पत्रांक ४३.
इ. स. १७६७ ता. १२ आगष्ट. श्रीकृष्ण. श्रावण वद्य ३ शके १६८९
श्रीमंत राजश्री चिंतापंत तात्या स्वामीचे सेवेसी
सेवक नानाजी कासी व जिवाजी कासी एवलेकर मुक्काम ज्यणस्तान (जनस्थान ) नमस्कार विनंती उपरी. रा। गोविंदराव माहादेव यांनी वरात रा। केदारजी सिंदे यांजवर दिली रुपये ११७०८॥ अकरा हजार सातशें साडेआठ. हेवरात वसूल करून खामख्हा स्वाधीन रुपये आले म्हणजे याची तिजाइ१ आम्ही स्वामीस देऊं बाकी ऐवज आम्हीं आपला घेऊं. हें लेहून दिल्हें सही हस्ताक्षर जिवाजी कासी शके १६८९ सर्वजित नाम संवत्छरे श्रावण वदि ३