Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फूल [पुष्पक = फुल्ल = फूल ] पुष्पक म्हणजे एक प्रकारचा नेत्ररोग.
फूस १ [ प्र + उत् + सह् = प्रोत्साहिका = फूस ] प्रोत्साहन. (धातुकोश-फूसदे पहा)
-२ [ प्रोत्सह् = फोस्स = फूस ] फूस म्ह० प्रोत्साहन.
फें [ अपेहि ! begone ! = (अलोप) फें ! ] फें फें करावयाला लावीन = अपेहि अपेहि इति वाचयिष्यामि.
फें, फेंफें [ प्रेहि ( प्र + इ to die ) = फें ] प्रेहिवाणिजा a rite in which no वैश्य is allowed.
तुला हि फें आणि तुझ्या बापाला हि फें. प्रेहि म्हणजे मर ही भाषा तुला हि लावतों व तुझ्या बापाला हि लावतों.
फेंगडा १ [ प्रज्ञुः ११. प्रज्ञु + ट: ( स्वार्थक) = पंगुडा = फेंगडा. प्रगते जानुनी यस्य प्रज्ञुः ] ( धा. सा. श. )
-२ [ प्रज्ञु, प्रज्ञ + ट = प्रज्ञट. प्रज्ञट = पञड = पेंगड = फेंगडा (डा-डी-डें)] प्रज्ञ, प्रज्ञु म्हणजे ज्याच्या गुडघ्यांत फार अंतर आहे तो.
ट हा कुत्सितार्थक प्रल्यय. (भा. इ. १८३७)
फेटा [ प्रभ्रष्ट ] (फेंटा पहा)
फेंटा [ प्रभ्रष्ट a garland worn or suspended on the knot of hair on head = फेटा, फेंटा ] a cloth worn or suspended on the head.
फेणी १ [ प्रहेणिका ( एक खाद्य ) = फेणी ]
-२ [ फेनक, फेनिका (white boiled rice flour) = फेणी ]
फेपरें १ [ प्रवेपः = फेपरें (कंप ) ]
-२ [ प्रवेप्र, प्रवेपिर ] ( फेंपरें पहा)
फेंपरें [ प्रवेप्र, प्रवेपिर trembling = फेपरें, फेफरें, फेंपरें, फेंफरें ] a disease in which there is great trembling of the body.
फेफरें, फेंफरें [ प्रवेप्र, प्रवेपिर ] (फेंपरें पहा)
फेंफरें [ प्र + वेप् १ कंपने - प्रवेपिरम् ] ( धातुकोश - फेंपर पहा)
फे फे [ प्रेहि प्रेहि = फे फे ] तस्य प्रेहि प्रेहि, अपेहि अपेहि जाता = त्याची फे फे झाली-उडाली.
फेफे [ फि म्हणजे क्रोधादि विकार. (द्विरुक्ति फिफि = फेफे ] फेफे होणें म्हणजे विकारानें भ्रममाण होणें.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फुकरणें [ फुकरणें पहा ]
फुंकरणें [ फुंक = फुंकरणें. फूत्कृ = फुकरणें, फुकरणें १ संस्कृतांत फूत्कृ, फुल्कृ व फुकृ अशीं तिन्हीं रूपें असावीं. (भा. इ. १८३६)
फुगारा [ फूत्कार: = फुगारा ]
फुट [ स्फुट = फुट (स्पष्टार्थक) स्फुटकळ = फुटकळ ] (भा. इ. १८३५)
फुटकळ १ [ स्फुटकळ ] ( फुट पहा )
-२ [ स्फुटकल्पः = फुटकळ ]
फुटाणा [ स्फुट + धान्यक = फुट + दाणा = फुट + आणा = फुटाणा ] (भा. इ. १८३२)
फुटाणी [ पुथ् भाषार्थः पुथाना = फुटाणी ]
talketive woman. बायको फुटाणी.
फुणगी [ स्फुलिंग = फुणिंग = फुणग (गी) ] स्फुलिंग = म्हणजे फुणगी. (भा. इ. १८३३)
फुंदणें [ स्पंद् = स्पंदन = फुंदणें ] धातूचें स्पुंद असें हि रूप असावें. (भा. इ. १८३३)
फुलणें १ [ फुल् संचलने ] ( फुलें पहा)
-२ [ स्फुल् = फुल. स्फुलन = फुलण (णें ) ] फुलणें (विस्तव, कोळसा). (भा. इ. १८३३)
फुलारी [ फुल्लहारी = फुलारी ]
फुलें [ फुल् संचलने = फुलें, फुलणें, उत्फुल्ल, उफळणें ] उफुलून बाहर आलें तें फुल. ( ग्रंथमाला)
फुलोरा [ फुल्लभरः = फुलेरा ]
फुलौरा [ फुल्लपूरः ] (ज्ञा. अ. ९ पृ. २४)
फुसकन् १ [ पुस् पोसयति ] ( पुसकन् पहा )
-२ [ स्फुर्छ् १ विस्तृतौ ] (धातुकोश-फुसक २ पहा)
फुसकुली [ पुस् पोसयति ] ( पुसकन् पहा)
फुसफुशित [ पुष् फुगणें द्विरुक्त = फुसफुशित ] Merely blown up.
फुसफुसणें [ पुस्फूर्जिष् = फुसफुस + णें = फुसफुसणें ] फुसफुसणें म्हणजे एक प्रकारचा भयप्रद आवाज करणें. ( भा. इ. १८३५)
फूकटा [ फूत्कृतेन ] फूत् असा तोंडानें वारा सेडला असतां, म्हणजे बिनखार्ची. ( ज्ञा. अ. ९, पृ. १६९ )
फूट १ [ पृथक् = पुढो = फूट ] Seperate. फूट वस्तू= पृथक् वस्तु.
-२ [ स्फुट् = फूट ]
-३ [ स्फुट् ६ विकसने १० भेदने ]
स्फुट = फूट. स्फोटनी = फोडणी. स्फुटिका = फोडी = फोड. ( धा. सा. श. )
स्थलनामव्युत्पत्तिकोश
असली - अप्सरस् - अप्सरःपल्ली. ३ खा म
असलोद - अप्सरस् - अप्सरःपद्रं. खा म
असवाडें - अश्मक, असिक (लोकनाम) अश्मकवाटं. खा म
असाणे - अश्मक, असिक ( लोकनाम ) - अश्मकवनं. खा म
असूस - अश्मककर्ष. खा म
असोदें - अश्मक (लोकनाम ) - अश्मकपद्रं. खा म
असोळी - अश्मक (लोकनाम) - अश्मकपल्ली. २ खा म
अस्ताण - असिक ( लोकनाम ) - असिकस्थानं. खा म
अहमदनगर - (अमदानगर पहा).
अहीरवडें - अभीरवाटं ( अभीरांचें गांव ). मा
अहीरवाडी - अभीर - अभीरवाटिका. खा म
अहूळ - अहि (सर्प) - अहिपल्लं. खा इ
अहेरें - अभीर - अभीरकं २ खा म
आ
आइतवडे - सं. प्रा - आइतवाडा ( आदित्यवाटिकः ) ( शि. ता. )
आकलकोश - आकल्ल. खा व
आंकलास - सं. प्रा. - अक्रूरेश्र्वर. (शि. ता.)
आंकलें - सं. प्र. - अकूरेश्र्वर (शि. ता.)
आंकलेसर - सं. प्रा. - अक्रूरेश्वर. (शि. ता.)
आटपाटनगर – अट् गमने व पट्गमने. आटपाटनगर= आलें गेलें नगर, कोणतें तरी निनांवी रहदारीचें गांव म्हणजे आटपट नगर (ग्रंथमाला)
आढलें (खुर्द) - आढकपल्लं (आढक = तुर). मा
आढें - आढकं ( तुरीच्या उत्पन्नावरून). मा
आतवण - अंतर्वनं ( वनाचा गाभारा). मा
आंधेरी - अंधकागिरि = आँधअइरि = आंधेरी. कृष्ण द्दा अंधक कुलांतील होता. (भा. इ. १८३३)
आनकवाडी - आणक ( क्षुद्र). खा नि
आनकवाडे - आणक (क्षुद्र). खा नि
आनंदपुर - आनंद. खा नि
आपटी - आपटी (झाडावरून). मा
आंबळे - आम्रपल्लं (झाडावरून). मा
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फारकत [ परिकृति ] ( धातुकोश-फारकत पहा)
फारकरून [ प्रायःकृत्वा, प्रायःकृत्य = फारकरून ] फारकरून म्हणजे बहुशः
फार चड [ प्रचंड = फारचड ] तस्य करणं प्रचंडं = त्याचें करणें फार चड आहे. चड, चडेल हे शब्द चंडपासून निघाले आहेत. (भा. इ. १८३६)
फार पुराणा [ प्रपुराणः = फार पुराणा. प्र = फार ] (भा. इ. १८३४)
फास [ प्रासः = फार ] that which is thrown पाशः = फसा dice
फासका [ प्राकषिक (गांडू, निरुपयोगी माणूस) फासका ] a worthless man, गांडू.
फासणें [ स्पर्शनं = फंस्सणं = फांसणें-णी-णा ] (भा. इ. १८३२)
फासळी [ पर्सु = फर्सु = फास = फासळी ] (स. मं.)
फासा [ पाशः = फासा ] ( फास पहा )
फांसा [ प्रासकः = फांसा ] dice.
फाळ [ स्फाल: = फाळ (नांगराचा ) ]
फाळका [ स्फालकक: = फाळका (केळीच्या पानाचा ) ]
फाळणी [ स्फालनिका = फाळणी. स्फालकाम्य = फडकाव] ( घा. सा. शा. )
फितना १ [ पीतनक = फितना] एक वासाचें द्रव्य आहे.
-२ [ पीतनः yellow orpiment = फितना ] a yellow scent.
फिरकणें [ भ्रेषणं ] ( भिरकणें १ पहा )
फिरकें [ स्फिरत्कं = फिरकें ]
फिरणे, फिरून [ प्रति + ईक्ष् = प्रतीक्ष् to wait for = फिरणें, फिरून ] थोडा फिरून ये = स्तोकं प्रतीक्ष्य याहि.
फिस्स [ पिस् १० भाषार्थे = फिस्स ] ( धा. सा. श.)
फिळफिळीत [ प्ली गतौ (द्विरुक्त) = फिळफिळीत ] watery buttermilk running like water.
फीत [ स्फीति = फीति = फीत ] फुगवून सैल विणलेलें कापड ( भा. इ. १८३३)
फुकुट १ [ फू (त्कृ) तं=फुक्कट = फुकट ] केवळ फूत् असा तोंडानें वारा सोडून होणारें तें फुकट. (भा. इ. १८३६)
-२ [ अपोहकटा = फुकट, फुकट्या ] going away with a mat.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फळफळणें [ फल् = फळफळणें ] सबंद द्विरुक्तीनें हि मराठींत पौनःपुन्यवाचक क्रियापदें साधतात. (भा. इ. १८३६)
फळा [ फलक: = फळा ] (फळी पहा)
फळा १ [ फली (small piece of wood) = फळी ] फलकः फळा
-२ [ परिघ = फलिह (जैनमहाराष्ट्री) = फळी ]
फाउर [ स्फाय् स्फायुर swollen, enlarged = फाउर ] फुगट. उ०-नीलिमा अंबरीं । कां मृग तृष्णालहरी।
तैसा वायां चि फाउरी । वावो जालें ॥ ज्ञा. १३-१०५
फाक [ प्रशाखा = फाक ] branch, slip.
फाज [ फंजी = फाज ( भाजी ) ]
फाजील १ [ प्राज्यं (much, overmuch वैजयंती ) + ल = फाजील (redundant ) ]
-२ [ प्राज्य abundant, plentiful + ( स्वार्थक ल) = फाजील ] abundant, over abundant. फाजील सामान redundant furniture.
-३ [ प्रहसिर jesting, jestful = फाजील ] फाजील पोरगा a jesting boy, mannerless lout.
फाटणें १ [ स्फुर् प्रकाशणें) स्फारयति (णिच्)=फाटणें ] फाटलें म्हणजे प्रकाशलें, उजाडलें. ( भा. इ. १८३६)
-२ [ स्पर्ध = फड्ड = फट्ट = फाट ] तेन सह वा तस्मै स्पर्धते = त्याशीं फाटतो, फाटून आहे. (भा. इ. १८३४ )
फांटा [ फाण्ट (absence of exertion वैजयंती कोश) = फांटा ] फांटा देणें म्हणजे कोणत्या हि कृत्याचा अभाव करणें.
फाड-फाडी [ स्फटिक = फाड-डी ] दगडाच्या चिर्यांना फाड म्हणतात. (भा. इ. १८३६)
फाड-फाडी [ स्फटी = फाडी ] सोनार लोक फाडी लावून धातु शुद्ध करतात. (भा. इ. १८३६)
फाडा [ स्फटा ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३३)
फाडून खा [ स्फंट्, स्फंड् ]
फाया [ स्फाय् १ वृद्धौ, पसरणें, वाढणें. स्फायः = फाया ] फाया म्हणजे पसरण्याकरितां कापसादिकांवर घातलेलें सुवासिक तैलादि द्रव्य.
फार १ [ प्राय (exceeding ) = फार, पार ]
प्रायगत = पार गेलेला, फार गेलेला.
प्रायमृत = पार नेलेला, फार नेलेला.
-२ [ स्फार = फार ( बहुत ) ] ( ग्रंथमाला )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फर्माविणें [ फरमाना नामधातू (फारसी) = फर्मावणें, फर्माविणें ] to proclaim.
फलकट [ फलिकरण ] (फलकण पहा)
फलकण [ फलिकरण (ऐतरेय ब्राह्मण) = फलिकण्ण = फलकण = फलकट ] (भा. इ. १८३४)
फवा १ [ प्रवाहः = पवहो = फवा ] current, sudden, sprey of water.
-२ [ प्रवाह = पहव (महाराष्ट्री) = फवा ]
-३ [प्रवाहः ] (धातुकोश-फव १ पहा)
फवारणें [ प्रवहः or प्रवाहः ( नामधातू ) = फवारणें ]
फवारा १ [ प्रवहः or प्रवाह: (नामधातू) = फवारा ] current of water. वाफेचा फवारा = बाष्पप्रवहः
-२ [ प्रवाहः ] ( धातुकोश-फव १ पहा)
फशीं पडणें [ पत् १ पतने. पाशपतनं = फशीं पडणें ] ( धा. सा. श. )
फस [ पांशु ( चिखल) = फस ] खड्यांतील फस म्हणजे चिखल.
फंस [ भ्रंश १ अवस्रंसने. भ्रंश्, भ्रंस् = फंसणें, फसणें. भ = फ] ( धा. सा. श. )
फसगत [ प्रहासगतिः = फसगत ] Condition of being mocked.
फसफस १ [ पस्पशा ( प्रस्तावना ) = फसफस ] एकदांची फसफस संपली म्हणजे प्रास्ताविक धडपड संपली. ( धातुकोश फसफस १ पहा)
-२ [ ( प्र + हस् ) प्रहसिः द्वित्व = फसफस ] हसणें, खिदळणें. फसफस फारशी माजली आहे, असें मुलींना उद्देशून बोलतात.
फसफसणें [ प्रस् १ विस्तारे. प्रसप्रसनं = फसफसणें ] विस्तार पावणें. कणीक फसफसली म्हणजे भिजून विस्तार पावली. ( धातुकोश-फसफस २ पहा)
फसवणें [ पक्षवादन = पच्छवाअण = फसवाण = फसवणे ( ण ) ] ( भा. इ. १८३२ )
फस्त ९ [ अपहस्त = ( अलोप ) फस्त ]
अपहस्त म्हणजे लुटलेलें. ( भा. इ. १८३७ )
-२ [ प्रहस्त ( पतित ) = पहस्त = फस्त ]
फळ [ फल (edge of a weapon वैजयंती) = फळ ] तरवारीचें फळ.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फरड १ [ पर्यटी ] ( धोतुकोश-फरड १ पहा)
-२ [ अट् १ गतौ. पर्यटि: = परड = फरड ] सर्पस्य पर्यटिः = सापाची फरड. फरड म्हणजे फिरण्यानें पडलेला मार्ग. ( धा. सा. श. )
फरडणें [अट् १ गतौ. पर्यटनं = फरडणें. पर्याटि = फराडी = फरड ] उ०-सापाची फरड. ( धा. सा. श. ) फरडा १ [ प्रष्ठ ( leader ) = फरडा ]
-२ [ स्पर्धः = फरडा ] फरडा लेखक म्हणजे ईर्षावान् लेखक (भा. इ. १८३५)
-३ [ स्पर्ध् १ संघषें ] (धातुकोश-फरड २ पहा)
फरपट [ परि + पट् ]
फरपड, फरपड, फरफट [ पट् १० ग्रंथे. परिपाटी = फरपट, फरपड ] उ०-सापाची फरपट (धा. सा. श.)
फरफटत [ फर् to Scatter ] ( फरफर १ पहा )
फरफर १ [ फर् ( द्विरुक्त ) to scatter ( Vedik ) = फरफर, फरफटत ]
-२ [ फर to scatter ( Vaidik ) द्विरुक्त = फरफर ] फरफर ओढणें to drag scatteringly.
फरफरणें [ स्फर् कांपणें, कंपायमान होणें. द्विरुक्त स्फरस्फरणं = फरफरणें ] (भा. इ. १८३३)
फरसफोडी [ परशु स्फोटितानि दारूणि = फरसफेडा पाणिनि २-१-३२ ] (कुर्हाडफोडी पहा)
फरा १ [फलक = फलक्ष = फला = फरा (कंबरेचा)] (स. मं. )
-२ [ प्रहर:, प्रहरक: = फरा ] मारण्याचें हत्यार. फरागदगी, दांडपटका हीं हत्यारें प्रसिद्ध आहेत.
-३ [ भर = फरा ] १ भर: = भारा, ओझें, गठडी. २००० पल = २० तुला = १ भर. भर: म्हणजे एक माप आहे. (ज्ञा. अ. ९ पृ. १७२)
फरारी १ [ परिहारिन् one escaping = फरारी one escaping.
-२ [ परापहारी = पराअआरी = परारी = फरारी ] तो द्रव्य घेऊन फरारी झाला म्हणजे परापहारी झाला.
द्वितीयार्थ: - पळाला. (भा. इ. १८३४)
फरी [ प्रहरिका = फरी (गदगा) ] खेळण्याचें एक हत्यार.
फर्जी [ प्रजि: ( subduer ) = फर्जी ]
The conquering प्रधान.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
अरकुंडें - आर, आल (वृक्षविशेष) आरकुंडं. खा व
अरणी - अरण्यानी, खा म अरवी - अर्वती (अप्सरा) अर्वती. २. खा म
अरवें - अर्वती ( अप्सरा ) अवर्त. खा म
अरळीतारें - अरालिका (राळ) ( वनस्पति). खा व
अरळें - अरालिका (राळ) अरालिकं. खा म
अराई - अर्वती ( अप्सरा) अर्वत्यावती. खा म
अरावें - आर, आल (वृक्षविशेष) आरवहं. खा व
अरुणावती - अरुणावती. खा न
अडीं - अद्रि (पर्वत ) अद्रिका. खा नि
अर्थे - अर्थ्यं (गेरू ) अर्ध्यं. खा नि
अलखेडें - आर, आल (वृक्षविशेष) आरखेटं. खा व
अलवाडी - आर, आल (वृक्षविशेष) आरवाटिका. खा व
अलवाण - आर, आल (वृक्षविशेष) आरवाहनं. खा व
अलाणें - आर, आल ( वृक्षविशेष ) आरवनं, खा व
अलियावाद - खा मु
अवगें - अवि - आविकं. खा इ
अवदाने - अविधानं. खा इ
अवधान - अविधानं. खा इ
अवार - अवि + अगार. खा इ
अव्हाटी - अविवाटिका. खा इ
अव्हाणी - अविवनी. खा इ
अव्हाणे - अविवनं खा इ
अशेरी - असिकगिरि = अशिअइरि = अशेरी. असिक, *सक नांवाचे लोक व प्रांत पद्मपुराणांत वर्णिलेला आहे.
अश्र्वत्थामा - अश्र्वत्थामा खा म
अष्टगांव - सं. प्रा. आसट्टिग्राम. नाशीक. (शि. ता.)
अष्टाणें - अश्मक, असिक (लोकनाम) असिकस्थान, खा म
अष्टें - सं. प्रा. आसट्टिग्राम. कुलाबा, बडोदें, भडोच. ( शि. ता. )
अष्टें - अश्मक, असिक (लोकनाम ) - असिकस्थं. २ खा म
असखेडें - अश्मक, असिक (लेकनाम ) - असिकखेटं. खा म
असनखेडें - असन: २ खा व
असरावें - अप्सरस् - अप्सरोवहं. खा म
असलगांव - अप्सरस् - अप्सरोग्रामं. खा म
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फटफजिती १ [ स्फंट् (थट्टा करणें ) = फट. स्फंटयति ] कोणाचें फट म्हणून घेणार नाहीं म्हणजे थट्टा करून घेणार नाहीं.
-२ [स्फंट्, स्फंड् to jest, to laugh at = फट. फजीइत persian = फजिती ] फट म्हणजे फजिती.
फटफटित [ स्फटस्फटित = फटफटित ] (भा. इ. १८३४)
फटफटीत [ स्फटत्स्फटितं ] (धातुकोश-फटफट २ पहा)
फटाकडी १ [फट: ] ( फट पहा )
-२ [ स्पष्टाकृति = फटाकडी ]
फटुकफळी [ प्रत्युत्फलिका = पच्चुफ्फळी = फटुफ्फळी = फटुकफळी ]
फड [ स्फटः = फड (निवडुंगाचा) ] सापाच्या स्फटेसारखा दिसणारा निवडुंगाचा भाग तो. ( भा. इ. १८३६)
फडकाव १ [ स्फट. स्फटकाम्य = फडकाव ] ( धा. सा. श. )
-२ [ स्फालकाम्य ] (फाळणी पहा)
फडफडित [ स्फटस्फटित = फडफडित (भात वगैरे) ]
फण [ फणः = फण ] शेतकर्याचें एक हत्यार. हें सापाच्या फणेसारखें असतें.
फणफणणें [ फण् गतौ ] (ग्रंथमाला)
फतकल [फल्क ] ( फतुकलें पहा)
फताडा [ स्फीताढ्यः = फिताडा = फताडा] फताडा निवडुंग म्हणजे अतिशय ढालगज पानाचा निवडुंग.
फतुकलें [फल्क (विस्तीर्ण शरीर) =फतकल (लठ्ठ बाईचे विस्तृत कुल्ले ), फतुकलें ] (भा. इ. १८३४)
फंद १ [ स्फंड् थट्टा करणें. स्फंड = फंद ] स्फंड - फंद म्हणजे थट्टा, थट्टा होण्याजोगें कर्म. (भा. इ. १८३३)
-२ [ स्पंद (घालमेल) = फंद ] (भा. इ. १८३५)
-३ [ स्पंद = फंद (सेतुबंध, ८-२५ ) ] (भा. इ. १८३२)
फंदी [ स्फंडिन्= फंदी ] फंदी म्हणजे विनोदी, थट्टेखोर. (भा. इ. १८३३)
फन्ना [ पड्-पंडयति नाशने = पंड: = फण्णा = फन्ना ] destruction. फन्ना उडविणें to destroy, consume.
फरक, फरकन् [ फलति बिशीर्यते इति फलकः
फलक = फरक (भेद ). फलंकृत्य = फरकन् ] (भा. इ. १८३४)
फरकाट्या [ प्ररोहकाष्टिका = फरकाट्या ] झाडाच्या फरकाट्या.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
फ
फक्कड १ [ फक्क् १ असद् व्यवहारे ] फक्कड = नीच कृत्य करणारा = चैनी = दुराचारी. (ग्रंथमाला)
-२ [ फक्क १ असद् व्यवहारे. फक्कट: = फक्कड ] फक्कड म्हणजे असभ्य, छिचोर. ( धा. सा. श. )
-३ [ प्रकृष्ट = फक्कड ] प्रकृष्टं प्राकृतं = फक्कड प्राकृत.
फजित [ अपजित = फजित ] Defeated.
फजिति [ प्र + च्युति ] (धातुकोश-फजित १ पहा)
फज्जा १ [ प्रजय: ( overpowering ) = फज्जा ]
-२ [ प्रहासः jest = फज्जा ]
-३ [ अपजय: = फज्जा ] Defeat.
-४ [ अपजित = फज्जा ] (फजित पहा)
फज्ज्या [ प्र + च्यु (प्रच्याव: ) ] ( धातुकोश-फजित १ पहा)
फोज्या [ अपजयः ] (पच्या पहा)
फट [ फटः cheat = फट. फटाकडी a female cheat ]
फटकन् [ फट् + कृ ] ( धातुकोश-फटक २ पहा)
फटकन्, फटदिनि [ चटकर पहा ]
फटकळ [ स्पष्ट + कल = ( बोलणारा) = फटकळ ] अति स्पष्ट बोलणारा.
फटकारा, फट्कारा, फटकारणें [ फट्कार: = फटकारा ] अस्त्राय फट्
फटकून [ फट् कृ ] (धातुकोश-फटकार २ पहा)
फटकूर [ पाटकचीरं= फटकूर = फटकूर ] फटकूर म्हणजे फाटलेलें वस्त्र.