Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

उभोणें - अभ्रवनं. खा नि

अमकट – आम्रकंथं. खा व

अभोणें - अभ्रवनं. खानि

अमकट - आम्रकंथं. खा व

अमखेड - आम्रः (अंबा) - आम्रखेटं. खा व

अमखेडें - आम्रः (अंबा ) आम्रखेटं, खा व

अमणपुर - अमंड (एरंड). खा व

अमथें - आम्रः (अंबा) आम्रप्रस्थं. खा व

अमदगव्हाण - अमंदगवादनी. खा व

अमदगांव - अमंदग्राम. खा व

अमदड, अमदर - आम्रः (अंबा) आम्रदर: खा व

अमदानगर - देवगिरि ऊर्फ देवीचा घांट चढून वर आलें म्हणजे अमदानगर लागतें. ह्यालाच प्रस्तुतकालीं अहमदनगर म्हणतात. अहमदनगर हा अमदानगर शब्दाचा अपभ्रंश आहे. अमदा म्हणून यादवकुळांतील एका राजाची नाटकशाळा होती. तिच्यावरून ह्या शहराला अमदानगर असें नांव पडलें असें कित्येक लोक म्हणतात. अमदा ऊर्फ अमळा ह्या नदीच्या नांवावरून हें नांव पडलें असेंहि कित्येकांचें म्हणणें आहे. ह्यांपैकीं कोणतें म्हणणें खरें धरलें तरी ह्या शहराचें नांव मूळचें फारशी नाहीं हें निर्विवाद आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक, श्रावण शके १८२६)

अंमदाबाद - खा मु

अमरकुवा - अमर (देव) अमरकुंबः खा म

अमरावती - अमरावती. खा न

अमराळें - अमर (देव) अमरालयं. खा म

अमलगुडी - अमला (आंवळी) अमलाकूटि. खा व 

अमलवाडी - अमला (आंवळी) अमलावाटिका. खा व

अमला - अमला(आंवळी) खा व

अमलाड - अमला(आंवळी) अमलावाटं. खा व

अमलाण – अमला (आंवळी) अमलावनं. खा व

अमली - अमला (आंवळी) खा व

अमलीपाडा - अमला(आंवळी) अमलापाटकः. खा व

अमलीपाणी - अमला (आंवळी) अमलापानीयकं. खा व

अमळगांव - अमला(आंवळी) अमलानांवरं. खा व

अमळनेर-अमला (आंवळी) अमलानीवरं. खा व

अमळथें - अमला ( आंवळी) अमलाप्रस्थं. खा व

अमोणी - आम्रः (अंबा) आम्रवनी. खा व

अमोणीबारी - अमोणीगांवाची बारी. खा प

अमोदें - आम्रः ( अंबा ) आम्रपद्रं. खा व

अम्रावें - आम्रः ( अंबा) आम्रवहं. खा व

पोहोचणें [ प्रस्थानं ] (पहचणें पहा)

पोळ १ [ प्लोष = पोळ ( भाजणें ) ] (भा. इ. १८३४)

-२ [गुजराथेंतील शहरांतील कित्येक लहानमोठ्या पेठांना पोळ म्हणतात. ह्या शब्दाचे संस्कृत प्रतोलि, प्रतोल हे शब्द होत. प्रतोल = पओल = पोळ ] ( स. मं.)

पोळा [ पूल् १ संघाते. पूलः = पोळा ] पोळा म्ह० बैलांचा संघ ज्या सणांत करतात तो. ( धा. सा. श. )

पोळी [ पुटी = पुली = पोळी (गव्हाची)] (ग्रंथमाला)

पौंड [ प्रोत + डी - डयनम्] ( धातुकोश-पौंड पहा)

प्यारा [ प्रियकारः ( ३-२-४४) = पिआरा = प्यारा ] प्रियंकर: व प्रियकार: असे दोन शब्द पाणिनि देतो. पैकीं प्यारा, पिआरा या मराठी व हिंदी शब्दांवरून प्रियकार: हा शब्द पाणिनिकालीं प्रचलित होता हैं दिसतें.

प्याला [ पेरु ] (पेला पहा )

प्रकाल [ प्र + कल् to drive forwards, to urge. प्रकाल: urging, insistence = प्रकाला ]
उ० - तैसा सांख्याहूनि पाहा प्रांजला ।
परि आम्हांसारखेयां जी अभोलां ।
एथ आथि काहिं प्रकाला । तो साहों ए वर ॥ ज्ञा. ५. १६५

प्रचीति [ प्रतीति (विश्वास) = प्रचीति. त = च ] ( भा. इ. १८३७ )

प्रयागवळ [ प्रयागपालक: ] (गयावळ पहा)

प्रवेसणें [ प्र + विश् = प्रविश् = प्रवेसणें ]

प्रसाद [ प्रसादन ( boiled rice) वैजयंती कोश = प्रसाद ] boiled rice as a खिरापत in a temple.
प्राञ्च् forward shows that the Aryans came from the प्रतीची West and travelled towards the East.

प्राण [ अपराण्हः = पराण्ह = प्राण्ह = प्राण ] अन्न मिळतां मिळतां रोज प्राण जातो.
अन्ने मेलिप्यति नित्यं अपराण्ह: भवति, जायते । ( भा. इ. १८३४)

प्रायश्चित [ प्रायस् (प्र + आ + यस् to trouble) = to trouble exceedingly
प्रायश्चित्त mind exceedingly exercised after a fault, crinne etc, etc. म. धा. १७
प्राय ( यः ) शब्द निराळा ( प्र + अय् घञ् or इ-अच् वा )
going away, dying as an expiation.)

प्रेष १ [ प्रैषः ( पाणिनि ८-२-१०४ ) order = प्रेष ] हा शब्द ऐतिहासिक मराठी पत्रांत येतो.

-२ [ प्रैष (निरोप पाठविणें ) = प्रेष ] प्रेष म्हणजे निरोप.
प्रेष्य = प्रेष. प्रेष = चाकर, जासूद.

मराठींत प्रेष या शब्दाचे चाकर व निरोप असे दोन अर्थ आहेत व ते प्रेष्य व प्रैष या दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून निघालेले आहेत. (भा. इ. १८३७, ३६ )

पोर १ [ पुत्रक = पुतरअ = पुअरअ = पोर = मुलगा ] (स.मं.)

-२ [ पोर शब्द मराठींत पुल्लिंगी हि आहे व स्त्रीलिंगी आहे. नपुंसकलिंगाशीं सध्यां कर्तव्य नाही. संस्कृतांत हि पुत्र शब्द मुलग्याचाहि वाचक आहे व मुलगीचा हि वाचक आहे.]
पुत्रशब्दः पुंसि स्त्रियां च स्मृतौ दृष्टः ।
अकृता वा कृता वापि यं विन्देत्सदृशात्सुतं
पौत्री मातामहः तेन दद्यात्पिंडं हरेद्धनम् ॥ इति ।
दौहित्रेण मातामहः पौत्री भवतीत्यर्थः । मनुः ।
लोके च दुहितरि पुत्रशब्दं प्रयुञ्जाना दृश्यन्ते एहि पुत्रेति ।
मंत्रे च दृश्यते। " पुमान्स्ते पुत्रो जायताम् " इति ।
तस्मात् पुमांसः पुत्राः इति विशेषणं ।
(आश्वलायनगृह्यसूत्र-गार्ग्यनारायणीयवृत्ते-१-७-३) (भा. इ. १८३६)

पोरकें-का-की [ पुत्रकक=पोरकें-का-की, पोरटा-टी-टें ] (स. मं.)

पोरगा इ. इ. [ पुत्रक = पुतरक = पुअरग = पोरग ( गा-गी-गें ). मूलक = मूलग (गा-गी-गें). लहानग (गा-गी-गें ) = लघीयस् + क. लांबग (गा-गी-गें) = लंब+ क ] (भा. इ. १८३३)

पोरटा-टी-टें [ पुत्रक ] ( पोरकें पहा )

पोरवकें [ पूर्वकं = पोरवकें ] supply.
उ० - जिये पदवियेचेनि पोरवकें । ते मातें पावति सुखें।
हे पालति मज विशेषें । करुं आवडे ॥ ज्ञा. १०-१२०

पोरवड [ पुत्रकावर्त = पोरवड ] पोरांचा घोळ.

पोरा-री-र [ पुत्रक = पुतरक = पुअरअ= पोरा-री-रा ] (स. मं.)

पोरांडें घर [ पुत्ररंड = पोररंड = पोरांड = पोरांडें घरा ] जेथें पोरें व बायका मात्र आहेत तें घर. (स. मं.)

पोरी [ पीवरी = पोरी, पोर ] कोंकणांत मोठ्या वीस पंचवी वर्षांच्या सुनेला सासवा पोर हा एकाकी शब्द लावतात.

पोरें सेरें [ पुत्रक सोदरक = पेरें सेरें ] (स. मं.)

पावतें [ पवित्रं = पोवतें. अ = ओ ]

पोहणें [ प्रोहण = पोहणें. प्रोह् पुढें जाणें ] पोहणें म्हणजे हातांनीं पाण्यांत गती करणें. अथवा प्रवह् = पउह = पोह. नदींत पोहतो = नद्यां प्रवहांत अथवा प्रोहति. (भा. इ. १८३३)

अंतुरली - अनंतपुरपल्‍ली. ९ खा व

अंतू- अनंतद्रु. खा व

अंतूर - अनंतपुरं. खा व

अंतूरखेडें - अनंतपुरखेटं. खा व

अंतूरघाट - गांवावरून. खाप

अंतौरी - अन्तःपुरिका = अन्तेउरिया = अंतौरी

अंदरद - अंध्र - आंध्रपदं. खा म

अंदलवाडी - अंधुलवाटिका. खा व

अंधारी - अंध्र - आंध्रागारिका. खा म

अंध्राव - आंध्रवहं ( आंध्रांचें गांव). मा

अनरध - अनिरुद्ध (कृष्णपुत्र ) अनिरुद्ध. २. खा म

अनवेल - अनु (ययाति. शार्मिष्ठापुत्र ) अनुवेलं, खा म

अनसुटें - आनसवाटं (झाडावरून). मा

अनोरें - अनु ( ययाति. शर्मिष्ठापुत्र ) अनुपुरं. २ खा म अपटी - अपत्रा (एक वनस्पति ) खा व

अंबाघाट - ( गवताळा पहा) खा प

अंबाड - सं. प्राकृत अंबाटक. नगर, नाशिक, सोलापूर. (शि.ता.)

अंबाडी - अंबा. २ खा म

अंबाडें - संस्कृत प्राकृत - अंबाटक. पुणें, बडोदें, सुरत. (शि.ता.)

अंबाडें - अंबापद्रं. ३ खा म

अंबापाणी - अंबापर्णिकाघाट: खा प

अंबापिंपरी - अंबा. खा म

अंबापूर - अंबा. खा म

अंबारी - अंबा. खा म

अंबारें - अंबा, खा म

अंबासन – अंबा-अंबासनं. खा म

अंबिका - अंबिका. खा न

अंबिल होळ - अंबु (पाणी ) अंबुल ओघालि. खा नि

अंबुर्डी - अंबा - अंबापुरवाटिका. खा म

अंबें - अंबा. ४ खा म अंबेंखेडें - अंबा. खा म

अंबेगांव - सं. प्रा. अंबिकाग्राम- सेलापूर, पुणें, नाशिक, कुलाबा, ठाणें. ( शि. ता. )

अभंग - अभ्र-अभ्रांकं. खा नि

आभाणें - अभ्र-अभ्रवनं. खा नि

अभोडें - अभ्रवार्ट. खा नि

पोथी [ पुथ् ( भाषार्थे ) = पोथ, पोथी, पोथिका ] (ग्रंथमाला)

पोथ्यापूर [ पुस्तिकापूलिकः = पोथिआपूर = पोथ्यापूर. ल = र] पोथ्यांचा ढीग.

पोपट, पोपटपंची १ [ पोपुट्यते (पुट् भाषायां ) = पोपट ] वैशेष्यानें अतिशय बोलणारा पक्षी तो पोपट.
प्रथम पोपट हें त्या प्राण्याचें गुणदर्शक विशेषण होतें, नंतर विशेषणच त्याचें सामान्य नांव झाले.

पंचिका (पंच् विस्तारवचने) = पंची. पोपटपंची म्हणजे पोपटाचें विस्तृत तें च तें बोलणें. (भा. इ. १८३६ )

-२ [ पठ, पंच १ विस्तारवचने ] पठ चें यङ् (क्रियासमभिहार ) पापठ होतें. परंतु प्राकृतांत पोपठ असें रूप होई. पोपठ:= पोपट (तोंडपाठ म्हणणारें पांखरू) पापट्यते = पापठः. पंचू (विस्तारवचने) = पंच. पंचिका = पंची. पापठपंची = पापटपंची = तोंडपाठ करून व्याख्यान करणें. पाचें पो पोपट शब्दावरून झालें आहे. (धा. सा. श.)

पोपडा १ [ पल्पूल: ] (पापोडा पहा)

-२ [ पोपुड्यते (पुड् उत्सर्गे) = पोपुडा = पोपडा] सुटून निघालेला कवचा म्हणजे पोपडा. ( भा. इ. १८३६ )

पोपी [ पूपिका ] ( पूपी पहा)

पो पो [ पि ६ गतौ पिय पिय = पो पो ] पो पो म्हणजे चल चल, चलाव चलाव. ( धा. सा. श. )

पोफळ [ पूगीफल किंवा पुष्पफुल्ल ] (पोय २ पहा)

पोबारा १ [ पर्ब् गतौ. पर्बः = पोबारा ] absconding. पर्ब् या धातूचा अर्थ abscond, to get away stealthily and speedily.

-२ [ ( प्र ) व्रज् ]

पोबारा (१३) [ सपादद्वादश = पावबारा = पोबारा (सलोप ) ]

पोंबारा [ पादोनद्वादश = पोंबारा ]

पोब्बारा [ व्रज. प्रव्राजः = पब्बारआ = पब्बारा = पोबारा, पोब्बारा ] त्यानें पोबारा केला म्हणजे संन्यास घेतला. ( धा. सा. श. )

पोय १ [ पोतिः = पोइ = पोय ( नारळाची ) ]

-२ [ पूगी = पोय. पूगीफल = पोयफळ = पोफळ (सुपारीचें फळ). पुष्पफुल्ल = पोफळ (पुष्प ) ]

पोंगडा [ पौगंड: = पोंगडा ]

पांगडें [ पीगंडकं = पोंगडें ( पोर) ]

पोच [ प्रोत्साहः ] ( धातुकोश-पोच ६ पहा)

पोंच [ प्रपंचः = पवंचो (कर्पूरमंजरी ) = पोंच] आमचा पोंच तो किती ?

पोचट [ प्रोज्झट = पोचट. प्र + उज्झ् to abandon ]

पोट १ [ पुष्टिः = पोट ] फुगारा, supplement, minor divisions.

-२ [ प्रोथम् embryo = पोट ] तिचें पोट वाढलें, फुगलें her embryo grew up.

-३ [ पुष्ट = पोट्ट = पोट ] पुष्टि देणारा अवयव. (स. मं.)

-४ [ प्रोथ् १ पर्याप्तौ ] प्रोथ = पोट. प्रोथः = पोटरः प्रोथा = पोटरी. प्रोथनं = पोटरणें. जोंधळा पोटरीस आला म्हणजे पर्याप्त झाला, गाभ्यांत पूर्ण झाला. (धा. शा. स.)

पोटभरु [ पुटिंभर = पोटभरु ] a mere eater.

पोटरणें [ प्रोथनं ] (पोट ४ पहा )

पोटरा [ प्रोथः ] (पोट ४ पहा )

पोटरी १ [ प्रोथा ] (पोट ४ पहा)

-२ [ प्रकोष्ट = पोट्ट = पोटरी ] (स. मं.)

पोटली [ पोट्टली = पोटली, पोटळी ] पोटली म्ह० पुरचुंडी. ( भा. इ. १८३४)

पोटोबा [ पुष्टपतिः (देवताविशेष, अथर्ववेद) = पोटोबा]

पोट्या [ प्रवटः = पउटा = पोट्या (गहूं)]

पोठरणें [ प्रोथ् to be complete, full, to be in embryo = पोठरणें ] to be in full embryo.
जोंधळा पोठरला, पोठरीस येणें.

पोत १ [ पोत = पोत (वस्त्रविशेष )] (भा. इ. १८३४)

-२ [ पोतः = पोत. गृहस्थाने पोत: (अमरकोशटीका ) ] पोता कडे खासगी कडे, गृहकृत्या कडे, हा शब्द जमाखर्चात येतो.

-३ [पोत = वोट = बोट Boat ] (भा. इ. १८३४)

पोतरें [ पोत्रं cleansing garment, cloth (from पू to cleanse) = पोतरें, पोतेरें a cleansing cloth.

पोतें [ पौतवं ( एक धान्याचें माप ) = पोतँ = पोतें ] पोतेंभर धान्य. (भा. इ. १८३३, ३४)

पोतेरें १ [ पोत्रं ] ( पोतरें पहा )

-२ [ पूतिवस्त्रं = पोतेरें ] सारवून घाण काढण्याचें वस्त्र.

-३ [ पवित्रं = पोतरें = पोतेरें. पूयते अनेन इति पवित्रं ] ज्यानें स्वच्छ केलें जातें तें पोतरें.

-४ [ पवित्रवस्त्रं = पोतेरें ] पोतेरें म्हणजे भुई पवित्र करण्याचें वस्त्र. पवित्र करतांना स्वतः वस्त्र मलिन होतें, सबब पोतेरें म्हणजे मलिन वस्त्र असा उलट अर्थ होऊन बसला.

अंजनी - अंजनी (कुटकी, काळी कापशी) अंजनी. खा व

अंजनी - अंजनी. खा न

अंजनेरी - अंजनागिरिः = अंजनेरी

अजमीर - अजमीढ हा जनपदवाचक शब्द आहे. आवृद्धादपि बहुजनविषयातू ( ४-२-१२५ ) ह्या सूत्रावरील व्याख्यानांत अवृद्धाजनपदावधे: । आजमीढक: ॥ असें वाक्य आहे. त्यांत अजमीढ हा जनपदवाचक शब्द आला आहे. ढ चा अपभ्रंश -ह व -हचा अपभ्रंश र होऊन अजमीर हा शब्द निष्पन्न झाला आहे. (भा. इ. १८३२)

अजमेर - अज ( दशरथपिता ) अजमेरु. खा म

अंजडैं - अंजलिका ( उंदीर ) अंजलिकापंद्र. खा इ

अजाव् - अज - अजवह. खा इ

अंजाळे - अंजलिका (उंदीर) अंजलिकालयं. खा इ

अंझलदर - अंजलिका (उंदीर) अंजलिकादरं. खा इ

अटंब - अट्ट ( बाजाराचें ) गांव, कसबा ) अटांविकं खा नि

अटरावल - अट्टालिका (राजवाडा) अट्टालिकापदं. खा नि

अटवाडें - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा) अट्टवाटं, खा नि

अटाळे - अट्टालिक्‍का (राजवाडा) अट्टालिकं. खा नि 

अडगांव - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा) अट्टग्रामं. खा नि

अडगांव बारी - गांवावरून. खा प

अडछी - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा) अट्टस्थली. खा नि

अडदें - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा) अट्टपद्रं. खा नि

अडघळें - अद्रि ( पर्वत) अद्रिस्थलं. खा नि

अडलें - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा) अट्टपलं. खा नि

अडळसें - अटरुष: ( अडुळसा) अटरुपकं २. खा व

अडावद- अट्ट ( बाजाराचें गांव, कसबा) अट्टावर्त. खा नि

अडें - अट्ट ( बाजाराचें गांव, कसबा ) अट्टक. खा नि

अढलगव्हाण - अघ्वर ( यज्ञ ) अघ्वरगावादनी. खा नि

अणवर्द - अनु ( ययाति. शर्मिष्ठापुत्र ) अनुवर्धनं, सा म

अणवदैं - अनु ( ययाति. शर्मिष्टापुत्र ) अनुवर्धनं. खा म

अतकरगांव – अध्किारिग्रानं.

अंतापुर-अनंतापुरं. खा व

पेपकार [ पेशस्कारी (सोनार)=पेषकार ] Treasuror. (वृहदारण्यक, चतुर्थ ब्राह्मणं ४)

पैं- [ पैं हें पादपूरक मराठी कवितेंत फार येतें. ह्याचा मूळ अर्थ झटकन्, जलदी. पदि = पइं = पैं अशा परंपरेनें हा शब्द निष्पन्न झाला आहे ] (स. मं. श्रावण शके १८२६)

पैक [ ज्ञानेश्वरींत पैक = समुदाय शब्द येतो. त्याच्या सप्तमीचें रूप पैकीं. पन्नास माणसांपैकीं = पन्नास माणसांच्या समुदायांतील ] (स. मं. )

पैजारा [ पादत्रा = पायजारा = पैजारा ] (थारा १ पहा)

पैठ (ठा-ठी-ठें) [ प्रतिष्ठित=पइठ्ठिअ=पैठ (ठा-ठी-ठें)] Well established.

पैठा [ स्था १ स्थाने प्रतिष्ठित = पइट्ठिअ = पैठा ] ( धा. सा. श. )

पैस, पैसा [ प्रयास: ] [ धातुकोश पैस ४ पहा)

पो [ पव = पो (शेणाचा ) ] पव म्हणजे शेण. ( भा. इ. १८३५ )

पोई १ [ उपोदिका = पोइआ (उ लोप) = पोई (वनस्पतिविशेष, माडवी वेल) ] ( भा. इ. १८३६ )

-२ [ प्रपीति ] (पवई पहा)

-३ [ (सं.) प्रहि = (प्रा.) पोढी ( कुंडें. शिलालेख नं. ५) = पोई. पानीय प्रहि = पाणपोढी = पाणपोई] (ग्रंथमाला)

पोंक [ पुंग ] (पोंग २ पहा )

पोकळ १ [ प्रोत्कील = पोकिळ = पोकळ ] पोकळ म्हणजे आंतून रिकामें केलेलें.

-२ [ प्र + उत्कल = प्रोत्कल = प्रोक्कल = पोकळ ] आंतून भरींव मगज काढून घेतलेला. (ज्ञा. अ. ९ पृ. ८५)

पोक्त १ [ प्रयोक्तृ (efficient) = पोक्त ] पोक्त माणूस स्त्री म्हणजे efficient man or woman.

-२ [ वच् परिभाषणे - प्र + वच्. प्रोक्त (प्रसिद्ध) = पोक्त] पोक्त माणूस म्ह० प्रसिद्ध संभावित माणूस. ( धा. सा. श. )

पोख, पोंख [ उख् गतौ. उँख् गतौ. प्रोख, प्रोंख = पोख, प्रोंख ] ( धा. सा. श. )

पोंग १ [ पुंग ( ढीग ) = पोंग ]

-२ [ पुंग ( टेंगूळ, उँचवटा ) = पोंग, पोंक ]

पेच (चा-ची-चें) [प्रेत्य = पेच्च =पेच (मेलेलें) = (लेचे) पेचें ] (भा. इ. १८३२)

पेटणें १ [ प्र + इंध. प्रेंधनं = पेंढणें = पेंटणें, पेटणें.
ध = ढ = ट ] पेटणें म्ह० जळणें. (धा. सा. श.)

-२ [ इट् १ गतौ. प्र + इट = पेट ] उ०-हट्टास पेटणें म्हणजे जाणें. (धा. सा. श.)

पेटी [पेटिका ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ५१ )

पेठ [ (न.) पीठं =पेठ (स्री ) ] व्यापारपीठं = व्यापाराची पेठ.

पेंड (मोत्यांचा ) [(मुक्ता ) पिंड: = पेंड ] (भा. इ. १८३४)

पेंडरी [पिंड (मांसाचा गोळा) = पेंडरी ] (स. मं.)

पेंडळे [ पिंडलकं = पेंडळे ] (पेंडाळे पहा)

पेंडार्‍या [ पिंडहारिकः = पेंडार्‍या ] भारेवाला.

पेंडाळें [ पिंडलकं = पेंडळें. पिंडालिः = पेंडाळी, पेंडाळें, पेंडाळा ]

पेडें [पेटं (संहतिः ) = पेडें ] सोन्याचें, मोत्याचें पेडें.

पेंढ [ पिण्याक = पेण, पेंढ ] निस्नेह तिलचूर्ण. ( भा. इ. १८३७)

पेढी १ [पीठ = पीढ = पेढ = पेढें (ग्रामविशेष) बसावयाचा ओबडधोबड पाट.

-२ [पीठिका = पीढिआ = पेढी ] पैसे देण्याघेण्याचें स्थान. (ग्रंथमाला)

पेढें [ पेढी पहा ]

पेण [ पिण्याक ] (पेंढ पहा)

पेणें १ [ प्री ९ तर्पण. प्रयणं = पेणें ] पेणें म्हणजे तृप्ति करणारें उपायन. ( धा. सा. श. )

-२ [ अप्ययनं = पेणें ] अप्ययन म्हणजे जोडणें. (भा. इ. १८३६)

पेरण [ परिधानं = पेर्‍हाणँ = पेराण = पेरण ( वस्त्रविशेष ) ] (भा. इ. १८३३)

पेरणें [ ईर् गतौ, कंपने. प्रेरणं = पेरणें ] नजर पेरणें = दृष्टि प्रेरणं. ( धा. सा. श. )

पेरू १ [परूषक = पेरू ]

-२ [ पीलु = पेरू ] एक वृक्ष व फळ आहे.

पेरें [ पर्वन् = पेरें ] (स. मं.)

पेला-प्याला [ पेरु हा शब्द छांदस आहे, वेदांत येतो माध्यंदिनीय वाजसनेयसंहिता ६-१०. पिवतीति पेरुः पानशीलः पिवत्यनेति पेरुः पात्रं । रलयो रभेदः । पेरुः = पेलुः । पेलुकः = पेलुआ = पेला - प्याला ] पिण्याचें लहान सोयस्कर भांडें. ( भा. इ. १८३३)

अकराळें - अकरा (आंवळी) अकरापल्‍लं. खा व
अकलपूर - आकल्ल ( अक्‍कल काढा) आकल्लपुरं. खा व
अकलाड - आकल्‍ल ( अक्‍कल काढा) आकाल्‍लवाटं. खा व
अकलूद - आकल्‍ल ( अक्‍कल काढा ) आकल्लपद्रं. खा व
अकवाणी - अक्षवाहिनी २ खा व
अंकाईटंकाई - अंकावती = अंकाई. टंकावती = टंकाई जैनग्रंथ). अंकाईटंकाईचा डोंगर महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहे.
अकुरडी - अकूरवाटिका (अकूर नांवाच्या यादवावरून) मा
अकुलखेडें - अकूरखेटं, खा म
अंकुशविहीर - अंकुशा (जैनदेवता) अंकुशाविवरिका खा म.
अखतवाडें - अक्षता ( काकडाशिंगी ) अक्षतावाटं, खा व
अखाडे - अक्ष ( बिब्बा ) अक्षवाटं. खा व
अंगुरणें - अंकुरक ( पक्ष्याचें घरटें ) अंकुरकवनं. खा नि
अगैर - अगिरा - अगिर = सूर्य. खा न
अघवान - अघ ( कंसाचा सेनापति ) अघवाहन. खा म
अघार - अघ ( कंसाचा सेनापति ) अघागारं २. खा म
अचलगांव - अचल ( डोंगर ) अचलग्रामं २. खा नि अंचळवाडी - अंजलिका ( उंदीर ) अंजलिकावाटिका. खा इ
अंचाडे - अंत्य (शूद्र) अंत्यवार्ट. खा म
अच्छी - अट्ट (बाजाराचें गांव, कसबा ) अट्टस्थली. खा नि
अजंग - अजा = अजांक. खा इ
अजंती - अजावंती. २ खा इ
अजंदे - अध्यंडा - अध्यंडकं. ७ खा व
अंजनविहरें - अंजनी (कुटकी, कोळी कापशी) अंजनी विवरं. २ खा व
अंजनविहीर - अंजनी (कुटकी, काळी कापशी) अंजनी विवरं. खा व
अजनाड - अंजनवार्ट. २ खा व
अजनाळें - अंजन - अंजनालयं. खा व