Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
उपनामव्युत्पत्तिकोश
-२ मौंजायनाः ( स )
मुंडरे - मौंडाराः ( स )
मुंडले - मौंडाराः (क) (स)
मुद्गल - मुद्गलाः (स)
मुसळे - मौसल्याः (स)
मुळ्ये - मूलपाः (क)
मुळ्ये - मूलपाः (स)
मेढी - मेधिन् = मेढी
हें महाराष्ट्रब्राह्मणांत आडनांव आहे. (भा. इ. १८३४)
मेहेंदळे -महेंद्राः (कों)
मैत्र - मैत्रेयाः (स)
मैत्रायणी - मैत्राण्याः (स)
मैत्रे - मैत्रयाः (स)
मोखे - मोखाः (स)
मोगरे [ सं. मुद्गर - महा. मोग्गर - मरा - मोगरे ] ( म ) (इतिहाससंग्रह)
मोग्रे - मुग्रिः (स)
मोगल १ - मुद्गलाः (स)
-२ मौद्गल्याः (स)
मोघे - मौखाः (क) (स)
मोडक - महोडकिः (कों) (स)
मोने - मौनाः (कों) (स)
मोरे - मौर्याः (स)
म्हात्रे - महात्रेयः (स)
म्हाबळ - महावाल्याः (कों) (स)
य
योगी - (प्राचीन) योगाः (क)
र
रटाटे - ललाटि: (कों ) (स)
रणादिवे - अरण्येदीपकाः = रणादिवे ( lights in a forest i. e. useless persons)
(संज्ञायां २-१-४४ पाणिनि )
राक्षे - राक्षायणः ( स )
राजमान्या - राजानं मन्यः = राजमान्या (मराठ्याचें आडनांव ) (भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नियत [ नियति = नियत, नेत ]
निरख [ नि: + क्रय ] ( धातुकोश-निरख ३ पहा)
निरखणें [ निरीक्षणं ] (निरेखणें पहा)
निरण [ निर्याणभाग = निराण = निरण ] अपांगदेशो निर्याणः
निरपणें [ निर्वपनं = निरपणें ] निरपणें म्ह० चाटून पुसून खाणें. (भा. इ. १८३४)
निरर्गट [ निर्ग्रंथिक, निर्ग्रंथ ] ( निर्गट पहा )
निरवणें १ [ अय् १ गतौ. निर् + अय् ( निरयति ). निरयनं = निरवणें ] ( धा. सा. श. )
-२ [ निर्वहणं = निरवणें ] (भा. इ. १८३५)
-३ [ वप् १ बीजसंताने. निर्वपनं ( अर्पणं ) = निरवणें ] ( धा. सा. श.)
-४ [ निर्वर्तनं = निरवअणँ = निरवणें ] संसारं निर्वर्त्य, संन्यासं कुरु = संसार निरवून संन्यास कर. (भा. इ. १८३४)
निरवानिरव [ निर् + वप्]
निरसें १ [ नीरसं ( शुष्कं ) = निरसें ] ज्यांत पाणी नाहीं तें.
-२ [ नीरसं = निरसें (बेचव, बेस्वाद) ] रस म्हणजे स्वाद.
निरांजन १ [ नीराजनं = निरांजन. रा वरील अनुस्वार आगंतुक ] (भा. इ. १८३४)
-२ [ राज् प्रकाशित करणें. निर् + राज् = नीराज = निरांजन ] ( धा. सा. श.)
निराळ [ अन्यतर = अन्यअर = न्यार. स्वार्थी ल प्रत्यय लागून, न्यार + ल = न्यारल = निराळ (ळा-ळी-ळें) ] (भा. इ. १८३३)
निराळा [ (निर्गतः आले: ) = निरालिः = निराळा. (निर्गतः आलयात्.) = निरालयः = निराळा ]
निराळें [ अन्यतरक + (स्वार्थे ल) = ( अ लोप) न्यअरअळ = निराळ (ळा-ळी-ळें ) ]
निरी [ नीवि = नीरी = निरी. व = र ] हा बदल अपूर्व आहे.
निरूत [ निरुक्त = निरुत्त = निरुत (स्पष्ट ). निः + ऋत = निरुत ( खरं ) ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ५७ )
निरुतें [ निरुक्तं ( स्पष्टं ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ५७)
निरूंद [ निर्वृंद = निवुंद = नीरुंद = निरुंद ] (भा. इ. १८३२)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
निपचित [ निःप्रचित्त = निपचित ] unconscious.
निपजे [ निपद्यते = निपज्जए = निपजे ] (भा. इ.१८३२)
निपट [ नि:स्पष्ट = निप्पट = निपट ] अति स्पष्ट तें निपट (भा. इ. १८३४)
निपटनिरंजन [ निःस्पष्टनिरंजन = निपटनिरंजन ] (भा. इ. १८३४)
निपटून [ पत्र ११. निस् + पत्र. निष्पत्रं = निपट ] निपटून खातो म्हणजे अति खातो, शीत देखील ठेवत नाहीं. ( अष्टाध्यायी ५-४-६१ ) ( धा. सा. श. )
निपुत्रिक [ अपुत्रक = नपुत्रक = निपुत्रिक. नकारार्थी नि ] (भा. इ. १८३२)
निंपुसक [ बायका असा उच्चार करतात. नकारार्थी नि ] ( भा. इ. १८३२ )
निपेटारा [ निस् + पिठ् to hurt, harm णिच्. निष्पेठयितृ harmless = निपेटारा ] harmless.
उ०- आतां हे तेयां निपेटारे जाले । निवटि वहिला रणि सांपडलें । घेइं यश रिपु जींतले । एकलेनि पैं ॥ ज्ञा. ११-४६५
निबर [ निर्भर = निब्भर = निब्वर = निवर-रा-रें ] ( ग्रंथमाला)
निबाप्या [ अवप्तक = नवप्तृक = निबष्पक = निबाप्या. नकारार्थी नि ] (भा. इ. १८३२)
निबिड [ निबिड ( अप्रवेश्य ) = निबिड ] निबिड अरण्य.
निबोळ्य [ निंबगूलिका = निंबऊलिआ = निंबोळ्या ] ( भा. इ. १८३२ )
निब्वर [ निर्भट (कठिन ) = निब्वर ] आंबा निब्बर आहे = आम्रः निर्भटः आभाति
निभाव [ वह् ] सहने. निर्वाहः = निव्वाअ = निभाव ] निभाव कसा लागेल म्ह० निर्वाह कसा लागेल ? ( धा. सा. श. )
निमाला [ नि + मा ] (धातुकोश-निम ४ पहा )
निमुळतें [ नम् १ प्रहृत्वे. निम्नोन्नत् = निमुळतें ] ( धा. सा. श. )
निमूट् १ [ भृ १ भरणे. निभृतं = निबूट = निमूट ] ती निमूट बसली म्हणजे एकाकी, कोण्हाशीं न बोलतां बसली. ती निमूट गेली म्हणजे एकाकी एकटी गेली. (धा. सा. श.)
-२ [ निमृतम् secretly = निमूट secretly. भ = म. ऋ = ऊ (भण् = म्हण्) ] secretly, noiselessly, unparceived, hiddenly.
-३ [ निभृतं = निभूट = निमूट. भ = म. भण् =म्हण ]
उपनामव्युत्पत्तिकोश
मध्वे - माधव्याः (स)
मरठे - अस्मरथाः (स)
मराठे १ - अस्मरथाः (स)
-२ आश्मरथ्याः (कों)
मसणे १ मषणाः (स)
-२ मणसणाः (स)
महाडीक - महाटवीकः = महाडीक (मराठ्यांचें आडनांव)
महाबळ - महावाल्याः ( कों )
महाले - महल्लक (अंतःपुरांतला स्त्रीरक्षक) = महालअ = महाला; अनेकवचन महाले. जिवा महाला हा शिवाजीचा एक विश्वासू अनुयायी होता. सध्यां महाल्यांची वस्ती सिंहगडाभोंवतीं आहे. (भा. इ. १८३३) माखलकर - ग्रामनामावरून. (कों)
मांगळे - मांगल: (स)
माचे - मत्साः (स)
माजरे, मांजरे - माजिरकाः (स)
मांडके - मांडूकेया: (स )
मांडे १ - मांडिः (स )
-२ मांडव्यः = मांडे a surname
-३ मांड्याः ( स )
माढरे, मांढरे - मार्ठ्य a patronomic = माढरे, मांढरे, मांढरा-री. a surname among महाराष्ट्रिकs. माधवे - माधव्याः ( स )
माध्यंदिन - मध्यंदिनः ( स )
मानवी - मानव्याः (स)
माने - मानेयाः (स)
मायदेव १ - देवमायाः (कों)
-२- सिंघणयादवाच्या इ. स. १२१५ तल्या एका ताम्रपटांत मायीदेव पंडीत असें विशेषनाम आलेलें आहे. (भा. इ. १८३२)
मारणे - मारायणाः ( स )
मालसे - मल्लकाशा: (कों)
माळवे - मालव्याः = माळवे.
बाहीक देशांतील एक आयुधजीवि संघ. माळवे हें एक आडनांव आहे.
माळी - माल्याः (कों ) (स ) (क)
मुजुमदार - धंद्यावरून (कों )
मुंजे १ - मौंजिकाः (स)
म. धा. ३२
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
निःखळ [निष्कल indivisible = निःखळ ] indivisible, entire.
निखिलें [ निशित + ल ] ( धातुकोश-निस ३ पहा)
निगरगट्ट १ [ निररघट्ट = निगरगट्ट. नकारार्थी नि. र बद्दल ग ] (भा. इ. १८३२)
-२ [ निगर्हगर्ड्ढ] ( निगरघट्ट पहा )
निगरघट्ट [ नि + गर्ह् to deopise. गर्ह् + त = गर्ड्ढ = घट्ट despised. निगर्हगर्ड्ढ = निगरघट्ट, निगरगट्ट ] Impervious to shame, very shameless.
निगर्गट [ निर्ग्रांथिक ] ( निर्गट पहा )
निगर्गट्ट [ निगर्हगर्हित । अत्यन्त निंद्य । ]
निगळता [ निर्+गल् १० स्रवणे ] (धातुकोश-निगळ पहा)
निंच १ [ न्यञ्च् = निंच ] Turned down.
-२ [ अनुच्चं, नोच्चं = निंच ]
निचरा १ [ निःस्रावः, निःस्रवः = निचरा. स्त्रू गतौ ] सुवाचा निचरा.
-२ [ निःस्रावः ] (धातुकोश-निचर ६ पहा)
-३ [ निःस्रावः = निचराअ = निचरा, णिचरा ] हा शब्द मराठींत णादि आहे. (भा. इ. १८३७)
निढळ [ निटिल = निढळ ] ( स. मं.)
निढळाचा घाम [(सं.) निटाल = (प्रा.) निडाल = निढाळ ] मस्तकाचा घाम म्हणजे निढळाचा घाम. (स. मं.)
नितकोर [ न्यंङ्कृत्वा = निगकोर = नितकोर. न्यंच् = क्षुल्लक, बारीक, भिकार ] (भा. इ. १८३३)
निताव [ निस्ताप ] (आवा ३ पहा)
निदला [ नि + द्रो ] ( धातुकोश-निद २ पहा)
निदान [ निदाने = निदानीं, निदान (क्रियाविशेषण ) ] निदान म्ह० सरते शेवटी.
निदानीचें [ निदानं (शेवट) निदानीयं = निदानिज्जं = निदानीचें ] शेवटचें.
निदेला [ नि + द्रा ] ( धातुकोश-निद पहा)
निधड, निधडा [ निर्दटः ( निर्दय, मदोन्मत्त ) निधड, निधडा ]
निनावी [ निर्नामिक = निनाव्या ] (भा. इ. १८३२)
निपक [ निष्पकं = निपक ] निपक म्ह० फाजील पिकलेलें. (भा. इ. १८३५)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नाळ १ [ नाल = नाळ ] ( स. मं. )
-२ [(नाभि) नाडी = नाली = नाळी = नाळ ]
नाळगुद [ नालगदः = नाळगुद ] (भा. इ. १८३४)
नि १ [ न पहा]
-२ [ ( वैदिक ) न्वै = नि — नी ] Indeed, verily मी आलों नि or नी I have come indeed.
निक (का-की-कें ) १ [ निष्क् ( मापणें, वजन करणें)= निख्क = निक्क = नीक = निक ( का-की-कें) ] नीकें, निकें म्हणजे बराबर वजन केलेलें, कांटेतील, ठरीव मापलेलें, खरें. (भा. इ. १८३३)
-२ [ निकामम् = निकावं = निकें ]
निकामम्= इच्छेप्रमाणें, यथेष्ट, पुष्कळ. निक = निक्क = नक्की. (भा. इ. १८३४)
निकर १ [ निग्रह = निघर = निकर ]
-२ [ नैकर्य = निकर ] निकर म्ह० आग्रह.
-३ [ निकार (इजा, प्रतिबंध, दुष्टपणा ) = निकर ]
निकराचें बोलणें, निकराची लढाई, म्हणजे अत्यन्त दुष्टपणाचें व प्रतिबंधाचें व अडवणुकीचें बोलणें इ. इ.
-४ [ निकरः, निकारः = निकर, निकार ] निकर म्हणजे पराकाष्ठेची मानहानि. (भा. इ. १८३६)
निकाढा [ निष्क्वाथः = निकाढा ]
निकाम्या [ अकर्मिक = नकर्मिक = निकाम्या. नकारार्थ नि ] (भा. इ. १८३२)
निकार [ निकर ४ पहा ]
निकें १ [ न्यक्षं = निकें. न्यक्षं कार्त्स्न्यनिकृष्टयोः (अमर) ]
-२ [ निष्क् to measure निष्कं = निकें, निक्की = नक्की ]
निक्षून १ [ निर + चि ५ चयने ] (धातुकोश-निक्ष पहा)
-२ [ निक्ष् भोसकणें. निक्षित्वा = निक्षून ] निक्षून सांगणें म्हणजे सुरी भोसकतात त्याप्रमाणें मनांत बिंबेल असें सांगणें.
निखळ [ निष्कलं = निखळ ] अगदीं, निरुपाधिक.
उपनामव्युत्पत्तिकोश
भोर - १ भौरिकायनिः (स)
-२ भौराः (स)
भोरे - भौराः (स )
भोले - १ भौलिकायनि: (स )
-२ बाहुलिः (स)
भोसकटे - भोजकट (देश) प्रांतावरून. ( कों )
भोसले १ [ भोज (क्षत्रियवाचक शब्द. चेऊल -चंपावती येथें यादववंशी क्षत्रिय होते.) भोज या शब्दाला स्वार्थक ल प्रत्यय लागून भोजल व त्याचा अपभ्रंश भोसल ( ला-ली-लें ) ] (महिकावतीची बखर पृ. ७९) व (भा. इ. १८३२)
-२ होय्सळ किंवा पोय्सळ ( आडनांव-म्हैसूरप्रांतांत दोरसमुद्र येथें यदुवंशीय क्षत्रिय या आडनांवाचे होते. पो - वो - बो - भो.
पोय्सळ यांचें मूळ गांव शशकपुर. शशकपुर याचा अपभ्रंश ससोदें किंवा शिसोदें. भोसले हे शिसोदें गांवचे राहणारे हें बखरींतून महशूर आहे. (महिकावतीची बखर पृ. ७९)
भोळे - बाहुलिः (स)
भौम (आडनांव) - भूमिपासून अपत्यवाचक शब्द भौम. भौमचा अपभ्रंश भोम.
भौमचा आणखी एक मराठी अपभ्रंश बोंब.
बोंब शब्दाला स्वार्थक ल लागून बोंबल ( ला-ली-लें) व बोंबल्या हे मराठी शब्द होतात.
पेणखोपवली रस्त्यावर बोंबल्या विठोबा आहे. त्याच्या नांवांत हाच शब्द येतो. त्या शब्दाचा बोंब ( शंखध्वनि ) किंवा बोंबील (मांसा ) या शब्दाशीं कांहीं संबंध नाहीं. (महिकावतीची बखर पृ. ७८ )
म
मंगरूरकर - ग्रामनामावरून (कों)
मटंग - मृटंवगीयाः (कों)
मटंगे - मृटंवगीयाः (स)
मंडके - मांडूकेया: (स)
मंडलिक - धंद्यावरून (कों )
मणेरकर - ग्रामनामावरून (क)
मत्से - मात्साः ( क ) ( स )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नारू [ नहारु (पाली ) + ण्हारू (जैनमहाराष्ट्री ) = नारू (रोगविशेष). पालींत नहारू = स्नायु] स्नायूच्या वेटाळ्यासारखा ज्या कृमीचा आकार तो नारू. (भा. इ. १८३२)
नाला [ नालः = नाला ]
नावारूपाला येणें - "तो मनुष्य नावारूपाला आला" ह्या वाक्यांत नावारूपाला म्हणजे योग्यतेला असा अर्थ आहे. हा अर्थ नावारूपाला येणेंप्रमाणें आला. प्रशंसायां रूपं (४-३-६६ ) असें पाणिनीचें सूत्र आहे. सुबंत किंवा तिङन्त शब्दापुढ़ें रूप हें पद लागून तो शब्द प्राशस्त्यार्थी होती. जसें, पटुरूपः म्हणजे प्रशस्तपणें पटु-चांगला कर्तबगार. तसेंच, नाम ह्या शब्दाला रूप लागून नामरूप शब्द झाला. अर्थ चांगलें, प्रशस्त, स्तुत्य नांव ऊर्फ कीर्ति. नामरूप ह्याचें मराठी नावरूप. चतुर्थीचा ला प्रत्यय लागतांना नांव हा शब्द तसाच रहातो किंवा रूपशब्दाप्रमाणें आकार घेतो. नावरूपाला किंवा नावारूपाला. (भा. इ. १८३२)
नावेक १ [ अन्हायक (अकच्) नावक = नावेक ] नावेक म्हणजे लौकर. (भा. इ. १८३६)
-२ [ नव्यकं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४९ ) हा शब्द जुन्या मराठी ग्रंथांत फार येतो. अन्हाय म्हणजे लौकर. ( भा. इ. १८३६ )
नासका [ नासकः = नासका. नस् कौटिल्ये ] तो नासका माणूस आहे म्हणजे कुटिल, वक्र आहे. नासका कुचका असे शब्द मुली उच्चारितात.
नासा [ स्नासा ] ( धातुकोश-नसनस पहा )
नासिका [ स्नासिका ] ,, ,,
नाहक १ [ अनागस् = अनाकह = नाहक (निरपराधी )]
त्यानें त्याला नाहक मारिलें = तेन सः अनागास् मारितः ।
क व ह याचा विपर्यय. फारसी नाहक्क शब्द निराळा. ( भा. इ. १८३४)
-२ [ अनाहतक: = ( अ लोप ) नाहअक = नाहक ]
अनाहतोऽपि विदीर्णहृदयः = नाहक दुःखी.
नाहि [ ननु हि = नाहि ] नाहि, असें पहा, ह्या वाक्यांत नाहि हें अव्यय संशय किंवा प्रश्न किंवा अवधारणा दाखवितें.
नाही १ [ नभ्] ( धातुकोश-नह पहा)
-२ [ नहि = नाही ]
मी गेलों नाहीं = अहं नहि गतः अस्मि
मी जाणार नाही = अहं नहि गंतास्मि
तो जाणार नाही = सः नहि गंता ।
ते जाणार नाही = ते नहि गंतार:
मराठींत ते जाणार नाहीत, असें हि म्हणतात. परंतु, तें एका प्रकारें अशुद्ध आहे. तात्पर्य, नाही हें अव्यय आहे. (भा. इ. १८३६)
-३ [ नव्हे पहा ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ना तरि [ नह तर्हि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४२ )
नातलग [ ज्ञातिलग्नः = नातलग ]
नातवंड [नप्तृगंडः = नातोंड, नातवंड] excellent grandson.
नातु [ नप्तृ = नत्तु = नातु - ती - त ] (स. मं.)
नातें [ ज्ञातेयं = ञातेअँ = नातें ]
तुमचें नातें सांगा = युष्मदीयं ज्ञातेयं संख्यात.
नातेवाईक [ ज्ञातिपातिकः = नातेवाईक] (वाईक पहा)
नातोंड [नप्तृगंड = नत्तुअंड = नातोंड ] गंड हा शब्द प्रशंसार्थीं संस्कृतांत योजीत. (भा. इ. १८३३)
नाद [नाथ् १ याच्ञ्नायां. नाथः = नाद] त्याचा नाद सोडा.
नाथालु = नाठाळ ( धा. सा. श. )
नांदरुख १ [ नंददृक्ष = नांदरुख्ख = नांदरुख ] (स. मं.)
-२ [ नंदिवृक्षः = नांदरुख ] (भा. इ. १८३४)
नादार [ दारु ] (दार पहा)
नाना १ [ नाना (खेरीज ) = नाना ( ज्ञानेश्वरी ) ]
ना-ना [ नाना without = ना ]
ना घर ना दार = नाना गृहान् नाना दाराः
गृह म्हणजे बायको. दारा: म्हणजे उपस्त्रिया.
नांनूं [ ननु (शंका, वितर्क ) नांनूं ] नांनूं करतां करतां म्हणजे शंका तर्क करतां करतां.
नापत् [ नाप्तिः ( unattainment ) = नापत् ]
आमची बाजारांत नापत झाली = पदार्थ मिळतनासे झाले.
नामर्द [ नामर्द, नाहक्क, नापास वगैरे शब्दांतील ना नकारार्थी फारसी आहे ] (भा. इ. १८३२)
नामाथिला १ [ नामप्रथित = नामाथिला ] Famous by name. गुणप्रथित = गुणाथिला.
-२ [ नामान्वित + ल ] (सत्त्वाथिला पहा)
नामी [ नाम्य = नामी ] स्तुत्य, नांव घेण्याजोगें.
नारिंग १ [ नरंग, नरांग = नारिंग (शिस्न)]
नारिंग या फलशब्दाच्या साम्याने किंवा उपमानानें नरांगा चा नारिंग उच्चार झाला आहे.
-२ [ नारंको योगसारो ( वै) नारंगो योगिको मतः ॥
(केयदेव-पथ्यापथ्यविबोध) नारंक = नारिंग ] (भा. इ. १८३४)
उपनामव्युत्पत्तिकोश
भावे - १ बाहविः (कों) (स)
-२ बाव्हादिभ्यश्च ( ४-१-९६ )
बाहु इत्येवमादिभ्यः शब्देभ्योऽपत्ये--इञ्
प्रत्ययो भवति । बाहविः ।
बाहुर्नाम कश्चित् । तस्यापत्यं बाहविः (काशिका )
बाहविः = वाहवीयः
बाहवीयः = भावीया = भाव्या (एकवचन )
भाव्ये ( अनेकवचन)
भावे ( आधुनिक )
(कै. राजवाडे यांच्या एका नोटबुकावरून)
भाव्ये - १ वाव्हिया: (कों)
-२ वाव्हियः (स)
भासल - भाषण्या: (क ) (स)
भासे - [ सं. वासुकि ] (म ) ( वासे पहा)
भिडे - बिदा: (कों) (स)
भिशे - भैषज्याः ( स )
भिसे १ - भैषज्याः ( स )
-२ भिषक् = भिसाओ = भिसा (ए. ) भिसे (अ.) वैद्य, भिसे ही महाराष्ट्रांत आडनांवें झाली आहेत. (भा. इ. १८३२)
भुरके - भौरिकः ( राज्ञः कोशागारे सुवर्णाध्यक्षः ) = भुरिका = भुरका; अनेकवचन भुरके. हें आडनांव महाराष्ट्रांत सोनार लोकांत आहे.
अर्थात्, पूर्वीच्या सात-आठशां वर्षांपलीकडील राजाच्या पदरीं हे भुरके असावे. धंद्यावरून आडनांवें या देशांत पूर्वीप्रमाणें आतां हि पडतात. जसे पेशवे, मुतालीक, फडनीस वगैरे. पुरातनः- राजाध्यक्ष्य, राजोपाध्ये, भुरके इ. इ. इ. (भा. इ. १८३३)
भुरे - १ भौरिकायनिः (स)
-२ भौराः (स)
भुसकुटे- १ भोजकट (देश) प्रांतावरून. (कोंं)
-२ भोजकटीय ( खानखोजे पहा )
भुस्कुटे - ग्रामनामावरून. ( कों )
भेडे - भेल्हि: (कों)
भेंडे - भिंदिः (स)
भोइटा - भूमिष्ठः ( ८-३-९७ पाणिनि ) = भोइटा (आडनांव)
भोगले - भोगलाः (स) भोजकटीय - भोजकट (देश) प्रांतावरून. (कों )
भोजकटे - भोजकट (देश) प्रांतावरून (कों)