Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३५.
इ. स. १७६७ ता. ३ जुलई श्री. १६८९ आषाढ शुद्ध ७
राजश्री भिवजी सिवदेव कमाविसदार प्र॥ येदलाबाद गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मीअलंकृत-राजमान्य स्ने॥ १सखुबाई सिंदे दंडवत सु॥ समान सितैन मया व अलफ रामचंद्र हरी याची मुजमूची असामी परगणेमजकुरीं होती ते दूर करून हाली सनमजकुरा-पासोन शामराज हरी याजकडे सांगितली असे. यासी वेतन सालिना रुपये ५०० पांचसे नेमून दिल्हे आहेत. मशारनिलेच्या हातें मजमूचें काम-काज घेऊन सदरहू पांचसे रुपये साल दरसाल परगणेमजकूरच्या ऐवजीं पावते करणें परगणेमजकूरच्या ऐवजी पावते करून स्वामी-सेवा घेणे. जाणिजे छ ६ सफर बहुत काय लिहिणें हे विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३४.
इ. स. १७६७. ता. ९ जून श्री. १६८९ जेष्ठ शु. १२
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
सेवक १रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समान सितैन मया व अलफ शिंद्याचे डौलाची फडणीसी देखील मुतालकीची, पेशजी सांगितली आहेच ते बक्षीस तुम्हांस दिल्ही असे. एक-निष्ठेनें सेवा करणे * जाणिजे छ ११ मोहरम बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३३.
इ. स. १७६७ ता. ६ जून श्री. १६८९ ज्येष्ठ शुद्ध ९
राजश्री चिंतोपंत-तात्या गोसावी यांसिः—
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असले पाहिजे. विशेष. राजश्री सदा शिव केशव यांची बोली करून नालबंदी सन सबा पैकीं पंच्यवीस हजार रुपये दिल्हे होते त्यास सदरहू ऐवजाचा भरणा तुह्मीं आपले विद्यमानें करून दिल्हा ऐवज बि-तपशील रु।।
४२०० खरीदी घोडे रास २ एकूण किंमत रुपये
२२०० पाटिलबावाकडे
२००० खाशाकडे
-----------
४२००
२५०० पागेच्या खर्चास ऐवज तसलमात
११४६ अवचितराव गणेश यांस वस्त्रें दिलीं ते दिवशीं सडे
स्वारीनिशी श्रीमंताकडे आलों सबब खर्चास रोख रुपये
१५००० सदाशिव केशव यांजकडील शिलेदार चाकरीस आले त्याज बाबत रुपये
८००० नालबंदी
३००० रोजमरे
४००० रवानगी समजवीस
-----------
१५००० मिळोन रुपये
२१५४ खाजगीखर्चास खाशाकडे रोख रुपये
-----------
२५०००
एकूण पंच्यवीस हजार रुपये ऐवज तसलमात नालबंदी बाबत ऐवज येणे होता तो ऐवज सदरहू प्रों भरणाकरून दिल्हा त्याजप्रों ऐवज जमा असे. याज उपरी नालबंदीच्या ऐवजाचा गुंता नाहीं. रा। छ ८ मोहरम सुहुरसन समान सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणे हें विनंति.१
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३२.
इ. स. १७६७ ता. ५ जून श्री. १६८९ ज्येष्ठ शुद्ध ८
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी२ सिंदे दंडवत विनंति उपरी एथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष तुम्हांकडे नालबंदी बा। ऐवज येणें रुपये २५००० पैकीं खाचरोदची वरात पावली नाहीं३ (?) रुपये ५००० बाकी वीस हजार येणें त्या पे।। रुपये
४००० खा। घोडे तुम्हांकडून घेतले त्याची किंमत
२००० राजश्री पाटिलबावाकडे
२००० राजश्री केदारजी सिंदे यांजकडे
---------
४०००
८००० सिलेदार यांची सालगुदस्ता चाकरी केली गागरे
व मावळे मिळोन आ।।५० चाकरीस होते त्यांस पावलें नाहीं.
५००० नालबंदी
३००० रोजमरे खर्चास
---------
८०००
४००० उसनवारी घेतले तुम्हांकडून
----------
१६०००
सोळा हजार बाकी रुपये ४००० च्यार हजार रुपये राहिले ते राजश्री विष्णु महादेव यांस रद्दकर्जी पाविले. तरी पावते करून कबज घेणें. रा। छ ८ मोहरम हे वि।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३१. *
१७६७ ता. ९ जान्युआरी श्री. १६८८ पौष शुद्ध १०
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत-विनंति उपरि. येथील क्षेम ता छ ८ साबान परी( येत ) वर्तमान यथास्तीत असे. येथील वर्तमान तर बाळाजीपंत लि।। याजवरून कळेल. आमचें वर्तमान तर पूर्वी मांडव्याचे१ मुकामीं जें जालें तें प्रतेयास आलेंच असें. विशेस लि।।वें ऐसें नाहीं. तुमचें आमचें बोलणें x x x तें करारच आहे. गुंता नसे. बहुत काय लिहिनें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३०.
इ. स. १७६६ ता. १७ नोव्हेंबर श्री. कार्तिक वद्य १ शके १६८८
राजश्री त्रिंबकराव चिंतामण व माधवराव व सदाशिव कमाविसदार पा खाचरोद वगैरे माहाल गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ जनकोजी२ शिंदे (?) दंडवत सु।। सबा सितैन मया व अलफ. पो रतलाम येथील मजमू सालमकुजरापासून राजश्रीं बापूजी गोपाळ यांस सांगून तैनात सालिना रु॥
५०० जातीस रु॥
१२५ अपतागिरा व मसालची (मशालजी) मिळोन सालिना रु।।
-----
६२५
एकूण सवा साशे रुपये तैनात सालिना शागीर्दपेशा व जातीस मिळोन करार केली असे तरी तुह्मी परगणेमजकुरचे मजमूचे काम मशारनिलेच्या हातें घेऊन सदर्हूप्रमाणें वेतन सालिना पावत जाणें. जाणिजे छ १४ माहे जमादिलाखर बहुत काय लिहिणें हे विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २९.
१७६६ ता. १७ आक्टोंबर श्री. श्रावण वद्य ५ शके १६८८
असल बा। नकल
वेदशास्त्र-संपन्न राजश्री मोर-जोशी बीन विठ्ठल जोशी राईरकर गोत्र अत्री, सूत्र आश्व-लायन, वास्तव्य मौजे उरवडें तार मुठें-खारें, गोसावी यांसि स्ने।। सखुबाई३ शिंदी दंडवत सु।। सबासितैन मया व अलफ. तुम्हीं को। श्रीगोंदे येथील मुकामीं येऊन विदित केले की ‘आपण कुटुंब वत्छल, स्नानसंध्यादिक शट्कर्मे आचरोन राज्यास अभीष्ट चिंतन करीत आहों. तरी कृपाळू होऊन योगक्षेम चालविला पाहिजे’ म्हणोन त्याजवरून मनास आणितां तुम्हीं थोर ब्राह्मण, सत्पात्र, स्नानसंध्यादिक शट्कर्मे आचरोन राज्यास अभीष्ट चिंतन करितां, हे जाणोन (व) तुमचे चालविल्यास श्रेयस्कर जाणोन तुम्हांवरी कृपाळू होऊन नूतन इनामी गांव पैकीं
१ मौजे भुसावळ ता। साकेगांव प्रो एदलाबाद प्रां खानदेश येथील तनखा टक्के ४२०० पैकी खेरीज मोकासा करून, दरोबस्त अमल रुपये
१ मौजे चोपडगांव पो शेवगांव सरकार अमदानगर एथील तनखा १९८६ रुपये खेरीज मोकास, बाबती, सरदेशमुख करून, दरोबस्त बाकी जाहगिरीचा अमल मोगलाई.
--
२
ए।। दोन गावचा अम्मल जलतरु-काष्ट-पाशाण-निधीनिक्षेप आम्ही (अमल?) करून हाली-पट्टी व पेस्तरपट्टी सुद्धां इनाम१ करार करून दिल्हा असे. तरी तुम्ही व तुमचे पुत्र-पौत्रादी वंशपरंपरेनें गावचा अम्मल अनुभवून सुखरूप राहाणें. जाणिजे छ १२ माहे जमादिलावल हे विनंति मोर्तब असे.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २८.
इ. स. १७६६ ता. २४ अगष्ट श्री. श्रावण वद्य ५ शके १६८८
पुरवणी राजश्री केदारजी शिंदे गोसावी यांसिः
सकलगुणाळंकरणअखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। रघुनाथ१ बाजीराव आशीर्वाद. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. राजश्री मोरो२ विठ्ठल यासी तुह्मांकडील मुलकी व फौजदारी कुलडौलाची फडणिशी पेशजी प्रमाणें करार केली असे. तर याचे हातून कुलडौलाचे फडणिशीचें कामकाज घेत जाणें. जाणिजे छ १७ रबिलाखर सु॥ सबा सितैन मया व अलफ* बहुत काय लिहिणे ? हे आशिर्वाद.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २७.
इ. स. १७६६ फेब्रुवारी, मार्च श्री. १६८७ फाल्गुन
पुरवणी१ राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः-
दंडवत विनंती उपरी. तुह्मी ऐवजाची काळजी न करावी. सर्व संशय दूर करून कोठें न गुंतता मजल दर मजल सत्वर येऊन पोहोचावें. भेटीनंतर सर्व खुलासे परस्परें कळोन सर्व गोष्टी मनोदयानरूप होऊन येतील. आपलें आमचें पूर्वी वचन-प्रमाण जालें त्या अन्वयावर व येथून वरचेवरी आपणास लिहीत गेलों त्यावरून आपण चार रु।। कबूल करून सरदारीचा बंदोबस्त केला, ऐसें असतां हाली (हल्लीं) तुम्हासीं दुसरा प्रकार करूं हें आपल्यातरी चित्तांत येते कीं काय ? असो. अतःपर काडीमात्र द्वइतार्थ न धरितां जलद येणें व्हावें. वरकड येथील कितेक अर्थ राजश्री विश्वासरावजीस सांगितले आहेत. त्यांचे लिहिल्यावरून कळेल, आमचे* व आपलें पूर्वी वचन आहे तेच जानावें. द्वयतार्थ किमपीही न मानावा. आमचे पक्षास किमपीही अंतर होणार नाहीं. हाच निश्चय जानावा. आनि सत्वर यावें. भेटीअंती-सर्व उत्तम तेंच होईल. बहुत काय लिहिणें हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २६.
इ. स. १७६५ ता. २३ नोव्हेंबर. श्री. १६८७ मार्गशीर्ष शुद्ध ११
पुरवणी राजश्री नारोपंत२ गोसावी यासिः-
विनंती उपरी. ‘सरकारांत ऐवज द्यावयाचा करार जाहला,’ त्याची तजवीज करून उजनीस ऐवज जमा करावा’ म्हणेन लिहिलें ऐसियासी येथील वोढीचा प्रकार तुम्हास दखलच आहे. परंतु तुह्मी मान्य केलें तें आम्हींहि कबूल केलें. तुमच्या लिहिल्यावरून तूर्त हप्तीयापैकीं कांहीं ऐवजाची तर्तूद येथून करून पाठवून देतों. संशय न धरावा. फडनिसी वगैरे कितेक मजकूर लिहिला आहे त्याचा बंदोबस्त करून घ्यावा. ऐवज पाठवून देऊं. रा। छ ९ जमादिलाखर हे विनंती.