पत्रांक ४२.
१७६७ ता. २८ जुलई श्रीपांडुरंग १६८९ श्रावण शुद्ध
राजश्रिया-विराजित-राजमान्य-राजश्री चिंतोपंत तात्या स्वामीचे सेवेसी-.
पो १त्र्यंबकराव माहदेव व गोविंद माहादेव साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहावें. विशेष. आपणास राजश्री केदारजी सिंदे व रा। माहादजी सिंदे यांजवर वरात रुपये १९०४५ एकूण चाळीस हजार पंचेचाळीस रुपये देविले तपसील
*![]() |
४१३६ | नानाजी नाईक व जिवाजी नाईक येवलेकर बा। |
७५७२॥ | यादोराव रघुनाथ भागवत वगैरे ता। ५७९५ खुद्द मशारनिले २०५ गोविंद बल्लाळ खांडेकर ५०० आबा दीक्षित १०७२॥ व्याजा बा। ---------- ७५७२॥ |
|
७३३६॥ | धोंडाजी जगनाथ रेघे बा। | |
-------------- | ||
१९०४५. |
सदरहू एकूणीस हजार पंचेताळीस रुपये यांची वरात दिल्हे आहे. रुपये आपणास न पावले तरी रुपये व्याजसुद्धां आह्मीं देऊं. मिती श्रावण शुद्ध ३ त्रितीय। शके १६८९ सर्वजित् नाम संवत्छरे. बहुत काय लिहिणे हे विनंति.