Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

नागदवणा [ नागदमनी = नागदवणा ] (भा. इ. १८३४)

नांगरटी [ लांगल पद्धति = नांगरवढ्ढई = नांगरोटी = नांगरटी ]

नांगर्‍या १ [ लांगलग्रह: (वार्तिक ३-२-९) = नांगर्‍या ] one who works with the plough.

-२ [ लांगलिक: = नांगरिआ = नांगर्‍या ]

-३ [ लांगलग्रहः = नांगरआ = नांगर्‍या (शेतकरी ) ]

नागा [ नह + गा ( जाणें) = नागा ] नागा म्हणजे जाण्यास प्रातिबंध, खाडा, खळ.

नाचण [ स्नसनः = न्हाचण = नाचण. स्नस् निरसने, to eject ] नाचण म्ह० न्हाव्याचें कांटा काढण्याचें यंत्र.

नाट १ [ नष्ट = नाट ] हरवलेली वस्तू.

-२ [ नष्टिः, नष्टं = नाट] नाट लागला म्हणजे हेतु नष्ट झाला.

-३ [ नाष्ट्यं = नाट ] नाट म्हणजे अदर्शन, लेप. नाट लावूं नको म्हणजे वस्तूचा अभाव होईल असें बोलूं, करूं नको.

नाटकी [ नाटकीयः = नाटकी ]
नाटकीयो नृत्तकरः इति अजयः ।

नाट्या [नाष्टिकः = नाट्टिआ = नाट्या ] नाष्टिक म्हणजे हरवलेल्या वस्तूचा धनी, अपेशी माणूस. नाट्याचें तोंड सकाळीं पाहूं नये म्हणजे अपेशी माणसाचें तोंड सकाळीं पाहूं नये.

नाठाळ १ [ अनास्थालु = नाठ्ठालु = नाटाळ, नाठाळ ] ( भा. इ. १८३६)

-२ [ अनास्थ = अनाठ्ठ + आल = नाठाळ. प्रारंभींच्या अचा लोप ] (भा. इ. १८३२)

-३ [ नाथालु ] (नाद पहा)

नाडणें १ [ नाडयति ] (नडणें पहा)

-२ [ नाथ्, नाध् उपतापे = नाडणें ] (भा. इ. १८३६)

नाडा १ [ नाद्धिः = नाडा ]

-२ [ नध्नी ] (नाडी १ पहा)

नाडी १ [नध्नी = नाडी, नाडा ]

-२ [ नदध्री = नाडी ( दोरी ) ]

नाणें १ [ नामांकनं ] (आडनांवें-नाणवटी शब्द पहा)

-२ [ ज्ञानम् = नाणँ = नाणें ] knowledge. खरें नाणें झांकत नाहीं.

-३ [ नामांकनकं = णाआँअणअँ = णाँणँ = नाणँ = नाणें ] नाण हा शब्द शुद्ध प्राकृतिक आहे. त्याचें पुन्हा संस्कृत नाणाकं. हा शब्द मृच्छकटिकांत येतो. (भा. इ. १८३२) ना. को. १४

नवस [ ( सं. ) नमसित = ( प्रा. ) नवसिय = (म. ) नवस ] नवस ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रार्थना. नंतर हेतुगर्भित प्रार्थना. नंतर प्रार्थनेंत देवाजवळ मागितलेला हेतू. (स. मं.)

नस् [ स्नस् १ निरासे ] ( धातुकोश-नसनस पहा )

नस १ [ स्नसा ( A tendon ) = न्हस, नस, नसा ] (भा. इ. १८३३)

-२ [ फारसी ] (स. मं.)

ना १ [ नाना (विनार्थे ) = ना (विना) ]
ना घर ना दार म्हणजे घरा विणें व दारा विणें.

-२ [ नाना (without) = ना ]
ना स्त्री ना घर = नाना नारी नाना गृहं संसारयात्रा विफला.

नाँ [ नाम = नावँ = नाँ ] उ०-बाजारांत जावयाचें नाँ ? (हाटं प्रति गम्यते नाम). येथें नामपासून नाँ निघाला आहे. (भा. इ. १८३२ )

नाइनसूक [ नातिसूक्ष्मा = नाइसुक = नाइनसूक ] येक कापडाची जात.

नाक १ [ नास = नासक = नाहक = नाअक = नाक ] (स. मं. )

-२ [ नायक = नाक ] तो मनुष्य समाजाचें नाक आहे म्हणजे नायक आहे. हा नायक शब्दोत्पन्न नाक शब्द नासिकार्थक नाक शब्दाच्या सारखा उच्चारांत असल्यामुळें शेजारधर्मास्तव नपुंसकत्व पावला आहे.

नाकझरी [ निर्झरी = नाकझरी. नगझरी = नाकझरी (mountain torrent) ]

नाकट [ नर्कुटकं ( नाक ) = नाकट ] निंदार्थी नाकाल नाकट म्हणतात.

नाकडा [ नासिकंधयः ( ३-२-२९) = नाकडा ] नाकडें पोर म्हणजे थानाला तोंड लावावयाच्या ऐवजीं नाक लावणारें कुकुलें बाळ.

नाकपुडी [ नासकपुटी = नाअकपुड़ी = नाकपुडी ] ( सा. मं. )

नाकाड [ नासक + अस्थि = नाक + हाड = नाकाड ] ( स. मं. )

नाकें [ नामकं ( स्थानं ) = नाअकँ = नाकें ]

नाक्याचें ठिकाण [ नायकीयं (स्थानं)= नाअकिज्जं = नाकेचे = नाक्याचें ]

नागडा [ नग्नः = नागा. नग्नाटः = नागाडा = नागडा ] संस्कृतांत नग्नाट म्हणजे नागवा हिंडणारा यति. (भा. इ. १८३७)

नंतर [ अनंतर = नंतर. येथें प्रारंभींच्या अचा मराठींत येतांना लोप होतो ] (भा. इ. १८३२)

नथ १ [ नस्तिका = नथ्थिआ = नथ ] (भा. इ. १८३६ )

-२ [ नाथः नासारज्जुः ( सिद्धांतकौमुदी ३-२-२४ ) नाथिका = नथ ( अलंकारविशेष ) ]

नथ्या [ नस्तितः = नथ्थिआ = नथ्या ] मराठींत नाक टोंचलेल्या मुलाला नथ्या म्हणतात. मूल जगावें म्हणून नाक टोंचतात. ( भा. इ. १८३६ )

नना [(वैदिक) नना (आई) = नना ] मराठींत आईला मुलें नना, नानी या शब्दांनीं हाका मारतात. (भा.इ. १८३७)

नन्नाचा पाडा [ अनन्वयस्य पाठ: = नन्नाचा पाडा ] ज्यांत अन्वय नाहीं तो अनन्वय पाठ. (भा. इ. १८३६)

नपेक्षां [ अनपेक्षा = नपेक्षा. तृतीया नपेक्षां] गोविंदा आला तर बरें; नपेक्षां तुं निघून जा. येथें नपेक्षां हें अव्यय आहे; व त्याचा अर्थ त्याच्या येण्याची अपेक्षा न धरतां, असा आहे. (भा. इ. १८३४)

नरडी [नर्दी (नर्द् = शब्द करणें, ज्या अवयवाच्या द्वारें शब्द होतो तो ) ] (स. मं.)

नर्डी [ नर्द् १ शब्दे. नर्दि: = नर्डी ] शब्द करण्याचा अवयव्.

नवट [ नविष्ठ = नवट (तमभाव)] नवट म्ह० अति नवें. ( भा. इ. १८३७)

नवती १ [ नव्यता = नवती ] तारुण्य.

-२ [ नवजातिः = नवआति = नवाति = नवती ] नवतीचीं पानें म्हणजे नूतन फुटीचीं कोवळीं विड्याचीं पानें.

नवथर [ नवतरं = नवथर (क्रियाविशेषण ) त = थ]

नवरी [ नववरिका a newly married girl = नवरी ]

नवानवश्याचा [ नमस्यति Freq नंनमस्यतिः नंनमस्यः = नवानवश्याचा ] one obtained through excessive prayer. nothing to do with नवा new.

नवाळी [ नवकालता = नवआली = नव्हाळी, नवाळी ] नव्हाळी म्हणजे तारुण्य.

नवीनवाळ [ नवनवकालः = नवनवाळ = नवीनवाळ ] नवीनवाळ म्ह० पहिला हंगाम.

नव्हाळी [ नवकालता ] (नवाळी पहा)

नव्हे [नभ् १ अभावे. नभ = नव्ह = नाह] मी नव्हे, मी नाहीं = अहं नभामि. (धातुकोश नह १ पहा)

बोडस - १ वृद्धोक्षः = बुढ्ढोस्स = बोडोस = बोडस (आडनांव ब्राह्मण) ( भा. इ. १८३४)
-२ बौधाक्षाः (कों)
-३ बोधाक्ष (बोडास) (स)
-४ [ मूर्धशयः = बोडस. शी २ स्वप्ने ] (धा. सा. श. )

बोडास - बौधाक्षाः ( कों )

बोधनी - बौधायनाः ( स )

बोरे - भौराः ( स )

बोले - बौलिः (स )

बौरे - भागुरि = भाउरि = भौरे = वौरे ( आडनांव ) (भा. इ. १८३७)

ब्रह्मे - भारमाः (स) 

भट - धंद्यावरून ( कों )

भदे - भद्र: = भदा, भदे ( आडनांव )

भर्मे - भारमाः ( स )

भवान्ये - भामाण्याः (स) ( कों )

भस्मे - भस्मायनाः ( कों )

भागवत - भागवित्तिः ( कों ) ( स ) ( क )

भाजके - बाह्यस्काः (स)

भाटे - भ्राष्ट्रेयाः ( क ) (कों)

भाडभोके - १ वलभोकि: (कों)
-२ वलभोकिः = बडभोक = भाडभोके (स)

भाडले - भंडिलायनाः (स)

भाणवसे - भाणवेशाः (स)

भानू - १ भानवः (कों)
-२ भानोरपत्यं भानवाः = भानू ( पतंजलि )( स )

भाभे - वाभ्याः (कोंं ) (स)

भारदे - भारद्वाजाः (स)

भार्गव - भार्गवाः ( स )

भार्गे - भार्गवाः (स) 

नक्कल [(सं.) नक्कणं - नक्कल. ण = ल] नक्क म्हणजे निर्मूल करणें. त्याचें नक्कल झालें म्हणजे त्याचें निर्मूल झालें. (भा. इ. १८३७)

नक्की १ [ निष्क्] ( निकें २ पहा)

-२ [ निक २ पहा]

नक्षा १ [ नक्ष् १ गतौ. नक्षः ]

-२ [ णक्ष् गतौ. नक्षः = णक्षा, नक्षा ] नक्षा, णक्षा उतरणें म्हणजे गति, उत्कर्ष बंद करणें. ( धा. सा. श.)

नख १ [ नख = नख ] (स. मं.)

-२ [ नखं ( छुरिका) = नख ] पोराचा नख लावून जीव घेतला, येथें नख म्हणजे सुरी असा अर्थ आहे.

नखरा [ फारसी ] ( स. मं.)

नखरुख [ नखवृक्ष = नखरुख (वृक्षविशेष) ] (भा. इ. १८३७)

नखरूड [ नखरुज् = नखरुड ( रोगविशेष ) ज = ड ] (भा. इ. १८३७)

नखला १ [ नखर: = नखला ]

-२ [( व्याघ्र) नखवल्ली = नखली = नखला ]

नखुरडें [ नखर + ट = नखुरडें ]

नखुर्डे [ नख शब्दाचें र्‍हस्वत्वदर्शक रूप ] (स. मं.)

नखोली [नखगूलिका = नखोली ] गव्हाच्या भिजवलेल्या कणिकेच्या नखानें केलेल्या गोळ्या.

नग १ [न + कृग्] ( घातुकोश-नक पहा)

-२ [ नकिः (वर्जने निपातः) = नगि= नग ( अव्यय)] (भा. इ. १८३४)

नंगा [ न्यंगः = नंगा. कौटिल्य अर्थशास्त्र ]
नंगा नाच = न्यंगं नर्तनं.
न्यंग म्हणजे कुरूप. नागा = नग्न पासून निघाला आहे.

नंगा नाच १ [ अनंग (नृत्यं ) = नंगा (नाच) ]

-२ [ अनंग नर्तन = नंगनाच = नंगानाच ] (भा. इ. १८३६)

नगे, नगेत [ न + कग्] ( धातुकोश-नक पहा)

नजर [ फारसी ] (स. मं.)

नटू बाई नटू [ नट् १ नतौ ] (धातुकोश-नट ३ पहा)

नडणें, नाडणें - [नडनं = नडणें. नाडयति (णिच्) = नाडणें ] नडणें म्हणजे पडणें व नाडणें म्हणजे पाडणें.
नी नडलों म्हणजे संकटांत पडलों. (भा. इ. १८३७)

[ अन्यत् = आणि, नि-नी-न ]
मी आलों न, नि, नी, आणि तो गेला.

नस्य विभाषा-गुफ, लिप, फुक, सोप, कुप, लुट, सिव, सिप इत्यादि धातूं पासून ( १ ) गुफणें, गुंफणें; ( २) लिपणें, लिंपणें; (३) फुकणें, फुंकणें; (४) सोपणें, सौंपणें; (५) कुपण, कुंपण; (६) लोंटणें, लोटणें; (७) सिंवणें, सिवणें, (८) सिंपणें, सिपणें; अशीं नोपध व अनोपध अशीं दोन रूपें मराठींत होतात. पैकीं नोपध रूपें पुणेरी भाषेंत शिष्ट समजलीं जातात व अनोपध रूपें देसोर भाषेंत हमेषा योजिलेलीं आढळतात. हा उच्चारभेद सकृद्दर्शनीं आपातिकसा भासण्याचा संभव आहे, परंतु तसा प्रकार नाहीं. भेद परंपरित आहे. पाणिनीय अष्टाध्यायी अध्याय १, पाद २, सूत्र २३ येणेप्रमाणें आहेः-
" नोपधात्थफान्ताद्वा " १-२-२३ या सूत्रांत ( १) ग्रथ्र्, ग्रन्थ्, (२) श्रथ् , श्रन्थ्, ( ३ ) गुफ्, गुम्फ् वगैरे धातूंचीं नोपध व अनोपध अशीं दोन हि रूपें दिलीं आहेत. तीच वंशपरंपरेनें आपण मराठींत उच्चारतों. (भा. इ. १८३३)

नकका [( नकि: अकच्क) नककि: = नककी, नकका ]
नककी जाऊं = जाऊं नको
नकि = वर्जने निपातः (भा. इ. १८३६)

नका, नको १ [ न + कग् नोच्यते ] (धातुकोश-नक पहा)

नको २ [ नकि: = नको ]
जाऊं नको = नकि र्याहि. बोलूं नको = नकि र्वद. तात्पर्य, नको हें अव्यय आहे. ( भा. इ. १८३६)

-३ [ १ न्यक्कृ, २ नक्क, ३ नकृ, ४ नकम्, ५ नकिः निपात, ३ नकं ( अकच्क) = नको ] (भा. इ. १८३४)

नकों, नकोत [ न + कग्] ( धातुकोश-नक पहा)

नकोरे [ न खलु = न करु = नकोर = नकेरे ]
(न) खलु पीत्वा = नकोरे पीऊं = मा पिब
(न) खलु गत्वा = नकोरे जाऊं = मा गम:
प्रथम खलु पीत्वा, खलु गत्वा असा न खेरीज प्रयोग पाणिनि व **** यांच्या कालीं होत असे. पुढें पुढें पाठीमागें न लावूं लागले. त्यापासून मराठी नकोरे निघाला आहे. (भा. इ. १८३७)

नकोस [ न + कग् ] (धातुकोश-नक पहा)

धेंडसें [ डिंडिशः = धेंडसें ] (भा. इ. १८३४ )

धोका १ [ धुक्ष् १ क्लेशने. धोक्षः = धोका ] क्लेश, संकट.

-२ [द्रुह् जिघांसायाम् Aorist स् ध्रोक्षः = धोका ] danger.

-३ [ धक्कः ] ( धकाधकी पहा)

-४ [धक्कः = धोका (नाश, नाशाचा संभव). अ चा ओ ] ( भा. इ. १८३६)

-५ [ धक्कः = धोका = झोका. धक्क् नाशने ]
धोका - झोका देणें म्हणजे नाश, नुकसान करणें.

धोत १ [ धौतिः a stream = धोत ]

-२ [ श्रोतस्] (झोत २ पहा)

-३ [ स्रोतः ] (झोत १ पहा)

धोतर [ धौतवस्त्र = धोतअर = धोतर ] (भा. इ. १८३४)

धोतरजोडा [ धौतवस्त्रयुग = धोतअरजोडा = धोतरजोडा] (भा. इ. १८३४)

धोपट १ [ अधःपट्ट = धोपड = धोपट ] धोपटमार्ग म्हणजे पायाखालचा मार्ग. (भा. इ. १८३५)

-२ [ ऊर्ध्वपथः = ( उ लोप ) धोपट ] धोपट मार्ग म्हणजे सरळ पुढला मार्ग.

धोपटणें [ अधः स्फोटनं = धोफोटणँ = धोपटणें ] (भा. इ. १८३५)

धोशा [ अध्यवसायः great effort (mental) = धोशा ]

ध्यास १ [ अध्यास = ध्यास ] आसक्ति. (भा. इ. १८३६)

-२ [ ध्यै १ चिंतायाम् - दिध्यासः = ध्यास ] (धातुकोश-ध्यास पहा)

ध्येन [ अध्ययन = (अ लोप) ध्येन ] गीतेचें ध्येन करतो म्हणजे अध्ययन करतो. हा ध्येन शब्द सध्यां देशस्थांत, बायकांत व अशिष्टांत हमेश ऐकू येतो. हा ध्यान शब्दाहून निराळा. (भा. इ. १८३४)

बंदरे - बादरायणाः (क)

बरवे - बाभ्रव्या: (स ) (कों)

बरुड - भरुंड (स)

बर्गे - १ भार्गाः (स)
-२ वर्गिन् (टोळीचा मुख्य) = बर्गी=बर्गा. मराठ्यांना बंगाली लोक बर्गे म्हणतात. हें मराठ्यांत आडनांव आहे.

बर्जे - भ्राजा: ( क )

बर्मे - भारमाः ( स )

बलाके - बलाकयः (स)

बहिरे - बाहिरिकाः (स )

बळाके - बालाकयः ( क )

बाकरे - १ वार्कलिः ( क )
-२ वार्कलयः (स)

बागुल - वागुरु: (कों ) (स)

बाण - वर्णकाः ( स )

बाताडे - वातण्ड्याः (स)

बापय्ये - वापिकाः (कों)

बाबर - बाभ्रव्याः (स)

बाम - वामः (देवाः ) ( कों )

बामणे [ सं. वामन-महा. बामण-मरा. बामणे ] (म) (इतिहाससंग्रह )

बारगीर - स्वारग्रीविः ( स )

बारशे - वार्ष्या: (स)

बाळ - बालेया: ( कों ) (स)

बिंब ( गोत्रनाम किंवा आडनांव ) याला अक् व इ हे प्रत्यय लागून बैंबकि हा अपत्यवाचक शब्द होतो.
(महिकावतीची बखर पृ. ७८)

बिरजे - [ सं. विरजा. ] (म) ( इतिहाससंग्रह)

बुदले - बुयादुलाः (क) (स)

बुरुड - भरुंड (स)

बुलाखे - बौधाक्षाः = बुडाखे = बुलाखे

बेंद्रा - द्वीद्रियक. ( बेंद्रे पहा)

बेंद्रे - द्विंद्रियक = बेंद्रा (having two limbs), बेंद्रे. (बेनरे) बेंद्रे - वैहीनरय: ( कों )

बेरड - वैरडि: (स) 

बेले - बैलेयः, वेल्याः (स) बेल्हे - वैल्याः ( स ) 

बेहरे - बाहिरिकाः ( कों ) ( स )

बैल - पैलः ( स )

धुव्वा १ [ धुर्व् (हिंसार्थे) = धुव्वा ] समूळ नाश. (भा. इ. १८३६)

-२ [ धू ९ कंपने ] ( धातुकोश-धुव ३ पहा)

धुश्श [ धूश् to burn shiningly चकाकणें = धुश्श, ढुस्स ] काळा धुश्श shining black.

धुळवड [ धूल्यावृत्ति (वर्त ) = धूळवड (स्त्री) ]

धूड १ [ धोड:( डुंडुभ, सर्पविशेष) = धूड ] जाड्या अवजड सापाला मराठींत धूड म्हणतात. त्यावरून अवजड माणसाला अगर प्राण्याला हि धूड हा शब्द लावतात. (भा. इ. १८३६)

-२ [ हुड् to collect, हुडः = धूड ] a bulky fellow, serpent etc. a collection of flesh.

-३ [ उदूढ fat = धूड ]

-४ [ अध्यूढ = धूढ़, धूड ] धूड म्हणजे शरिरानें अति पुष्ट, लठ्ठ. (भा. इ. १८३६)

-५ [ अध्यूढ़ = धूड ( अ लोप )] अध्यूढ़ म्हणजे संपन्न. शरीरानें व मेदानें संपन्न तो धूड. (भा. इ. १८३७)

धूढ [ अध्यूढ़ ] ( धूड ४ पहा)

धूण १ [ धावन = धोन = धूण ] (भा. इ. १८३२)

-२ [ धूतपानीयं = धुअवण = धुवण, धूण ]

धूत् [ धूर्त = धुत्त = धूत् ! ] हा मराठींत उद्गारवाचक शब्द झाला आहे. ( भा. इ. १८३२ )

धूम [ वैदिक ) द्रुम्म् गतौ = धूम ] to step in hurry and bustle. धूम ठोकणें, धूमधडाका.

धूम ठोक, धूम धडाका [द्रुम्म् गतौ] (धूम पहा)

धूर [ धूम्रः ]

धूव [ दुहितृ ] (धुई ४ पहा)

(नास) धूस [ ध्वंस = धूँस = धूस ] (भा.इ. १८३५)

धूळपाटी [ धूलिपाटी = धूळपाटी ]

धूळवड [ धूलिपाता = धूळवड ] the day on which धूळ is thrown.
शकपाता = शेणवड the day of फाल्गुन on which dung is thrown.
दांडपाता = दांडवड the day on which sticks are thrown. वैजयंती, अष्टाध्यायी ]

धेंड [ अध्येद्ध = धेडू = धेंड ] अति वाढलेला, अति मोठा माणूस, पदार्थ, पशु वगैरे. (भा. इ. १८३६)

धुई १ [ द्रुही (daughter) = धुई ]

-२ [ दूति = दूइ = धुई ] कामकरीण. (भा. इ. १८३४)

-३ [ दुहितृ = धुइऊ = धुई ] मुलगी. (भा. इ. १८३३)

-४ [ दुहितृ = धुई, धृव ] daughter. बोले सुने आणि लागे धुवे.

धुकें १ [ धुको वायु: (उणादि ३३४ ) ] वायूसारखें पातळ अभ्र. (भा. इ. १८३३)

-२ [ धूम + कं ] ( धातुकोश-धुकट पहा)

धुगघुगणें [ धुक्ष् कृछ्रजीवने = धुगधुगणें ] धुगधुगी [ धुक्षिका = धुगी, ( द्विरुक्त ) धुगधुगी. धुक्ष् जीवने ] धुगधुगी म्हणजे क्षीणपणें जीवंत असणें.

धुडुम् [ द्रुम्म् (vedik to go गतौ) = दुडुम्, धुडुम् ] धुडुम् दिशी चालता झाला.

धुणावळ [ धावनमूल्यं = धौणोळ = धुणोळ = धुणावळ ] हा वळ प्रत्यय मूल्य या संस्कृत शब्दापासून निघालेला आहे. आवली-लि या ओळवाचक संस्कृत शब्दापासून हा शब्द व्युत्पादणें अनुचित होय.
जेवणावळ म्हणजे जेवणाचें मूल्य
खाणावळ म्हणजे खाण्याचें मूल्य
लिहिणावळ म्हणजे लिहिण्याचें मूल्य
घडणावळ म्हणजे घडण्याचें मूल्य
खोदणावळ म्हणजे खोदण्याचें मूल्य
जेव्हां जेवणावळ व खाणावळ ह्या शब्दांचा अर्थ जेवण्याच्या व खाण्याच्या पंक्ति असा असतो, तेव्हां आवालि शब्दापासून निघालेला आवळ प्रत्यय आहे असें समजणें रास्त आहे. (भा. इ. १८३५)

धुंद [ धूमगंध = धुंद ] धुंद म्हणजे धुरकट. धुपारा [ धूपराग = धुपारा]

धुमी १ [ धूमिका = धुमी ]

-२ [ धूम्या a dense mass of smoke = धुमी ]

धुरवणी [ धूम्रपानीयं = धुरवणी ]

धुराडें [ धूम्ररंध्र = धुराडें ]

धुराळा [ धूम्रालि: = धुराळा, धुरोळा ]

धुरु [ध्रुवं = धुरु ] ( भा. इ. १८३४)

धुरोळा [ धूम्रालिः ] ( धुराळा पहा)

धुवण [ धूतपानीयं ] ( धूण २ पहा )