Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पापरा, पापरी [ पादप्रहारः = पापरा. पादप्रहारिका = पापरी ] लाथ.
पापा १ [ प्रपा = पपा = पापा ] प्रपा म्हणजे पाणपोई. मुलाच्या मुखाचें औत्कट्यानें चुंबन घेणें म्हणजे पापा घेणें. नंतर, पापा म्हणजे मुका, असा अर्थ झाला.
-२ (पपा ( पा to drink) = पापा ] Great drink. पापा देणें म्हणजे मुलाला पिण्यास मामू देणें.
पापिटल [ पापिष्ट = पापिट्ट = पापीट. पापीट + ल = पापटल ( ला-ली-लें) ] (भा. इ. १८३२ )
पापुद्रा, पापोटा [ पल्पूल: ] (पापोडा पहा)
पापोडा [ पल्पूल १० लवने छेदने. पल्पूल: = पापोला - पापोडा, पापोटा, पापुद्रा, पापोद्रा, पोपडा ] पापोडा, पापुद्रा, पोपडा म्हणजे कापून काढलेलें सालपट. (धा. सा. श.)
पापोद्रा [ पल्पूल: ] (पापोडा पहा )
पाप्या १ [ पापक (contemptible) = पाप्या (पापाणके कुस्तितैः ) ] पाप्याचा पितर = Father of a contemptible man worthless.
-२ [ पापात्मा = पाप्या ]
पांबरी [ प्रावारी, प्रवरी ] (पामरी पहा)
पाभर [ प्राग्भार = पाभर ] पाभर म्ह० तीर.
पामरी १ [प्रावारी, प्रवरी (पाणिनि ३-३-५४) = पामरी, पांबरी ] पांघरावयाचें रेशमी वस्त्र.
-२ [ प्रावारी - पामारी = पामरी ] पांघरावयाच्या उपरण्यादाखल लहान पीतांबरास पामरी म्हणतात. किंवा पीतांबरी = पिआंमरी = पामरी (लहान पीतांबर).
पाय १ [ पाद = पाअ = पाय ] (स. मं. )
-२ [ अपाय = पाय (इजा ) ] रांडेच्या पायीं बुडाला, येथें पायीं म्हणजे अपायीं. (भा. इ. १८३६ )
पायकडी [ पादकटिका anklet = पायाकडी ]
पायकडी [ पादकटिका temporary pillar for support वैजयंती = पायका, पावका ]
पायखाना [ पायुखनिः = पायखाना ]
पायखीळ [पादकीलिका = पायखीळ ]
पायंडा [पाददंडः = पायंडा ]
पायपोस १ [ पादपोषक = पायपोस ] Foot-preservar.
-२ [ पादस्पृश् = पायपोस ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पादरपुचका [ पर्दपृश्निक: = पादरपुचका ] पर्द: म्हणजे पादरा, पादणारा; आणि पृश्निकः म्हणजे दुर्बल. पादरपुचका म्हणजे पादरा आणि दुर्बळ.
पादरफुसका [ पर्द्, स्फुर्ज् १ कुत्सिते शब्दे. पर्दस्फुर्जकः= पादरफुसका ] स्फुर्जक म्हणजे मेघनाद करणारा. पादरफुसका म्हणजे पादून मोठा आवाज करणारा. [धा. सा. श. ]
पादेंलोण [ पर्दक (पर्द पादणें) + लवण = पद्दअलोण = पादलोण = पादेंलोण ] पादाच्या रूपानें नळांतील वात काढून लावणारें जें लवण तें पादेंलोण० ( भा. इ. १८३३ )
पाद्रा १ [ पर्दक: (पादणारा) = पाद्रा]
-२ (प्रा + द्रु to fly away from : प्राद्रावक = पाद्रा ] पळकुटा.
-३ [ पद्रक = पद्रा = पाद्रा ] ( स्थलनामकोश-भडोच पहा)
पान १ [ उपाभरणं = उपाहरणँ = उपारणँ = उपरणें = पर्णे = पर्ण = पान ] सरदारांना पानें व लुगडीं दिलीं म्हणजे सरदारांना उपरणीं व वस्त्रें दिलीं. (भा. इ. १८३३)
-२ [ साप चावला म्हणजे पान लागलें असा प्रयोग महाराष्ट्रांत करितात. येथें पान म्हणजे साप असा अर्थ आहे, झाडाचें पत्र असा अर्थ नाहीं. साप हा अर्थ कसा आला तर असा:- (सं. ) पन्नग = ( महा. ) पण्णअ = (जु म.) पाण = (न. म.) पान. (१) पुष्कळ शब्दांचीं लिंगें मराठींत बदलतात म्हणून व (२) पान (पत्र) ह्या मराठी शब्दाच्या लिंगाचें अनुकरण करून, पान (सर्प ) हा शब्द मराठींत नपुंसकलिंगी बनला आहे. पान लागलें = साप (पायाला वगैरे) लागला ! (भा. इ. १८३२)
पानवेल [ पन्नगवल्ली [ (नागवल्ली) = पानवेल ]
पान्हा [ प्रस्नावः ] ( धातुकोश-पान्ह पहा)
पापणी १ [ पक्ष्मणी (द्विवचन ) = पक्कणी = पाकणी = पापणी ( डोळ्याची ) ] मराठींत पापणी एकवचनी आहे. अनेकवचन पापण्या. पक्ष्मणी क्ष्म = प = पापणी आत्मन् त्म = प = आपण आत्म्यं त्म्य = प आपें (ग्रंथमाला)
-२ [ पक्ष्मिणी (द्विवचन ) = पापणी ] (स. मं.)
पापरा [ पर्परिक = पापरिअ = पापर्या, पापरा. येन पीठेन पंगवः चरंति स पर्पः । पर्पेण चरति पर्षिकः । ] गाडींत बसून जो पांगळा भिक्षा मागतो तो. गाडींत बसून भिक्षा मागणार्यांची ही परंपरा पाणिनीच्या वेळेपासूनची आहे ! (भा. इ. १८३४) म. धा. १६
स्थलनामव्युत्पत्तिकोश
(१) दंडकारण्य आर्यागमना पूर्वी निव्वळ किर्र रान होतें. त्यांत कोणत्या च माणसांची वसती बिलकुल नव्हती.
(२) माणसांची जर वसती असेल तर ती (१) पशुतुल्य पूर्ण रानटी, किंवा (२) अर्धवट रानटी, किंवा (३) किंचित सुधारलेल्या माणसांची असेल. पशुतुल्यांना गांवें व अर्थात् ग्रामनामें नसतात. अर्धवट रानट्यांना गांवें असलीं तर ग्रामनामें असतील. आणि किंचित सुधारलेल्या माणसांची वसती असेल, तर ग्रामनामें त्यांच्या भाषेतील असू शकतील. आर्य वसाहती करण्यास दक्षिणारण्यांत जेव्हां शिरले तेव्हां तेथील पूर्वीच्या माणसांकडून नद्या, पर्वत, ओढे, गांवें, प्रांत, प्रदेश, इत्यादींची त्या माणसांच्या भाषेतील नांवें आर्यांच्या काना वर पडून तीं च नांवें आर्य कमजास्त प्रचलित करतील. (४) चांगले बरे च सुधारलेले लोक जर आर्यपूर्व असतील, तर ग्रामनामें त्या लोकांच्या भाषेतील च शंभरांपैकी ९९ १/२ हिश्शांनी रहातील. एखाद दुसरे नांव संस्कृत येईल. (६) जगांतील वसाहतकर्माच्या अर्वाचीन सार्वत्रिक अनुभवानें सिद्ध झालेल्या ह्या गृहीतगोष्टी घेऊन, महाराष्ट्रांतील ग्रामांच्या नांवांचा अभ्यास कर्तव्य आहे. मराठी भाषा आज बाराशें वर्षे ज्या प्रदेशांत प्रामुख्यानें प्रचलित आहे, त्या प्रदेशाला, सध्यांच्या शोधा पुरता, मी महाराष्ट्रदेश ह्मणतों. ह्या शोधाचा समग्र अभ्यास म्हणजे महाराष्ट्रांतील यच्चयावत सर्व गांवांच्या नांवांचा अभ्यास. पैकीं प्रथम एका तालुक्याच्या एका तर्फेतील सर्व ग्रामांच्या नांवांचा अभ्यास देतों. रीति अशी. सध्यांचीं ग्रामनामें बहुतेक एकोनएक मराठींत संस्कृतांतून महाराष्ट्रीद्वारा अपभ्रष्ट आहेत, असा समज. तो खरा कीं खोटा, हें पहाण्या करितां मराठी अपभ्रंशाचें मूळ संस्कृत रूप देण्याचा प्रयत्न करावयाचा. प्रयत्नांत एक बाब दृष्टी पुढे ठेवावयाची, ती ही कीं, संस्करणांत ज्या अवयवाचा संस्कृतवैदिक भाषेत कांहीं च अर्थ निष्पन्न होणार नाहीं, तो अवयव ज्या ग्रामनामांत असेल तें ग्रामनाम तात्पुरतें अनार्य समजावचाचें. पुढें कोणास तो अवयव संस्कृत आहे असें सिद्ध करतां आल्यास, तें ग्रामनान अनार्यकोटींतून वाढून आर्यकोटींत घालावयाचें. निरुक्ति सहज साधिली पाहिजे, ओढाताण करावयाची नाही. ग्रामनामांची निरुक्ति करतांना कांहीं अडाखे आढळले ते निरुक्तकारांच्या उपयोगार्थ खालीं देतों. ग्रामनामांच्या अंत्यावयवां वरून हे अडाखे बसविलेले आहेत.
ग्रामनामा- कोणत्या संस्कृत- म्रामनामा कोणात्या संस्कृतन्त्यक्षरें शब्दाचा अपभ्रंश न्त्यक्षरें शब्दाचा अपभ्रंश
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
ह्यांतील बहुतेक सर्व शब्द पाणिनीय आहेत. पल्ल हा शब्द पद्र ह्या पाणिनीय शब्दाचा अपभ्रंश आहे. वेर हा शब्द पाणिनीच्या नंतरचा आहे. पुर:, पद्रा, वहा वगैरे लिंगें पाणिनिपश्चात्क आहेत. धि, धं, हे प्रत्यय समुदाय, धारणा, इत्यादींचे वाचक आहेत.
यापुढे पुणें जिल्ह्यांतील मावळ तालुक्यापैकीं नाणें तर्फांतील १६८ गांवांच्या नांवाची व्युत्पति राजवाड्यांनीं दिली आहे. तीं गांवें व त्यांची व्युत्पति कोशांत घेतलेली आहे.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
(३) सध्यांच्या संस्कृत रामायणांत शबरीचा उल्लेख आहे. त्या वरून एवढें च सिद्ध होतें कीं, आर्यांना दक्षिणेंत शबरांची ओळख झाल्यावर रामायणाची रचना झाली. गोंड,खोंड, कातकरी, ठाकूर, कोळी, यांचा उल्लेख रामायणांत नाहीं. भारतांत, तर, मला वाटतें, गोंड, खोंड वगैरे शब्द नाहींत च नाहींत. रामायणांत व भारतांत पांड्यादि दक्षिणेंतील लोकांचीं नांवें येतात, त्या वरून हे दोन्ही ग्रंथ पांड्यादींच्या राज्यांची दक्षिणेंत स्थापना झालेली माहीत झाल्या नंतर लिहिले गेले एवढें सिद्ध होतें. हे दोन्ही ग्रंथ सापेक्षतः बरे च अर्वाचीन आहेत असें सर्व शोधक म्हणतात, तें साधार दिसतें. आतां भिल्ल, शबर, ह्यांचा उल्लेख रामायणांत आहे, या वरून दक्षिणेंत आर्यांच्या अगेदर शबरांची व भिल्लांची वसती झालेली होती, असें च केवळ म्हणतां येत नाहीं. अगस्त्यादि आर्य ऋषि व भिल्लशबरादि अनार्य लोक समकालीं दंडकारण्यांत आले असण्याचा. संभव आहे. इतकें च नव्हे, तर आर्यांनीं अल्पस्वल्प जंगल साफ केल्या नंतर हि भिल्लादि अनार्य दंडकारगाण्यांत येऊन राहूं लागले असण्याचा संभव आहे. तात्पर्य, दंडकारण्यांत आर्य आधीं आले कीं अनार्य आधीं आले, हा प्रश्न रामायण व भारत ह्या ग्रंथांतील उल्लेखां वरून निभ्रांत सुटण्या सारखा नाहीं. तत्पश्चात्क संस्कृत ग्रंथांची तर, ह्या शोधांत कांहीं च मातब्बरी नाहीं.
(४) आपण आर्य लोक व ज्यांना आपण प्रस्तुतकालीं अनार्य म्हणण्याचा प्रघात पाडला आहे ते मूतिबपुलिंदशबरादि लोक जेव्हां विध्योत्तर एका च प्रदेशांत रहात होते, तेव्हां मूतिबादींना आपण लावतों त्या अर्थी अनार्य हि संज्ञा लाविली जात नसे, असें ह्यणण्याला पुरावा आहे. विश्वामित्राचे शंभर पुत्र होते, पैकीं कांहीं अधर्म्य आचरण करूं लागले, सबब पतित झाले. ते हे पतित विश्वामित्रपुत्र मूतिबादि लेक होत, असा वैदिक इतिहास आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, आर्य ऋषि व मूतिबादी लेक मूलतः एकवंशीय असून, अधर्म्य आचरणा स्तव पतित होऊन निराळे गणिले जाऊं लागले, अशी समजूत ब्राह्मण कालीन विचारवंतांची होती. समजूत कशी असो, एवढें सिद्ध आहे की, मूतबादि लोक आर्यसंघांतून निघून निराळे झाले, म्हणजे मूतिबादि लोक आर्यांची विंध्योत्तरप्रदेशांत वसती झाल्यानंतर अस्तित्वांत आले, असा इतिहास ब्राह्मणकालीं प्रचलित होता. मूतिब, पुलिंद, शबर, भिल्ल, कातकरी, ठाकूर गोंड, खोंड, कोळी, इत्यादि लोक विंध्योत्तर व विंध्यदक्षिण प्रदेशांतील मूळचे स्वयंभू लोक आहेत व ते आर्यांच्या फार पूर्वी पासून ह्या प्रदेशांत रहात आहेत, अशी जी यूरोपीयन तदनुयायी हिंदू शोधकांची समजूत ती उपरिनिर्दिष्ट ऐतरेयब्राह्मणान्तर्गत परंपरित इतिहासाच्या विरुद्ध आहे. उत्तरदक्षिण हिंदुस्थानांत आर्यांच्या अगोदर ह्या अनार्यांची वसती होती, हें यूरोपीयन शोधकांचें मत साधार आहे, असें वरील प्रपंचा वरून, ह्मणतां येण्यास बरा च प्रतिबंध होतो.
(५) शोधाच्या ह्या प्रश्ना संबंधानें अशी अनिश्चित स्थिति आहे. दंडकारण्यांत भिल्लादि अगोदर वसूं लागले कीं ब्राह्मणादि अगोदर वसूं लागले, ह्या बाबीचा निर्णय अद्याप निश्चयात्मक झाला नाही, असें माझें ह्मणणें आहे. यूरोपीयन लोकांची ह्या बाबीच्या निर्णयांत जी चूक झाली आहे ती अशी. सामान्यतः कोणत्या हि प्रदेशांत रानटी लोक जे आढळतात ते सुधारलेल्या लोकांहून पुरातन असतात, असा समज यूरोपीयन शोधकांच्या तर्कसरणींत गर्भित असतो. हा गर्भित समज सर्वत्र खरा नाहीं. यूनायटेड् स्टेट्स् मध्यें कमजास्त रानटी असे नीग्रो लोक तीनशें वर्षांपूर्वी गो-या लोकांनी आणिले. ते गो-यांच्या आगमनाच्या पश्चात्क आहेत. तसें च भिल्लादि कमजास्त रानटी लोक दक्षिणेंत आर्यांच्या पश्चात्क असण्याचा संभव आहे. हा संभव कितपत साधार आहे, तें पारखण्या करितां, सध्यां एक साधन मज जवळ सिद्ध होऊं पहात आहे. तें साधन म्हणजे महाराष्ट्रांतील गांवांच्या प्रस्तुतकालीन नांवांचा अभ्यास. ह्या अभ्यासा पासून प्रस्तुत प्रश्नाचा निर्णय होण्यास मदत व्हावी असें वाटतें. ती अभ्यासपद्धति एणें प्रमाणें:-
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पाणसळ १ [ पर्णशाला = पाणसळ ]
-२ [ पानीयशलाका = पाणसळ ]
पाणसाळ [ पानीयशाला = पाणसाळ ]
पाणारी [ पानीयहारिकः = पाणारी ]
पाणी १ [पू ९ शोधने. पावनीयं = पाणी ] तरवारीला पाणी देणें म्हणजे घासून शुद्ध करणें. ( धा. सा. श. )
-२ [ प्राणित्त animation (प्र + अन् to animate) = पाणी ] त्याच्या आंगांत पाणी आहे he has ardour or animation in him.
पाणेरें [ पानीयगृहं = पाणरें ]
पातडी [ पाटलिका - पातडिआ = पातडी ] पिशवी. (भा. इ. १८३४)
पातवडी [ पत्रवटिका = पातवडी ] पक्वान्न.
पातळ १ [ प्रतल = पातळ ] (भा. इ. १८३५)
-२ [ पत्रल = पत्तल = पातळ ] पाना इतकें जाड म्हणजे पातळ. (भा. इ. १८३६)
-३ [ प्रतनु = पतलु = पातलु = पातळ ] (भा. इ. १८३६)
पातळी [ प्रतलिम = पातळी ] superficies. (भा. इ. १८३५)
पाताळूं [ पत्रालु = पाताळूं ] एक प्रकारचें अळूं. (भा. इ. १८३६)
पातें [ पत्रं = पत्तं = पातं = पातें ] (स. मं.)
पातेजणें [ अय् १ गतौ. प्रत्ययनं = पातेजणें ] (धा.सा.श.)
पातेली [ पातिली = पातेली ]
हा शब्द Monior Williams देतो परंतु प्राकृत दिसतो. Williams यानें तें नीट संस्कृत आहे किंवा नाहीं तें तपासलेलें नाहीं. (भा. इ. १८३५)
पात्यवणें [ अय् १ गतौ. प्रत्ययनं = पात्यवणें ] (धा. सा. श.)
पात्र [ पत्रं (नौ: ) = पात्र ] पात्र म्ह० होडी.
पाथरावट [प्रस्तरकुट्ट = पाथरवुट = पाथरवट = पाथरट ( भा. इ. १८३२ )
पाद, पादणें [ पर्द् कुत्सिते शब्दे । गुदरवे इत्यर्थ:
तिङन्ते भ्वादयः । पर्द = पाद (पादणें, पाद) ] गुदं पर्दते = गांड पादते. ( भा. इ. १८३२ )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पाडाव १ [प्रत्यवाय reverse = पाडाव ] reverse, defeat.
-२ [ प्र + दम् णिच् : प्रदाम्, प्रदान् = पाडाव ] one who is subdued in a battle, one who is a prisoner of war.
पाडु [ पारः (पारय् सामर्थ्ये)] (ज्ञा. अ. ९ पृ.२०)
पाडून १ [प्राध्वंकृत्य = पाडून] प्राध्वंकृत्य बंधनेन अनुकूलं कृत्वा । प्राध्वं बंधने ( १-४-७८)
पाडून मागणें म्हणजे वचनानें बांधून खरेदी करणें.
-२ [अह् शब्दे पूर्ववैदिक धातु. प्रत्यह्य = पाडून ]
उ० - घालून पाडून बोलणें. (धा. सा. श.)
पांढरपेशा [ पांडुर: +पेशः यस्य = पांडुरपेषः. पांडुरपेशः = पांढरपेशा ] पांडुर म्हणजे श्वेत व पेश म्हणजे रूप. पांढरपेशा म्हणजे ज्याचा वर्ण श्वेत गोरा आहे तो ब्राह्मणादि.
पांढरेंफेक [ पांडुरश्वेतं = पांढरेंफेक ] (भा. इ.१८३४)
पांढरें शुभ्र [ पांडुरं शुभ्रं = पांढरें शुभ्र ] (भा. इ.१८३४)
पांढरें सफेत [ पांडुरश्वेतं = पांढरें सफेत ] (भा. इ.१८३४)
पाणक्या [ पानीयकक = पाणकअ = पाणका = पाणक्या ] (ग्रंथमाला)
पाणचेट [ पाणचेट हा शब्द पण्यचेट या संस्कृत शब्दापासून निघाला आहे. पण्य म्हणजे विकावयाला काढलेला; आणि चेट म्हणजे दास, गुलाम. पण्यचेट = पानचेट किंवा पाणचेट; येथें ण्य चा न किंवा ण होतो. पाणचेटबद्दल पानचट असा हि उच्चार ऐकूं येतो. परंतु, पानचट म्हणजे पाण्याच्या चवीसारखे असा अर्थ आहे. चवट म्हणजे चवीचा. पाण्याच्या चवीचा जो पदार्थ तो पानचट पदार्थ. (भा. इ. १८३३)
पाणजा [ प्रार्य्यक = प्राज्जअ = पाजअ = पाजा = ( पणतु शब्दाच्या संसर्गानें ) पाणजा, पणजा-जी-ज] (स. मं.)
पाणथळ [पानीयस्थलं = पाणथळ ]
पाणंद १ [ पाणिंधमः ( मार्गः) = पाणंद ] पाणिंधम म्हणजे अंधेरा मार्ग. पाणंद म्हणजे दोन शेतांमधील अंधेरा मार्ग.
-२ [ पाणिंधम (रत्थ्या) = पाणंद ]
पाणिंधम म्हणजे असा अंधुक रस्ता कीं ज्याच्यांतून हातानें वेली एकीकडे सारून वाट काढावी लागत्ये.
जातिनामव्युत्पत्तिकोश
शेणावी - महाराष्ट्रांत शेणवई ह्या नांवाचे स्वदेशबांधव आहेत. त्यांच्या नांवाची व्युत्पत्ति नाना प्रकारची दिलेली निरनिराळ्या ठिकाणीं सांपडते. कित्येकांच्या मतें शेणवई असें रूप नसून शेणवी असें शुद्ध रूप आहे. ह्या लोकांच्या मतें शेणापासून झाले ते शेणवी ! गोव्याकडे पोर्तुगीज लोक शेणवयांना सनाय म्हणून हाक मारतात; परंतु हा शेणवई ह्या शब्दाचा केवळ अपभ्रंश आहे. श्येननामक प्राण्यापासून ज्यांची मूळ उत्पत्ति कल्पिली ते शेणवई असाही मालवणास एका गृहस्थानें समासव्यवच्छेद केला. असे नानाप्रकारचे अर्थ ह्या शब्दाचे विनोदानें झालेले आहेत. त्यांत विशेष कांहीं मतलब नाहीं. कोंकणी भाषेत शेणय असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ पंतोजी आहे. तिकडे ब्राह्मणांपेक्षां शेणव्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे शिक्षकाचा धंदा शेणवीच करीत आले आहेत. ज्याप्रमाणें आंग्लो इंडियन लोकांत पंडित म्हणजे पंतोजी समजण्याचा प्रघात आहे, त्याचप्रमाणें गोव्याकडे अस्सल पोर्तुगीज लोकांत पंतोजीस शेणय म्हणण्याचा प्रघात आहे. सारांश, शेणय हा शेणवी शब्दाचा अपभ्रंश आहे. तेव्हां शेणय शब्दाचा आश्रय करून शेणवी शब्दाची व्युत्पत्ति करतां येणें शक्य नाहीं. शेणवी शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. शेणवी शब्द मूळ शेणवई असा आहे. शेणवई हें रूप मूळचें शेणवइ असें आहे. शेणवइ=सेण्णवइ = सैन्यपति, अशी ह्या शब्दाची परंपरा आहे. सैन्य शब्दाचें सेण्ण प्राकृत रूप आहे; व पति शब्दाचें वइ प्राकृत रूप आहे. चोलवइ = चोलपति, वाणरवइ= वानरपति, घरवइ = गृहपति अशों रूपें सेतुबंध काव्यांत अनेक ठिकाणीं आलीं आहेत. तात्पर्य, सैन्यपति शब्दाचें सेण्णवइ व सेण्णवइ शब्दाचें शेणवी असें अपभ्रष्ट रूप आहे. शेणवी, शब्दाच्या जोडीचाच दळवी शब्द आहे. हा शब्द दळवे ह्या रूपानें ज्ञानेश्वरींत येतो. दळवैपणा हें भाववाचक नाम ज्ञानेश्वरीत अनेक वेळां आलें आहे. दळवी = दळवै = दळवइ = दलपति, अशी ह्या शब्दाची परंपरा दिसते. शेणवी व दळवी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. दळवी व शेणवी हे दोन्ही शब्द ज्ञानेश्वरांच्याहि पेक्षां जुने आहेत; व ते धंदा किंवा पेशा ह्यांचे वाचक आहेत. ह्यावरून दळवी व शेणवी ह्यांची मूळजात कोणती तें मात्र निक्षून सांगतां यावयाचें नाहीं. परंतु सात आठशें वर्षांपूर्वी अलीकडल्यापेक्षां जातिनिर्बंध जास्त कडक होते असें मानल्यास शेणवी व दळवी ह्यांची जात धंद्यावरून क्षत्रियांची ठरते. हा केवळ व्युत्पत्तिदृष्ट्या विचार झाला. धर्म, आचार, शरीराचा आकार, वगैरेंचा ह्या बाबीसंबंधानें विचार करून मग कायमचा सिद्धांत बांधला पाहिजे. ( सरस्वती मंदिर श्रावण शके १८२६)
सवाशे (ब्राह्मण) - ब्राह्मण्यां जायते वैश्याद्योसौ वैदेहिकाभिधः । शूद्रान्ते रक्षणं राज्ञा कुर्यादनुपमोहि सः ॥ सामान्यवनिताः पोष्यास्तासां भाटी च जीविका । तस्योक्ता शूद्रधर्माणां नाधिकारोस्ति कश्चन ॥ सावासी ॥ ( जातिविवेक ) सावासी = सवाशे ( अनेकवचन) (भा. इ. १८३४)
सुतार - सूत्रग्राहः = सुतार. हातांत सूत्र वागवणारा तो सूत्रग्राह. सुतार हें कोंकणस्थांत आडनांव आहे. सूत्रकार पासून सुतार शब्द निराळा.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पाठराखी, पाठराखणी [प्रतीहार रक्षी ( a female doorkeeper) = पाठराखी. प्रतीहाररक्षण = पाठराखण ]
पाठलाग [ लग् १ सङ्गे, गतौ. पृष्टलागः = पाठलाग ] ( धा. सा. श. )
पाठवणें [ पाथयति (पच्याणिच्) = पाठवणें (धाडणें); (भा. इ. १८३६)
पाठस (सा-सी-सें) [ पृष्टशय = पाठस (सा-सी-सें ) ] (भा. इ. १८३४)
पाठाड-ण [ पृष्ट + अस्थि = पाठ + हाड = पाठाड = पाठाण ] (स. मं. )
पाठार [ पठार ३ पहा]
पाठि [ प्रस्थिति march = पाठि ] march, progress.
उ० - म्हणौनि यया वाखाणा । पाठि सेइली चौगुणा ।
ना म्हणों न येंसि देखणा । होंसि ज्ञानी ॥ ज्ञा. १३-६४४
पाठिंबा [ पृष्ठिस्तंभः = पाठिंबा ] पृष्टिस्तंभ म्हणजे पाठी-मागचा खांब.
पाड १ [ पार: ability = पाड ] सामर्थ्य.
त्याचा पाड किती ? what is his powers ?
-२ [ प्र + अट्ट आतिक्रमणे to exceed. प्राट्ट: = पाड ] excelling, overriding. तूझेनि पाडें overbearing thee disparating thee.
-३ [ प्र + अड्ड् to meditate. प्राढ्डः thought meditation = पाड ] thought. द्रोणाचा पाडु न करी Don’t think of द्रोण.
पाडणें [ पट् १० ग्रंथे. पाटनं = पाडणें ] काकडीच्या फाकी पाडणें, लाकडाच्या फळ्या पाडणें म्हणजे कापणें.
पत् पासून निघालेल्या पड धातूचें प्रयोजक रूप पाडणें होतें तें निराळें. ( धा. सा. श. )
पाडा १ [ पद्रक = पड्डअ = पाडा ( लहान गांव) ]
गुजराथेंत व कोंकणांत क्षुद्र गांवांना पाडा म्हणतात. जांबुळपाडा वगैरे. ( भा. इ. १८३३)
-२ [ पाटक = पाडअ = पाडा ] पाटक म्हणजे गांवाचा एक लहान भाग.
कोणत्या हि गांवा खालचा किंचित् दूर असलेला जो लहानगा पांचदहा घरांचा समूह त्याला पाडा म्हणतात. (भा. इ. १८३५).
-३ [ पटकः half a village = पाडा ] a hanlet.
पाडा-डे [ पाटी, पाट: ( अंकगणित). पाट: = पाडा-डे ( अंकगणित) ] ( भा. इ. १८३२ )
जातिनामव्युत्पत्तिकोश
शाक्य - नट, निच्छिवि वगैरे व्रात्य क्षत्रियजाति ज्या प्रांतांत रहात होत्या त्याच प्रांतांत शाक्य नांवाचे व्रात्यक्षत्रिय राहात असत. मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाचा ४४ वा श्लोक येणेंप्रमाणें आहे :--
पौंड्रकाश्चौड्रद्रविडाः कांबोजा यवनाः शकाः ।
पारदाः पश्चीबाल्हीनाः किराता दरदाः खशाः ॥४४
( वृषलत्वं गता लोके ब्राह्मणादर्शनेन च ॥ ४३ ॥ )
वृषल म्हणजे व्रात्य. सगर राजाच्या कालीं ह्या शक वगैरे क्षत्रियजाति व्रात्य झाल्या. पैकीं शकक्षत्रियोत्पन्न जे शाक्य व्रात्यक्षत्रिय त्यांपैकीं कांहीं लोक समानशील अशा नट, निच्छिवि वगैरे व्रात्यक्षत्रियांच्या प्रांतांत येऊन राहिले. ह्या शाक्यव्रात्यक्षत्रियांत गौतमबुद्धाचा जन्म झाला. महावीर जसा नटव्रात्यक्षत्रिय होता, तसाच बुद्ध शाक्यव्रात्यक्षत्रिय होता. व्रात्यत्वामुळें गौणता आली. तच्छमनार्थ शुद्धक्षत्रियांच्या व शुद्धब्राह्मणांच्या विरुद्ध ह्या दोघांनीं जैन व बौद्ध धर्म काढिले. ते शकादि व्रात्य जातींत अर्थातच फार प्रिय झाले. शुद्ध चातुर्वर्णिकांत ह्या वर्णसंकरकारक धर्मांचा शिरकाव झाला नाहीं. शकोऽभिजनोऽस्य शाक्यः ( ४-३-९२ ). शण्डिकादिभ्योऽण (४-३-९२) ह्या सूत्रांत जो शण्डिकादि गण सांगितला आहे त्यांत खालील शब्द आहेतः- शण्डिक, सर्वसेन, सर्वकेश, शक, शट, रक, शंख, बोध. गर्गादिभ्यो यञ् ( ४-१-१०५) ह्यांतील गर्गादि गणांत हि शक शब्द आहे. ह्या दोन सूत्रांत अभिजनो अस्य व गोत्रापत्ये शाक्य असें रूप होतें म्हणून सांगितलें आहे. तद्राजार्थी रूप काय होतें तें पाणिनि सांगत नाहीं. गौतमबुद्ध ऊर्फ शाक्यमुनि तर राजपुत्र होता म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हां पाणिनि बुद्धापूर्वी झाला.
(भा. इ. अहवाल १८३२ )
शिख - शिख (Vedik, name of a serpent priest) = शीख. हें एका वैदिककालीन सर्प लोकांच्या भटाचें नांव होतें.
शिंपी - शिल्पिन् = सिप्पी = शिंपी. शिंप्यांतील जुन्या चालीचे आधुनिकांग्लशिक्षणानभिज्ञ लोक आपणा स्वतःस सिपी म्हणतात. परंतु ब्राह्मणी उच्चाराचें शिष्टत्वास्तव अनुकरण करणारे नव्या चालीचे लोक शिंपी ह्या शब्दाचा उपयोग करितात. वस्तुतः शिंपी ह्या रूपापेक्षां सिपी हें रूप जास्त शुद्ध आहे. शिपींतील अनुस्वार प्रथम अनुनासिक होता. तो शिष्टांनीं अनुस्वार केला. (स. मं.)
शीख - (शिख पहा )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पांघरणें, पांघरूण [ प्रघृण्ण् = पाघरण = पांघरणें. घृण्ण् धरणें घेणें ] (भा. इ. १८३३)
पाघळ [ प्राघारः, प्राघाराः ] ( धातुकोश-पाघळ २ पहा)
पाच [ स्पृच् = पाच (वनस्पति) ]
पाचकळ [स्खल् १ खनने. प्रस्खल = पाचकळ ] ( धा. सा. श. )
पाचर [ प्राचर, प्रचर = पाचर ]
पाची, आठी, दाही - येथें ई हा प्रत्यय जोर दाखवितो. (ग्रंथमाला)
पाचुंदा १ [ पंचपदा ] (दुवड पहा)
-२ [ पंचतयः = पांचुंदा ] पांच पेंढ्यांचा समुदाय. पाजणें [ आप्यायनं = पाजणँ ( आ लोप) = पाजणें ] आप्यायन म्हणजे संतुष्ट करणें.
पितरांना पाणी पाजणें म्ह० उदकानें संतुष्ट करणें. (भा. इ. १८३६)
पांजरपोळ [ पंजरप्रतोलः = पांजरपोळ] पंजरं पशुपक्ष्यादि बंधनगृहं व प्रतोलः मार्गः रत्था.
पाजी १ [ पाय्यः पाजी (तिन्ही लिंगी य अक्षरामुळें ) ] राय्य म्हणजे निंद्य किंवा नीच, हलकट.
-२ [ पज्जः = पाजा = पाजी ] पज्जः म्हणजे शूद्र. तूं पाजी आहेस म्हणजे तूं शूद्र आहेस. प्राचीनकाळीं ब्राह्मणाला शूद्र म्हणणें अपशब्द समजत. (भा. इ. १८३७)
पाटा [ पाटक = पाटा ] पाटक म्हणजे वांटावयाचा दगड. (भा. इ. १८३५)
पाटाउ [ प्रत्यायः toll, tax. = पाटाउ ] toll, tax.
उ०- कैवल्य कनंकाचेया दाना । नकडसी थोरुसाना ।
द्रष्टे याचे या दर्सना । पाटाउ जो ॥
ज्ञानेश्वर अमृतानुभव ६९-जुनी पोथी
पाटीवर बसणें [पाटी (Arithmetic) पाटीवर बसणें म्हणजे अंकगणिताला प्रारंभ करणें. ]
पाठ [ पृष्ठ = पाठ ] ( स.मं. )
पाठचा १ [ शी २ स्वप्ने. पृष्टशयः = पाठचा. पृष्टशयः भ्राता = पाठचा भाऊ. ( श = स = च ) ] ( धा. सा. श.)
-२ [ प्रातस्त्य = पाटच = पाठच ( चा-ची-चें ) पाठचा (सूर्य), पाठचें (ऊन) ] पाठचें उन्ह म्हणजे सकाळचें ऊन; पाठीवरचें ऊन नव्हे. (भा. इ. १८३४)
पाठनिपाठ [ पाठ: निपाठ: = पाठनिपाठ ] पुस्तक पाठनिपाठ केलें = पुस्तकें पाठनिपाठं कृतं.