Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

माळी - माल: = मलओ = मळा = बागा. ज्याचा धंदा मळ्यांत तो माळी. (नामादिशब्दकोश - माळ २ पहा)

मोराटो, मोराठे ( Moratto ) इ. स. च्या सतराव्या शतकांतील ईस्ट इंडिया कंपनीचे हिंदुस्तानांतील इंग्रज बेपारी व नोकर मराठ्यांना मोराटो म्हणत. हा उच्चार ते बंगाली लोकांपासून पहिल्याप्रथम शिकले. बंगाली लोक अ चा उच्चार र्‍हस्व ओ करतात. त्यामुळे मचा मो करून तत्कालीन बंगाली लोक मराठ्यांना मोराटो म्हणत. मो उच्चार कां झाला तें येथपर्यंत सांगितलें. आतां टो ची परंपरा सांगतों. मराठा म्हणून जो शब्द आहे तो मराठो असा रजपूत, व्रज, मारवाडी व बंगाली भाषांत प्रथमपुरुषाच्या एकवचनीं होत असे. येणें प्रमाणें मोराठो हा उच्चार निष्पन्न झाला. ठो चा टो असा कोमल उच्चार करण्याची बंगाल्यांची लकब आहे. त्यामुळे मोराटो हा उच्चार सिद्ध झाला. तो कलकत्याच्या इंग्रजांच्या परिचयाचा झाला व तो त्यांनीं आपल्या पत्रव्यवहारांत व इतिहासांत नमूद करून ठेवला. हा दिसण्याला वेडाबागडा उच्चार इंग्रजांनीं आपल्या टांकसाळींतून स्वयंस्फूर्तीनें पाडला नाहीं. त्यांनीं फक्त बंगाली लोकांचें अंधपरंपरा न्यायानें अनुकरण केलें व आधुनिक मराठ्यांच्या थट्टेस आपणास नाहक्क पात्र करून घेतलें. (भा. इ. १८३३)

लाडसक्के - शक = सक. ठसकेदार उच्चार सक्क, (पु.) सक्का, (पु. अनेकवचन ) सक्के. लाडसक्का म्हणजे लाट देशांतील शक लोक. (महाराष्ट्रांचा वसाहतकाल पृ. १३८ )

लोणार - लवणाकरः = लोणार.

वंजारी - १ वनदारक किंवा वाणिज्यहारी
(महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. १३६)
-२ ( बिंजारी पहा)

वडार - वध्र ( लोकनाम )

वाघरी - वागुरिक ( snake-keepers ) = वागरी = वाघरी ही एक जात गुजराथेंत आहे.

वाणी - पाणिक merchant = वाणी.

वारली - वारुडकि = वारुलइ = वारुली = वारली. दुबळा शूद्र आहे. वरुड ही एक अनार्य जात होती. तिच्यापासून वारुडकि जात झाली. (महिकावतीची बखर पृ. ८३)

वेसकर - (महार शब्द पहा ) - जे श्वपाक यालाच महार हें लौकिक नांव आहे तस्य मृतानां गोगर्दभशुनां ग्रामाद् वहिर्निर्हरणं वृत्तिः नगरादबहि: वासश्च । ह्याला वेसकर, येसकर, ही संज्ञा खेड्यांतून असलेली दृष्टीस पडते. वेशीपाशीं नगराबाहेर राहणारा जो तो वेसकर किंवा एसकर अगर येसकर. यांनीं गवादींचें कातडें काढून वारावरांना म्हणजे चांभारांना द्यावें. ( राजवाडे लेख संग्रह भा. २ अंत्यजोद्धार पृ. १३३ )

पां [ त्वै = त्पइ = पैं, पां ( निपात ) ] ( ज्ञा. अ. ९ पृ- ७ )

पांई [ उपाय ( Proximity, nearness ) उपायीं = पायीं, पाईं ] through proximity of, through contact of. विद्येपाईं खर्चांत आलों.

पाउट [ पादपीठं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३६ )

पाउटी [ प्रवृत्ति practice = पाउटी ] Practice. उ०- पैं अभ्यासाची पाउटी । करुनि टाकिजे किरीटि ।
ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥ ज्ञा. १२-१२६

पाउंड [ प्रोत् + डी १ विहायसागतौ - डयनम् ] ( धातुकोश-पौंड पहा)

पाउण [ पादोन = पाउन (जुन्नर शिलालेख ) = पाऊण ] (ग्रंथमाला)

पाउल १ [ पाद + वली = पाउली = पाउल ] (स. मं.)

-२ [ पादतलं = पाउल ]

-३ [ पाद + ल = पाअल = पाउल ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८)

पाऊसबिऊस [ प्रावृष् विप्रुष् = पाऊसबिऊस. विप्रुष ( थेंब ) ] (भा. इ. १८३४)

पाकुळकी [ अपाकुलकता = (अ लोप) पाकुळकी ] अपाकुल म्हणजे विकृत, विकारग्रस्त.

पाखटी [ पक्षति = पांखटी ] पाखटी म्हणजे पाखराच्या पांखांचें मूळ.

पाखर [ प्रक्षरिका, प्रखरिका armour to protect a horse, elephant = पाखर, पांखर ] armour. कृपेची पाखर armour in the shape of good will.

पाखरूं [ पक्षितर = पक्खिअर = पक्खिरुं = पाखिरूँ (ज्ञानेश्वरी ) = पाखरूं ] ( रूं पहा )

पागल १ [ पागल (संस्कृत ) = पागळ] वेडा, व्यंग, दुबळा. (भा. इ. १८३२)

-२ [ प्रग्लः exhausted = पागल ] exhausted, weak.

पागळी [ प्रागलिका ] (धातुकोश-पघळ २ पहा)

पाग्या १ [ प्राग्र्यः (मुख्य, पुढारी) = पाग्या ] घरचा पाग्या, बाहेरचा गांड्या.

-२ [ प्राग्र्यः foremost, chief = पाग्या ] chief. बायकोचा पाग्या chief with his wife बाहेरचा माग्या mudmost outside.

पहा - धान्यदर्शं भक्षते = धान्यपहा खातो
कन्यादर्श वरयति = मुलगीपहा लग्न करतो
पादुकादर्श गृण्हाति = जोडापहा घालतो
वस्त्रदर्शं क्रीणाति = वस्त्रपहा विकत घेतो
वस्तुदर्श चोरयति = वस्तुपहा चोरतो
धान्यपहा हें णमुल् आहे.

पहाट - [ प्रातः + तट = पाअह्+ अट = पाह् + अट = पाहट = पहाट ] प्रातःकाळच्या तीराजवळचा जो काळ तो पहाट. (स. मं.)

पहारा - [ प्रहर = पहरो = पहर = पहारा ] दिवसांतील दर २॥ घटकेला बदलणारें संरक्षक सैनिकांचें काम. हा शब्द फारशी नाही. (स. मं.)

पहिले छूट ( हिंदी ) [ प्रथमस्यां सृष्टौ = पहिले छूट ] पहिले छूट म्हणजे कोणत्याहि कर्माची प्रथम निर्मिति करण्याच्या वेळेस.

पहिल्या विशींत - प्रथमे वयासे = पहिल्या विशींत (सप्तमी). विंशति या संख्यावाचक शब्दाचा येथें कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

पही [पथिक = पही ] पंथानं गच्छतीति पथिकः.

पही (पाहुणा ) [ पथिन् = पहि = पही ] ( भा. इ. १८३४)

पळकट [ पलंकट = पळकट]

पळकुटा [भीरुस्तु भेलो हरिणहृदयः स्यात्पलंकटः (त्रिकांडशेष). पलंकट = पळंकट = पळकट = पळकुट = पळकुटा ] (ग्रंथमाला)

पळणें [ली - द्रवीकरणे. प्रलयनं (प्रलयः ) = पलणें ] नाश पावणें. द्रव्य पळालें = द्रव्यं प्रलयेतं
धान्य पळालें = सस्यं प्रलयं गतं
सैन्य पळालें = सैन्यं प्रलयं गतं ( नष्ट झालें) दृष्टि पळाली = दृष्टिः प्रलयं गता. ( धा. सा. श. )

पळपळीत [ पल straw = पळपळीत ] हलकें, बेचव.

पळवापळवी [प्रलपना + अपलपनी = पळवापळवी ] (भा. इ. १८३६)

पळापळ [ पलायना + आपलायना = पळापळ ] (भा. इ. १८३६)

पळिता [ प्रदप्ति ] (पलिता २ पहा.)

बढई, बढवई, बढाई [ वर्धकिन् = बढ्ढइणो = बढई, बढाई, बढवई ] बढई = सुतारकम करणारी एक जात. (स. मं.)

बिंजारी - विंध्याधरिन् = विंज्झ्याहरी = विंझारी = बिंजारी = वंजारी. (भा. इ. १८३२)
बुरूड [ वरुड: ( अंत्यज विशेष) = बरूड = बुरूड ]

बेरड १ [वैराष्ट्रिक = बेरट्ट = बेरड ] (राधामाधवविलासचंपू पृ. १६० )
-२ [ वेरट ( a low caste man ) = बेरड ]

वेलदार [ बिलदारक = बेलदार] दगडांचें बीळ उकरणारा, खाण उकरणारा.

भंडारी - मंडहारक = मंडहारिकः = भंडारी.
मंडं अच्छसुरां हरति मंडहारक:
मंडहारक म्हणजे ताडी करणारा.

भांडारी - ( १ ) कोकणांत भांडारी नामक दर्यावर्दी लोकांची जात आहे. ह्या लोकांत मायनाक, रामनाक, वगैरे नाकप्रत्ययान्त नांवें असतात. नाक हा नाग ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. उघड आहे की, हे भंडारी लोक नागवंशीय आहेत. ह्यांचा पिढीजात धंदा दर्यावर्दीपणाचा आहे. संस्कृतांत भांड म्हणजे गलबत. गलबतांनीं समुद्रावर हालचाल करणारे जे ते भांडाहार.

भांडाहार = भांडार
भांडार ते च भांडारी

(२) महारांच्या हि नांवांपुढें नाक, नाग हे शब्द लागतात. तेव्हां महार हि नागवंशीय होत.
(३) भारतांत नागांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यापैकीं बहुतेक सर्व वंश सध्यांच्या मराठा क्षत्रियांत आढळतात. इतिहाससंग्रहाच्या दुसर्‍या वर्षांच्या चवथ्या अंकांत नागांविषयीं मीं एक विस्तृत लेख लिहिलेला आहे. त्यांत नागवंशीय मराठा क्षत्रियांच्या आडनांवांचा ऊहापोह केला आहे.
(४) तात्पर्य, प्राचीन नागलोकांत क्षत्रिय, नावाडी व अतिशूद्र अशा तीन जाति असाव्या किंवा होत्या, हें नि:संशय आहे. (भा. इ. १८३५)

भावीण - भामिनी = भाविणी = भावीण (स्त्रीविशेष. जातिनाम ). (भा. इ. १८३३, ३७)

मण्यारी [ मणिकार = मणिआर = मण्यार = मण्यारी ] (भा. इ. १८३२ )

महार - गाईला संस्कृत शब्द महा. ह्या गोवाचक महा शब्दावरून गवादींचें गांवाबाहेर निर्हरण करणार्‍या जातीला महाकार अशी संज्ञा असे. महाकार शब्दाचें महाराष्ट्री रूप महाआर व महाआर ह्या महाराष्ट्री शब्दाचें मराठी रूप महार. ( राजवाडे लेख संग्रह भा. २- अंत्यजोद्धार पृ. १३३)

महुमद - [ केशव Mahamedan ह्याला महुमद शब्द योजतो ] (भा. इ. १८३२)

मांगेल - मांग + इल या दोन शब्दांचा समास आहे. पैकीं मांग हा शब्द मातंग ह्या शब्दाचा अपभ्रंश समजणें युक्त नाहीं. कारण मांगेल लोक अस्पृश्य नाहींत, पूर्ण स्पृश्य आहेत. तेव्हां मांगेल या संयुक्त शब्दांतील मांग ह्या शब्दाचें मूळ अन्यत्र शोधिलें पाहिजे. या मांगेल किंवा मांगेले लोकांचा धंदा मच्छीमारीचा असून ते उंबरगांवापासून मुंबईपर्यंतच्या टापूंत समुद्रकिनार्‍यापासून मैल अर्ध मैलाच्या आंत वस्ती करून राहिलेले आहेत. (महिकावतीची वखर पृ. ८०)

पवाडा १ [ अपवादः = (अ लोप) पवाडा ] पवाडा म्ह० निंदा. अपवाद म्हणजे निंदा.
ज्ञानेश्वरीत निंदार्थक पवाडा शब्द येतो. अनिंदार्थक पवाडा शब्द प्रवाद ह्या शब्दापासून निघाला आहे. ( भा. इ. १८३७)

-२ [प्रवादः = पवाडा] कीर्ति, प्रसिद्धि. (भा. इ. १८३६)

पवारी [प्रवालवल्ली (विद्रुमलता) = पवारी ] एक सुगंधि द्रव्य.

पसरणी १ [ प्रसारिणी = पसरणी ] वनस्पतिविशेष. (भा. इ. १८३४)

-२ [स्त्रु १ गतौ. प्रास्रवणिका = पसरणी ] (धा. सा. श.)

पसरणें १ [ अपसरणें = (अ लोप) पसरणें (अकर्मक)] लोक पसरले म्हणजे जनाः अप्पासरन् परंतु लोकांनीं पाय पसरले = जनाः पादान् प्रासरन्, (भा. इ. १८३७)

-२ [ प्रसरण = पसरणें ] अंथरूण पसरणें = आस्तरणप्रसरणं. (भा. इ. १८३५ )

पसा [प्रसरक = पसअअ = पसा ] (स. मं.)

पसार १ [ अपसारः ] ( धातुकोश-पसार १ पहा)

-२ [ सृ १ सरणे. अपसारः = पसार. प्रसारः = पसारा. सरसरं = सरसर = सरसरा = सरासरा ] ( धा. सा. श.)

पसार होणें [ अपसारं भू = पसार होणें ] पसार होणें म्हणजे निघून जाणें. ( भा. इ. १८३५ )

पसारा [ प्रसारः = पसारा ]

पसीना [ प्रस्विन्नः = पसीना ] पसीना म्ह० घाम.

पहचणें [ प्रस्थानं = पहचणं = पहचणें = पोहोचणें ] ग्रामंप्रति प्रस्थाति = गावातें पोहोचतो. (भा. इ. १८३४ )

पहणें, पाहणें, बघणें - दृश् असा एक धातु संस्कृतांत आहे. त्याची कांहीं रूपें पशू, पश्य ह्या लुप्त धातूपासून होतात. हा पश् धातु स्पश् to spy ह्याचेंच एक रूप आहे. पश् म्हणजे पाहाणें. श् चा ह् होऊन, पश् चें पह् बनलें. पचा ब व हचा घ होऊन, बघ् बनले. पह व बघ अशीं हीं दोन्ही रूपें पश् धातूपासून निघालीं आहेत. पह् पासून पाहणें असें अनिश्चितार्थी रूप जुन्या मराठींत करीत. पहचें पाह हें प्रयोजक रूप आहे. ह्या प्रयोजक रूपापासून पाहिजे हें रूप निघालें आहे. मी ती वस्तु पाहतों म्हणजे बघतों. मला ती वस्तु पाहिजे, म्हणजे मला ती वस्तु दाखवावी, दाखविली जावी. पाहिजे हें रूप पह् ह्या धातूचें causal Passive आहे. पह रूप अडाणी लोक योजतात व तें बघ इतकेंच शुद्ध आहे. (स. मं.)

परिवाण [ परिवारण train, retinue = परिवाण ] retinue. उ० - पैं राॐ परिवाण नेणे । आज्ञा चि परचक्र जेणे । कां चंद्राचेनि परिपूर्णे । सिंधु भरती ॥ ज्ञा. १३-१३८

परी [ पर्यायः किंवा परीतिः ] ( पर पहा )

परीट [ ( परिभृज्) परिभृट् = परिइट् = परीट ] ( भा. इ. १८३५)

परुस, परसाकडे [ परिसरः = परिसरओ = परसो = परस = परुस. शब्दयोगियुक्त = परसाकडे ]
परिसर = घराभोवतालील जमीन.
परसाकडे = बहिर्दिशा.
परसाकडेस लागली, ह्या वाक्यांत परसाकडे हैं मराठींत नाम बनलें आहे.
परसाकडे, परसाकडेहून, परसाकडेत, परसाकडेचा. (ग्रंथमाला)

परेड [ अट् १ गतौ. पर्यटिः = परेड ] Parade शी -कांहीं एक संबंध नाहीं. ( धा. सा. श. )

पर्या [ परीवाह = परीआआ = पर्या] परीवाह म्हणजे ओहोळ किंवा वहाळ. हा शब्द रत्नागिरीच्या बाजूस आढळतो. (भा. इ. १८३५)

पर्‍हिव [परीवाह = पर्‍हिव, पर्या ] ओहोळ, मोरी.

पलख [ प्लक्ष = पलक्ख = पलख ] वृक्षनाम. (भा. इ. १८३३)

पलंगपोस [पर्यंकस्पृश्य = पलंगपोस ]

पलाटण [ अट् १ गतौ. पर्याटन = पलटण ] ( धा. सा. श.)

पलिता १ [ प्रज्वलितः = पलित्ता = पलिता ] जळणारी दिवटी. (भा. इ. १८३६)

-२ [प्रदीप्त = पलित्त (महाराष्ट्री) = पलिता, पळिता ]

पल्ला [ पल्यः = पल्ला ] पल्य a sack for corn ( probably containing a certain measure, Vedic) पल्य हें वैदिककालीं माप होतें, व सध्यां हि महाराष्ट्रांत माप च आहे. महाराष्ट्रांतील पल्ल्यावरून वैदिक पल्ल्याचें मान कळून येण्यासारखे आहे. (भा. इ. १८३५)

पवई [ प्रपीति (cistern) = पवीइ = पवई व पोई] सातार्‍यांत एका नाक्याला पवईचें नाकें म्हणतात. पूर्वी तेथें पाणपोई होती.

पवनविजय [ प्रमाण = पवँण. प्रमाणविजय = पवँणविजय = पवनविजय ] जुन्या मराठींत पवनविजय नामें ग्रंथ आहे. त्याचें मुळचे नांव पवँणविजय असें आहे. (भा. इ. १८३२)

निच्छिवि, लिच्छिवि ऊर्फ लिच्छवि व्रात्यक्षत्रियांचें नेपाळांत शक ५५७ च्या सुमारास राज्य सुरू झालें.
ह्या लिच्छवि जातीचें नांव गौतमबुद्धाच्या चरित्रांत अति येतें.
(भा. इ. अहवाल १८३२ प्रभू पहा).

नायर [ नाग + केर (संबंधार्थक प्राकृत प्रत्यय) = नागकेर = नाआएर = नाएर = नायर ]
(रा. मा. वि. चंपू पृ. १८९)

परदेशी [ पारदेशिक = परदेशी ]

परभू- ( प्रभू पहा )

परेया - मद्रास वगैरे प्रांतांत अतिशूद्राहूनही एका पतित जातींतील लोकांस परेया म्हणतात. परेता:=परेया=मेलेले = मृत. जुन्या काळीं पिशाच्च म्हणून जे येथील मूळचे लोक होते, त्यांना, जिंकून जमीनदोस्त केल्यावर परेता:, परेया, असें अपनाम आर्यांनीं दिलें. ( सरस्वतीमंदिर)

पिंजारी - पंजिकार: = पिंजारी
पिशाच - पिशिताशनः = पिशाचः = पिशादः

पिशं अत्ति = पिशाचः, पिशाचs i.e. the original people of पेशावर were canibals.

पुंड - पुंड्र = पुंड = पुंड. पुंड्रक हा शब्द जातिवाचक असून ऐतरेय ब्राह्मणांत आला आहे. (भा. इ. १८३२ ) पेंढार, पेंढारी - पिंडार = पेंडार = पेंढार, पेंढारी. पिंडार (गाईम्हशींचे कळप घेऊन जाणारे आहीर वगैरे.)
(भा. इ. १८३२)

प्रभू - ( प्रभू, परभू, अधिकारी ) - देशावर जसे देशमुख, देसाई वगैरे पांचपन्नास, किंबहुना दोनचारशें खेड्यांवरील आधिकारी सातआठशें वर्षांपूर्वी असत व सध्यां आहेत, त्याप्रमाणेंच दक्षिण कोंकणांत प्रभू ह्या नांवाचे अधिकारी असत, व आहेत. हे अधिकारी, ब्राह्मण, शेणवी, कायथ व मराठे ह्यांपैकी वाटेल त्या जातीचे असत. जसे इंग्लंडांत लॉर्ड लोक त्या त्या परगण्याचे अधिकारी असत, तसेच हे प्रभू लोक कोंकणांतील पांचपन्नास गांवांचे अधिकारी असत. ब्राह्मण, शेणवी व मराठे ह्या तीन जातींचे जे प्रभू होते ते यद्यपि प्रभूपणा करीत तत्रपि त्यांनीं प्रभूपणाची एक निराळी जात केली नाहीं. कारणा, पेशा जरी प्रभूपणाचा असला तत्रापि आपल्या जातींत त्यांचा समावेश होत असे. कारण ब्राह्मण, शेणवी व मराठे ह्याच देशांतले राहणारे होते व आपण जींत आहों तीहून उच्च जातींत जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा साहजिकच नव्हती. परंतु कायथांची तशी स्थिति नव्हती. ते ब्राह्मण, शेणवी किंवा मराठे ह्यांपैकीं कोणत्याही एका जातींतील नसून कायथ म्हणून अक्षरचणकांची जी एक जात आर्यसमाजांत प्रसिद्ध आहे तींतील होते. ह्या कायथ लोकांचा धंदा लिहिण्याचा, चित्रे काढण्याचा वगैरे असे. ह्या कायथांतील कित्येक लोक कोकणांत व मावळांत प्रभू झाले; तें प्रभूपण त्यांनीं दहापांच पिढ्या केलें; व प्रभू या आडनांवानें च ते आपल्याला मोजूं लागले. लोकांनीं ' तुम्ही कोण ' म्हणून विचारिलें म्हणजे ह्यांनीं 'प्रभू' म्हणून सांगावें, ' कायथ ' म्हणून सांगू नये. ह्यांच्यापैकीं कित्येक अशिक्षित लोक प्रभू शब्दाचा उच्चार परभू करीत. इतर ब्राह्मणादि जातींतील कुटाळ लोकांना एवढेच पुरें होऊन प्रभू शब्दाचा परभू असा अपभ्रष्ट उच्चार ते मुद्दाम करीत. अशा रीतीनें परभू हा शब्द निष्पन्न झाला आहे. खरा शब्द प्रभू असाच आहे. ब्राह्मण, शेणवी, मराठे, प्रभू यांपासून भेद दाखविण्याकरितां हे आपल्याला कायथ प्रभू म्हणत. पाताणे प्रभू यांपासून भेद दाखविण्याकरितां चांद्रसेनीय हें विशेषण हे लेक जोडतात. कायथ हा शब्दही धंद्याचाच वाचक आहे. ह्या चांद्रसेनीय कायथ प्रभूंची मूळ जात कोण हें जातिनिर्णायक ग्रंथांवरून ऐतिहासिक परीक्षेनें कळण्यासारखे आहे. चित्रे = चित्रें काढणारे, गुप्ते = खजिन्यावरचे कारकून. चिटणीस, कारखानीस, वगैरे जीं आडनांवें ह्या लोकांत प्रचलित आहेत त्या सर्वाचा लेखणीशीं कांहींना कांहीतरी संबंध आहे. ही जात महाराष्ट्रांत बरीच पुरातन आहे. ( सरस्वती मंदिर श्रावण शके १८२६)

परसा-कडे [ परिश्रम fence, enclosure = परस, परूस ] परसाकडे म्हणजे कुंपणा कडे.

परसाकडे, परसाकडेस, परसाकुडे [ पुरीषाकुष्टि to void excrement, to expel faeces = परसाकुडे, परसाकडे ( एकारान्त नाम स्त्रीलिंगी ), परसाकडेस ] taking off excrement. पुरीषाचुकुषिषा = desire to expel faeces. परसाकडे किंवा कडेस लागली. आ+कुष् to expel. परसाकुडे व परसाकडे असे दोन्ही उच्चार ऐकुं येतात.

परसांकडे [ परसंकटं = परसांकडे ] वाघ पाहून परसांकडेस झालें म्हणजे परम संकट झालें. शौचाचा संबंध नाहीं.

परसूं १ [ परिसरकं = परसूं ]
उद्यानपरिसरकं = बागेचें परसूं
गृहपरिसरकं = घराचें परसूं
परसाकडे म्ह० परिसराच्या शेवटीं.

-२ [ ( पुं.) परिसर = परिस = परसू (नपुं. ) ]
मला परसा कडेस जावयाचें आहे म्हणजे घराच्या परिसरा कडे शौचार्थ जावयाचें आहे. परसाकडे हा शब्द मराठींत एकारान्त स्त्रीलिंगी नाम आहे. (भा. इ. १८३५)

पराणा [ प्राजनः = पराणा ] प्राजन म्हणजे चावूक.

पराणी १ [ प्राजनी (टोचणी ) = पराणी ] a goad

-२ [ प्रवयणी = पराणी (शस्त्रविशेष )]

परातणें १ [ ऋञ्जि १ भर्जने. प्रार्ञ्जनं = परांजणें = परातणें ] परातणें म्हणजे तव्यावर भाजून काढणें. ( धा. सा. श.)  

-२ [ परावृत्तं ] (परतणें ६ पहा)

परि [ परं अपि = परं भि = परं हि = परं इ = परिं = परि.] (ज्ञा. अ. ९ पृ. २ )

परिपाठ [ परिपाटि = परिपाट, परिपाठ ] पठ् ह्या धातूशीं कांहीं एक संबध नाहीं. (भा. इ. १८३६)

परिमंद [ परिमंदः ] फार मंद

परिवर १ [ परिग्रह house, abode = परिअर = परिवर ] house, abode.

-२ [ परिवृति (परिसर, कुंपणांतील सर्व जागा, लपण्याचें गुह्य स्थान ) = परिवर. परि + वृ to conceal ] कुंपणाच्या आंतील जागा, कुंपण.
उ०- दीप ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी lamp placed in a covered place does not direct nor caution anybody. माडगांवकर-ज्ञानदेवी-९-१२८

धेड, धेडा - दैतेयः (the sons of दिति = दैत्य ) = धेड, धेडा.
धेड म्हणजे वेदकालीन दैतेय, दैत्य.
धेडा ही जात दैत्यांची डहाणू उंबरगांवाकडे आहे.
धेड हे महाराष्ट्रांत सर्वत्र आहेत.

धोयी - धौतिक = धौबिअ = धोबीअ = धोबी. (भा. इ. १८३५)

नट, निच्छिवि - जैनधर्माचा संस्थापक महावीर हा नट जातीचा होता, हें प्रसिद्ध आहे. ह्या नट जातीचा उल्लेख मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाच्या २२ व्या श्लोकांत केला आहे. व्रात्यक्षत्रियापासून सवर्ण म्हणजे क्षत्रियस्त्रीच्या टाई जी प्रजा होते तिला नट ही एक संज्ञा असलेली मनुसंहितेंत वर्णिली आहे. तेव्हां ह्या व्रात्यक्षत्रिय जातींत महावीर जन्मला हें सांगावयाला नकोच.

ही नटजाति वैशाली नगराजवळ रहात असे. ह्या वैशाली नगरींत लिच्छवि नामक क्षत्रियांचें त्या कालीं वास्तव्य असे. लिच्छवि म्हणजे मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाच्या २२ व्या श्लोकांत उल्लेखिलेली निच्छिवि नामक व्रात्यक्षत्रियांची जात होय. निच्छिवि ह्या शब्दांतील निच्या ठिकाणीं लि आदेश होऊन लिच्छिवि हा प्राकृत शब्द निष्पन्न झाला. प्राकृतांत असा न चा ल होतो. उदाहरणार्थ निंब (संस्कृत) = लिंब (प्राकृत ). ह्या प्राकृत लिच्छिवि शब्दाचा लिच्छवि हा अपभ्रंश किंवा पर्याय आहे.

ह्या लिच्छिवि जातींतील कुमारदेवीशीं शक २२० च्या सुमारास गुप्तवंशाचा आदिपुरुष जो पहिला चंद्रगुप्त त्यानें लग्न लाविलें. (V. A. Smith's Early History of India, chapter XI ).

ह्या निच्छिवि शब्दाचा भारतांतील शिबि, शिवि ह्या देशवाचक व तद्देशराजवाचक शब्दाशीं संबंध असलेला दिसतो. शिविदेशाच्या जवळील जो प्रदेश तो निच्छिवि. शिविदेशांतील शिविनामक शुद्धक्षत्रियापासून जे व्रात्यक्षत्रिय झाले त्यांचा जो देश तो निच्छिवि देश.

परमा [ ह्या रोगाचा उल्लेख कौशिक सूत्रांत २७॥३२ त केला आहे. मुंचामि त्वेति ग्राम्ये पूतिशफरीभिरोदनम् । दारिल:, ग्राम्यो व्याधिः मिथुनसंयोगात् पितादूरिति प्रसिद्धाभिधानः । ] (भा. इ. १८३२ ) (गर्मी पहा)

परमित [ परिमित ] Moderate, measured.

परमेसर [ परमेश्वर = परमेसर ( अशिष्ट भाषा ); पण ईश्वर = इस्वर, विस्वर ]

परवड १ [ प्रपत्ति = परबडी = परवडी = परवड ] (भा. इ. १८३२)

-२ [ प्रवृत्तिः = परवडि=परवड ] सुखार्थाः सर्वाः प्रवृत्तयः = सुखाच्या सगळ्या परवडी. ( भा. इ. १८३४)

परवडणें [ वर्ध् १ वृद्धौ. प्रवर्धनं = परवडणें ] परवडणें म्ह० सुखास सोईस पडणें. ( धा. सा. श. )

परवा १ [ परवासर ] (आज पहा)

-२ ( परेद्यवि = परवा, परवां ] the other day, the day before yesterday, any day before today, the day after tomorrow.

-३ [ परश्वः = परवा ] the day ofter tomorrow. परवां ह्या शब्दाचे दोन अर्थ संस्कृतांतल्याप्रमाणेंच होतात.

-४  परवत्ता ( submissiveness toothers) = परवआ, परवा ]

-५ [ परुत् ( मागलें वर्ष ) = परवा ] परवां [ परेद्यवि ]

परवाचा १ [ परिव्राजः (सिद्धि, तयारी) = परवाचा ]
परवाचा म्हणणें म्हणजे धड्याची सिद्धि दाखविणें.

-२ [ प्रतिवाच् crying out to in answer to the master = परवाचा ] पंतोजीच्या उपदेशाप्रमाणें उलट उत्तर म्हणून तेच शब्द म्हणणें.

-३ [ बादशाही फर्मानाचा जो संक्षेप त्याला तालीक म्हणतात; व तालिकेंत किंचित् फरक करून जें राजपत्र तयार करतात त्याला परवांचा म्हणतात. म्हणजे परवांचा या शब्दाचा अर्थ संक्षिस उजळणी असा आहे. त्यावरून, रोजच्या धड्यांची जी संध्याकाळीं तोंडीं संक्षिप्त उजळणी पंतोजी मुलांकडून करून घेतो तिला परवाचा म्हणतात. हा शब्द संस्कृतोद्भव नाहीं. ] (ग्रंथमाला)

परवाना [ परिवाहन ( परवाण { बौद्ध } ) = परवाना ]

परव्हाण [ प्रवाहन ( carriage ) = परव्हाण] carriage.

परसदार [ पार्श्वद्वारं = परसदार ]