Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

अधिकारी - ( प्रभू पहा )

अरब - वाजिवाहार्वगंधर्वहयसैंधवसप्तयः (अमर - द्वितीय कांड - क्षत्रियवर्ग ४५) येथें अर्वन् शब्द घोडा या अर्थी आलेला आहे. क्षीरस्वामी अर्वति याति इति अर्वा अशी व्युत्पत्ति करतो. व्युत्पत्ति हटानें वाटेल तशी होते. माझ्या मतें अर्वन् शब्द देशवाचक आहे. ज्यांना सध्यां अरब म्हणतात त्यांचें मूळ नांव अर्वन् व त्यांच्या देशाचें हि नांव अर्वन्. अर्व देशांतील घोडा तो अर्वन्. हा देशवाचक अर्व शब्द ऋग्वेदांत येतो.
(भा. इ. १८३४)

ओस्वाल १ - ऊर्जस्वल = ओस्वाल (माधवचंपू) (जातिविशेष )
-२ अश्वपालः = ओस्वाल (ब्राह्मणाची एक जात )

काठी [ कांथिक: = कांठी, काठी ] काठेवाडांतील लोकांना काठी म्हणतात.

कातकरी [ कातवडी पहा ]

कातवडी [ कृत्तिपट्टिन्= कातवडी ] कातवडी, काथोडी, कोठोडी व कातकरी हीं एकाच जातीचीं नांवें आहेत. कृत्ति म्हणजे कातडें व पट्ट म्हणजे वस्त्र. कातड्याचें वस्त्र पांघरणारा तो कुत्तपट्टिन्. (महिकावतीची बखर पृ. ८४)

कायस्थ १ - कायस्थ, कायथ, काइत, काइथ हा शब्द काय व स्थ या शब्दांच्या संहितेपासून निघाला आहे. क्षत्रियात् शुद्रायां जातः कायस्थः । काय म्हणजे मूळ धन. त्यावर उपजीविका करणारा जो तो कायस्थ. काये, कायेन वा तिष्ठति य: स कायस्थः । ह्याचा मूळ धंदा व्याजबट्टा करण्याचा दिसतो नंतर लेखन, चित्रकर्म हीं कामें ह्याला नेमून दिलीं, असें दिसतें.

-२ अथवा बोटांचीं शेवटें म्हणजे काय. त्याच्या साह्यानें उपजीविका करणारा जो तो कायस्थ. हाताच्या बोटाच्या शेवटांनीं लेखन, चित्रकर्म साधावयाचें. तेव्हां लेखन चित्रकर्म हा मूळ धंदा. त्यानंतर इतर धंदे.

या दोन व्युत्पत्त्या दिल्या आहेत. पैकीं दुसरी व्युत्पत्ति बरी दिसते. कारण, धर्मशान्त्रांतर्गत जातिविवेकप्रकरणांत दिलेल्या लेखनकर्माशीं ह्या दुसर्‍या व्युत्पत्तीचा मेळ चांगला बसतो. मनुसंहिता, याज्ञवल्क्य, मुद्राराक्षस व मृच्छकटिक यांत हा शब्द येतो. कायस्थ इति लघ्वी मात्रा ( मु. १; मृ. ९; या. १-३३६) (भा. इ. सं. मं. अहवाल १८३२ पान १६)

पडघा १ [ पतद्गृहः = पंडघर = पडघा= पिकदाणी किंवा पिकदाणी सारखें लहान पात्र ] (स. मं.)

-२ [ पलिघः = पडघा ]

पडघें [ परिग्राहः (enclosure) = पडघें ] enclosed ground near the house.

पडजीभ [ पतजिव्हा = पडजीभ ] (स. मं.)

पडतू [ प्रति हस्त substitute = पडतू ] substitute

पडदणी [ परिधानी = पडिदाणी = पडदाणी = पडदणी ] सोळें नेसतांना बायका मध्यें एक आडवस्त्र घेतात तें. (भा. इ. १८३३, ३४)

पडदा १ [ पटान्त: = पटंतो = पडदा ]

-२ [ परिधा = पडिधा = पडदा ] (भा. इ. १८३४)

पडदी [ परिधिः wall = पडदी ] wall.

पडलेलें [ पतितपतितं ] ( ओलेलें पहा)

पडवळ १ [ पटोल = पडवळ ] (भा. इ. १८३७)

-२ [ प्रतिवल = पडवळ ]

पडसर [ पत्सर = पडसर ]

पडसें [ ( पु. ) प्रतिश्यायस्तुः पीनसः । प्रतिश्याय = पडिसाअ = पडसें ] (भा. इ. १८३४)

पडळ १ [ पटलं त्वंधता स्मृता ॥ (केयदेव-पथ्यापथ्यविबोध)] डोळ्यावर पडळ आलें आहे म्हणजे अंधता आली आहे. (भा. इ. १८३४)

-२ [ प्रदर = पडळ] प्रदर: गर्त: (आचारमयूख)

पंडा, पंड्या [ प्रणिधिः (निगा राखणारा ) = पंडा, पंड्या ] गंगेचा पंड्या म्हणजे गंगेवरची निगा राखणारा, गंगेवरचा परिचारक.

पडाव [प्लवः = पडव = पडाव ] एक प्रकारचें तारूं

पडिपाडु [ परि + पृ to fill up completely = परिपारः = पडिपाडु ] पूर्णता.

पडिभर [ परि + बर्ह् : परिबर्हः = पडिभर ] अतिशय, आधिक्य.

पडियन्ता [ प्रीयमाणः = प्रीयन्तः = पढियंता ] favoured, loving, being loved. ( ज्ञा. अ. ९ )

पडिसाई [ प्रतिछाया = पडिसाई ] shadow.

पडू [ प्रतिभू (surety) = पडू (खेळांतला) ]

पट्ट [ पट्ट हा शब्द प्राकृत आहे, संस्कृत नाही; प्राकृतांतून संस्कृतांत घेतलेला आहे. मूळ शब्द पत्र. त्याचें प्राकृत पट्ट. पत्र शब्द पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी. पैकीं पुल्लिंग पट्ट या शब्दाच्या वांट्यास आलें. ]
ताम्रपत्र = ताम्रपट्ट. पत्रवर्धन = पट्टवर्धन, पत्राभिषेक = पट्टाभिषेक. पत्रराज्ञी = पट्टराणी. पत्र = पत्त = पात ( एक प्राकृत रूप ). पत्र = पट्ट ( दुसरें प्राकृत रूप ); पैकीं दुसरें रूप पुन्हा संस्कृतांत घेतलें गेलें. (भा. इ. १८३३)

पट्टा [ प्रत्यायः tax, revenue, toll = पट्टा ] tax. पट्टा भरणें to pay tax.

पट्पट् [ पट् शब्द करणें. द्विरुतीनें पटपट. बोलण्याप्रमाणें जलद ] (ग्रंथमाला)

पठार १ [ प्रस्तार (forest abounding in grass) = पठार ]

-२ [ प्रस्थाहार = पठ्ठाआर = पठार ] table-land प्रस्थे सानौ (क्षीरस्वामी-अमर-द्वितीयकांडवनौषधिवर्ग-श्लोक ७९ टीका). पठार म्हणजे डोंगराच्या माथ्यावरील प्रदेश. (भा. इ. १८३४)

-३[ पृष्ठ ह्याचें प्राकृत व मराठी पाठ. विस्तीर्ण पाठ म्हणजे पाठार = पठार ] डोंगराची विस्तीर्ण पाठ म्हणजे डोंगरपठार. (स. मं. )

पठ्ठा [ स्था १ स्थाने. प्रतिष्ठापकः = पडिठ्ठावअ = पठ्ठा ] आमचा पठ्ठ्या = अस्मत्प्रतिष्ठापक: पठ्ठ्या १ [ पटिष्ट: ( अतिशय पटु) - पठ्ठ्या ]

-२ [ पष्टवाह् = पठ्ठ्या = पठ्ठ्या. षष्टवाह् (वैदिक) म्हणजे चार वर्षांचा बैल ] पष्टवाह् म्हणजे ओझें वाहून नेण्याला किंवा नांगर ओढण्याला योग्य असा चार वर्षांचा बैल. त्यावरून कामकर्त्या तरुण माणसाला लक्षणेनें पठ्ठ्या म्हणतात. (भा. इ. १८३५)

पडखाणें [ ईक्ष् १ दर्शने. प्रतीक्षा = पडिखा = पडखा ] प्रतीक्षस्व क्षणं = क्षणभर पडखा.
पडखा म्हणजे वाट पहा. पड आणि खा असे दोन शब्द नाहींत. पडखा असा एक शब्द आहे. पडखाणें हें सबंद क्रियापद आहे. प्रतीक्षणं = पडिखाणें = पडखाणें. (धा. सा. श.)

पडगें [ परिघः = पडिघ = पडगें ]
परिघ म्हणजे खळे, कुंपणा.

पडघम [ पटहं = पडघम. -- = म ] म.धा.१५


हजारी - साहस्त्रिकः = हजारी. सहस्रं भृतिः यस्य, ज्याचें वेतन हजार नाणीं आहे. हजारी हें परदेशांत आडनांव आहे.

हर्षे - हार्यश्वाः (क) (स )

हवे - ( इद्व ) हव्याः ( एकशेष ) ( कों ) ( स )

हंस - हंसाः (स)

हंसे - हंसकायनाः ( स )

हाटे - हाटिकः (हाट्ये पहा.)

हाट्ये - हाटिकः = हाटिआ = हाट्या. अनेकवचन हाट्ये, हाटे. हें अडनांव महाराष्ट्रांत आहे. बाजारांत व्यापार करणारा. जो तो हाट्ये. (भा. इ. १८३४)

हाबडे - हापत्तिः ( स )

हारकारे - हार्करिः (स)

हार्‍ये - हारीताः ( कों ) ( स )

हार्शे - हार्यश्वाः ( स )

हिंगणकर - ग्रामनामावरून. (क)

हुचमणे - उच्चैर्मन्यवः ( स )

हुजूरबाजार - धंद्यावरून ( क )

हेर - हैयुराः ( स )

पछाडणें [ पश्चादयनं = पच्छाडअण = पछाडणें ] (भा. इ. १८३४)

पंजा [ फारसी ] (स. मं.)

पंजाबी [ पंचातपिन् doing austerilies under the five fires = पंजाबी ] one thoroughly initiated in any art, science etc.

पंजी [ पांचि = पंजी ] (भा. इ. १८३५)

पंजोळ [ प्रार्यालय = पाज्जालअ = पंजोळ ] (स. मं.)

पज्या [ अपजयः ] (पच्या पहा)

पटकन्, पटकर, पटदिनि [चटकर पहा ]

पटकन् झटकन् [ पटिति झटिति = पटकन् झटकन् ]

पटका १ [ पटकः a cotton cloth = पटका ]

-२ [ पट्टकः = पटका ]

पटकुर [ पट्टकुल = पटकूर (दासोपंत) ] (भा. इ. १८३२)

पटणें [ प्रतिभानं = परिहाणँ = पडणँ = पटणें ] यत्ते प्रतिभाति तत्कुरुष्व = जें तुला पटेल तें कर. (भा. इ. १८३५)

पटपट [ पटुपटु ( sharply, quickly) = पटपट ( काम करणें ) ]

पटवणें [ ( पटु) पटयति = पटवतो ] सः तं पटयति (पटुं आचष्टे) = तो त्याला पटवतो म्हणजे कुशल आहे म्हणून दुसर्‍याची खात्री करतो. (भा. इ. १८३६)

पटवणें, पटविणें (गळेसरी, अनंत वगैरे)-पट विणणें, बांधणें. पटापनं = पटावणें = पटवणें. (भा. इ. १८३३)

पटवा [ पट्टवायक ] (पटव्या पहा)

पटवेगार [ पट्टवायकारः = पटवइगार = पटवेगर. पट्टिकावायकार = पटवेगार ] रेशमाच्या पट्टया विणणारा. पटवणें = पट्टवायनं = पटावणें. पट्टया विणणें. ( भा. इ. १८३३)

पटव्या [ पट्टवायक = पटवा, पटव्या ] रेशमी वस्त्र विणणारा.

पटाइत वाघ [ पट्टायत = पाटाइत = पटाइत ] एक पट्टा लांब असणारा. (ग्रंथमाला)

पटाईत [ पटीयस्= पटाईत. स्=त् ] पटाइत म्हणजे युक्तिवान् skillful.

सेटे - शैताः = सेटे = श्रेष्ठिः ( स )

सेंडे १ - सैंधवाः (कों)
-२ सैन्धवाः (स)

सेवक - सेवकाः (स)

सोणीये - शौणायनाः (स )

सोणे - शौनकाः (स)

सोनिये - शौणायनाः ( कों )

सोनी १ - शुश्रूषेण्यः (सोन्या पहा)
-२ सोनी, सोहोनी, सोनिये, सोने -
नडादिभ्यः फक् ( ४-१-९९) नडादिगणांत शोण शब्द येतो.
शोणि: = सोनि, सोनिये, सोन्ये, सोने, सोहोनी, सोहनी.
( कै. राजवाडे यांच्या एका नोटबुकावरून )

सोनीये - शौणायनाः (स)

सोने - १ - शौनका: (स ) (कों)
-२ सौन्याः ( कों )
-३ सौन्यः (स)

सोन्या - शुश्रूषेण्यः worthy to be heard (Vaidik) = सोन्या, सोनी (हें कोंकणस्थांत सोनी आडनांव आहे. )

सोन्ये - शौणायनाः (कों)

सोपटे - सौपिष्टाः (स)

सोमण - १ सौम्यानिः ( स )
-२ सौमिनिः ( स ) ( कों )

सोवनी - सौमिनिः ( कों )

सोहनी - सौमिनि: ( कों ) (स)

पगडी १ [ प्रकृति = पगडी ] (अठरा पगड जात पहा)

-२ [ प्रकृति = पगडि, पगड ] बारा पगड, अठरा पगड जात म्हणजे अठरा प्रकृतीचीं माणसें. पगड म्हणजे प्रकृति. प्रकृति ह्या शब्दाचा पगडि असा अपभ्रंश जैनमहाराष्ट्रींत होतो. (भा. इ. १८३६ )

पघळणें [ प्रगलनं ] (भा. इ. १८३६)

पचका [ प्रचक् भिवविणें. प्रचकः = पचका ] पचका उडाला म्हणजे भेदरून गेला. (धातुकोश-पचक ५ पहा)

पचखालणें [ अक्ष् १ व्याप्तौ. प्रत्यक्षीकरणं = पचखालणें. अन्वक्ष् = नोख ( अ लेप ) ] ( धा. सा. श. )

पचणें [प्रत्ययनं = पच्चअणं=पचणें] यत्प्रत्येष्यते तत्वूहि= जें पचेल तें बोल. पचेल म्हणजे प्रत्ययास येईल. पच जिरणें या धातूहून हा पच प्रत्ययास येणें हा धातू, निराळा. (भा. इ. १८३५)

पचपचीत [पृषु सेचने (द्विरुक्त) पृषतपृषत्=पचपचीत] पचपचीत म्ह० पाण्यानें पाणचट झालेला पदार्थ. (धातुकोश-पचपच पहा)

पचंबा [प्र + समः (घोटाळा ) ] पचंबा उडाला म्हणजे घोटाळा उडाला.

पंचा [ (फारसी) पंज = (मराठी) पंच. पंजह्= पंचा ] पांच हात लांब वस्त्र. ( भा. इ. १८३३)

पचाडा [ प्रत्यादेशः = पच्चाडा, पचाडा (निंदा) ] (भा. इ. १८३४)

पचापचा [ प्सा प्सा ( प्सा to eat, devour) = पचापचा, पसा पसा ] पसा पसा डाळ खातो devours डाळ. पचापचा थुंकतो. उपसणें = उप्सा. भात उपसतो devours.

पच्चा १ [भर्त्सा = पच्चा] फजिती. to censure.

-२ [प्रत्यूहः = पच्चा] प्रत्यूह म्हणजे विघ्न. पच्चा उडाला म्हणजे विघ्न झालें.

-३ [ प्रत्ययः = पच्चअ = पच्चा] त्याचा पच्चा झाला = तस्य प्रत्यय: जातः. स्त्रीलिंग पच्ची (प्रतीति). ( भा. इ. १८३४)

पच्ची [अपश्री = पश्शी = पच्ची ] सौंदर्यनाश. (भा. इ. १८३६)

पच्या [ अपच्यवः = पच्या discomfiture. अपजयः = पज्या, फज्या defeat, discomfiture ]

पच्च्या [ प्र + च्यु (प्रच्याव: ) ] (फजित पहा)


पकपक आवाज करणें [ प्रकर्द. कर्द् १ कुत्सिते शब्द ] ( कडकड पहा)

पंकीं [ पंक्ति = पंक्कि = पंकीं किंवा पांकी ] ही वस्तु कोणत्या पंकीं पडते ? असा प्रश्न मुलें खेळाच्या प्रश्नोत्तरांत करतात त्यांतील पंकीं हा शब्द संस्कृत पंक्ति या शब्दापासून निघाला आहे. (भा. इ. १८३३)

पक्कड १ [प्रस्कदिः = पक्कड. स्कद्. स्कंद् to leap ] उडीचा प्रकार.

-२ [ प्रस्कंदिका = पक्कड. स्कंद् ] (धा. सा. श.)

पक्कें [पक्क = पक्क = पक्कं = पक्कें-क्का-क्की ] ( ग्रंथमाला )

पंक्तिपठाण [ पंक्तिप्रष्ठ = पंक्तिपठ्ठः = पंक्तिपठाण ] पठाण या शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३३)

पंक्ति बारगीर [ वारकीरः (a wife's brother) = बारगीर (पंक्तीला जेवणारा मेव्हणा). वारकीर: (a courser horse ) = बारगीर ( घोडेस्वार ) ]

पखवाज [ पक्षवाद = पक्खवाज = पखवाज. द चा ज ] (भा. इ. १८३३)

पखळण [ प्रक्षलन = पक्खलन = पखळण ] (भा. इ. १८३२)

पंखा [ इख़्, इंख् १ गतौ. प्रेंखा = पंखा. इख् , इंख् मागें पुढें हलवणें ] ( धा. सा. श. )

पखाल [ प्राघारिका = पखाल ] मुतणारी मुलगी.

पग १ [ पद = पअ = पग ] ( स. मं.)

-२ [ प्रक्रम = पगवँ = पगअँ = पग. प्रकृति = पगइ ] पग म्हणजे पुढें पाऊल टाकण्याची जागा. (भा. इ. १८३६)

पगड [ प्रकृति ] (पगडी २ पहा)

साधले - शांडिलाः (क)

सांधले - शांडिलाः ( क )

साने -१ - श्वानेयाः (कों ) (स)
-२ सायणाः ( कों )
-३ सायणः ( स)

सापळे १ - श्वाफत्काः (कों )
-२ श्वाफल्क: (स)

साफळे - श्वाफल्काः (स)
साबणे १ - सावर्णिः (स)
-२ श्यापर्णाः (स)

साबणें - श्यापणेंय = साबणें a surname

सांबारे - शांबरायणाः ( स )

सामग-क - श्यामगुः (स)

सारंगपाणी - शार्ङपाणि (शारंगपाणी पहा)

सारवटे - शारद्वताः (स) (क)

सावणे - श्यापर्णा: (स)

साळके १ - शालाक्याः (स)
-२ सालंकायनाः (स)

साळवे - साल्वेया: (स)

साळवणी - शाल्यायनिः (स)

साळुंके - शालंकायनाः (स)

सित्रे - श्वैत्रकाः (स)

सिंत्रे - श्वैत्रकाः (स)

सिधये १ - सिद्धाः (स)
-२ सिद्धाः ( सिद्धेयाः ) ( कों )

सुंदर - शौनरयः ( स )

सुदामे - सौदामेयाः (स)

सुनरे - शौनरयः (स)

सुरवे - सुरपतिः (इंद्र) = सुरवे (आडनांव) हें आडनांव मराठ्यांत आहे.

सुरुड - स्वरुंड ( स ).

सुर्वे - सुर्वे हें आडनांव प्रभु, मराठे वगैरे जातींत आहे. सुरपति = सुरवइ = सुरवै = सुर्वे. (ग्रंथमाला)

सुलाखे १ - स्वलोक्या: (स)
-२ सुनाश्वः (स)
-३ सुराक्षः (स) (t ) (t ) (t )

सुलोखे - स्वलोक्याः (स)

सूर - सुराः

नेम १ [ नेम (वेळ) = नेम (वेळ ) ] तो नेमाला आला म्हणजे वेळेला आला.

-२ [ नेमि: वज्रः । (निघंटु । ) त्यानें नेम मारला, या वाक्यांत नेम हा शब्द हत्यार या अर्थी वापरलेला आहे.
नेमि = नेम. त्यानें नेम मारिला म्हणजे त्यानें हत्यार मारिलें. ( भा. इ. १८३४)

नेमके [ नेम (कांहीँ ) कक = नेमका ] some few. ( भा. इ. १८३४)

नेमकें १ [ नियमिकं=नेमकें (नि +यम्)] restrained, confined, limited.

-२ [ निमितकं = नेमकें ( नि + मे to measure ) ] measured.

नेमाळी [ नवमल्लिका = नोमाली - नेमाळी ] पुष्पलतिकाविशेष ] (ग्रंथमाला)

नेवाणें [ न्यग्भू (णिच्) to humiliate
न्यग्भवनम् - न्यग्भावनम् } = नेवाणें humiliation
उ०- आहो रानिचेयां पालेखाइरां ।
नेवाणें करविलें लंकेश्वरा ।
एकला अर्जुनु परि अकरा ।
न जीणे क्षौणी ॥ ज्ञा. ११-२३

नेवाळ-ळी [ नैपाली = नेवाळी-ळ ] फुलझाड आहे.

नेवाळी [ नेपाली = नेवाळी ] वनस्पति.

नस, नेसणें [ निवस् = निअस् = न्येस =नेस ]
आभरणानि निवसति = वस्त्रें नेसतो. ( भा. इ. १८३३)

नेसणेंविसणें [ वस् आच्छादने. निवास्=नेसणें.
निवसनंविवसनं = नेसणेंबिसणें ] ( धा. सा. श. )

नोक [ अनूकं = नोक ] अनूकं तु कुले शीले ( अमरे मेदिनी ) नोक म्हणजे शील, स्वभाव. त्याचा नोक झोक पहा, म्हणजे शील स्वभाव पहा.

नोर [ नौ + आतर = नोवार = नोर.
नौ + तार्य = नोर ] fare.

नोवरा-री रें [ नववरक = नोवरअ = नोवरा-री-रें] नुकतेंच लग्न झालेली व्यक्ति ] ( स. मं.)

न्यहा (सं.) ( Noon) closing day = noon the advanced day.

न्यारें १ [ अन्यतर = अन्यअर = न्यारें-रें] (भा. इ. १८३२)

-२ [ अन्यतर = ( अ लोप ) न्यअर = न्यारें ]

न्याहारी [ अहनाहारी = न्हाआरी = न्याहारी.
अहन् = दिवस, अहना = दिवसां ( स्त्रि ) आहारी म्हणजे जेवण, अन्न घेणें, न्याहारी म्हणजे दिवसाचें जेवण.

न्हावगंड [ स्नापिकगंड: ] (शेणगंड पहा)