Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

बिराढ १ [ बिराध Vexation, annoyance = बिराड, विर्‍हाड, बिर्‍हाड ) vexation.
हें बिराड एकदां जाऊं द्या = Let us rid of this annoyance. म. धा. १९

-२ [ वि + राध् to hurt, offend. विराद्धं = बिराढ, विर्‍हाड, विर्‍हाढ ] Vexation. हें काय विर्‍हाड आणिलें आहेस what is this plague you have brought ?

-३ [ विराष्ट्र ] ( धातुकोश-बिर्‍हाड १ पहा)

बिराहाड [ विराष्ट्र ] ( धातुकोश-बिर्‍हाड १ पहा)

बिरीद [वि + रुद् - बिरुदम् ] ( व्रीद पहा )

बिरुद [ वीरमुद्रा = बिरुद ] वीराचें वीर्यदर्शक चिन्ह.

बिरूद [ वि + रुद् - बिरुदम् ] ( ब्रीद पहा )

बिर्‍हाड १ [ विराद्धम्] (बिराढ २ पहा)

-२ [ विराध ] (विराढ १ पहा)

-३ [ विराष्ट्र] ( धातुकोश-बिर्‍हाड १ पहा)

-४ [ वि + राध् ]

बिर्‍हाढ - [विराध ] (बिराढ १ पहा)

बिलगणें १ [ अपिलग् = पिलग् = बिलग् अथवा विलग्= बिलग्] दोहींचा अर्थ एकच, चिकटून असणें. (भा. इ. १८३३)

-२ [ विलग्न = बिलगणें ] (भा. इ. १८३४)

बिलबिलीत १ [ बिल् भेदने (द्वि.. ) ] ( धातुकोश-बिलबिल २ पहा)

-२ [ ब्ली to crush ( द्वि. ) ] ( धातुकोश-बिलबिल १ पहा)

बिल्ली [ बिडाली = बिलाली = बिल्ली ] मांजरी. (भा. इ. १८३३)

बिवड [ विवर्तकः =बिवड ] पिकाचा पालट करणारा. (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)

बिवशी [ पितृस्वसृ ] (पिवशी पहा )

बिशी १ [ बृसी (व्रुवन्तः अस्यां सीदन्ति, पढणारे जींत राहतात ती जागा, खाणावळ) = व्रिशी = बिशी ] खाणावळ. ( भा. इ. १८३३)

-२ (विशिषं abode = बिशी ] An abode or धर्मशाळा for लिंगायतs and जैनs.

-३ [ (वि + शी) विशय = विशी = भिशी ] धर्मशाळा, उतरण्याची जागा. (भा. इ. १८३४)

-४ [ वृपी ( व्रतिनां आसनं ) = व्रिसी = विसी, भिसी, बिशी, भिशी ] लिंगायतांच्या भिक्षुकांच्या राहाण्याच्या जागेला बिसी, भिसी सध्यां म्हणतात.

कंदाणें - कंद. खा व

कंधाणे - कंद. खा व

कनकापुर - कन्या (पार्वती) - कन्यकापुरं. खा म

कनासी - कर्ण ( मंदार) - कर्णकर्षा. २ खा व

कनोली - कर्णकूला. खा न

कन्नड - सं. प्रा. कण्ण, हैदराबाद. ( शि. ता.)

कन्नड -(कर्णाटक पहा )

कन्हेवाडी - कर्णिका (कांटे शेवती). खा व

कमखेडें - कमा ( सौंदर्य ) - कमाखेटं. २ खा नि

कमरावाद - कंबर (नागाचें नांव) - कंबरावर्त. खा म

कमळगांव - कमल. खा व

कमळापुर - कमल. खा व

कमळापुरी - कमल. खा व

कमोद - कुसुदं. २ खा व

करकोट - कर्कोटकः (सर्पजाति ) - कर्कोटकं. खा इ

करगांव - करभ ( उंट) - करभग्रामं. खा इ

करंज - करञ्ज - करंजकं. खा व

करंजकुपें - करञ्ज - करंजकुंबक. खा व

करेंजखेडें - करञ्ज. खा व

करंजगाव्हाण - करञ्ज. खा व

करंजगांव - करञ्ज. खा व

करंजगांव - करंजग्रामं (झाडावरून). मा

करंजडांगरी - करञ्ज. खा व

करजराम - करञ्ज - करंजारामः. खा व

करंजवडें - सं. प्रा. करंदीवडे. सातारा, बेळगांव, पुणें, कोल्हापूर. ( शि. ता.)

करेंजवें - करञ्ज - करंजवहं. खा व

करंजाई - करञ्ज - करंजावती. खा व

करंजाड - करञ्ज - करंजवाटं. खा व

करंजाणे - करञ्ज - करंजवनं. खा व

करंजाली - करञ्ज - करंजपल्ली. खा व

करंजी - करञ्ज - करंजिका. खा व

करंजुलें - करञ्ज - करंजपल्लं. खा व

करंजोद - करञ्ज - करंजपद्रं. खा व

करंडोली - करंडपट्टी ( बौद्ध करंडावरून). मा

करणकुवा - करण (व्रात्यक्षत्रिय ). खा म

करणखेडें - करण (व्रात्यक्षत्रिय). २. खा म

करणगांव - करण. (कर्णाटक पहा)

बिदौणी [ द्विद्रोणिक: = बिदौणी, विदौनी (a discrict)]*

बिन [ विहीन (वि + हीन) = बिन ] विहीनवस्त्रं = विनवस्त्र (adj. or adv. )

बिनसणें [ वि + नश् = बिनस (णें )] कुसंगेन पुत्रो विनश्यति ( धर्मदत्तचरितम् ) (भा. इ. १८३४)

बिनमोल [ विनामूल्यं = बिनमोल (क्रियाविशेषण ) बिनमोल ]

बिववा वाघ [ विंबक = विब्बअ = बिबव = विबवा ] वाटोळे ठिपके आहेत तो. (ग्रंथमाला)

बिवोटी [ विभूति = विबोटी ] Medicine given to children, ashes of some herbs.

बिब्बा [ विभाषा = बिबासा = बिबाहा = विब्बा ] त्यानें ह्या कामामध्यें बिब्बा घातला म्हणजे विकल्प घातला. येथें बिब्बा म्हणजे विकल्प असा अर्थ आहे.
बिब्बा घालूं नको म्हणजे हें करूं कां तें करूं असा विकल्प आणूं नको. (भा. इ. १८३६ )

बिब्वा (वाघ) [ द्वीपिन् = बिबिअँ = बिब्बा, बिब्या ]

बिब्या वाघ १ [ द्वीपिन्= विविआ = बिब्या =बिब्बा] बिब्बा नांवाच्या झाडाशीं व त्याच्या फळाशीं ह्या शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं. व्याघ्रः पंचनखो द्वीपी ॥ (भा. इ. १८३७)

-२ [ द्वीपी व्याघ्रः = बिब्या वाघ ] द्वीपी म्हणजे बेटासारखे ठिपके असलेला वाघ.

बियाळ [ बीजल: = बियळ = बियाळ ] सिध्मादिभ्यश्च ( ५-२-९७)

बिरडणें [ अर्द् १० हिंसायाम्. व्यर्दनं = बिरडणें ] चिरडणेंबिरडणें = अत्यर्दनंव्यर्दनं ( धा. सा. श. )

बिरडी १ [ विरूढ (मोड आलेला दाणा) विरूढिः=बिरडी]

-२ [ विरुध् ] ( बिरढा पहा)

बिरडया [ विरूढिका = बिरुडिआ = बिरुड्या = बिरड्या ] विरुढक म्हणजे मोड आलेलें धान्य. ( भा. इ. १८३४)

बिरबिरीत [ वि + री ४ स्रवणे ] ( धातुकोश-बिरबिर पहा)

बिराजा [ द्वैराज्यं = बिराजा ] Divided dominions एक्कल काजा । दुढ्ढी बिराजा.

कच्छमांडवी - कच्छमंडपिका. (भडोच पहा)

कजवाड - कच (वाळा ) खा व

कटखाना - कट (तृणविशेष) (खनक = खाण). खा व

कटगर - कट (तृणविशेष) - कटगृहं. खा व

कटर - कट (तृणविशेष). खा व

कटरें - कट (तृणविशेष ). २ खा व

कटूर - कट (तृणविशेष). खा व

कटेल - कटिल्लक ( कारलें ) खा व

कटोरा - कट (तृणविशेष) - कटपुरकं. खा व

कटोरें - कट ( तृणविशेष ). ५ खा व

काटोली - कट (तृणविशेष ) खा व

कडगांव - कट (तृणविशेष) खा व

कोडधें - कटधं (कटतृणावरून) मा

कड-हाण - कट (तृणविशेष) - कटारण्यं. खा व

कडवान - कट (तृणविशेष) - कटवाहनं. खा व

कडारी - कट (तृणविशेष) - कटागारिका. खा व

कंडारी - कांडेरिका (तांदुळजा ). २. खा व

कडेगांव - कटकग्रामं = कडेगांव

कंडोली - सं. प्रा. कंडवल. कछ (शि. ता.)

कड्याळे - कटि (पिंपळी) - कट्यालयं. खा व

कढई - क्रथ (यदुवंशीय लोक) - क्रथावती. खा म

कणूर- सं. प्रा. कर्ण्णपुर. वांई, यल्लापूर. (शि. ता.)

कणूर - कर्णपुरं = कणूर, काणूर

कण्हेर - कणिकारा. खा न

कण्हेरखेड - कन्हगिरि. ( कान्हेरी पहा )

कण्हेरवाडी - कर्णिकार. खा व

कण्हेरी - कर्णिकार. खा व

कण्हेरी - कन्हगिरि. (कान्हेरी पहा)

कण्हेरें - कर्णिकार. ३ खा व

कथवान - क्रथ ( यदुवंशीय लोक) - क्रथवाहनं. खा म

कंदाण - कंद. खा व

बिचकणें १ [ विजू ३ भयचलनयोः. विजकाम्यति = बिचकणें ] भयानें चलन पावणें. (धा. सा. श.)

-२ [ बिचक् (चक् भिणें) = बिचकणें. (भा. इ. १८३६)

बिछाना [ विशायः ( Turn of sleeping पाणिनि ३-३-३९ ) बिशायनः = बिछाना ] sleeping clothes.

बिजवर [ बिजामातृ one who has purchased a wife = बिजवर a man who marries a second. wife of course with money. द्वितीयवर ह्या शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं.

बिजागरी [ बीजार्गला = बिजागरी ]

बिजौरा [ बीजपूरक = बिजौरा ] (भा. इ. १८३४)

बिटा [ वृथा ] (बेटा पहा )

बिडती [ द्विधागतिः, द्विधास्थितिः = बिडती ] दोहोंकडून अडचणीची स्थिति.

बिडलोण [ विड्लवण = बिडलोण ] (भा. इ. १८३६)

बिंडा [ व्द्यंडकः = बेंड्या having two testicles, बिंडा (a proper name in मराठी) ].

बिडाल [ विटाद = बिडाल ] विट म्हणजे उंदीर व अद म्हणजे खाणारा - मूळ संस्कृत शब्द विटाद. त्याचा अपभ्रंश बिडाल. कालान्तरानें विटाद शब्द मागें पडून बिडाल शब्द च संस्कृत म्हणून रूढ झाला.

बित्तंबातमी - बातमी हा बातनी ह्या फारसी शब्दापासून मराठींत आला आहे व बित्तं हा शब्द संस्कृत वृत्त शब्दापासून किंवा विवृत्त शब्दापासून निघाला आहे.
वृत्त = वित्त = बित्त.
विवृत्त = बिवत्त = विअत्त = बित्त.
विवृत्त म्हणजे विशेष वृत्त.
बित्तंबातमी हा मुसलमानी अमलानंतर मराठींत जोडशब्द बनला आहे. बित्तं म्हणजे बातमी. (भा. इ. १८३६)

बिथरणें [ वितर्जन = बिथर्रण = बिथरणें. वितर्ज् गर्हायां । ] (भा. इ. १८३३)

बिदा [ विद्या = विदा ] ही बिदा तुम्ही कोठें शिकलां = इयं विद्या युष्माभिः क्वाधीता ?

बिदा करणें [ वि + दा to grant = विदा करणें ] to grant, to gift.

बिंदुलें [ बिंदु a detached partical. बिंदुल: तस्य भावः बैंदुल्यं detachment वेगळेपणा. बैंदुल्यं = बिंदुलें. बिंद अवयवे to split, to detach ( ज्ञा. अ. ९ )

बाहुल [ पुत्तल = वुत्तल = बुअल = बउल = बाहुल ( ला-ली-लें ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. २६ )

बाहुली १ [ भावली (गारोड्याचें हावभाव करणारें लांकडाचें मनुष्याकृति यंत्र ) ] (स. मं.)

-२ [ पुत्तलिका = (बुहली) = बाहुली, बाव्हली, भावली, भाउली. पुत्तलकं = बाहुलें ]

बाहुलें [ पुत्तलकं ] ( बाहुली २ पहा)

बाहू [ बाह = बाहू ] (स. मं.)

बाहेरचें [ बहिस्थं ] (कोठचें पहा)

बाळ [ बाल = बाळ ] (स. मं.)

बाळगणें [ वल्गु १ माधुर्ये, पूजायां. वल्गूयति = बाळगतो. ] गाय बाळगणें म्हणजे तिशीं माधुर्यानें वर्तन करणें. (धा. सा.श.)

बाळंत, बाळंतीण [ बालांतर्वत्नी ] (बाळांतीण पहा)

बाळंतें [ बालांतर्वत्नीवस्त्रं = बाळंतें ] बाळंतिणीचीं वस्त्रे.

बाळसें [ बालिश्यं = बाळसें. ब्राह्मणादि गण ]

बाळांतीण [ बालांतर्वत्नी = बाळांतीण, बाळंतीण, बाळंत ]

बाळिंगा [ बाललिंग: = बाळिंगा ] तरुण एडका.

बाळी [ भल्ली = बल्ली = बाली = बाळी ] अलंकार. कस्तूरी तिलकं बाले भाले भल्ली विराजते.

बाळें [ बाल्यं = बाळें ] म्हातारचळ.

बि [ वि = बि ] करणेंबिरणें =विकृ. निजणेंबिजणें = विनिद्रा. बि नें हजारों धातू मराठींत संस्कृतांतल्याप्रमाणें होतात.

बिंग [ व्यंग = बिंग ] (भा. इ. १८३४)

बिंगाट [ व्यंगार्थ ] (बिंगाड पहा)

बिंगाड [ व्यंगार्थ the state of being crippled = बिंगाड, बिंगाट ] व्यंग.

बिग्राणी [ विक्रेणी ] ( जवकिरा २ पहा)

बिघा १ [ (द्विगुः) द्वैगवः = बिघा ] बिघा म्हणजे दोन बैलांनीं नांगरली जाईल इतकी जमीन.

-२ [ द्विग्रहक = बिघअ = बिघा ] (ग्रंथमाला)

बिघाड १ [ विघटन = विघडन = बिघडण = बिघडण नाम, बिघाड ] (ग्रंथमाला)

-२ [ अभिघात = बिघाड ] (भा. इ. १८३६)

-३ [ विघात = बिघाड ] (भा. इ. १८३६)

-४ [ बिघाटः = बिघाड ] (भा. इ. १८३६)

बावा १ [ वर्मन, गोविंदवर्मन् = गोंदबावा ]

-२ [ भवत् ] (बवा पहा)

-३ [ भगवत् ] ( बोवा पहा )

बावासा [ भवादृशः = बावाइसा = बावासा.
त्वादृशः = तूसा.
मादृशः = मीसा.
कृष्णदृश: = कृष्णसा.
तात्पर्य हा स (सा-शी-सें) प्रत्यय दृश ह्या संस्कृत प्रत्ययापासून आलेला आहे व तो मराठींत वाटेल त्या नामाला लागतो. ] (भा. इ. १८३४)

बाव्हटा १ [ बाहुपुटक: = बाव्हटा ]

-२ [ बाहुअस्थि = बाव्हड्डि = बाव्हटी, बाव्हटा ]

बाव्हली [ पुत्तलिका ] ( बाहुली २ पहा )

बाव्हळ [ बाहुमूल = बाव्हळ ] The base of the arm.

बासट [ सट्ट]

बांसड [ वंशान्धः = बांसड ] टिरी.

बासन १ [ मृज्जनं ( तवा, कढई इ. शिजविण्याचीं भांडीं ) = बासन. ]

-२ [ वसनस्य इदं वासनं. वासन = वासन ] वसन (वस्त्रें ) बांधण्याचें कापड तें बासन. ( भा. इ. १८३३)

-३ [ भाजन = बासन ] बासन म्हणजे भांडें. (भा. इ. १८३४)

बाहणा [ भावना = बाउणा = बाहणा ] बाहाना हा फारसी शब्द निराळा. बाहणा म्हणजे भावकरण.

बाहणें १ [ आवाहनं = बावाहणँ = बाहणें ] बाहणें म्हणजे बोलावून आणणें. हा शब्द जुन्या मराठींत आढळतो. (भा. इ. १८३४)

-२ [ बाह् १ प्रयत्ने. बाहनं = बाहणें ] बाहणें म्हणजे आपलेकडेस आणण्याचा प्रयत्न करणें. ( धा. सा. श. )

-३ [ व्याव्हानं ] ( बाहाणें पहा).

बाहवा [ व्याधिघातः = वाहिहाआ = वाहावा = वाहवा ]

बाहाणें [ व्याव्हानं = बाहाणें, बाहणें ] व्याव्हे म्हणजे निरनिराळ्या माणसांना निरनिराळें बोलावणें. (भा. इ. १८३६)

बाहार १ [ व्याहृति ( मधुर नर्मभाषण) = बाहार ] ह्या गाण्यांत काय बाहार आहे ?

-२ [ व्याभारः = वाहार = बाहार किंवा भारः = बाहार ] (भा. इ. १८३४)

ऐचाळें - इच्छिका - ऐच्छिकवनं. खा व

ऐनपूर -ऐन. खा व

ऐनें -ऐन. खा व

 

ओझर्डें - हें गांव वांईपासून चार मैलांवर आहे.
अवझरवाटः = ओझरवाड = ओझरआड = ओझराड = ओझरड = ओझर्डँ = ओझर्डें.
ज्या गांवाला धो धो वाहाणार्‍या झर्‍याचें किंवा ओढ्याचें पाणी वैशिष्ट्यानें आहे तें. अवझर = धो धो वाहणारा ओढा. ( सरस्वतीमंदिर)

ओतूर - ओतुः (मांजर) - ओतुः पुरं. खा इ

ओरपें - औरभ्र (ग्रामं. मेंढ्यांची लोंकर होणारें गांव). मा

 

औढ्या जगन्नाथ - औढ्रो जगन्नाथः = औढ्या जगन्नाथ

औरंगपूर - खा मु

 

कउटखेडें - कपित्थखेटकं. खा व

कंकराज - कंक: (करकोचा) - कंकराजि. खा इ

कंकराळ - कंकर (गृध्र) कंकरालयं. खा इ

ककाणी - कर्क ( कांकडी) - कर्कवनी. खा व

ककाणें - कर्क ( कांकडी). खा व

कंचनपूर - कंजनः (मैना) - कंजनपुरं. खा इ

कचरें - कच्छुरं (धमासा कुइली ). खा व

कचवाण - कच (वाळा ) खा व

कंची - सं. प्रा. कांची. अंकेला (शि. ता.)

कंचेवाडी - सं. प्रा. कांची. बेळगांव (शि. ता.)

कच्छ - (भडोच पहा)

बारबोडी [ बारवधूकः ] ( बारबोड्या १ पहा)

बारबोड्या १ [ बारवधू- बारवधूक: (रांडांचा नायक, कुंटण, नपुंसक) = बारबोड्या ]

-२ [ द्वारमोट्कः = बारवोडआ = बारबोड्या ] बारबोडी गाय, बारबोडा घोडा, बारबोडें डुकर म्हणजे सबंद दारचें दार मोडणारी गाय, घोडा किंवा डुकर. हा अपशब्द मराठींत गणतात, परंतु तसा प्रकार नाहीं. खुंटमोडओ हत्थी = खुंटबोड्या हत्ती. (भा. इ. १८३६)

बारव [ वारिवह् = बारिव = बारव ] एक प्रकारचा वाहता कूप.

बारा [ व्द्यपरदशन्] ( अकरा २ पहा)

बारी [ द्वारिका ( दार ) = बारी ]
बाहेरबारी = बहिर्द्वारिका.
नगरबारी = नगरद्वारं.
चारबारी = चतुर्द्वारिका.

बारीक १ [ वरीयस्क excellent, superior = बारीक ] superior.
बारीक काम तो स्वतः करतो he manipulates the superior work.

-२ [ अर्भक small = (अलोप ) बारीक ] small.

बार्गळ [ व्यर्गलं = बार्गळ. व्यर्गलं = निरर्गलं ]

बार्डी १ [ वार्धिः = बार्डी ] बार्डी म्हणजे पोहरा. वार्धिः म्हणजे पाण्याचा सांठा.

-२ [ वार्धिः = (ocean, receptacle of water) = बार्डी ]

बाल [ वाल = बाल ] कोवळे केस. (ग्रंथमाला, स. मं.)

बालंट [ व्यलीककटं = बालिअअट = बालट = बालंट ]

बालू [ वल्लव (गुराखी) = बालू ] गुराखी लोकांना संस्कृतांत बल्लव म्हणत. कोंकणांतून मुंबई वगैरे शहरीं घरकाम करण्याकरितां जे कोकणे येतात त्यांना सर्वांना बालू म्हणतात. हे सर्व पूर्वी गुराखी होते.

बावची [ वाकुची = बावची ]

बावरणें [ बाभ्रश्यते ( भ्रंश) = बावरणें ] बावरणें म्हणजे अतिशय भ्रंश पावणें. (भा. इ. १८३६)

बाँवरणें [ भ्रम् ( बंभ्रम्यते ) = बाँवरणें ] ( भा. इ. १८३६ )

बावळ [ व्याकुल = बाउळ = बावळ ( ळा-ळी-ळें ) ] भयव्याकुलः = भयानें बावळा. (भा. इ. १८३५)

बापदादे - जन्म देणारे व अन्न देणार, (स. मं.)

बापु [ चातक ह्या अर्थी बापु शब्द महाराष्ट्रींत आहे. ज्ञानेश्वरींत बापिया असा शब्द आहे. हा शब्द संस्कृत पा धातूपासून आला आहे. पा = पिणें. पपु = पिणारा. पपुरेव पापु:. पापु = बापु = बापिया, बापु ] बापु म्ह० चातक. (भा. इ. १८३२)

बापुचातक - ज्ञानेश्वरींत बाप, बापु हा शब्द ह्या अर्थी येतो. त्याचें मूळ प्राकृत बप्पीहो. घनपालाच्या पाइलच्छी खालील शब्द आहेत:-
गहरो वओ या गिद्धो सारंगो चायओ य बप्पीहो ॥ १२६ ॥
ज्ञानेश्वरींतील चातकार्थक जो बापु शब्द तोच मराठींतील पुरुषवाचक प्रेमार्थी बापु शब्द होय. (स. मं.)

बापुडीं [ पापधियः, पाषिष्ठाः ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४४ )

बापू [ वापीह ] (बप्पीह पहा)

बापूस, बाप्या [ वप्तृ ] (बाप २ पहा )

बाबजादे = बापाची पोरें ( बिनबापाच्या पोरांहून भिन्न ) जाद हा फारशी शब्द आहे. (स. मं.)

बाबरझाटी [ वर्वरीकः ( कुटिल केशः ) = बाबर ] बाबरझाटी म्हणजे कुटिल केशांचें जुंबाड.

बाबा [ भावः = बाबा ] (भा. इ. १८३४)

बाभूळ [ बभ्रुल = बब्भुल = बाभुळ = बाभूळ = बाभळ ] बभ्रु रंग ज्या झाडाच्या सालीपासून निघतो तें झाड. बाभळी रंग भगव्या रंगाहून निराळा असतो. भगवा रंग जास्त चकाकणार असतो. बाभळी रंग फिकट व निस्तेजस्वी असतो. (भा. इ. १८३३)

वामणबुवा [ ब्राह्मणब्रुवः = बामणबुवा ] (भा. इ. १८३४)

बाय [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बॉय Boy [ पोत = वोअ = वोय = Boy ] (भा. इ. १८३३)

बायको १ [ वामिका + अवावा ] (बाइको पहा)

-२ [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बायडी, बायरूं [वामातरी = बाइरी, बायडी. प्रेमदर्शक बायरूं ]

बायो [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बार [ भार: = बार ] बंदुकींत बार भरणें म्हणजे दारूचें द्रव्य ठासणें.

बारगीर [ वारकीर: ( Porter ) = बारगीर ] वारकीर म्हणजे हमाल.
लाख्या बारगीर, ह्या प्रयोगांतील बारगीर शब्द संस्कृत वारकीर शब्दापासून निघालेला आहे. फारशी बारगीर शब्द निराळा. (भा. इ. १८३६)

बारडी [वार्धिः (वार्+धिः ) = बारढी = बारडी ] पाणी सांठवण्याचें भांडें.