Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

बनात [ ऊर्णावत् (लोंकरीचें) = वुण्णाअत = बुणात = बनात ] लोंकरीचें वस्त्र. (भा. इ. १८३३)

बनाव [ वन् क्रियासामान्ये. वनापयति = बनावणें. वनापः = बनाव ] ( धा. सा. श. )

बप्पीह [ वापीह (वापीला टाळणारा, चातक) = बप्पीह (चातक) = बापू ] चातक विहिरीचें पाणी पीत नाहीं. (भा. इ. १८३६ )

बंब १ [ द्वंद्वं = बंब ] काय बंब वाजतो तो वाजूं द्या म्हणजे युद्ध, पराक्रम होतो तो होऊं द्या.

-२ [ द्वंद्वं = बंब, बोंब ] तो काय बंब सांगतो = स किं द्वंद्वं मंत्रयते । द्वंद्व म्हणजे रहस्य, व बंब म्हणजे रहस्य, गूढ,

बंबाळ [ भंभालि ] (भंभाळ पहा)

बंब्या [ ब्रह्मा = बंभो = बंब्या ] हा बंब्या आला !

बभुक [ बुभूष = बभुक ] over-ornamental. रंग बभुक दिसतो.

बभ्रा [ अवव्रवः (बेअव्रू) ill report, evil news = बभ्रा ] Bad report.

बरँ १ [ परमं ( अंगीकारे अव्ययं ) = बरँ ! बरवँ ]

-२ [ ( वैदिक ) भल certainly = बरँ ]

-३ [ वा रे ! = बरँ, बरें ] कसँ बरँ.

बरकत [ बरी + गती = बरगत = बरकत. वर = बर.
कर्मधारय होतांना प्रथम शब्दाचें मूळरूप ] (भा. इ. १८३२)

बरं कां [ बरं कं ] ( बरें कां पहा)

बरगडी १ [ वंक्रि: = बर्गडी, बरगडी ]

-२ [ उरस् ( छाती) + गड ( समुदाय ) = उरोगड = वरगड = बरगड = बरगडी ] छातीच्या व भोंवतालच्या हाडांचा समुदाय. ( स. मं. )

बरड [ बरट = बरड ] धान्यविशेष.

बरणी [ भरणी = बरणी ] लोणचें भरण्याचें भांडें, पातळ पदार्थ भरावयाचे पात्रविशेष.

बरबटणें [ भ्रंश् १ अवस्त्रंसने. बरीभृश्यते = बरबटणें ] गांड गुवानें बरबटली म्ह० अतिभ्रष्ट झाली. ( धा. सा. श.) म. धा. १८

बत्ती १ [ व्यक्ति (स्पष्टपणा) = बत्ती ]

-२ [ वर्त्तिः ( दिवा ) = बत्ती ] दिवाबत्ती.

-३ [ वर्तिका (वात ) = बत्ती ] दिवाबत्ती.

-४ [ वर्तिः (गुंडाळी) = बत्ती ] पागोटेंविशेष.

-५ [ वर्तिका (सोटा) = बत्ती ] सोट्याचा मार. बती देणें = मारणें सोट्यानें.

-६ [ वस्त् १० क्लेशे. वस्तिः = बत्ती देणें ( मारणे ) ] बत्ती (पागोटें) व बत्ती (वर्तिका) हे शब्द निराळे. ( धा. सा. श. )

-७ [ बद्धि (बध्-बाध्) = बत्ती (मार) ] बत्ती देणें म्हणजे मारणें.

बद [ बद् १ स्थैर्ये ] (बंद १ पहा)

बंद १ [ वद् १ स्थैर्ये = बंद. बदि असा धातू असावा ] बद ( रुपया) स्थिर झालेला, आवाज न काढणारा रुपया. द्विरुक्ति = बदबद. ( धा. सा. श.)

-२ [ बंध (दोरी, सुतळी) = बंद ]

बदकर्म [ व्यतिक्रम crime, transgression = बतकाम, बदकर्म ]

बदचाल [ व्यतिचारः = बदचाल ] offence against custom.

बदडणें [ बध् लगडादिना ताडणे, उपरोधे. बद्ध = बदढ = बदडणें ] बदडणें म्हणजे काठी वगैरेंनीं उपरोध करणें. ( भा. इ. १८३६ )

बदबद [ बद् १ स्थैर्य ] (बंद १ पहा)

बदाबद १ [ (vaidik) बाध् Red बदबध्= बदाबद; thump on thump. बदाबद चेंडूचे रट्टे मारणें.

-२ [ ( vedik ) बदबध (intensive बाध ) oppress intensevely = बदाबद ] चेंडू बदाबद मारिला.

बद्द [ बद् स्थैर्ये = बद्द, बद्दु ]

बद्दू १ [ बद्] (बद्द पहा)

-२ [अवद्य = वद्य (अलोप) = बद्दू ] अवद्य म्हणजे निंद्य. ( भा. इ. १८३६)

बन्दर [ व्यन्तर supernatural beings = बन्दर ]

बंधुला [ बंधुलक (दासीपुत्र ) = बंधुला ] (भा. इ. १८३२)

बनणें १ [ वनु क्रियासामान्ये ]
त्याचें घर बनतें = तस्य गृहं वन्यते ।
त्यानें घर बनविलें = स: गृहं प्रावनयत् ।
मला बनत नाहीं = मे न वन्यते (भावे) ( धा. सा. श. )

-२ [ ( वन् ) वननं = बनणें ]
काम बनलें = कर्म वनितं ( वन् सिद्ध होणें )
मला बनतें = मे वन्यतें ( वन् तयारी करणें) इ. इ. ( भा. इ. १८३३)

उंदरी - वृन्दर: पुणें, कोल्हापूर. (पा.ना.)

उदळी - उद्दालक (भोंकर) – उद्दालिका. खा व

उंदीरखेडें - उन्दरू (उंदीर) - उन्दूरखेटं. खा इ

उन्दीर – उदकगिरी = उन्दीर.
उन्दीर हें डोंगराचें नाव आहे. ह्या डोंगरांत पाण्याचे झरे फार आहेत. उदयगिरी या शब्दापासून उन्दीर हा शब्द कित्येक व्युत्पादितात पण ते युक्त दिसत नाही. (भा.इ. १८३७)

उधलोद – उद्दालक (भोंकर). खा व

उधळें - उद्दालक (भोंकर). खा व

उनावदेव – उष्णापस (उनाव). खा व

उन्हाळी - उष्णिका (आटवल). उष्णिकापल्ली. खा व

उपखेडें - यूपखेटं. खा व

उपरपिड – उत्पलपिंडं. खा व

उपळाई – सं. प्रा. - उप्पलिका. सोलापूर, हैदराबाद, ठाणें. (शि.ता.)

उफडीं - उत्पलवाटिका. खा व

उंबर – उदुंबर (उंबर) – औदुंबरं. खा व

उंबरदड – उदुंबर (उंबर) उदुंबरदरी. खा व

उंवरपाडा - उदुंबर (उंबर) – उदुंबरपाटक: खा व

उवरपाडें - उदुंबर (उंबर) – उदुंबरपाटकं. खा व

उंवराणें - उदुंबर ( उंबर ) उदुंबरवनं. खा व

उंबरें - उदुंबर (उंबर) – औदुंबरं. ५ खा व

उंबरें नवलाख – नवलाक्ष औदुंबरं ( नवलाक्ष राक्षसाचें गांव). मा

उंब्रें - औदुंबरं (उंबराच्या झाडावरून). मा

उभंड – ऊर्ध्ववंटं. ३ खा नि

उभद – ऊर्ध्वपद्रं. खा नि

उभराटी - उदुंबर (उंबर) – उदुंबराट्टिका. खा व

उभराटी - उदुंबर (उंबर) – उदुंबराट्टिका. खा व

उंभरें - उरभ्र (मेंढा) - उरभ्रकं. खा इ

उंभडें - उदुंबर (उंबर) – उदुंबरवाटं. खा व

उमज – उमा - उमाजं. खा म

उमरक – औदुंबरिका. खा न

उमरकुवा - उदुंबर (उंबर ) उदुंबरकुंब:. २ खा व

उमरखेडें - उदुंबर (उंबर) उदुंबरखेटं. २ खा व

उमरटी - उदुंबर (उंबर) – उदुंबराट्टिका. ४ खा व

उमरतलाव – उदुंबर (उंबर) उदुंबरतडाक: खा व

उमरदें - उदुंबर (उंबर) – उदुंबरपद्रं. खा व

बडगा [ परिघातः a club, iron bludgeon = बडगा. परिघात = बडिघाअ = बडगा ] club, bludgeon सोडगा.

बडबड्या [ वदावदः = बडाबड = बडबड्या ]

बडवणें १ [ व्यध् ४ हनने. व्यधनं = बडवणें ] ( धा. सा. श. )

-२ [ विधमनं = बिडवणँ = बडवणें. विधमनं = निहननं ] (रामायण-सुंदरकांड-सर्ग ६० श्लोक १०) (भा. इ. १८३४)

बडवा १ [ बटुकः = बडुआ = बडवा, भडवा ] अरे भडव्या = रे बटुक (शिवी असेल तेव्हां). भाड्या शब्द निराळा. भडव्या, मागें सर = बटुक, पार्श्वे अपसर.

-२ [ बटुकक = बडुअअ = बडुआ = बडवा ] (भा. इ. १८३२)

बडा १ [ बृहत् = बडा (मोठा) ]

-२ [वड्रः = बडा (मोठा) ]

बडाई [ वड्रता = बडई = बडाई, बढाई ] मोठेपणा.

बंडाळ [ वंटालु = बंडाळ ] Boistrous chap.

बंडाळी [वंटालिका ] (बंड ५ पहा)

बडिवार [ वृद्धिकारः = बडिवार ]

बढाई १ [ बद् १ भाषार्थ: J (धातुकोश-बढाव १ पहा)

-२ [ वड्रता ] ( बडाई पहा )

बतकाम [ व्यतिक्रम ] ( बदकर्म पहा)

बताडा [ वृहदाढ्यः = बताडा ]

बताणा १ [ वितान: own = बताणा ]

-२ [ अवतानकः = ( अलोप) बताणा ] पागोट्याचा बचाणा.

बतावणी १ [वृतु भाषायां. वर्तयति = बतावतो ] बतावणें म्ह० असत्य भाषण करणें. ( धा. सा. श. )

-२ [ स्तु २ स्तुतौ. प्रस्तावना = पतावणी = बतावणी ]

बतावणीकर [ प्र + स्तु ] (धातुकोश-बताव २ पहा)

बत्तासा [ वृत्ताशः = बत्तासा ] खाण्याचा साखरेचा वाटोळा पदार्थ.

बत्तिशी [ द्वात्रिंशी = बत्तिशी ] (स.मं.)

इंदूरी - इंद्रापुरी (इंद्रायणीवरील मोठें गांव ). मा

इंद्रा - इंद्रा. खा न

इंद्रापिंपरी - इंद्रा (कवंडळ). खा व

इंद्री - इंद्रा (कवंडळ). २ खा व

इनशी - इन (सूर्य ) - इनकर्षों. खा म

इराण - इरिणं ऊषरं । इराणांत ऊषर म्हणजे ओसाड रानें अतिशय, सबब आर्यांनीं त्या प्रांताला इरिण म्हटलें तेंच नांव अद्याप चालू आहे. (भा. इ. १८३४ )

इसरडें - इषिर ( अग्नि } - इषिरवाटं, खा म

इसरणें - इषिर ( अग्नि ) -इषिरवनं, खा म

इसाळ - इषिका (दर्भ) - इषिकापल्‍लं. खा व

उकसाण - ऋक्षवनं ( आस्वलें ज्या वनांत फारं आहेत तेथील गांव ). मा

उखळवाडी - उत्खला (मुरा), उखलः (तृणविशेष) २ खा व

उखळसंगम - उत्खला (मुरा), उखलः (तृणविशेष) खा व

उचंगी - सं. प्रा. उच्छंगी. इचलकरंजी. (शि. ता.)

उछळ - उच्छिलींध्रं (कुत्र्याचें मूत). खा व

उज्‍जनी - उज्जयिनी. खा म

उटखेडें - उष्ट्रिका (कुइली ). खा व

उटदा - उष्ट्रिका (कुइली ) - उष्ट्रिकापद्रा. खा व

उटावद- उष्ट्रिका (कुइली)-उष्ट्रिका (आवर्त.) खा व

उटें - उष्ट्रिका (कुइली ) - उष्ट्रिकं. खा व

उंडणी - उंडणी ( वनस्पति ). खा व

उडदवाई - उद्दिष्ट ( बोरू) - उद्दिष्टावती. खा व

उंडवडी - सं. प्रा. उंडिकवाटिका. भिमथडी-पुणें. (शि. ता. )

उंडाणें - उद्र ( ऊद) - उद्रवनं. खा इ उढेवाडी - ऊर्ध्ववाटिका. मा

उत्खरी - उत्खरिन्, देवतानाम. खा न

उत्राण - उत्तरा (पिंपरी ) - उत्तरावनं ( गुजरहद्द व अहीरहद्द). २. खा व

उदया - उदया. खा न

बटाट्या [ अवटीटः flatnose person = बटाट्या चपट्या नकाचा.

बट्टी १ [ मृष्टिः = बट्टी ] Fried wheaten round food.

-२ [ भ्रस्ज ]

बट्टू [अवटुः (मानेवरचा उंच भाग) = बटु ( अलोप ) = वट्टू ] मानेची घाटी. ( भा. इ. १८३६)

बट्टयाबोळ [ वस्तिकापूल: = बट्टिआबोळ = बट्ट्याबोळ ] वस्तिका म्हणजे वस्त्राच्या दशा व पूल म्हणजे ढीग. बट्ट्याबोळ म्हणजे दशांच्या दोरांची गुंतागुंत, गोंधळ, गुतागुंत.

बठ्ठा १ [ अवस्थः (शिस्न) = बठ्ठा ] शिस्न. घ्या माझा बठ्ठा.

-२ [ अवहस्त: ( हाताचा मागला भाग) = बठ्ठा ] हाताचा बठ्ठा.

-३ [ अवष्टंभः = बट्टंहा = बठ्ठा ] त्यानें बट्ठा दाखविला म्हणजे अवष्टंभ ऊर्फ दर्प ऊर्फ उरमटपणा दाखविला. (भा. इ. १८३५)

-४ [ वस्तः (बस्तिः ) = बट्टा ] बठ्ठ्यांत म्हणजे वस्तींत. ( भा. इ. १८३४)

बठ्ठू [ अवस्तु unreality, nonentity = बठ्ठू ] nonentity, nothing. अवस्तुता = बठ्ठ्या. घ्या माझा बट्ठू take nothing from me. घ्या माझा बठ्ठ्या

बठ्ठ्या १ [ अवस्तुता ] (बठ्ठू पहा)

-२ [ बस्तिकः = बठ्ठिआ = बठ्ठ्या ] (भा. इ. १८३४)

बड (डा-डी-डें ) १ [ अभ्यधिक = बढिअ (अलोप) = बढा = बडा ]

-२ [ वड्र = बड (डा-डी-डें) ]

-३ [ बाढ = बड ( डा-डी-डें ). वाढमुष्णं । वाग्भट - अष्टांगहृदय-सूत्रस्थान-अध्याय ५ श्लोक २८ ] (भा. इ. १८३४)

बंड १ [ भंड: = बंड ] दांडगा पोरगा.

-२ [ बंड ( उनाड ) = बंड ] उनाड मुलगा.

-३ [ भंड: ( buffoon ) = बंड ] मुलगा फार बंड आहे म्हणजे चावट खोडकर आहे.

-४ [ वंटः unmarried man, truant profligate = बंड ] Boistrous chap, mutinous chap.

-५ [ वंटालिका a kind of battle, rebelion = बंडाळी. वंट revolt = बंड. unorthodox fighting, mutiny ]

बचावणें [ विच्छ् १० गतौ. विच्छ = बचणें. विच्छायते = बचावतो ] ( धा. सा. श. )

बची [ वत्सक ] (बच्चा २ पहा)

बचू १ [ वासू: ] (बाची पहा)

-२ [ वत्सक ] (बच्चा २ पहा)

बचेळी [पीचालि: ] (बेचाळी पहा)

बच्चा १ [ वयस्य = बअच्च = बच्च. ( संबोधन ) बच्चा ] बच्चा म्हणजे मित्रा.
वत्स या शब्दापासून निघालेला बच्च शब्द निराळा. त्याचा अर्थ मूल, पोर.
बरोबरीच्या माणसांना जो बच्चा शब्द मराठींत लावतात तो वयस्य या संस्कृत शब्दापासून निघालेला आहे. (भा. इ १८३४)

-२ [ वत्सक = बच्चअ = बच्चा-च्ची-च्चें, बचू, बची ] ( स. मं.)

बच्चाजी [ व्यंसक: = बंचआ = बच्चा ]
बच्चाजी म्हणजे फसव्या, लुच्चा.
वत्स पासून निघालेला बच्चा शब्द निराळा.

बच्चीं [ अपत्यानि = ( अलोप) बच्चाँइँ = बच्चीं ] हा शब्द मराठींत प्रायः अनेकवचनी नपुंसकलिंगी वापरतात. (भा. इ. १८३४)

बछेरा [ वत्सतर: = बछेरा ] शिंगरूं.

बजरंग [ बज्रांग = बजरांग = बजरंग. रा तील आ चा अ झाला ] हा शब्द अंजनीपुत्राचा वाचक आहे. (भा. इ. १८३३)

बजरवटु [ वज्रवृत्त = वजरवट्ट = बजरबट्ट = बजरबटु ] ( भा. इ. १८३४)

बजरबट्टू [ वज्रवटकः = बजरबट्टू ] वज्र म्हणजे कठिण व वटक म्हणजे वाटोळा खडा.

बजित [ व्यथित (कष्टदशा प्राप्त झालेलें माणूस) = बजित ] Distressed.

बट १. [ वट ( दोरांचा लहान जुडगा) = बट ] (स. मं.)

-२ [ वटी = बटी = बट ] वटी म्हणजे रज्जु. केसाची बट, कापसाची बट.

बटबटीत १ [ व्यक्तव्यक्त = बत्तबत्त = बटबट, बटबटीत ] ( धा. सा. श. )

-२ [ वि + अच् ] ( चंदन )

बटवा १ [ वस्तुक: = बट्टुआ = बटवा ] दस्तुक म्हणजे चंदनबटवा.

-२ [ वास्तुकं = वात्थुअं = बाटुअ = बटवा ]

आंबिल ओढा - आम्र = अंबिर = आंबिल. आंबिलओढा म्हणजे ज्याच्या कांठीं आंबे आहेत तो ओढा.

आंबी - आम्रिका. मा

आंबेगांव - आम्रग्रामं (झाडावरून). मा

आमलीबारी - (गांवावरून) खा प

आर - आरा (हा शब्द आरावालि या समासांत येतो). खा न

आर्डाव - अद्रिवहं ( डोंगराजवळील गांव). मा

आवंढें - आम्रर्ध ( आंबे पुष्कळ असणारें गांव). मा

आवंढे (घुद्रुक) - आम्रधं. मा

आवंढोली - आवंढें गांवाचें लहान रूप. मा

आशर - राक्षसः कौणपः क्रव्यात्क्रव्यादोऽस्रप आशरः ॥६३ अमर-प्रथमकांड-स्वर्गवर्ग.
ह्या श्र्लोकांत आशर शब्द आला आहे. आसुर्यांतील इष्टिकलेखांत असुरांच्या राजधानीला व प्रांताला Asshur आशर म्हटलेलें आहे. (भा. इ. १८३५)

आसनबागघाट - आसनबाग गांवाची बारी. खा प आळंदी - सं. प्रा. - आलंद. पुणें. (शि. ता. )

इंगळूण - हिंगुलवनं (झाडावरून). मा

इच्छागव्हाण - इच्छक ( महाळुंग ) खा व

इच्छकपुर - इच्छक (महाळुंग) - इच्छकपुरं. खा व

इच्छापुरी - इच्छक (महाळुंग). खा व

इज्यमान - इज्य ( गुरु ) - इज्यमाणिका. खा म

इटनेर -- इष्टिका ( यज्ञ ) - इष्टिकानीवरं, इष्टिका नामक नदी. ३ खा म

इटवें - इष्टिका (यज्ञ ) - इष्टिकावहं. खा म

इटवेबारी - गांवावरून. खा प

इटाई - इष्टिका ( यज्ञ ). ईष्टिकावती, खा म

इटेघर- यष्टिगृह = इट्टिघर = इटेघर.
सह्याद्रीच्या खो-यांतील एका गांवाचें नांव. यष्टिगृह हें संस्कृतांत गांवाचें नांव आहे. (भा. इ. १८३६)

इंदवणें - इंद्रवनं. खा म

इंदवें - इंद्रवहं. : २ खा म

इंदूर - इंद्रपुर = इंदूर्

[बप्त्री ] ( बाई ६ पहा )

बइंगण [ वातिंगणः = बइंगण ]

बक [ अर्भक = अब्भक = ( अलोप ) बक ] बक म्हणजे पिल्लूं.

बकबक्या [ भषभषकः = बकबक्या ] भषणं श्वरवः

बकरा [ भोलिर्बहुकरो वक्रग्रीवो मेषस्तु लोमशः (त्रिकांडशेष). 'बहुकर' पासून बकरा ही व्युत्पत्ति कृत्रिम दिसते. वर्कर = बक्कर = बकरें - रा - री ] ( ग्रंथमाला )

बकरूं [ बर्करतर ] (रूं पहा)

बकवा [ भषद्वाच् = बखवाअ = बकवा ] Vain talk.

बकाबक [ भक्ष्याभक्ष्यं = बक्खाबक्ख=बकाबक ] बकाबक खातो म्हणजे बरें वाईट न पाहतां खातो. (भा. इ. १८३७)

बकाबका [ भक्षंभक्षं = बकाबका ]

बखतर [ वक्षस्त्रं = बखतर]

बखाटी १ [ वक्षणा = बखाटी ] सा वः प्रजां जनयद् वक्षणाभ्य: ( १४-२-१४)

-२ [ वक्षोस्थि = बक्खोठ्ठि = बखोटी ] उरावरचें हाड.

-३ [ वक्षोस्थि = बक्खोठ्ठि = बखोटी = बखाटी ] पोट बखाटीला गेलें म्हणजे भुकेनें इतकें ओसरलें कीं वक्षस्थलाच्या हाडापर्यंत गेलें. (भा. इ. १८३७)

बखेडा १ [ प्र + क्ष्वेड् किंवी क्ष्विड् १ शब्दे. प्रश्वेड: ( गडबड, गोंधळ ) = बखेडा ] ( धातुकोश-बखेड पहा )

-२ [ प्रक्ष्वेडः a loud indistinct noise = बखेडा ] confusion, noise, clamour.

बख्खळ १ [ बहुकल = बख्खळ (पुष्कळ ) ]

-२ [ पुष्कल = बुख्खळ = बुख्खळ = बख्खळ ] हा शब्द गांवढ्यांत फार.

बग [ वश = बख = बग ] influence.
बोलबगें = वाग्वशात् (ज्ञानेश्वर )

बग ! [ भकोः ] (बघो पहा)

बंगण [ वातिंगणं ] (वांगें ३ पहा)

बगल [ फारसी ] (सं. मं.)

बगहो ! [ भकोः ] (बघो पहा)

बंगी [ विहंगिका (पेटी) = बिअंगिआ = ब्यंगी = बंगी. बंगी म्हणजे नीट चोहोंकडून बांधलेली पेटी, पिशवी इ. इ.
विहंगिका हा शब्द खुंटीचा वाचक म्हणून समजतात; परंतु तो पेटीचा हि वाचक होता, असें बंगी ह्या मराठी अपभ्रंशावरून दिसतें.

बगोटा-टी-टें [ बाहुमूलं = बगाटें-टा-टी. ह = घ = ग. ल = ड = ट ]

बघ ! [ भकोः ] (बघो पहा)

बघणें १ [ वक्ष् १ रोषे ] बघणें-तुझें बघून घेतों; दम धर. ( धा. सा. श. )

-२ [ पश् ] (पहणें पहा)

बघहो ! [ भगोः = बघो ! बघहो ! भो: ( अकच्) = भकोः = भगोः ] बघो, बघहो हीं मराठींत संस्कृतांतल्याप्रमाणें अव्ययें आहेत. बघ या क्रियापदाशीं संबंध नाहीं. बघो म्हणजे भो, अरे.

बघो ! १ [ भगोः ] (बघहो पहा)

-२ [ भको: (भोः अकच्) = बगहो ! बघो ! बघ ! बग ! ! भोः आगतोऽस्मि = बगहो ! आलों.

बचक [ प्रसरक = बचक, बचका ]

बाचका १ [प्रसरक] ( बचक पहा)

-२ [ प्रचायकः = पचाका = बचाका = बचका ]
पुष्पप्रचायः = फुलांचा बचका.
बचका म्हणजे हातांतला फुलांचा पुंज.

बचनाग [ वत्सनाभ = बच्चनाह = बचनाग ] (भा. इ. १८३७)

फेंफें [ प्र + इ-प्रेहि = फें फें ] ( फें पहा)

फेरा [ पर्ययः = फेरा ] सर्पः बाहुं पर्येति = साप हाताला फेरा घालतो.

फेस १ [ स्फिच् = फिस = फेस ] तुझा फेस काढीन. तव स्फिचौ कर्षिष्यामि म्हणजे तुझे कुल्ले ओढीन. (भा. इ. १८३४)

-२ [ प्रैषः distress = फेस ] तोंडांतून फेस गळणें. फेस काढणें.

फैल [ प्रहेल, प्रहेलिका (riddle, riddling position ) = फैल ] फैलावर घेणें म्हणजे शब्दताडण करणें. फोक [उक्ष् १ सेचने. प्रोक्षः = फोक ] अत्यंत पातळ पाण्यासारखा ढाळ. ( धा. सा. श. )

फोड १ [ स्फुटिका = फोडी = फोड ( स्त्री ) ]

-२ [ स्फुटिका = फुडिआ = फोड ( स्त्री )] ( भा. इ. १८३५)

-३ [ स्फोट = फोड ( पुं.) ] (भा. इ. १८३५, १८३४)

फोडणी [ स्फोटनी = फोडणी ] (फूट पहा)

फोडणें [ वद् १ भाषणे ] - अपवद = फोड.
अपवदति = ( अलोप) पोडतो = फोडतो.
खर्द् १ दन्दशूके = खर्द: म्हणजे दंशक शब्द.
नांवानें खडे फोडणें - नाम्ना खर्दान् अपवदति = नांवानें खडे फोडतो. ( धा. सा. श. )

फोडीवं [ स्फुटेलिम = फोडीवँ ]

फोदा [ ( पाणिनि कन्यानां प्रमदः ) प्रमदः = पंवदा = फोदा ) rejoicing.
तुझ्या आईचा किंवा बापाचा फोदा=तव मातुःपितुर्वा प्रमदः
मूळांत फोदा या शब्दांत बीभत्स असें कांहीं नाहीं.
Rejoicing of the father or mother.

फोद्या [ प्रोद्वाह्या married woman, wife = फोद्या. प्र + उत् + वह् to marry ] a wife : hence by implication, the female genetic organ.
फोद्या चालला काशी the wife is going to काशी
लवड्या तुझी गत कैशी oh husband, what shall you do?

फोपसा [ पुप्फुल (वातानें फुगलेला) = फोपसा ] ( भा. इ. १८३३)

फोपाटा [ प्र + उत् + पाटय् ] (धातुकोश-फोपाट पहा)

फोपीस [ फुफ्फूस = फोपीस ]

फोफसणें १ [ पुष् ४ पुष्टौ - पोपुष्यते = फोफुसणें = फोफसणें ] फोफसणें म्हणजे अतिशय पुष्ट होणें. (भा. इ. १८३६)

-२ [ पोस्फुर्छ्यते = फोफुसणें = फोफसणें, फोफसा ] फोफसणें म्हणजे अति पसरणें अंगानें इ. इ.

फोफसा १ [ पोपुष्यः = फोफसा] अतिशय पुष्ट. ( भा. इ. १८३६)

-२ [ पोस्फुर्छ्यते ] (फोफसणें २ पहा)

फोफाटा [ प्र + उत्+ पाटय् ] ( धातुकोश-फोपाट पहा)

फोल [ पूल्यम् (पोंचट दाणा ) = फोल ]

फौज्या [ प्रयोज्यः (servant, servitor) = फौज्या ] तो फौज्या आहे, झालें ! he is a servitor, that’s all.