Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

उमरविहीर – उदुंबर (उंवर) उदुंबरविवरं. खा व

उमराण – उदुंबर (उंवर) – उदुंबरवनं. खा व

उमराणी - उदुंबर (उंबर) – उदुंबरवनी, ३ खा व

उमरावती - नद्यां मतुप (४-२-८५) ह्या पाणिनिसूत्रांत नदीवाचक शब्दांना चतुरर्थी मतुप प्रत्यय लागतो. जसें, उदुंबरावती = उंबरावती (प्राकृत) = उमरावती. कित्येक लोक वऱ्हाडांतील उमरावतीनामक नगरवाचक शब्दाचा अमरावती असा उच्चार करतात; परंतु तो अपभ्रष्ट होय (भा.इ.१८३२)

उमरी - उदुंबर (उंबर) – उदुंबरिका. खा व

उमर्ठी - (गांवावरून) खा प

उमर्डे - उदुंबर (उंबर) – उदुंबरवाटं. खा व

उमप्याघाट – औदुंबरघट: खा प

उमाळें - उमापल्लं. खा म

उरण – वरूण – वारुणं. इस्लामपूर. (पा.ना.)

उरसें - और्वशीयं. मा

उरसें - a village name. उरश: name of a country inhabited by a warrior tribe. औरशं = उरसें a village in पवनमावळ. This tribe founded the village of उरसें in plantation days.

उरूळी - (वरूळी पहा)

उलाई – उलि: (कांदा) - उल्यावती. खा व

 

एकतार्स – एकतार्क्ष्य (गरूड) – एकतार्क्ष्यं. खा इ

एकरुखी - एकवृक्षा. खा व

एकलग्नें - एक – एकलग्नकं - राश्युदयकाल. २ खा नि

एकलहरें - लहर (लोकनाम, सध्यांचें लडक) – एकलहरकं - ६ खा म

एकवाई – एकवृत्तिका - कुंपण. खा नि

एकुलती - एकलतिका. २ खा व

एणगांव – एण (हरिण) – एणग्रामं (वेणगांव). खा इ

एरंडगांव – एरंडग्रामं. २ खा व

एरंडगांव – सं. प्रा. - एरंडपल्ल. नाशिक, नगर. (शि.ता.)

एरंडवणें - एरंडवन = एरंडवणे = एरंडवणें (ग्रंथमाला)

एरंडोल – सं.प्रा. - एरंडपल्ल. खा (शि. ता.)

एरंडोल - एरंडपल्लं. खा व

एरंडेली - सं. प्रा.- एरंडपल्ल. नगर ( शि. ता. )

एरवडें - इतरवाट =येरवाड = एरवाड = एरवड = एरवडें. ( ग्रंथमाला )

अपभ्रंशांतील बापु हें रूप उकार लागून बनलेलें आहे, आणि तें विचारांत घण्यासारखेंही नाहीं. सबब, निर्देशमात्राने त्याची बोळवण करून, संस्कृत वप्तृ व महाराष्ट्री बप्प यांचा आदेशसंबंध कोणता तें सांगतों.

वप्तृ शब्दापासून बप्प शब्द निष्पादितांना ज्ञानप्रकाशांतील परीक्षकाला जी अडचण आली ती ही कीं, प्त चा प्प होणें शक्य नाहीं. तेव्हां कोणत्या किमयेनें तो तुम्ही बनवितां तें बोला, नाहीं तर आपली चूक कबूल करा, असा त्याचा प्रश्न आहे.

संस्कृतांतून महाराष्ट्रींत येतांना प्त चा त्त हा आदेश नियमानें होतो, हें परीक्षकाप्रमाणें मलाही मान्य आहे. लवरखेरीज करून संयुक्त व्यंजनांतील उपरिष्ट हलाचा लोप होतो व अधःस्थ हलाचा होत नाहीं, असा नियम आहे. तो प्त च्या बाबतींतही खराच असणार. संस्कृतांतून महाराष्ट्रींत येतांना प्त तील उपरिष्ठ जो प् त्याचा लेप होतो व अधःस्थ त ला द्वित्व येतें-या नियमाप्रमाणें पाहातां, वप्तृ या शब्दांतील (प्त चा त्त होऊन वत्तु असें महाराष्ट्री रूप व्हावें, जसे नप्तृ= नत्तु) परंतु तें तसें होत नाहीं हें तर आपण प्रत्यक्ष पाहातों. तेव्हां याला तोड काय करावी व ह्या अडचणींतून कसें निघावें ? अथवा बाब दुर्भेद्य व असाध्य म्हणून तशीच सोडून द्यावी व हताश होऊन स्वस्थ बसावें ? बाप, बप्प व बप्तृ हे तीन पितृवाचक शब्द मुलगा, बाप व आजा ह्या क्रमानें एकाच वंशाचे व बीजाचे आहेत ह्यांत संशय नाहीं. कां कीं, बप्प ह्या महाराष्ट्री शब्दाचें संस्कृत मूळ शोधून काढण्यास प्रतिलोमादेशपद्धतीनें ज्या अटी हव्यात त्यांपैकीं बहुतेक सर्व बप्तृ ह्या शब्दांत आढळतात. ( १ ) शब्द व्द्यक्षरी पाहिजे. (२) त्याचें आद्याक्षर आदेशानें व होण्यासारखे पाहिजे. आणि (३) द्वितीयाक्षर संयुक्त असून आदेशानें प्प होण्यासारखें पाहिजे. पैकीं पहिल्या दोन अटी बप्तृ ह्या शब्दांत आहेत. तिसरी अट मात्र ह्या शब्दांत सकृतदर्शनीं आढळत नाहीं. ऐतिहासिक पद्धतीच्या जोरावर एवढें तर निखालस म्हणतां येतें कीं, इष्ट शब्द वप्तृतर असलाच पाहिजे. आदेशप्रमाणाच्या दोन अटीही तेंच सांगतात. तेव्हां प्रमाणांचा तर जोर बप्तृ ह्या शब्दाला सडकून आहे. एक तिसरी अट मात्र सकृतदर्शनीं आड येते. ती टाळावयाचा रस्ता येणेंप्रमाणें:-

आत्मन् ह्या शब्दाला अप्प व अत्त असे दोन आदेश होऊन दोन प्रकारचीं रूपें साधतात. हे अप्प व अत्त आदेश आत्मन् ह्या शब्दापासून निर्वचनकार येणेंप्रमाणें साधितात. आत्म० = आत्व० = आत्प० = आप्त०. त्म चा त्व, त्व चा त्प, आणि त्प चा प्त होतो, असें सांगण्याचा आशय आहे. आत्प ह्या आदशाचें आप्त असें रूपांतर होतें, असें मानिल्याशिवाय अत्त हें रूप साधत नाहीं. ह्या स्थलीं त् आणि यांचा स्थल. व्युत्क्रम होतो. तसाच स्थानव्युत्क्रम वप्तृ ह्या शब्दांत होऊन वत्पृ असें रूप होतें व उपरि लोप होऊन बप्प असें रूप बनतें. वप्प चें बप्प होतें, व बप्प चें मराठींत बाप होतें. वत्पृ पासून वप्प बनण्यास स्थानव्युत्क्रमाच्या नियमाचा आश्रय करावा लागतो. तो करणें निरुक्तिशास्त्राच्या नियमांना धरूनच आहे.

स्थानव्युत्क्रमाचा आश्रय करावयाचा नाहीं, असा आग्रह धरावयाचा असल्यास, बप्प ह्या शब्दाचें निर्वचन अन्यमार्गानेंही देतां येण्यासारखें आहे. वप् ह्या धातूपासून वापक असें नाम बनतें व त्याचा अर्थ वप्तृ सारखाच बहुतेक होती. मग, वापक = बावअ = बापअ = बप्पअ = बप्प असें परंपरित रूप साधतां येतें. हें रूप चार मजल्यांनीं साधलें. परंतु वप्तृ = वत्पृ = बप्प हें रूप दोन मजल्यांनींच साधतें. सबब ह्या दुसर्‍या रूपसिद्धीचा सौलभ्यास्तव मी आश्रय केलेला आहे. हा आश्रय अक्षरव्युत्क्रमाच्या नियमाला धरून आहे. तेव्हां तो सशास्त्र आहे, ह्यांत संशय नाहीं. मी आपल्या ज्ञानेश्वरीचें प्राचीनत्व सिद्ध करण्याकरितांच केवळ बाप हा शब्द वप्तृ ह्या शब्दापासून साधला असें नाहीं. तर तो तसा शास्त्रानुसार साधला जातोच. बाप शब्द वापक शब्दापासून साधला तथापि त्यानें माझ्या ज्ञानेश्वरीचें प्राचीनत्व अणुमात्र ढळत नाहीं. बापक या शब्दाहून वप्तृ हा शब्द संस्कृतांत जनक ह्या अर्थी विशेष प्रचलित असल्यामुळें तो मीं स्वीकारिला आहे. ह्याहून दुसरा हेतु नाहीं. ह्या दोन व्युत्पत्त्या बाप ह्या शब्दाच्या मला दिसतात. ह्याहून सरस अशी एखादी व्युत्पति परीक्षक जर दाखवूं शकेल तर ती स्वीकारण्यास माझ्याकडून कांकूं होणार नाहीं. (ज्ञानप्रकाश, आषाढ शु. २ शके १८३२)

" परमभट्टारक-महाराजाधिराज-परमेश्वर-श्री-बप्पपादानुध्यातः ”

ह्या पदांचें डॉक्टर फ्लीट येणेंप्रमाणें इंग्रजी भाषांतर देतात :-
" Who meditated on the feet of the परमभट्टारक, महाराजाधिराज and परमेश्वर “ his glorious father ”. म्हणजे बप्प या शब्दाचा अर्थ father असा डॉक्टर फ्लीट करतात. हा शब्द जुना प्राकृत म्हणजे महाराष्ट्री आहे, संस्कृत नाहीं, असेंही डॉक्टर सांगतात. इतकेंच नव्हे, तर त्यापासून मराठी बाप शब्द निघाला असेंही स्पष्ट सुचवितात.

बापाला गौरवानें पितृपादाः असें म्हणण्याची चाल होती तीच बप्पपादाः या महाराष्ट्रीसंस्कृत सामासिक शब्दांत दिसून येते.

बप्प = पितृ

हा बाप शब्द इतरही आणीक अनेक काश्मीर कांची वगैरे देशांतील ताम्रशिलालेखांतून सांपडतो. मेवाडच्या गुहिलवंशाचा मूलोत्पादक जो पुरुष (A. D. ७३५) त्याचेंही नांव बप्प होतें. शक ४०५ मधल्याही एका ताम्रपटांत ( C. I. I. Vol. III, No. २२) बप्प शब्द आलेला आहे; आणि तो आणखी विशेषनाम म्हणून आलेला आहे. म्हणजे शक ४०५ च्या अगेदर बरीच शतकें हा शब्द सामान्यनाम म्हणून प्रचलित असला पाहिजे. तात्पर्य, शातवाहनांच्या कालीं महाराष्ट्रांत हा शब्द होता. निदान शक ४०५ च्या सुमारास चांगलाच प्रचलित होता.

एवंच बाप या शब्दाची महाराष्ट्री बप्प या शब्दापर्यंत पिढी लागली.

कादंबरीच्या उत्तरभागारंभीं बाणतनयानें खालील उद्गार काढले आहेत:-
वीजानि गर्भितफलाने विकाशभांजि
वप्त्रैव यान्युचितकर्मबलात्कृतानि ।
उत्कृष्टभूमिविततानि च यांति पोषं
तान्येव तस्य तनयेन तु संहतानि ॥

येथें वप्तृ या शब्दाचा अर्थ पिता असा आहे. शिवाय कोणत्याही चांगल्या कोशांत वप्तृ या शब्दाचा अर्थ पिता, बीजी असा सांपडेल.

एवंच, संस्कृत वप्तृ, महाराष्ट्री बप्प व मराठी बाप अशीं तीन रूपें आपल्या पुढे आहेत. तिहींचा अर्थ पिता असा आहे. पैकीं महाराष्ट्री बप्प व मराठी बाप ह्या शब्दांची आदेशप्रक्रिदा सर्वमान्य आहे. संयुक्तक्षरपरत्वामुळें मागील स्वराला दैर्घ्य येऊन संयुक्ताक्षर असंयुक्त झालें आणि बप्प चें बाप झालें.

बाप १ [ पा = पालन करणें. कुर्भ्रश्च (उणादि सूत्र २२) प्रमाणें पपुः पालक:. पपु = बपु = बापु = बप्प = बाप ] पिता. (भा. इ. १८३२)

-२ [ वप्तृ = वप्प = बप्प = बाप, बापूस, बाप्या, बा ] बीं पेरणारा. (स. मं.)

-३ [ द्व्यात्मन् = बाप्प = बाप ] तो माझा बाप आहे म्हणजे तो माझा दुसरा आत्मा आहे. (भा. इ. १८३४)

-४ [ मराठी बाप शब्दाचें निर्वचन - ज्ञानप्रकाशच्या ११ जुलैच्या ( १९१०) अंकांत रा. रा. रामचंद्र भिकाजी जोशी यांच्या “ मराठी शब्दसिद्धि ” या पुस्तकाचें कोण्या परीक्षकानें त्रोटक परीक्षण केलें आहे. त्यांत बाप या शब्दाची जी व्युत्पति रा. रा. जोशी यांनीं दिली आहे ती त्या परीक्षकाला मान्य नाहीं.

अमान्यतचें कारण तो येणें प्रमाणें देतो. ‘ वप्तृ यापासून प्रकाराचा लोप होऊनच शब्द साधेल; असें एकही उदाहरण नाहीं कीं, ज्यामध्यें प्त या जोडाक्षराचा उत्तर अवयव गळाला आहे.” म्हणजे प्रकाराचा लोप होऊन वत्त असाच शब्द साधेल; वप्प असा शब्द कदापि साधणार नाहीं. असा या परीक्षकाचा अभिप्राय आहे. तो कितपत साधार आहे तें येथें पहावयाचें आहे.

२ कोणत्याही शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार तीन पद्धतींनीं करावा लागतो. पहिली आदेशपद्धति; दुसरी ऐतिहासिक पद्धति; व तिसरी तौलनिक पद्धति. पैकीं आदेशपद्धतीचा उपयोग दोन गतींनीं करतां येतो; अनुलोमगतीनें व प्रतिलोमगतीनें. मूळ वैदिक शब्द किंवा संस्कृत शब्द घेऊन त्याला महाराष्ट्री, अपभ्रंश व मराठी भाषांत येतांना कोणकोणते आदेश होऊन, मराठी रूप येतें, तें अनुलोमपद्धतीनें पाहावयाचें असतें. जेथें वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश ह्यांतील रूपें माहीत नसून केवळ मराठी रूपानें माहीत असलेला शब्द व्युत्पादावयाचा असतो, तेथें आदेशशास्त्रनियमानुसार त्या मराठी शब्दाचीं अपभ्रंश, महाराष्ट्री, संस्कृत व वैदिक रूपें कल्पावयाचीं असतात. जेथें अनुलोमादेशपद्धति, ऐतिहासिक पद्धति व तौलनिक पद्धति, या तिन्ही पद्धति थकल्या, तेथें ही प्रतिलोमादेशपद्धति लावणें अवश्य होतें. व्युत्पाद्य मराठी शब्दाचें वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश ह्यांपैकीं कोणत्याही भाषेत पूर्वरूप आढळलें असेल, तर बाकी राहिलेल्या भाषांपुरतींच तेवढीं पूर्वरूपें आदेशनियमानुसार कल्पावीं लागतात. व्युत्पाद्य मराठी शब्दाचें पूर्वभाषांतील पूर्वरूप किंवा पूर्वरूपें ऐतिहासिक पद्धतीनें सांपडतात. ती सांपडलीं असतां आदेशपद्धतीचा व ऐतिहासिक पद्धतीचा मिलाफ होतो व निर्वचन बलवत्तर होतें.

३ ह्या तीन पद्धतींतून बाप ह्या मराठी शब्दाला प्रथम ऐतिहासिक पद्धति लावली असतां निरुक्ति सुकर होईल. कारण मग कल्पनेचें काम म्हणजे प्रतिलोमादेशपद्धतीचें काम फार थोडें राहील, कदाचित्त् बिलकुल राहाणार नाहीं. बाप हा शब्द मराठींत पितृवाचक आहे. ह्या शब्दाचें अपभ्रंशांत व महाराष्ट्रत कोणतें रूप होतें तें ग्रंथांतरीं सांपडल्यास पाहावयाचें आहे.

डॉक्टर फ्लीट यांनीं corpus Incriptionum Indicarum च्या तिसर्‍या खंडांत वलश्रीच्या चवथ्या शिलादिल्याचा शक ६८९ तला एक ताम्रपट दिला आहे. त्यांत बप्प हा महाराष्ट्रीं शब्द आला आहे.

बात १ [ वार्ता = वत्ता = बत्ता = बात ] हकीकत. (भा. इ. १८३४)

-२ [ व्याघात = बाहात = बात ] अडथळा. हें काम होणार नाहीं म्हणजे काय बात आहे = काय अडथळा आहे ? (भा. इ. १८३४)

बातमात [ वार्त्तामात्रं = बातमात ]

बातल, बाताड्या [ वातिकः ] (बात्या पहा)

बातुकली [ व्यात्युत् + केलि mutual sport = बातुकली, भातुकली. (वि + आ + अति+उत्) ] पोरांची भातुकली girl's mutual sports.

वात्या [ वातिकः = बात्या ] वातिक म्हणजे धूर्त. गीतनृत्यहसितैः उन्मत्ततां आवहंति वातिकाः ।
(बाण-हर्षचरित-चतुर्थोश्वास, पृष्ठ १३८, निर्णयसागर) बात्या, बाताड्या, बातल हीं ह्या शब्दाचीं रूपें आहेत. (भा. इ. १८३५)

बादली १ [ वार्दोलिका = बादोली = बादली ] बादली म्हणजे विहिरींतून पाणी काढण्याचा डोल.

-२ [ फालं कार्पासं बादरं (अमर-द्वितीयकांड-नृवर्ग १११) ] बादर म्हणजे कापसाचें वस्त्र, कापड. बादरकं = बादल (ला-ला-लें). मराठशाईंत आहेरार्थ बादली देत असत. (भा. इ. १८३४)

बांध [ बंध = बांध (नदीचा) ] (भा. इ. १८३४)

बांधवणें, बांधावणें [ बध् १० संयमने. बंधयति = बांधवणें, बंधापयति = बांधावणें ] ( धा. सा. श.)

बांधा [ बंधक = बांधा (लागाबांधा ) ]

बांधें [ वंदा = बांधा, बांधें ] बांधें म्हणजे वृक्षादनी.

बांधेसूत [ बद्धसूत्र = बाधसूत = बांधेसूत. बंधसूत्रित = बांधेसूत ]

बाज १ [ बाह्या = बाज, बाजलें ] बाजेवर बसून नद्या तरुन जात.

-२ [मंचिका = बाजी = बाज = बाज ] वाज ( खाट) शब्द ज्ञानेश्वरींत येतो.

-३ [ भज् १ सेवायां. रंजाभाज: = रंडीबाज. गंजाभाजः = गांजेबाज. अहिफेनभाजः = अफीणबाज. स्मश्रुभाजः = मिशाबाज इ. इ. इ.]
बाज हा फारशी हि शब्द आहे, परंतु वरील शब्दांत तो नाहीं. शिवाय फारशी बाज शब्द संस्कृत भाज शब्दाचाच अपभ्रंश आहे. (धा. सा. श. )

बाजत् [ बाह्यतः = बाजत् ]

बाजा [ वाद्यः = बाज्जा = बाजा ] वाद्यं कुरु = बाजा कर.

बाजारबसवी [ भार्यारु + उपवेशिनी = बाजारबसवी ] दुसर्‍याच्या स्त्रीच्या ठाई प्रजोत्पादन करणारा असा जो त्याला अनुरक्त जी स्त्री तिला बाजारबसवी म्हणत. दुकानांचा समूह जो बाजार त्याशीं येथें वस्तुतः संबंध नाहीं. ( भा. इ. १८३७)

बाजीकरी [ व्याजीक्रिया = बाजीकिरी = बाजीकरी = बाजीगरी ] व्याजीकरण म्ह० फसवणूक.

बाजीगरी [ वाजीक्रिया = बाजीगरी ] मंत्रौषधिक्रिया.

बाजीराव [ वत्सस्य पुत्रः वात्सिः ॥ वात्सि = वाच्चि = बाची = बाजी. वात्सिराजः = बाजीराव ]

बाजें [ बाह्यं = बाजे, बाजें ] बाहेरील. बाजा गोष्टी काय कामाची ?

बाट्या [ व्रात्यः = बाट्या ]

वाठी [ बीजाष्टिः (वीज + अष्टिः) = बिआठि = ब्याठि = बाठी ] आंब्याची वाठी.

वाड [ बद् १० भाषायां ] ( धातुकोश-वाड पहा)

बांड १ [ वंड् to cover =वंड: = बांड] लुगडें धडोतीचें.

-२ [ वंठ: (अविवाहित तरुण पुरुष) = बांड ] तरणा बांड म्हणजे तरणा अविवाहित पुरुष.

-३ [ बन्धकी ] (बांडगी पहा)

बांडगी [ बन्धकी = बांडकी = बांडगी, बांड ] ती बांड आहे म्हणजे पुंश्चली आहे. (भा. इ. १८३४)

बांडगुळ १ [ वंदागुल्मं = वांडगुळ = बांडगुळ ] वंदा म्हणजे वृक्षादनी.

-२ [ वनगुल्मः ] (वाणगुळ पहा)

बाडा [ बद् १० भाषायां ] ( धातुकोश-वाड पहा)

बाणगुळ [ वनगुल्मः = वणगुळ = वाणगुळ = बांडगुळ ]

बाइलवेडा [ महिलाविधेयः = बाइलवेडा ]

बाई १ [ ( वामा ) वामिका = बाई, बाइका ] Woman.

-२ [ वप्त्री = बाई ] progenitress, mother, woman.

-३ [ भवती = बअई = बाई ] Lady.

-४ [ भगवती = बअअई = बाई ] Lady.

-५ [ भगवती = वअवई = बावी = बाई ] ये बाई = एहि भगवती. बाई भिक्षा वाढ = भवति भिक्षां देहि भवती = बअई = बाई. ( भा. इ. १८३४)

-६ [ वप्त्री = वप्पी = बप्पी = बापी = बावी = बाई, बाय, बायो, बाईल, बायको, ब ] बीं पेरणारी, (स. मं.)

बाईबापडी [ वामावप्त्रिका = बाइबापडी, बाईबापडी ] वामा म्हणजे स्त्री व वप्त्रिका म्हणजे स्त्री. बायाबापड्या म्हणजे ख्रिया.

बाईल [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बाईलवेडा १ [ महिलाविधेयः (subject to wife) = बाईलवेडा, बाइलवेडा ] स्त्रीवश.

-२ [ वप्त्रीविधेयः = बाईलवेडा. वप्त्री + ल ( स्वार्थक) = बाईल ]

बाका १ [ वाग्यः speaking cautiously = बांका, बाका ] cautious and expert.

-२ [ वक्कन् (Vakvan) great speaker, clever speaker = बाका, बाँका, बांका ] clever, efficient.

बाका-की-कें [ पाकः = वाका = बाका-की-कें ] पाकशब्दः प्रशंसायां प्राशस्ते वा । (आश्ललायनगृह्यसूत्र गार्ग्यनारायणीयवृत्ति १-१-२)
हा पाक शब्द अल्पत्वार्थक हि संस्कृतांत आहे. परंतु त्यापासून मराठींत कोणता अपभ्रंश झाला आहे, तें सध्यां सुचत नाहीं. (भा. इ. १८३६)

बाँका [ वक्कन्] ( बाका २ पहा )

बांका [ वक्कन्, वाग्यः ] (बाका २, १ पहा)

बांकून [ वंक् १ कौटिल्ये. वंकित्वा = बांकून ] बांकून वागणें म्ह० कौटिल्यानें वागणें. ( धा. सा. श.)

बागुर्डा [ बल्गुलकीटकः = बागुल्डा = बागुर्डा]

बागुल १ [ बल्गु १ माधुर्ये, पूजायां. बल्गुल = बागुल] ( धा. सा. श. )

-२ [ बल्गु = बागुल ]

वाचणें [ भाष् = भास = बाच् (वाचणें ) ] (भा. इ. १८३२)

बहकणें [ बृह्, भष् भाषार्थे. बृह = बह= बहकणें ] (भकणें पहा)

बहर [ बर्हः = बहर ] बर्ह ( म्हणजे प्रामुख्य, प्राधान्य, व्याप्ति.

बहिण [ भगिनी = बहिणी = बहिण, बहिणा, वहिणी, वहिनी ] (स. मं.)

बहिणा, बहिणी [ भगिनी ] ( बहिण पहा )

बहु [ बह्वीयस् = भूयस्. comparative of बहु अपभ्रंश ]

बहुत [ प्रभूत = पहूत = वहूत = बहूत, बहुत ] अस्य लक्ष्मी रपि प्रभूता जाता (धर्मदत्तचरितम्) = त्याला द्रव्य हि बहुत जालें. या बहुत शब्दाचा बहु या संस्कृत शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

बहुतशहाणा [ ईषदूनः विचक्षणः बहुविचक्षणः । बहुविचक्षणः = बहुत शहाणा ]

बहुतशहाणा म्हणजे शहाणपणांत किंचित् कमी, फार हुशार, अतिशहाणा इत्यादि ठिकाणीं फार, अति हे शब्द उणेपणा दाखवितात, विभाषा सुपो बहुच् पुरस्तात्तु (५-३-६८)

बहूत [ प्रभूत ] ( बहुत पहा)

बळ [वलय = वळ, बळ ] रोगविशेष.

बळकट [ बल + कट (साधनीभूत) = बळकट. मल+ कट = मळकट. तैलोत्कट =तेलकट इ. इ. इ. ]

बळद, बळध [ बल् ११. बलं धत्ते = बळद, बळध ] बळद म्हणजे धान्य सांठविण्याची जागा. (धा. सा. श.)

बळस [ बलासः स्नेहभूस्थिरः ॥ ( केयदेव-पथ्यापथ्यविबोध) बलास = बळस, बळसा ] लहान मुलांच्या घशांतून श्लेष्मा निघतो तो बळस. (भा. इ. १८३४)

बा १ [ वप्तृ ] ( बाप २ पहा )

-२ [ पाद = पाअ = वाअ = बा ] ( व्यक्तिनाम कोश-बा पहा)

बाइका [ वामिका ] ( बाई १ पहा )

बाइको [ बामिका + अवावा = बाइकाऊ= बाइको, बायको ]

बाइरी [ वामातरी ] (बायडी पहा)

बाइल [ महिला = वइल = बइल = बाइल ] बाइल म्हणजे स्त्री.

बाइलघाण्या [ महिलाघ्न ] ( घाण्या पहा)

बाइलबडगा [ वप्त्रीबटिका = बाइलबडिगा=बाइलबडगा ] भार्या व रांड. बटु पोरगा याचें स्त्रीलिंग बटिका (पोरगी, दासी). ( स. मं.)

बवा [ भवत् = बवअ = बवा, बोवा, बुवा, बावा ] (भा. इ. १८३४)

बस १ [ बस् to stop ]
बस, पुरें झालें = stop, it is enough.

-२ [ पद्य (सम्यगर्थे निपातः) = वसु = बसु = बस (निपात) ]. बस = उत्तम, पुरे. (भा. इ. १८३४)

-३ [ अव + सो to finish Imp. second sing स्य. अवस्य = (अलोप) बस ! ] Finish !, end !, stop !

-४ [ वश = बस, हरिसबसविसप्पमाणहियए = हर्षवशविसर्प्पद्हृदयः त्याचा बस बसला म्हणजे त्याचा वश, अधिकार, सत्ता स्थापित झाली ] बस म्ह० वजन, अधिकार. त्याचा त्या घरांत बस बसला म्हणजे वश, आधिकार चालू झाला. (भा. इ. १८३६)

-५ [ वस् ४ स्तंभे. वस्य = बस, बस्स. वसुस्तंभे, वस्यति ] वस्य म्हणजे थांब. बस, बस्स म्हणजे थांब, पुरे.
मराठीत हें आज्ञार्थक रूप अव्यय झालें आहे. ( धा. सा. श. )

बसक [ विश्. उपवेशिका = बइसिका = बसक ] बसक म्हणजे जनावरांची बसण्याची जागा. (धा. सा. श. )

बसणे [ वस् स्तंभे ] तो गप्प बसला = सः निशब्दः अवस्यत्. बसला म्हणजे स्तब्ध झाला.
उपविश् पासून निघालेला बैस, बस धातू निराळा. ( धा. सा. श. )

बसवणें [ प्रमाणें बसवणें, उदाहरणें बसवणें, ताळा बसवणें वगैरे प्रयोगांत बसवणें हा शब्द उपवेशन या शब्दापासून निघालेला समजणें असमंजस आहे. येथें बसवणें हा शब्द संस्कृत अवसेय, अवसान या शब्दापासून निघालेला स्पष्ट दिसतो.
उदाहरणानि अवसेयानि = उदाहरणें बसवावीं.
प्रमाणं अवसेयं = प्रमाण बसवावें.
अवसेयं = बसवावें म्हणजे जाणावें.
बसवणें म्हणजे जाणणें असा मराठी धातू आहे.] (भा. इ. १८३५)

बसाव [सो ४ अन्तकर्मणि. व्यवसायः = बसाव] ( धातुकोश-बसावा १ पहा)

बस्तान ३ [ अवस्तान = बस्थान = बस्तान (अलोप ) ] बस्थान म्हणजे अवस्था, स्थिति. - (भा. इ. १८३६) -२ [ व्यवस्थान = बस्तान ] आधान, रहाणें, स्थिति.

-३ [ अवस्थान = बस्तान ( अलोप ) ]

-४ [ अवस्थानं settled position = बस्तान ]

बरव १ [ परम = वरव = बरव (वा-वी-वें) ] बरवा हा शब्द अतिशयवाचक ऊर्फ तमभाववाचक मराठींत आहे. (भा. इ. १८३७)

-२ [ बरिमन् (विशेषण-श्रेष्ठ ) = बरिवँ = वरव ( वा-वी-वें ) ]

बरवा [ वरीयस् better = बरवा ]

बरळणें १ [वृधु भाषायां. वृध्= बरड = वरळ ] बरळणें म्ह० विसंगत बोलणें. ( धा. सा. श. )

-२ [ व्रण् १ शब्दे = बरळणें. ण् = न = ल = ळ ] ( धा. सा. श. )

-३ [ लप् १ व्यक्तायां वाचि. प्रलपनं = बरळणें. प्ररटनं = परळणें = बरळणें ] ( धा. सा. श. ).

बरी, बरीक [ वराकिका = वराइआ = बरी, बरीक ]
ती बरीक मेली = सा वराकिका मृता.

बरीक २ [ वरं के ] (बरें कां पहा)

बरें १ [ वा रे ! ] (बरँ ३ पहा)

-२ [ परमं ! = बरें | ( अव्यय अंगीकारार्थी ) ] (भा. इ. १८३७)

बरें कां [ वरं कं = बरं कां, बरीक, बरें कां.
कं निदायां सुखे वा निपातः] त्याची बरीक नोकरी गेली. बरीक = बरं कां ( Do you see ) (भा. इ. १८३४ )

बर्गी [ वर्गिन् = बर्गी ] वर्ग means a fighting horde - बर्गी हें नांव इतर प्रांतस्थ लोक मराठ्यांना लावतात.

बर्तन [ वर्धनं ( पात्रविशेष ) = बर्तन ( हिंदी ) ]

बर्सात १ [ वर्षर्तु rainy season = बर्सात ] rainy season.

-२ [ वर्षारात्र rainy season = बर्सात ] rainy season.

बलक, बलगा [ वलज = बलक, बलग ] वलज म्हणजे हाडाच्या आंतील रस. अंड्याच्या आंतील रसाला बलक म्हणतात.

बलुता, बलुतें, बलुतें [ प्लेव् to serve प्लेवितृ = बेलुता = बलुता ] village servant. प्लेवितं = बलुतें the requisites* of a village servant.

बलुल १ [ बलूल = बलूल. बलं न सहते बलूलः ] तो पोरगा बलूल आहे म्हणजे दुर्बल, हैवान आहे.

-२ [ बल + ऊल = बलूल ] आळशी, भित्रा. ( भा. इ. १८३४)