Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पुर्या विशींत [ पूर्वे वयसि =पुर्या विशींत ] ( भा. इ. १८३४)
पुर्वणें [ पुर्व् १ पूरणे. पुर्वणं = पुर्वणें ] मरण पुर्वेल = मरणं पुर्व्येत ( कर्मणि ). हा धातू पूर् या धातूहून निराळा. ( धा. सा. श. )
पुष्प [ पुष्प = पुप्फ + ल = पोफल. पोफल = पुष्प (ज्ञानेश्वरी ) ] पूगीफल या शब्दापासून हि पोफल निघतो. ( भा. इ. १८३३)
पुसकन् [ पुस् पोसयति, पाद वगैरे सोडणें = पुसकन्, फुसकन्, फुसकुली ] (भा. इ. १८३४)
पुसणें १ [पुस्त = पुस्स = पुस किंवा पुस्त = पुत्थ = पुच्च = पुस] पुत्रः पितरौ पुस्तयति = पुत्र पितरांस पुसतो. पुसणें म्हणजे सन्मान करणें.
-२ [प्रोंच्छन = पुंछण = पूंसणें = पुसणें ] पुसणें म्हणजे घासून नाहींसे करणें. (ग्रंथमाला)
पुसपुसणें [ पृच्छ् = पुसपुसणें ] घरच्या गेष्टी पुसपुसून तिनें मला सळो का पळो केलें. येथें ही सबंध द्विरुक्ति आहे. ( भा. इ. १८३६ )
पुस्तपास्त [ बुस्त् to honour + बस्त् to enquire = पुस्तपास्त ) to enquire or pay respect.
पुळपुळीत [ पुल (पूर्ण न झालेलें धान्य, फोल) = पुळपुळोत] पुळपुळीत म्ह० अपूर्ण, अशक्त, भरींव नव्हे असा.
पुळुका [ पुलकः = पुळका, पुळुका ] पुळका म्हणजे रोमांच. अळुके-पुळुके या संयुक्त जोड शब्दांत हा शब्द येतो. (भा. इ. १८३५ )
पूड, पुडी [ पुडि (खंडने) = पुड, पूड ] पूड म्ह० वांटून केलेली बारीक भुकटी. (भा. इ. १८३६)
पूत [ पुत्र पहा ]
पूपी [ पूपिका (एक मधुर पक्वान्न) = पूपिआ = पूपी = पोपी ] (भा. इ. १८३३)
पूल [पूल् संघाते] दोनी तीरांचा संघात करणारा कृत्रिम रस्ता. (ग्रंथमाला)
पेंग [ प्र + इंग = पेंग. अप + इंग = पेंग ( अ लोप) ] ( धा. सा. श. )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पुता-ती-त [पुत्रक = पुतअ = पुता-ती-त] (स. मं.)
पुत्र [ पुत्र = पुत्र, पूत ] ( स. मं. )
पुरण [ पृच् to mix. पृग्ण mixed (Vaidik)= पुरण ( mixture ) मिश्रण ] पुरणाच्या पाटल्या म्हणजे सोन्यांत इतर धातूंचें मिश्रण करून केलेल्या पाटल्या.
पुरमाशीण [ पूर्णमासिनी = पुरमाशाण ] पूर्ण महिने झालेली गर्भारीण.
पुरवठा [ पूर्यवंट: = पुरवटा, पुरवठा ]
पुरवणें [ पुर्व् पूरणे. पुर्वणं = पुरवणें ] पिछा पुरवणें म्ह० पाठलाग पूर्ण करणें. (धा. सा. श.)
-२ [ पृ १० पूरणे = पुरवणें ] शक्ति असणें. कोणाला हि जातां पुरवत नाहीं = केनापि गंतुं न पार्यते. ( धा. सा. श.)
पुरुष १ [पुरुष म्हणजे नवरा असा अर्थ मराठींत आहे. आमचे पुरुष घरांत नाहींत ह्या वाक्याचा अर्थ माझा नवरा घरांत नाहीं असा आहे. हा अर्थ मराठीनें संस्कृतापासून घेतला आहे.
त्वं मम भार्या भव अहं तव पुरुषो भवामि । आश्वलायन गृह्यसूत्र-गार्ग्य नारायणीयवृत्ते-१-६-१ ] ( भा. इ. १८३६)
-२ [ पौरुष (मस्तकावर सरळ वर हात केलेल्या पुरुषाची उंची) = पुरुष ]
ही विहीर सात पुरुष खोल आहे, येथें पुरुष म्हणजे विवक्षित उंचीचें मान आहे व हा पुरुष शब्द संस्कृत पौरुष शब्दापासून निघालेला आहे. प्राकृतांत येतांना संस्कृत शब्दांतील वृद्धि काढून टाकण्याचा प्राकृताचा व मराठीचा स्वभाव आहे. संस्कृत भाववाचक नामें मराठींत व प्राकृतांत अपभ्रष्ट होतांना हा विकार दृष्टीस पडतो. पौष = पूस इ. इ. इ. (भा. इ. १८३७)
पुरुषात्कार [ पुरुषकारः = पुरुषात्कार (साक्षात्काराच्या सादृश्यावरून ) ] हा शब्द मी आमच्या मातुःश्रींच्या तोंडून फार वेळां ऐकिला आहे.
पुरेपूर १ [ पुरु पुरु ( much ) = पुरेपूर, पुरु वैदिक आहे) exceedingly, पुष्कळ.
-२ [ पुरुहं + पूरु = पुरोपुर = पूरेपूर ] पुरुहं व पुरु ह्या दोन्ही शब्दांचा अर्ध पुष्कळ असा आहे. एकार्थक दोन शब्द जोडून अतिशय दाखविलेला आहे. (भा. इ. १८३५)
-३ [ परिपृ (परिपूरं) = पुरेपूर ] Filled to the brim.
-४ [ पुरुहूः पुरु: = पुरेपूर ] पुरुहू व पुरु या दोन्ही शब्दांचा फार (स्फार) असा अर्थ आहे. बाहुल्यार्थ द्विरुक्ति.
-५ [ पुरेपूर दूध प्यालों, ह्या वाक्यांत पुरेपूर म्हणजे पुष्कळ. वैदिक शब्द पुरु. त्याची द्विरुक्ति पुरुपुरु. पुरु म्हणजे पुष्कळ. पुरुपुरु म्हणजे सडकून पुष्कळ. पुरुपुरु या शब्दाचा अपभ्रंश पुरेपूर ] (भा. इ. १८३३)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
या पुढील लेखांत मनुष्यें, देवता, लोक, प्राचीन स्थलें इत्यादिकांच्या नामांपासून निघालेल्या ग्रामनामांची व्युत्पति दिली आहे तीं ग्रामनामें व त्यांची व्युत्पति हीं कोशांत घेतलीं आहेत. यापुढे याच लेखमालेंत निर्जीव सृष्ट पदार्थनामांवरून
निघालेलीं ग्रामनामें दिलीं आहेत. तसेंच मुसुलमानी ग्रामनामें, नद्यांचीं नांवें व पर्वतनामें यांची व्युत्पत्तिही दिली आहे, ती कोशांत घेतली आहे. याशिवाय शक ० पासून शक तेराशें पर्यंतच्या शिलालेखांत, ताम्रपटांत व प्राकृत ग्रंथांत आलेलीं महाराष्ट्री प्राकृत ग्रामनामें. या ग्रामनामांचाही समावेश कोशांत केला आहे. या लेखमालेंतील बाकीचा भाग वसाहतकाल विवेचनात्मक असल्यामुळे विस्तारभयास्तव तो येथें दिला नाहीं. जिज्ञासु वाचकांनीं तो मूळांतूनच वाचणें इष्ट आहे.
(राजवाड्यांचे भाषाशास्त्रीय लेख स्वतंत्र ग्रंथरूपानें यापुढे राजवाडे मंडळाकडून प्रसिद्ध व्हावयाचे आहेत. त्या ग्रंथांत महाराष्ट्राचा वसाहतकाल हा सर्व लेख छापून प्रसिद्ध व्हावयाचा आहे. सबब या कोशांत दिलेल्या शब्दांच्या व्युत्पत्तीला लागू विवेचन तेवढें मात्र येथें घेतलें आहे. )
स्थलनाम-व्युत्पत्ति-कोशाची योजना
या कोशांत कै. राजवाडे यांनीं लिहून ठेवलेल्या कित्येक स्थळांच्या व्युत्पत्तीच्या चिठ्ठया, महाराष्ट्राचा वसाहतकाल या लेखमालेंत आलेल्या स्थळांची व्युत्पत्ति, महाराष्ट्र इतिहास नांवाच्या मासिकांत त्यांनीं दिलेल्या स्थळांच्या व्युत्पत्त्या. ह्या घेतल्या आहेत. तसेंच भारत इतिहास संशोधक मंडळाचीं इतिवृतें, ग्रंथमाला, सरस्वतीमंदिर, संशोधक त्रैमासिक वगैरे ठिकाणीं प्रसिद्ध झालेल्या त्यांनीं दिलेल्या व्युत्पत्या ह्याही घेतल्या आहेत.
महाराष्ट्राचा वसाहतकाल या लेखमालेंत आलेल्या स्थळांच्या व्युत्पत्ति या राजवाड्यांनीं केलेल्या कोणत्या प्रकारांत येतात हें कळण्यासाठीं पुढील योजना ठरविली आहे व तें तें अक्षर त्या त्या स्थळाच्या व्युत्पत्तीपुढें दिलें आहे.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
यांशिवाय इतर जिल्हे व संस्थानें यांतलें स्थळ असल्यास त्या त्या जिल्ह्याचें अगर संस्थानाचें नांव दिलें आहे. एकाच नांवांचीं कित्येक अनेक गांवें आहेत त्या ठिकाणीं राजवाड्यांनीं दिलेला त्या गांवांच्या संख्येचा आंकडा दिला आहे.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
६ पुनगांव, पुनखेडें, हे शब्द पूर्णक नांवाच्या पक्ष्या वरून निघालेले आहेत. पूर्णक म्हणजे स्वर्णचूडपक्षी. हें पूर्णक पक्षिनाम पुणेकरांना विशेष लक्ष्य आहे. पुणें या शब्दाचें पूनक असें रूप ताम्रपटांत आढळतें. पूनक याचें संस्कृत रूप पूर्णकं. पूर्णकं म्हणजे तें गांव कीं ज्यांत स्वर्णचूड़पक्षि वसाहतवाल्यांना प्रथम वैपुल्यानें किंवा वैशिष्टयाने भेटले.म.पा.३५
७ सितोड व चितोड असे दोन उच्चार एका च गांवाच्या नांवाचे खानदेशांत ऐकू येतात. स चा च व च चा स होतो. चित्रक, चित्र या पशुनामा पासून चित्रकूट पासून चितोड व चितोड पासून सितोड. अथवा सीता या शब्दा पासून हि सितोड, चितोड शब्द निघूं शकतील.
८ घांगुरलें हें नांव घर्घुर्घा (रात्राकिडा ) या संस्कृत शब्दा पासून निघालेलें आहे. घर्घुर्घा (रात्रकिडा ) हा शब्द कोशांत आढळतो. परंतु, तो लोकांत कधीं प्रचारांत होता कीं काय, हें कळण्यास चांगलासा मार्ग नव्हता. कारण, कालिदासादींचें जें संस्कृत विदग्ध वाङमय त्यांत हा शब्द आढळणें दूरापास्त. हा शब्द पुरातनकालीं लोकांच्या घरगुती बोलण्यांत रात्रंदिवस यावयाचा, किंवा प्राणिशास्त्राच्या ग्रंथांत नमूद व्हावयाचा. पैकीं संस्कृतांत प्राणिशास्त्राचे ग्रंथ नाहींत व घरींदारीं संस्कृत बोलणारे लोक हि अस्तंगत होऊन दोन हजारां वर वर्षे गेली. फक्त घांगुरलें या ग्रामनामांत घर्घुर्घा हा शब्द आतां उरला आहे. अवि, खिंखिर, बप्पीह, ( ज्ञानेश्वरी, बापु ) घृणि, तंडक, दात्यूह, इत्यादि शेंकडों शब्दांच्या बाबतींत हि हा च न्याय लागू पडेल. हीं ग्रामनामें जर उपलब्ध नसतीं, तर संस्कृतभाषेत शाब्दिकांनीं स्वकपोलकल्पनेनें हीं नांवें गोवून तर दिलीं नसतील, अशी शंका घेणाराचें तोंड बंद करण्यास औषध राहिलें नसतें.
९ अंगूष या संस्कृत शब्दा पासून मराठी मुंगूस शब्द निघाला आहे. अंगूष = ओंगूस = ओंगुस = मोंगुस = मुंगूस हा अंगूष शब्द मुंगसें या ग्रामनामांत आढळतो. नकुल या
शब्दा पासून निघालेला अपभ्रंश नकुल = नउल = नवल अशा परंपरेनें नवल, नवलगांव, इत्यादि ग्रामनामांत कायम आहे, परंतु बोलण्याच्या मराठी भाषेत सध्यां प्रचलित नाही. वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री, अपभ्रंश, मराठी अशा पांच रूपान्तरांतून जातांना अर्वाचीन मराठी पर्यंत पोहोचतां पोहोचतां किती हजारों शब्द गळून गेले. त्यां पैकीं कांहीं थोड्यांचा मागमूस ह्या ग्रामनामांत लागतो.
१० ह्या १७६ प्राणिनामांत व ६८५ ग्रामनामांत भिल्लादींचा बिलकुल पता नाहीं. अवि, अंगूप, करभ, ढेंक, जकूट, खिंखिर, कीर, चीरि, चिल्ल, धोड, भोलि वगैरे शब्द मूळचे संस्कृत नाहीत, ते मूळचे एथील भिल्लादि रानटी मनुष्यांच्या भाषेतील आहेत, अशी शंका काढून, संशयाचा फायदा भिल्लादींना देण्याचा सकृद्दर्शनीं मोह पडण्या सारखा आहे. परंतु, निश्चयाच्या तीराला पोहोंचण्यास ह्या मोहाचा कांहीं एक उपयोग नाहीं. कारण भिल्लादि लोक सध्यां ज्या भाषा बोलतात, त्या मराठी, गुजराथी, रजपुतानी, वगैरेंनीं इतक्या भरून गेल्या आहेत कीं दोन तीन हजार वर्षांपूर्वीचे त्यांच्या भाषेतील शब्द कोणते, हें ओळखण्याला सध्यां साधन उपलब्ध नाहीं. सातपुड्याच्या व विंध्याच्या व अरवलीच्या कुहरांत अत्यन्त रानटी स्थितींत जे थोडे भिल्लादि सध्यां जीवमान आहेत त्यांच्यांत कोणी भाषाशास्त्रज्ञ राहून त्यांच्या भाषेचा दोन तीन हजार वर्षांचा इतिहास तो जेव्हां सिद्ध करील, तेव्हां ह्या शंकेचा व संशयाचा परिहार होईल. तों पर्यंत वनस्पतींचीं व प्राण्यांचीं जीं संस्कृत नांवें कोशांत आढळतात तीं मूळचीं संस्कृत आहेत, असें च धरून चालणें युक्त आहे.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पीठवन [ पृष्टिपर्णि = पीठवन ] (भा. इ. १८३४)
पीतवीत [ पीतविपीत (शाकपार्थिवादि गण) = पीतवीत ] वि पासून निघालेली बि मराठींत संस्कृतांतून आली आहे.
पुकारा [ पुत्कारः = पुकारा ( धर्मदत्तचरितम्)] (भा. इ. १८३४)
पुख्खा [ पूष् १ वृद्धौ. पूषः = पुख्खा ] वृद्धि करणारें अन्न. ( धा. सा. श.)
पुचकणें [ प्युस् विभागे. प्युसनं = पुचकणें ] पुचकणें म्हणजे विभाग होणें, मोडणें, क्षीण होणें. ( धा. सा. श.)
पुचकन् [ प्र + मुच् ६ मोचने ] (धातुकोश-पुच पहा)
पुचका [ पृश्निक: = पुचका ] क्षीण, दुर्बळ.
पुचपुचित १ [पुच्छ १ प्रमादे] ( धातुकोश-पुचपुच पहा)
-२ [ प्युस् विभागे = पुच. प्युसप्युसितं = पुचपुचित ] पुचपुचित म्ह० भाग होण्यास योग्य, पोकळ. (धा. सा. श.)
पुच्चा, पुच्ची [पुषः Vulva. वैजयंती=पुच्चा, पुच्ची]
पुटकुळी [ पिटका = पिटकुळी (स्वार्धे ल), पुटकुळी ] (भा. इ. १८३४)
पुटपुटणें [ पुट् (बोलणें) = पुटपुट (द्विरुक्ति) ] (ग्रंथमाला)
पुंडा ऊस [ (१) पौंड्रक= एका प्रकारचा ऊस. पौंड्रक = पौंडा. = पुंडा (२) पुंड्र = पुंडा. ] ( भा. इ. १८३३)
पुडी [ पुटि, पुटी = पुडी, पूड ] ( पूड़ पहा)
पुडुत, पुडुतीपुडुती, पुढचा, पुढला, पुढां, पुढील, पुढुन [पुढें १ पहा]
पुढें १ [ वैदिक नाम पुरस् पासून पुढ. 'पुढ' ची सप्तमी पुढें, पंचमी पुढून, षष्ठी पुढचा, सप्तमी पुढां.
पुरत: = पुडुत, पुडुता, पुडुतीपुडुती. पुढपासून विशेषण पुढला, पुढील. ] ( ग्रंथमाला)
-२ [ प्रभृति ( पासून ) = पुढें ] ततः प्रभृति = त्या पुढें (तेव्हां पासून)
पुतण्या-णी - [ पुत्रान्यक = पुतन्यअ = पुतन्या = पुतण्या-णी ] पुत्रासारखाच दुसरा पुत्र, भावाचा मुलगा. ( स. मं.)
पुतळी [ पुत्रिका = पुतरिआ = पुतळी ]
पुत्तलिका हा शब्द पुत्रिका शब्दाचा अपभ्रंश आहे.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
९ एणें प्रमाणें ३८०० पैकीं १४०० ग्रामनामांचा निकाल लागला. बाकीच्या २४०० ग्रामनामां पासून काय निष्पति होत्ये, ती पुढील दोन तीन लेखांत कळून येईल.
१ खानदेशांतील वनस्पतिनामजन्य ग्रामनामांचें संस्करण एथ पर्यंत झालें. त्यांत सुमारें १५०० गांवांचा हिशोब विल्हेस लागला. अवशिष्ट राहिलेल्या २३०० किंवा २४०० ग्रामनामांच्या संस्करणाचे खालील चार भाग केले आहेत. [ १ ] मनुष्येतरप्राणिनामजन्य ग्रामनामें, ( २) मनुष्यें, देवता, जाति, लोक, यांच्या नांवां वरून निघालेलीं ग्रामनामें, [ ३ ] निजाँव सृष्ट पदार्था पासून निघालेलीं ग्रामनामें, आणि [४] मुसुलमानी ग्रामनामें. ह्या चार भागां शिवाय [ १ ] नद्या व (२) डोंगर आणि डोंगरबा-या असे आणीक दोन शुद्र भाग केले आहेत.
२ यापुढे दिलेलीं मनुष्येतर प्राणिनामजन्य ग्रामनामें कोशांत घेतलीं आहेत.
३ यादींत एकंदर ग्रामनामें ६८५ व प्राणिनामें १७६. त्यांत सिंह, हत्ती, घोडा, सर्प, उंदीर, माकड, कोल्हा, उंट, चित्ता, वाघ, मोर, भुंगा, विंचू, ससा, बोकड, हरिण, इत्यादि पशुपक्ष्यांचीं नांवें आहेत. सिंहादींच्या नांवा वरून सहज च अनुमान होतें कीं वसाहतकालीं ह्या प्रांतांत सिंहादि पशुपक्षी होते. हत्तींच्या कळपांचें खानदेशांत अस्तित्व मुसुलमान तवारिखकारांनीं उल्लेखिलेलें आहे. कळंभेर, ग्रामनाम सिंहवाचक जी करभीर शब्द त्या पासून हि व्युत्पादितां येतें. नखिन, करभीर व सिंह हीं तीन नांवें कोशांत सिंहवाचक आढळतात. तीं वसाहतकालीं लोकप्रचारांत शेती, केवळ कोशकारांनीं कल्पिलेलीं नव्हत, असें तदुत्पन्न ग्रामनामां वरून स्पष्ट सिद्ध होतें. खरु, खेट, घेोटक, पीथि, वारु, भूकल, हीं सहा घोडयांचीं नांवें; गो व महा हीं दोन गाईचीं नांवें; शापठिक, मयूर, बर्हि, सिखावल, व साधृत [ मोरांचा कळप ], हीं पांच मोराचीं नांवें; बंभर, भ्रमर, भंभ, मृंग, मधुकर, मधुप, हीं सहा भुंग्याचीं नांवें; कुंजर, पृष्टहायन, भद्र, मनाका, विक्क, हस्तिन, हीं हत्तीचीं नांवें; किखि, बाहुक, मर्कट, वानर हीं वानराचीं नांवें; ग्रामनामावलींत पाहिलीं म्हणजे निःसंशय खात्री होत्ये कीं कोशांत ह्या प्राण्यांना जीं अनेक नांवें दिलेलों असतात तीं लोकप्रचारांत एके कालीं होतीं. Steed, horse, bay, arab, वगैरे, अनेक नांवें जशी इंग्रजीत घोड्याचीं वाचक लोकप्रचारांत आहेत, त्यांतला च मासला उपरिनिर्दिष्ट संस्कृत नांवांचा आहे. निरनिराळ्या नांवांनीं एकाच प्राणिजातीचे अनेक भेद त्या कालीं दर्शविले जात होते.
४ पिप्पका हें पक्षिनाम वैदिक आहे. तें पिपी या ग्रामनामाचें मूळ. त्या वरून अनुमानतां येतें कीं वसाहतवाल्यांत कांहीं वैदिक शब्द प्रचलित असतांना, पिपी या गांवाची वसती झाली असावी.
५ मामलदें या नांवाचें मूळ मामलपद्रं. पैकीं मामल या शब्दाचें मूळ महाभल्ल. महाभल्ल म्हणजे मोठं अस्वल. ह्या महाभल्ल शब्दा पासून च मामलमावळ शब्द निघालेला आहे. मावळ म्हणजे मोठी अस्वलें. सह्याद्रींत ज्या भागांत वसाहतवाल्यांना वैशिष्ट्यानें प्रथम दिसलीं तो भाग. सूर्य मावळत्या दिशेस जो प्रदेश तो मावळ अशी व्युत्पति कोठें कोठें केलेली आढळते; पण, महाभल्ल शब्दावरून हा शब्द व्युत्पादिणें प्रशस्त दिसतें. महाबळेश्वर ह्या शब्दाचें मूळ (१) महाभल्लेश्वर असें प्रथम होतें. नंतर त्याचा अपभ्रंश मामलेसर झाला. त्याचें पुनः संस्करण महाबलेश्वर झालें. मामलेसर, मामलेस्वर, असा उच्चार जुन्या मराठी लेखांत लिहिलेला आढळतो.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पिप्परी [ पिप्परी - कौशिकसूत्र २०।२२ प्लक्षोदुंबरः पिप्परीति प्रसिद्धः (!) येथें Bloomfield उद्गार व आश्चर्य कां दाखवितो न कळे. ] (भा. इ. १८३२)
पिवशी बिवशी [ पितृस्वसृ = पिअससा = पिवशी, बिवशी ] ( मावशी बिवशी ह्या सामासिक शब्दांत हा शब्द येतो. स्वतंत्र अस्तित्व सध्यां ह्या शब्दाला नाहीं. लोप झाला आहे.) (स. मं.)
पिवळें हिरवें [ पीतंहरितं = पिवळें हिरवें. हरित = हरिअ = हरिव = हिरव ( वा - वी - वें )] येथें हिरवें म्हणजे पिवळें असा अर्थ आहे. (भा. इ. १८३४)
पिवळोखी [ पीतलक्षिका = पिवळोखी ] पिवळोखी म्हणजे पिवळा रंग.
पिवा [ पीव् to be fat स्थौल्ये = पिवा ] Fat, plump.
पिशवी [ प्रसेवक, प्रसेविका. प्रसेविका = पिसवी = पिशवी ( सा - सी, शी - सें ) प्रसेविका ( leathar vessel ) = पिशवी ]
पिस [ पिशाच्य = पिशाइ = पिसें (वेड ) ] पिसें लागलें म्हणजे पिशाच्य लागलें. (भा. इ. १८३३ )
पिसाव [ प्रस्रावः ] (धातुकोश-पिस ३ पहा)
पिसारा १ [ पिच्छबर्हः = पिसारा ]
-२ [ पिच्छभारः = पिस्सहारा = पिसारा (पाखराचा) ]
पिसारें [ पिच्छाग्रं = पिसारें ( बाणाचें ) ]
पिसावा [ स्त्रु १ गतौ. प्रस्रावः ] (धातुकोश-पिस ३ पहा)
पिस्कारणें [ अपस्किरणं = पिस्करणें, पिस्करणें (प्रयोजक) ] (भा. इ. १८३२)
पिळका [ पुलकः = पिळका. उ = इ ] अंगाला पिळके देत म्हणजे पुलक देत.
पिळणें १ [पीडनं = पीळणें = पिळणें ] स मां पीडयति = तो मला पिळतोय्. (भा. इ. १८३४)
-२ [ पीडन = पीळण = पिळणँ - णें ] ( भा. इ. १८३२)
पी [ प्लीहा (कुक्षिव्याधिः ) = पीआ = पी ] त्याला पी झाली आहे म्हणजे प्लीहानामक कुक्षिरोग झाला आहे. (भा. इ. १८३३)
पीक [ पक्ति: = पीक (पक्वं) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)
पीठवण [ पृष्टिपर्णि = पीठवण ] पृश्निपर्णि असा शब्द अथर्व संहितेंत येतो. परंतु मराठींत अपभ्रंश पीठवण असा ठकारयुक्त आहे. तेव्हां पृष्टिपर्णि असा ष्टिकारयुक्त उच्चार मराठीच्या पूर्वजांना माहीत होता असें दिसतें. ही पीठवण कोडावर औषध आहे. अथर्वांत पृष्णपणिं कुष्टावर सांगितली आहे. (भा. इ. १८३६)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पिंजणें [ पिंज् १० हिंसायाम् = पिंजणें ] तो माझीं हाडें पिंजतो म्हणजे क्षीण करतो. ( घा. सा. श.)
पिंजर [ पिंजरं (पिंजरिका) = पिंजर ] पिंजर म्हणजे हरताळ.
पिंजरणें [ पिंज् १० हिंसायाम्, पिंजरितं = पिंजरलें ] पिंजरणें म्हणजे बारीक धून पिस्कारणें. (धा. सा. श.)
पिंजरा [ पंजर = पिंजरा ] ( स. मं.)
पिंजळी [ पिंजूल = पिंजळी ] एकविशत्यादर्भपिजूलैः पावयंति । (ऐतरेय ब्राह्मण) पिंजूलि असा हि संस्कृत शब्द असावा. ( भा. इ. १८३४)
पिंजारणें [ पिच्छ् १० कुट्टने. पिच्छलायते = पिंजारणें ] मांजर शेंपूट पिंजारतें म्हणजे केस पसरतें. ( धा. सा. श.)
पिंजारी [ पंजिकार: = पिंजारी ]
पिटुकलें [ प्रथुकं (young of an animal) पिटुक. पिटुक + ल (स्वार्थक) = पिटुकलें ] प्रथुक म्हणजे कोणत्या हि प्राण्याचें लहान अर्भक. उंदराचें young one of a rat. (भा. इ. १८३६)
पिटणें [ पिट् शब्दसंघातयोः ] पिटणें ( टाळी, डांगोरा) (ग्रंथमाला)
पिठवडी - पिठवडी = पिष्टवर्ति (पिठाचें एक तिखट पक्वान्न)
पिठोरी = पिष्टपूरिका (घिवरांसारखे एक पक्वान्न)
घिवर = घृतपूरः ( घिऊर = घिवर ) एक पक्कान्न.
पिठोरी = पिष्टगौरी । पिठोरी पूर्णिमा म्हणजे ज्या पूर्णमेस पिठाची गौरी करून पूजितात ती ।
पिठी [ पिष्टिका = पिठी ]
पिठोरी १ [ पिष्टपूरिका = पिठोरी ]
-२ [ पिष्टगौरी अथवा पीठगौरी = पिठोरी ]
पिठ्ठा १ [ पिपाठ: (पौनःपुन्येन पाठ: ) सनचा अभ्यास ] त्यानें काव्याचा पिठ्ठा पाडला = तेन काव्यस्य पिपाठ: (सं.) पादितः । म्हणजे त्यानें काव्याचा सडकून पाठ केला.
-२ [ पिष्टकः । तिळाच्या कूटाची ढेप ] पिठ्ठा पाडणें म्हणजे तीळ कुटून त्याचें बारीक चूर्ण करतात त्याप्रमाणें एखाद्या पदार्थाचें चूर्ण करणें. अत्यन्त कुंबळणें ।
पिढाण [ पिधानं = पिढाण ] मडक्यावर ठेवावयाचें झांकण.
पिता [ पितृ = पिता ] ( स. मं. )
पित्तपापडा [ पीतपर्पटः = पित्तपापडा ] (भा. इ.१८३४)
पित्त्या [ पित्रीय = पित्तीअ = पित्त्य (त्त्या-त्त्यी-त्त्यें ) ] (भा. इ. १८३२)
पिंपळ [ पिप्लुः = पिंपळ ] (भा. इ. १८३३)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
७ ज्या वनस्पतिनामां वरून बरींच ग्रामनामें निघालीं त्यांतील मुख्यमुख्यांचें वर्णन एणें प्रमाणें:-
१ पिप्पल (पिंपळ) | ९० | २ वट (वड) | ७९ |
३ निंब (लिंब) | ४६ | ४ वरक (वरीं) | ४५ |
५ बदर (बोर) | ४३ | ६ चिंचा (चिंच) | ३७ |
७ नंदक (नांदुकीं) | ३४ | ८ उदुंबर (उंबर) | ३१ |
९ पलाश (पळस) | ३१ | १० हिंगु (हिंगणबेट) | ३० |
११ जंबु (जांभूळ) | २७ | १२ श्यामाक (सांवा) | २७ |
१३ मधु (मोहडा) | २४ | १४ करंज …. | २१ |
१५ कदंब (कळंब) | २० | १६ सारक (जैपाळ) | १८ |
१७ आम्र (अंबा) | १७ | १८ कटतृण | १७ |
१९ साक (साग) | १२ | २० अमला (आंवळी) | ११ |
२१ शिरीष (शिरस) | ११ | २२ पाटली (पाडळ) | ११ |
२३ शाल्मलि (सांवर) | ९ | २४ बर्बुर (बाभुळ) | ८ |
२५ कदली (केळ) | ७ | २६ खदिर (खैर) | ७ |
६७१ |
एकंदर १४२८ गांवें. त्यां पैकीं सुमारें निम्मी गांवें ह्या २६ वनस्पती खाली पडतात. ही च वर्गवारी कमजास्त फेरफारानें इतर हि विस्तीर्ण प्रांतांत पडावी, असं अदमास आहे.
८ वनस्पतींचीं सर्व नांवें व ग्रामवाचक सर्व प्रत्यय एथूनतेथून संस्कृत आहेत, निदान सध्यांच्या महत्तम संस्कृत कोशांत सांपडतात. एक हि वनस्पतिनाम असंस्कृत नाहीं. ऐन, उंडण, वगैरे दोन तीन नांवांचें मूळ संस्कृत मला देतां आलें नाही. तत्रापि तीं संस्कृतोत्पन्न आहेत यांत संशय नाही. ह्या सा-याचा अर्थ असा कीं वनस्पतिनामजन्य ग्रामनामें एकोनएक आर्य वसाहतवाल्यांनीं अरण्यांत वसाहत करतांना दिली. ह्या १४१८ ग्रामनामांत भिल्लादींचा बिलकुल पत्ता लागत नाहीं. नापत्याचें कारण आर्यप्रवेशाच्या आधीं दंडकारण्यांत भिल्लादींचा अभाव असो, किंवा आर्याची म्लेच्छभाषासहिष्णुता असो, किंवा भिल्लादींची अत्यन्त वन्यावस्था असो. तिन्हीं पक्षां पैकीं अमुक च पक्ष स्वीकार्य धरण्यास अद्याप पर्यंत ह्या वनस्पतिनामांत कांहीं च खूण सांपडलेली नाहीं.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पाहाडमूळ [ पाठामूलं = पाहाडमूळ ] वनस्पति.
पाहाल १ [ प्रभातकाल = पाहाल (प्रातःकाल )
-२ [प्रातःकाल = पाहाल] पाहालें पाही रे oh lock at the dawn
पाहूणचार [ प्राघूर्णिकोपचारः = पाहूणचार ]
पाळ १ [ पाली = पाळ ] (स. मं. )
-२ [ पालि: = पाळ ] परिघ, कांठ.
-३ [ पालि: (अश्रि, कोण) = पाळ ] घराची पाळ म्हणजे कोपरा, कोण.
पाळत-द [ पाल् १० वाट पाहाणें, प्रतीक्षणे. पाल + क्तिन् = पालतिः = पाळत-द ] ( धा. सा. श. )
पिकदाणी [ पिकादिनी = पिकदाणी ] (भा. इ. १८३४)
पिकलेलें [ पक्कपक्कं ] ( ओलेलें पहा)
पिंगूळ [(कु) भृंगकः = बिंगल = पिंगुल = पिंगूळ ] पिंगूळ म्हणजे घाणेरडें पादणारा किडा.
पिचकट [ पिच्चट (नेत्ररोग ) = पिचकट ] (भा. इ. १८३३)
पिचकणें [ उपस्कृ = (उ लोप) पचक = पिचक.
पस्करणं = पिचकणें, पुचकणें ] दहीं पिचकलें म्हणजे दहीं कुजून नासून बिघडलें. उपस्कृतं पूतिगंधादियुक्तं. (भा. इ. १८३४)
पिचकारी [ अपस्किरी = पिसकरी = पिचकरी = पिचकारी. स चा च झाला ] (भा. इ. १८३२)
पिचडी [ पिच्चटी, पिच्छटी ] (धातुकोश-पिचकार पहा)
पिचणें [ पिष् = पिस् = पिच् = पिचणें वा पिसणें ] (भा. इ. १८३२)
पिचलेलें [ पिच्छिलं = पिचलें. पिचल + ल (स्पार्थक) = पिचलेलें ( दहीं वगैरे) ] (भा. इ. १८३४)
पिच्छा १ [ पिपृक्षा F. = पिच्छा M. ] The wish to be asked.
विचारून विचारून पोरानें पिच्छा पुरविलान्. The lad tired and exhausted my wish to reply by asking question after question.
-२ [ (पद) पित्सा =पिच्छा ] पित्सा म्हणजे मिळविण्याची इच्छा. त्यानें पिच्छा घेतला म्हणजे कांहीं एक वस्तु मिळविण्याची इच्छा घेतली. (भा. इ. १८३६)
पिछाडी [पश्चार्द्धं = पिछाड - डी. अ = इ]