चितपावन. पृथ्वीला पवित्र करणारे जे ब्राह्मण. (भा.इ. १८३३)

चित्पावन - १ हा शब्द ' चित्पावन ” व चित्तपावन अशा दोन रूपांत आढळतो. विशेष प्रतिष्ठितपणें बोलावयाचें किंवा लिहावयाचें असलें म्हणजे ' चित्तपावन' हें रूप योजतात. परंतु सामान्य रोजच्या उपयोगांत चित्पावन हैं रूप हमेशा येतें.

-२ ह्या शब्दाची व्युत्पत्ति अनेकांनी अनेक प्रकारांनीं केलेली आहे (१) चितेपासून पावन झालेले जे ते चित्पावन. (२) चित्त पावन ज्यांचें झालें ते चित्तपावन. (३) तिसरी व्युत्पात्ति जरा चमत्कारिक आहे. 'इजिप्त' ह्या शब्दाचा अपभ्रंश ' चित् ' आहे, असें गुंजीकर म्हणतात ! ह्यांपैकीं एकही व्युत्पत्ति ऐतिहासिक नाहीं; सबब ग्राह्य करण्याला अडचण येते. (१) स्मशानांत मेलेलीं शवें जिवंत झाली व त्या पुरुषांना पुढें जी संतति झाली, ती ' चित्पावन ' या नांवाची मालक झाली, हा आधार पहिल्या व्युत्पत्तीला देतात; ऐतिहासिक रीत्या आधार आधेयाच्या पूर्वकालीन असावा लागतो, मानवी व्यवहारांत शक्य असावा लागतो, व साक्षात् घडला असल्याचा त्याला पुरावा असावा लागतो. ह्या तिन्ही बाबी प्रस्तुत आधारांत विद्यमान नाहींत. कां कीं, आधेयाच्या पश्चात् आधाराची कल्पना केलेली दिसते. चितेवर ठेवलेलीं शवें उठल्याची हकीकत फारशी शक्य दिसत नाहीं. आणि यदाकदाचित् शक्य मानिली, तत्रापि ती कालदशादींनीं परिछिन्न नाहीं. अर्थात् ही व्युत्पत्ति ग्राह्य नाहीं. (२) दुसर्‍या व्युत्पत्तीला आधार धर्मभ्रष्ट झालेल्यांच्या चित्तशुद्धीचा देतात. तोही कालदशादींनीं विशिष्ट नाहीं, सबब तो हि इतिहास नाहीं. ( ३ ) तिसरी व्युत्पत्ति हि कालदेशादि-अनिर्देशास्तव अग्राह्य च होय. ' इजिप्त ' शब्दांतला जो ‘ जित् त्याचा अपभ्रंश ' चित् ' अशी कल्पकानें कल्पना बसविली आहे. ह्या पद्धतीनें वाटेल त्या शब्दापासून वाटेल तो शब्द निघूं शकेल. उदाहरणार्थ, चितागांग वगैरे. परंतु ऐतिहासिक सत्यतेच्या कक्षेत येण्यास त्याला अनेक अडचणी येतील. सबब ह्या तिन्ही व्युत्पत्त्या अग्राह्य होत. अर्थात्, सह्याद्रिखंड, शतप्रश्नकल्पलता वगैरे संस्कृत परंतु अर्वाचीन ग्रंथ ह्या प्रकरणीं बिलकूल विश्वास्वं दिसत नाहींत.

पडेल [ पतयालु disposed so fall. = पडआल = पड्याल, पडेल ] तो पहिलवान पडेल आहे.
कुस्तींत हार खातो त्याला पडेल, पड्याल+ म्हणतात. (भा. इ. १८३४)

पडोशी [ प्रत्यूषे = पड्डूसी = पडोषी, पडोशी ] पडीशी म्ह० पहाटे. (भा. इ. १८३४)

पड्या [प्रतीपः = पडिआ = पड्या ] मित्रः प्रतीपः = पड्या स्नेही म्हणजे उलट जाणारा मित्र.

पड्याल [पतयालुः ] (पडेल पहा)

पढतमूर्ख [ प्रति (नि) विष्ट = पडि (णि ) इट्ट = पडि (णि ) ट्ट = पडिट्ट = पडट्ट = पढत ] पढत हा शब्द प्रतिविष्ट किंवा प्रतिनिविष्ट शब्दापासून निघालेला आहे- पठ धातूशीं कांहीं एक संबंध दिसत नाहीं. (भा. इ. १८३४)

पढिअ [ प्रिय = परिअ = पढिअ. प्रियः = पढिओ ]

पढियंता [ प्री संतुष्ट होणें, प्रीयमाण = परीयन्त = पढियन्त (ता-ती-तें) loving, loved.

पढियो [ प्रतिग्रहः = पडिघो = पडिहो = पढियो ] प्रतिग्रह म्हणजे प्रेम, मर्जी. प्रथमा एकवचन. ( ज्ञा. अ. ९ पृ. ९)

पढीक [प्रधी + क very intelligent = पढीक ] very intelligent naturally. पढीक वैद्य a medical practitioner who is very intelligent but not regularly educated in the profession.

पण [ पणः (प्रतिज्ञा) = पण ] पणबंधः = पण बांधणें. पणजा [ आर्यक = अज्जअ = आजा. प्रार्यक = पज्जअ; पणतोंड शब्दांतील णच्या धर्तीवर = पणज्जअ पणाजा = पणजा ] (भा. इ. १८३३)

पणजा-जी-ज [प्रार्य्यक] (पाणजा पहा)

पणती [ पण्यस्त्री = पणती ] दिवटी, रांड.

पणतु-ती-त [ प्रणप्तृ = पणत्तु = पणतु-ती–त ] (स. मं. )

पणतोंड [ पणप्तृगंड = पणत्तुअंड=पणातोंड=पणतोंड ] (भा. इ. १८३३)

पणा, पण [प्रणय = पणअ = पण, पणा ] ती आपल्या पणांत आली = सा प्रणये प्रविष्टा

कारावर ( चांभार) - निषादापासून वैदेहीच्या (वैश्यापासून ब्राह्मणीचे ठायीं झालेल्या स्त्रीच्या ) ठाई झालेला तो कारावर. लोककार, कांस्यकार, चर्मकार, रथकार, सुवर्णकार ह्या शब्दांत कार हें जें पद आहे त्याचा अर्थ शिल्पी असा आहे. कारावर ह्या शब्दांतील कार ह्या पदाचा अर्थ शिल्पी असाच आहे. कारणां शिल्पिनां अवरः कनिष्ठः नीचः कारावरः । कारांत म्हणजे शिल्पांत जो अत्यंत गलिच्छ धंदा करणारा तो कारावरकारावरो निषादात्तु चर्मकारः प्रसूयते ( मनुस्मृति अध्याय १०, श्लोक ३६) चामड्याचे शिल्प करणारा.
(राजवाडे लेखसंग्रह भा. २ अंत्यजोद्धार पृ. १३३)

कुणबी [ कुलपति = कुळवइ = कुळवी = कुणबी ] कुणबी म्हणजे शूद्र नव्हे. कुणबी म्हणजे जमीन करणारा. (रा. मा. वि. चंपू पृ. १९३)

कुळंबी - मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायांतील ११९ वा श्लोक व त्याची कुल्लूकव्याख्या अशी आहे:-
दशी कुलं तु भुंजीत विंशी पंच कुलानि च ।
ग्रामं ग्रामशताध्यक्षः सहस्राधिपतिः पुरम् ॥ ११९

“ अष्टागवं धर्महलं षड्गवं जीवितार्थिनां । चतुर्गवं गृहस्थानां त्रिगवं ब्रह्मघातिनां " इति हारितस्मरणात् षड्गवं मध्यमं हलं इति तथाविधहलद्वयेन यावती भूमिर्वाह्यते तत्कुलं इति वदति । तद्दशग्रामाधिपतिर्वत्त्यर्थं भुंजीत । एवं विंशत्यधिपतिः पंच कुलानि शताधिपतिर्मध्यमं ग्रामं सहस्राधिपतिर्मध्यमं पुरम् ॥ ११९ ॥

एकेक नांगर साहा बैलांनीं ओढावा; अशा नांगराला षड्गव नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाते तेवढीला कुल अशी संज्ञा आहे. अशी कुल्लूकभट्टांनी कुल ह्या शब्दाची शक्ति सांगितली. तात्पर्य, कुल व वाहणें हे दोन शब्द मनुसंहितेपासून किंवा तत्पूर्वीपासून भारतवर्षात प्रचलित आहेत. सहा बैलांनी जेवढी जमीन नांगरली व वाहिली जाते तिचें नांव कुल. ह्या कुल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कुळ असा होतो. कुल शब्द जसा संस्कृतांत नपुंसकलिंगी आहे तसाच कुळ शब्द मराठींत नपुंसकलिंगी आहे. लहानशा खेड्यांतील लागवडीखालील जमीन पांच सहा कुळे असते व मोठ्या गांवांत पांचपंचवीस कुळें असते. एकेका कुलाचा म्ह. सहा बैलांनीं वाहिल्या जाणार्‍या जमिनीचा जो कर्द्या त्याचें नांव कुलपति. कुलपति ह्या संस्कृत शब्दाचें महाराष्ट्री रूप कुलवइ; आणि कुलवइ ह्या महाराष्ट्री शब्दाचें मराठी रूप प्रथमारंभीं कुळवी व नंतर कुणबी. ह्या शब्दाचे कुळंबी, कुनबी असेहि अपभ्रंश सध्यां आहेत. पूर्वी कुणबी ही जात नव्हती, केवळ धंदा होता. तो सध्यां जात झाला आहे. प्रायः शूद्र जमीन वाहतात; म्हणून शुद्रांना सध्यां कुणबी अशी संज्ञा महाराष्ट्रांत प्राप्त झाली आहे. जमीन वाहणारा जर मराठा क्षत्रिय किंवा धनगर किंवा महार किंवा कुंभार असेल तर सरकार किंवा सावकार त्या मराठ्याला किंवा धनगराला किंवा महाराला किंवा कुंभाराला आपलें कुळ म्हणतात. कुळें दोन प्रकारचीं-मिराशी किंवा उपरि. वंशपरंपरेनें जमीन वाहणारी जीं तीं मिराशी व एका मोसमापुर्ते जमीन वाहणारी जीं ती उपरि. सारांश, कुलपति, कुलवइ, कुळवी, कुणबी, कुळंबी हा शब्द फार पुरातन आहे. (भा. इ. १८३२)

महाराष्ट्राच्या वसाहतकालीन इतिहासाचा शोध

१ सध्यां महाराष्ट्रांत जी लोकवसती आढळते तीपैकीं कांहीं लोकांची वसती अगदीं अर्वाचीन म्हणजे दोन तीन शें वर्षा अलीकडील आहे. उदाहरणार्थ, इंग्रजांची वसती. शक १५२२ पासून आज शक १८३८ पर्यंत महाराष्ट्रांत इंग्रजांना येऊन व वसती करूं लागून सुमारें ३१६ वर्ष झालीं. अस्सल अरबादि मुसुलमानांची ह्मणण्या सारखी वसती शक १२०० च्या आगेंमागें झालेली आहे. पारश्यांची वसती महाराष्ट्राच्या उत्तरेस संजानास शक ६०० नंतर झाली. एणें प्रमाणें अस्सल इंग्रज, अस्सल मुसुलमान व अस्सल पारशी, यांची कायमची वसती महाराष्ट्रांत केव्हां झाली, तें आपणास नकी माहीत आहे. यहुद्यांची वसती हि महाराष्ट्रांत अथवा कोंकणांत सांगण्यासारखी प्राचीन नाहीं. तेव्हां तिज विषयीं फारसें गूढ़ उकलावयाचें आहे, असें नाही. हे चार लोक काढून टाकले म्हणजे मग फक्त दोन प्रकारचे लोक शोध्य रहातात. एक ब्राह्मणादि आर्य लोक व दुसरे भिल्ल, गोंड, कातकरी, नाग, केळी इत्यादि अनार्य लोक. पैकीं भिल, गोंड वगैरे अनार्य लोक आपणा आर्यांच्या येण्यापूर्वी एथें वसती करून होते, अशी समजूत आहे. ती कितपत साधार आहे तें पाहिलें पाहिजे. एतत्प्रकरणीं शोधाचे एकंदर तीन पक्ष होतात. प्रथम पक्ष, अनार्य आर्यांच्या आधीं दंडकारण्यांत रहात होते, हा. द्वितीय पक्ष, अनार्य आर्यांच्या नंतर दंडकारण्यांत आले, हा. आणि तृतीय पक्ष आर्य व अनार्य असे दोघे हि समकालीं दंडकारण्यांत वसत्यर्थ शिरले, हा. पैकीं, अमुक पक्ष साधार व विश्वसनीय असा पूर्वग्रह करून न घेतां, आपणास शोध केला पाहिजे. आर्य अनार्याच्या पाठीमागून दंडकारण्यांत वसती करूं लागले असले, तरी वाहवा, व नसले तरी वाहवा. त्यांत कोणाचें कांहीं च बिघडत नाही आणि शोधकर्मात कोणाच्या पूर्वग्रहांत कांही बिघडलें, तरी त्याची पर्वा करावयाचें कारण नाही. प्रमाणान्तीं, जें विश्वास्य व साधार दिसेल, तें च तेवढे मान्य करणें जरूर आहे.

(२) दंडकारण्यांत आर्य अगोदर आले किंवा अनार्य अगोदर आले, ह्या बाबीचा शोध ( १ ) वैदिक सारस्वत व (२) अनार्याच्या भाषा व कहाण्या, यांतील उल्लेखां वरून किंवा ज्ञापकों वरून किंवा गमकां वरून करतां येण्याचा फार च अल्प संभव आहे. कारण, पाणिनीच्या काला पर्यंत विंध्यपर्वताच्या दक्षिणे कडील प्रदेशाची यत्किंचितहि माहिती आपणा आर्यास नव्हती. तेव्हां वैदिक सारस्वतांत विंध्याच्या दक्षिणेस रहाणाच्या (कोणी रहात होते कीं काय हा च मुळीं संशय आहे) अनार्य लोकांचे उल्लेख किंवा ज्ञापकें सांपडणें शक्य व संभाव्य नाहीं. वैदिक सारस्वतांत, दस्यु, असुर, रक्षस्, इत्यादि जीं लोकनामें येतात, तीं विंध्याच्या दक्षिणे कडील लोकांची नाहीत. अर्थात, वैदिक सारस्वताचा या शोधांत कांहीं एक उपयोग नाहीं. भिल्ल, कोळी, कांतकरी, वगैरेंच्या भाषा व कहाण्या सर्व तोंडी आहेत व त्या संस्कृत किंवा वैदिक भाषे हून किंवा कहाण्यां हून जुन्या आहत, असें विधान करण्याला कांहीं च आधार नाही. भिल्‍लादींना शंभर वर्षा पलीकडील काळ व पांच हजार वर्षा पलीकडील काळ, असे दोन्ही काळ सारखे च पुरातन वाटतात. अर्थात, भिल्‍लादींच्या भाषांचें व कहाण्यांचें हि ह्या शोधास कांहीं साहाय्य होईल, असा रंग दिसत नाही.- ऐतरेय ब्राह्मणांत मूतिवादि जे लोक सांगितले आहेत त्या लोकांचीं नांवें अपभ्रंश होऊन प्राकृत भाषांत सध्यां, खरें पाहिलें तर, सांपडावीं. परंतु, तीं हि सांपडत नाहीत किंवा सांपडलेलीं नाहींत. भिल्ल, खोंड, गोंड, कातकरी, ठाकूर, कोळी, हे लोक ऐतरेय ब्राह्मणांतील मूतिबादि लोकां हून नांवां वरून तरी अगदीं भिन्न असलेले दिसतात व वैदिक काला नंतर व पाणिनिकाला नंतर त्यां पैकीं कांहीं आर्यांना माहीत झालेले आढळतात.