Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

नीड [ स्निग्ध = निढ्ढ = नीड = नीट ] नीट बोल = स्निग्धं वद. (भा. इ. १८३४)

( आड ) नीड [ नि + अर्ध ]

नीत [ नीतिः = नीत ]

नीपरकापण [ निस् + परकत्वं = नीपरकापण ] the state of being without another.
उ०- नीपरीकापणी आपुलां । आकासाचा संचु वीराला ।
तो स्वयं असे पुढेला । कांही नाहीं की ॥ २१५
अमृतानुभव जुनी पोथी.

नीम [ नेम (अर्धा) = नीम ] (भा. इ. १८३४)

नुगमणें [ अनुगमनं ] (नुमगणें पहा)

नुमगणें [ अनुगमनं = नुगमणें = नुमगणें ] नुमगणें म्हणजे जाणणें. (भा. इ. १८३६)

ने आण [ नय आनय = ने आण ]

नेचा [ नेजक ( तंबाखूचा धूर पाण्यानें धुवून ज्या पात्रांतून जातो तें पात्र) = नेचा ]

नेट १ [ नैष्ट्यं = नेट ]

-२ [(स्त्री) निष्टा = नेट (पुं.) ] नेंट म्हणजे निश्चय.

-३ [नेत्रः = नेट]

-४ [ नेत्र = नेट्ट=नेट ] (भा. इ. १८३२)

नेटक ( का-की-कें) [ नैष्ठिकं (निश्चित) = नेटिकें = नेटकें ] नेटकें म्हणजे निश्चित.

नेटकी [ नेचकी ( सर्वांगसुंदर गाय ) = नेटकी ] नेटकी नार म्हणजे सर्वांग सुंदर स्त्री.

नेटकें [ नेपथ्य + अकच् = नेटक (का-की कें) well-attired. साडीचोळी नीटनेटकी नेस.

नेडें [ नीध्रं edge = नेडें ( सुईचें) ] नेत [ नियति ] ( नियत पहा)

नेभळा [ निर्बल: = नेंबळा = नेभळा. इ=ए, रेफामुळें ]

नेभळ (ळा-ळी-ळें) नाभिल = नेभळ. भि मधील इ ना कडे नेऊन ने ] नाभिल म्हणजे नाभि संबंधानें, फुटल्या बेंबीचा. नेभळें नेसूं नकोस म्हणजे नाभीच्या खालती नेसूं नकोस. हा मनुष्य नेभळा आहे म्हणजे (मूळार्थ) हा मनुष्य बेंबट्या आहे. बेंबट्या मनुष्य दिसावयाला ओंगळ व हास्यकारक दिसतो; सबब नेभळा म्हणजे भोळसर, हास्यकारक, ओंगळ इ. इ. इ. (भा. इ. १८३७)

निसते (समयीं) [निशीथे = निसीते = निसते ] निसते समयीं म्हणजे निशीथ समये.
निजते हा ज मध्य शब्द निराळा.
निशीथ ह्या शब्दांत शी शयन करणें हा घातू आहे. निशीथ म्हणजे शयन करण्याचा वेळ. (भा. इ. १८३४)

निसरडें १ [ निषद्वरं = निसरडें (चिखल ) ] निसरड्यावर चालूं नको म्हणजे पातळ चिखलावर चालू नको.

-२ [ नि:सरत् = निसरड ( डा-डी- डें) ] ( भा. इ. १८३२)

निसुक [ निःस्वक = निमुक ] दरिद्री. (भा. इ. १८३४)

निसूर १ [ नि + शूर (शूर स्तंभने, वेड्यासारखें स्तब्ध होणे, to be senseless)= निसूर senseless, idle.

-२ [ निस् + स्मृ = निसूर ] without memory, forgetfully.

निस्तोप [ निस्तुषं = निस्तोष] ज्यांत तूस राहिलें नाहीं तें, लाक्षणिक निर्दोष.
तूस काढलेले तांदूळ ते निस्तुष.
निस्तोष म्हणजे व्यंग, उणेपणा नसलेलें.

निहाळणें [ नि + भाल् = निहाळ (णें). न्याभाल् = न्याहाळ (णें ) ] निहाळणें हा शब्द न्याहाळणें असा हि उच्चारितात. भल ( भालयति, चुरादि ) , पहाणें निरीक्षणें. ( भा. इ. १८३२)

नी १ [ अन्यत्] (न पहा)

-२ [ न्वै ] ( नि २ पहा )

नीक ( का-की-कें) [ लीक (कं-का-क: ) ] अलीक = खोटें. लीक = खरें.
इतकेंच कीं हा लीक शब्द ग्रंथिक संस्कृतांत नाहीं. ज्ञानेश्वरींतील उपयोगावरून असें दिसतें कीं, हा शब्द प्रांतिक भाषेंत प्रचलित होता. (ज्ञा. अ. ९ पृ. ६०)

नीचनवा [ नित्यनवः = निच्च = नीच ]
नीचनवा म्हणजे नित्यनवा हा शब्द मराठी काव्यांत येतो.

नीट १ [ स्निग्ध ] (नीड पहा)

-२ [ स्निह् स्नीढ kind = नीट kind ] तो माझ्याशीं नीट आहे he is well desposed towards me.

संक [ सं. शंख - महा. संख - मरा - संक ] (म) (रा. ले. सं. भा. २ )
संकपाल [सं. शंखपाल (नागानंद नाटक) ] (म) (रा. ले. सं. भा- २ )

सटवे - सार्थवाहक = सठवाहअ = सठवा = व्यापारी. सटवे हें आडनांव महाराष्ट्रांत प्रचलित आहे. (ग्रंथमाला)

सबनीस - धंद्यावरून (क)

संबुस - शंबुः (स)

समंध - संबंधिः ( स )

समुद्र - सामुद्रिक = सामुद्रिआ = समुद्य्रा = समुद्रे = समुद्र. हें आडनांव देशस्थ ब्राह्मणांत आहे. (भा. इ. १८३२)

सरदेशमुख - सर्वदेशमुख्य: = सरदेशमुख. येथें सर हा शब्द फारसी नाहीं.

सरदेसाई - धंद्यावरून ( क )

सरवटे १ - शारद्वताः (क) ( स )
-२ श्रीपथाः (स)

ससनारे - शासनाहार: = ससनारे (आडनांव) noe who prepares copperplates.

सरपाटील - सर्वपट्टकील: = सरपाटील. सर शब्द फारसी नाहीं.

सरवटे - शारद्वताः (स) (क)
साकरे १ - शार्कराः (स)
-२ सांकरा: ( कों ) ( स )

साखरे १ - शर्कराक्षाः (स)
-२ शार्कराः ( कों )
-३ शाक्राः ( क )

साठये - सार्ष्टेयाः (कों) (स )

साठे १ - सार्ष्टिः (कों)
-२ सार्ष्ठिः (स)
-३ शाठ्यायनिः ( स )
-४ शठः = शाठ्यः = साठ्या = साठ्ये = साठे
( कै. राजवाडे यांच्या एका टिपणवहीवरून)

साडमाने - साद(मा) नाः= साडमाने = सांद्रमणि: (स)

साढमानी - सांद्रमणि: ( कों )

सातपुते - सात्वतपुत्राः (स)

सात्ये - सात्वकि: (स)

शेणवी व दळवी - महाराष्ट्रांत शेणवई ह्या नांवाचे जे स्वदेशबांधव आहेत त्यांच्या नांवाची व्युत्पत्ति नाना प्रकारची दिलेली निरनिराळ्या ठिकाणीं सांपडते. कित्येकांच्या मतें शेणवई असें रूप नसून शेणवी असें शुद्ध रूप आहे. ह्या लोकांच्या मतें शेणापासून झाले ते शेणवी ! गोव्याकडे पोर्तुगीज लोक शेणवयांना सनाय म्हणून हाक मारतात; परंतु हा शेणवई ह्या शब्दाचा केवळ अपभ्रंश आहे. श्येन नामक प्राण्यापासून ज्यांची मूळ उत्पत्ति कल्पिली ते शेणवई असाही मालवणास एका गृहस्थानें समासव्यवच्छेद केला ! असे नाना प्रकारचे अर्थ ह्या शब्दाचे विनोदानें झालेले आहेत. त्यांत विशेष कांहीं मतलब नाहीं. कोंकणी भाषेत शेणय असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ पंतोजी आहे. तिकडे ब्राह्मणांपेक्षां शेणव्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळें शिक्षकाचा धंदा शेणवीच करीत आले आहेत. ज्याप्रमाणें आंग्लोइंडियन लोकांत पंडित म्हणजे पंतोजी समजण्याचा प्रघात आहे, त्याचप्रमाणें गोव्याकडे अस्सल पोर्तुगीज लोकांत पंतोजीस शेणय म्हणण्याचा प्रघात आहे. सारांश, शेणय हा शेणवी शब्दाचा अपभ्रंश आहे. तेव्हां शेणय शब्दाचा आश्रय करून शेणवी शब्दाची व्युत्पत्ति करतां येणें शक्य नाहीं. शेणवी शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेप्रमाणें आहे. शेणवी शब्द मूळ शेणवई असा आहे. शेणवई हें रूप मूळचें शेणवइ असें आहे. शेणवइ = सेण्णवइ = सैन्यपति, अशी ह्या शब्दाची परंपरा आहे. सैन्य शब्दाचें सेण्णं प्राकृत रूप आहे; व पति शब्दाचें वइ प्राकृत रूप आहे. चोलवइ = चोलपति, वाणरवइ = वानरपति, घरवइ = गृहपति, अशीं रूपें सेतुबंध काव्यांत अनेक ठिकाणीं आली आहेत. तात्पर्य, सैन्यपति शब्दाचें सेण्णवइ व सेण्णवइ शब्दाचें शेणवी असें अपभ्रष्ट रूप आहे. शेणवी शब्दाच्या जोडीचाच दळवी शब्द आहे. हा शब्द दळवै ह्या रूपानें ज्ञानेश्वरींत येतो. दळवैपणा हें भाववाचक नाम ज्ञानेश्वरींत अनेक वेळां आलें आहे. दळवी = दळवै = दळवइ = दलपति, अशी ह्या शब्दाची परंपरा दिसते. शेणवी व दळवी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. दळवी व शेणवी हे दोन्ही शब्द ज्ञानेश्धरांच्याहीपेक्षां जुने आहेत; व ते धंदा किंवा पेशा ह्यांचे वाचक आहेत. ह्यावरून दळवी व शेणवी ह्यांची मूळ जात कोणती तें मात्र निक्षून सांगतां यावयाचें नाहीं, परंतु सात आठशें वर्षांपूर्वी अलीकडल्यापेक्षां जातिनिर्बंध जास्त कडक होते असें मानल्यास शेणवी व दळवी ह्यांची जात धंद्यावरून क्षत्रियांची ठरते. हा केवळ व्युसतिदृष्ट्या विचार झाला. धर्म, आचार, शरीराचा आकार, वगैरेंचा ह्या बाबीसंबंधानें विचार करून मग कायमचा सिद्धान्त बांधला पाहिजे.
( सरस्वतीमंदिर शके १८२६)

शेवक - सेवकाः (स)

शेष - शैशयः ( स )

शेषे १ - शैशयः ( स )
-२ शैषया: (स)

श्रीखंडे - श्रीकंठ a district in North India - श्रीखंडे. श्रीकंठपदलांछन: called श्रीकंठ.

श्रोत्री - श्रोत्रियाः ( क ) ( स )

विळे १ - ऐलाः (स)
-२ विलवः (स)

वैद्य १ - बैदाः (कों) ( क) (स)
-२ शूलगवं यो वेत्ति असौ वैद्यः ( आश्वलायन-गृह्यसूत्र नारायणीयवृत्ति) शूलगव प्रकरणांत आहे.
वैद्य हें आडनांव कोंकणस्थ, कर्‍हाडे ब्राह्मणांत आहे. वैद्य म्हणजे वैद्यकी औषधांचा धंदा करणारी जात निराळी.

वैशंपायन - वैशंपायनाः ( कों ) ( स )

वोक - मौकाः (कों ) ( स )

वोझे - बौध्याः (क) (स)

व्यास - व्यासाः (कों) (स)

शारंगपाणी - शार्ङपाणि = शारंगपाणी, सारंगपाणी. ( भा. इ. १८३६)

शार्ङ्गपाणि - शार्ङ (रवाः) पाणिः च = शार्ङ्गपाणि. ( कों )

शिखावत - शिखापत्तिः (स)

शिंत्रे - श्वैत्रकाः (अनुनासिक आगंतुक) (कों)

शिंदा [ (शक ९०० तील) सिंद: = शिंद ] (रा. मा. वि. चंपू पृ. १८९)

शिरवटे - श्रीपथाः (स)

शिर्के [ शिरीषक ] (म) (शिखें पहा)

शिर्खे [ सं. शिरीषक-महा. शिरीखअ - मरा. शिर्खे, शिर्के ] (म ) (इतिहाससंग्रह)

शुक्रे - शौक्रेयाः (स)

शुक्र्‍या - शुक्रियः (शुक्रो देवता अस्य) = शुक्र्‍या. शुक्रये, शुक्रे अनेकवचन. महाराष्ट्र ब्राह्मणांत हें आडनांव आहे. (भा. इ. १८३३ )

शेखदार - धंद्यावरून. (क)

शेखावत - शिखापत्तिः (स)

दक्षिणा चात्र देया वै निष्कत्रयसुवर्णकं
( हरिवंशः अन्त्य अध्यायः ७ श्लोक )

निष्कत्रयसुवर्णक = तीन निष्क सुवर्ण.
१५. विश्वा, विस्वा (विंशक) अठरा विश्वे दरिद्र.
( अमरकोश-द्वि. कां. वैश्य वर्ग ८५-९० श्लोक ).

रुप्याचें नाणें
५ गुंज = आद्यमाषक
१६ माष = कर्ष, अक्ष, (रुप्याचा) (तोळा).
४ कर्ष = पल

सोन्याचें नाणें
८० गुंजा = सुवर्ण, बिस्त (हेम्नोऽक्षे).
४ सुवर्ण = कुरुबिस्त, सुवर्णपल.
१०० सुवर्णपल = तुला.
२० तुला = भार.
१० भार = आचित ( शाकटो भारः )

रुप्याचें नाणें
कार्षाषण, कार्षिक (रौप्य ).
ताम्रिके कार्षिके = पण:
रूप्यं = मुद्रितं
रूप्यकः = रुपिया = रुपया

नाणक हा शब्द अमरांत नाहीं.
नामांकण = नावांवण = नाण
नाण = नाणावलेला, नांवाजलेला
नामार्चित = नावाजलेला
नामांकनं = नावांअण = नाण (भा. इ. १८३२)

निश्चक्र (निःशेष) उपास म्हणजे पूर्ण पक्का उपास.

निश्णा [ निशाणः = निश्णा ] न्हाव्याचा वस्तारे पाजरण्याचा दगड.

निसट [ निसृष्ट = निसट ] (ओसाड पहा)

निसटणें १ [ निस्सृष्ट = निसट्ट = निसट ] (ग्रंथमाला)

-२ [ निसृष्ट = निसट्ट = निसट ] निसट + णें = निसटणें. निसृज् पासून न निघतां, निस्टष्ट पासून निसटणें शब्द निघाला आहे. किंवा निसृज् यांतील ज चा ट होऊन त्यापासून हा शब्द निघाला आहे. (भा. इ. १८३६)

निसणा [ निश्राणः = निसणा ]

लेणे - लायनाः ( कों )

लेंभे - रेभाः, रेभ्या (स)

लेले १ - लैलेहि ( कों )
-२ लैलेभिः (स)

लोकर १ - लोहकारय: (क)
-२ लौहकारयः ( स )

लोहकरे - लौहकारयः (स)

वझे - वाधिकाः (स)

वझ्ये - वधिका ( कों )

वणवे [ पर्णपति = वण्णवइ = वणवी = वणवे ] (म) ( इतिहाससंग्रह)

वर्जे - भ्राजाः (क) (स)

वर्णे - वरेण्यायनिः ( स )

वर्तक १ - वर्तनिक (Road-cess-collector) = वर्तक.
-२ धंद्यावरुन (कों.)

वर्त्तक - जमाबंदीचा कारकून (भा. इ. १८३२)

वष्ट - त्वाष्ट्राः (स)

वळे - बलि: (स)

वाकडे - (पर्ण) वल्काः (स)

वाकणकर - वाकिनिकेरा: (क) (स)

वाकळे - (पर्ण) वल्काः (स)

वागळे - वाग्गुलिकः तांबूलकरकंवाही । वाग्गुलिकः=वायुळिआ = वागुळिया = वागुळ्या = वागळ्या = वागळे ( अनेकवचन).
हें आडनांव सारस्वतांत, सध्यां आहे. इतर जातींत आहे कीं नाहीं हें माहीत नाहीं. तांबोली ( तांबुलिक: ) हें आडनांव देशस्थ
ब्राह्मणांत सध्यां आढळतें. (भा. इ. १८३२)

वाघ - व्याघ्राः (स)

वाटवे १ - वाटव्यः (स)
-२ वाटव्याः (स)

वाड १ - वाटा: (कों.) (स)
-२ वाटः (स)

वानवळा - वनपाल: = वनवाळा = वानवळा; किंवा उपायनपाल: = वाणवाळा = वानवळा.

वासे [ सं. वासुकि-महा. वासुइ-मरा. वासे, भासे ] (म)
(इतिहाससंग्रह)

विश्वामित्र - वैश्वामित्राः ( स )

निवर्तणें [ वृत् १. निर्वर्तनं - निवर्तणें ] मरणें. (भा. इ. १८३६)

निववणें [ वप् १ बीजसंताने. निर्वापणं = निवावणें = नववणें ] डोळे निवव = चक्षुषी निर्वापय. (धा. सा. श.)

निवळ १ [मल् ११. निर्मलनं = निवळणें. निर्मल = णिम्मल = निव्वळ, निवळ, निवळणें ] ( धा. सा. श.)

-२ [ निर्मलं = निव्वळ = निवळ ] निर्मलं वारि = निवळ पाणी.

निवाड [ निर्वादक = निवाड (निवडणारा) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)

निवाडा १ [ निर्णयपादः ( फैसल्ला ) = निवाडा ] Final Judgment.

-२ [ निर्वादः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३३)

निवांत [ निवातं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. २० )

निवेद १ [ ( न्यदः ) निध्यद = निवेद ( अन्न ) ] (भा. इ. १८३४)

-२ [ नैवेद्य offering of food to God = निवेद ] निव्वळ [ निर्+ मल् ]

निशणा [ निकषनः = निहसणः = निसणा, निशणा ]

निशाण-दुंदुभि [निःसाण = निशाण]
ज्ञानेश्वरींत निशाण शब्द येतो. त्याचा अर्थ नगारा, दुंदुभि. हा निशाण शब्द निःसाण शब्दाचा अपभ्रंश आहे. पताका या अर्थी फारशी निशान, निशाण म्हणून जो शब्द आहे त्याचा नगारा ह्या अर्थाच्या निशाण शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. मराठी पोवाड्यांत " घाव घाला निशाणा ” असें एक वाक्य येतें, येथें "नगार्‍यावर टिपरूं मारा" असा अर्थ विवक्षित आहे. ( स. मं. )

निशिलें [ निशित + ल ] ( धातुकोश-निस ३ पहा )

निष्क [ निष्क् १० परिमाणे, to weigh ]
१ निष्फ = २ सुवर्ण = ३ कर्ष ( १६ मासे = माषाः ).
४ कर्षाषण = १६ मासे.
५ { सुवर्ण कार्षाषण. 
६ { रौप्य कार्षाषण. 
७ टंक. 
८ द्रम्म ( द्रम् to go ). 
९ पण, पाण, पाणक (आणक).
१० नाणक.
११ काकिणी.
१२ कपर्दिका.
१३ वदाम = २ दान. 
१४ गद्यान.

राजवाडे १ - राजवाट = राजवाड = राजेवाडी. राजवाड गांवचा राहणारा तो राजवाडे. (ग्रंथमाला)
-२ धंद्यावरून (कीं)

रानडे - रानडे याचें मूळ रूप रानवडे. अरण्यवाट = रण्णवाड = राणवाड = रानवाड = रानवड.
रानवड नांवाच्या गांवांत किंवा थळांत राहणारा तो रानवडा अथवा रानडा. हें आडनांव व इतर पुष्कळ आडनांवें कुळवाचक आहेत. ब्राह्मण, मराठे, शूद्र व अतिशूद्र या सर्वांत रानडे हें आडनांव आहे. रानडे नांवाच्या कुळांत चातुर्वर्ण्यांतील जाति व उपजाति येतात. (ग्रंथमाला)

रानड्ये - अरण्यवाटाः = रण्णवाड = (प्राचीन मराठी) राणवडे = ( अर्वाचीन मराठी ) रानडे. (कों ) रानडे यांच्या वंशांत उत्पन्न झाले ते रानड्ये. ( इतिहाससंग्रह)

रावण - रावणाः (स)

रुखे - वृक्षाः (स)

रुषी - ऋक्षाः ( स )

रेंभे -रेभ्याः ( स )

रोगणे - रहूगणाः (स )

रोड्ये - रोदकि: ( कों ) (स)

लंके - लांकायनः (स)

लघाटे - लघुघाट = लघाट. लघाटांवर राहणारा, काम करणारा, तो लघाटा. (ग्रंथमाला)

लद्दू - लादः (स)

लवकर - लोपकृत: (स)

लंवकर - लोपकृत: ( क )

लवाटे - लव्यारदंडि: ( स) ( कीं )

लागू - लिगु: ( कों )

लाटे - ललाटिः ( स ) ( कों )

लिंबकर - लिपिकरः लिबिकरः ( scribe ) = लिबकर = लिंबकर (पाणिनि ३-१-२१ ) परभू आडनांव.

लिमये - या आडनांवाचा निमये असा पाठ कोंकणांत देवाच्या गोठण्यास गोडबोले यांच्या येथें सांपडला. गोत्रांत निमिः, निमयः असें नाम आहे. निमयः = लिमये (भा. इ. १८३५)

लुचाके - ग्लुकुचायनिः (स)

लुले - छलायाः (स)

निरेखणें [ ईक्ष् १ दर्शने. निरीक्षणं = निरेखणें, निरखणें ] ( धा. सा. श. )

निरोप १ [ निर्+ रु गतौ णिच् रोपय् to send = निरोप ] sending, dispatching.
निरोप देणें म्हणजे जा म्हणून सांगणें.

-२ [ निरोपः = निरोप ]

निर्गट [ निर्ग्रंथिक, निर्ग्रंथ ( भिकारी, मूर्ख ) = निर्गट, निरर्गट, निगर्गट ]

निर्गांठ [निर्ग्रंथ = निर्गांठ = निर्गाठ. सुग्रंथि = सुगांठ = सुगाठ = सुर्गाठ (निर्गाठींतील रकाराच्या धर्तीवर ) ] ( ग्रंथमाला )

निर्ढावणें [निरूढायते = निर्ढावतो. नीरूढ म्हणजे निःशेष रूढ ] निर्ढावणें म्हणजे अतिशय रूढ किंवा संवयीचा होणें. ( धा. सा. श. )

निर्धास [ निर्ध्वस्त] (निर्धास्त पहा )

निर्धास्त [ ध्वंस् १ नाशे. निर्ध्वस्त = निर्धास्त, निर्धास. ध्वस्ति = धास्ती. ध्वंस्तध्वंस्त = ढाचेंढुचें. ध्वंसनं = ढासण ] (धा. सा. श.)

निर्वानिरव १ [ वप् १ बीजसंताने. निर्वापानिर्वाप = निरवानिरव ] निर्वाप म्ह० देणें, अनिर्वाप म्हणजे न देणें.
त्यानें निरवानिरव केली म्हणजे देणें न देणें याची व्यवस्था केली. (धा. सा. श.)

-२ [ निर्वाह अनिर्वाह = निर्वाअअनिर्वा = निर्वानिरव ] (भा. इ. १८३५)

निर्वाळा [ निर+ वह् ] (धातुकोश-निर्वाळ ३ पहा)

निर्शन [ निर् + अश् = निरशनं = निर्शन. अश् ९ भोजने. ]

निर्‍हां [ नितराम् = निर्‍हां ] completly, अगदीं, निखालस.

निलाजिर [ णिल्लजिरं =निलाजिर ( रा-री-रें), निलाजर नकारार्थी नि ] (भा. इ. १८३२ )

निवडुंग [स्नुहिदंडवृक्षः = निवडंडवृक्ष = निवडंग, निवडुंग ] दंड मधील डच्याबद्दल गा झालेला आहे. (भा. इ. १८३७)

निवणें १ [ निपानं (पेला ) = निवाणें = निवणें ] पंतीचें निवणें म्हणजे पंतीच्या खालील पेल्यासारखे शेणाचें किंवा मातीचें बसकट.

-२ [ वा. निर्वाणं = निवणें. निर्वा (क्रियापद ) ] निवणें म्ह० थंड होणें. (भा. इ. १८३६)