Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २५.
इ. स. १७६५ ता १८ सप्तंबर श्री. १६८७ आश्विन शुद्ध ३
राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणेन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आजपावेतों रा. गणोजी कदम व गोविंदराव महादेव व मोरो विठ्ठल यांचे मायेंत x x x मिळोन दरबारी खूळ केलें. श्रीमंतासी अनेक भास भासवून तुम्हांकडे श्रीमंताची मर्जी पूर्ण होती त्यांत अंतर पाडलें. यावरून तुम्ही रा।. अंताजी विश्वनाथ, राजश्री विष्णु महादेव याजवळ, ठेऊन नाशकास गेला. मागें श्रीमंतांनीं नवें मुद्दे घातलें कीं, ‘(१) दोन लक्षाचा सरंजाम सरंजामांतून द्यावा, व (२) सरदारास एकटे भेटीस आणावें,’ ऐसीयासि त्याजकडे एकही निश्चय जाहला नव्हता. जाबसाल मात्र उभयपक्षीं श्रीमंत करीत असतां तुम्हांकडे याज शिवाय नवा मुद्दा आणिक घातला कीं ‘सरंजाम शिंद्यांनीं तुम्हांस१ दिल्हा तो देखील सरकारांत द्यावा. व तीन लक्ष त्याजहून शिवाय माहादाजी गोविंद मृत्य पावले यामुळें द्यावे’ म्हणोन. ऐसियासि प्रस्तुत गणोजी कदम (व) गोविंदराव याकडून जाबसाल होईनासा पाहून विष्णु माहादेव याचें मायेंत शिरोन-श्रीमंताचे आज्ञेनरूप विष्णुपंत व अंताजीपंताकडून कबूल करवितात, म्हणोन वर्तमान ऐकिलें. त्यास त्या लबाडाच्या म्हटल्यानें सरंजाम कोण देतो ? पूर्वीपासून तुमच्या सल्याप्रमाणें पैकामात्र द्यावा. बनला तर माघे सरंजाम श्रीमंतांनी घेतला तो हस्तगत करावा. तेव्हां पुढें सरंजाम कसा देवतों ? आपण विचाराचे मागें पाहावें. गणोजी कदम यासीं सहसा आपण या जाबसालांत न घ्यावें. दरबारीं याचें पारपत्य यथास्तित होय तें करावें. दुसरें जें कोणी ऐसीं कर्मे दरबारीं करूं न पावें तें करावें आणि सरंजामाचा जाबसाल कबूल न करावा. दरबारचा रंग पाहून पैका मात्र कबूल कराल तो आह्मास मान्य असें. गणोजी कदम या खेरीज जो जाबसाल तुह्मी कराल तो आम्हास मान्य होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवावें. रा. छ २ रबिलाखर *बहुत काय लि।। लोभ असो दिजे हे विनंती. (पौ) छ २७ माहे रबिलाखर सन सीत सितैन मु।। नाशिक.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २४.
१७६५ ता. ६ सप्तंबर. श्रीशंकरवरद. १६८७ भाद्रपद वद्य ७
श्रीमत् राजश्री नाना स्वामीचे शेवेसीः-
पो चिंतो विठ्ठल व चिंतो अनंत सा। नमस्कार विनंती. येथील कुशल ता। छ १९ रबिलोवल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आपणांस श्रीमंतांनीं१ इमान दिल्हें व पत्र आपले पर्वत-विषई२ (?) सरकारांत होतें तें माघारें दिल्हें. त्यास आपणासी बोलणें ते श्रीमंत बोलले आहेत. त्याप्रो श्रीमंतांनीं इमानपुरसर कृपा आपल्यावरी-करावी याविषई आम्हींहि आपल्यास वचन द्यावें, त्यास आपण श्रीमंतांचें सेवेत पूर्वीपासून एकनिष्ट आहेत, त्यास श्रीमंतांनीं जें कृपा करून इमान दिल्हें, व वचन दिल्हें आहे त्याप्रों आह्मीं श्रीमंतास विनंती करून वचन चालवावें. येविसीं आम्हापासून अंतर होणार नाहीं. आपण दुसरा प्रकार व कोणीकडीलहि संदेह चित्तांत न आणावा आणि यावयाचें करावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २३.
इ. स. १७६५ ता. ३० आगष्ट. श्री. १६८७ भाद्रपद शुद्ध १५
राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः—
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ महादजी शिंदे दंडवत. विनंति उपारि. येथील कुशल ता। छ १२ रा।वल मुकाम नजीक बकाणे पा। हांडोती जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. सांप्रत आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर लेखन करावें. यानंतर दरबारचे बंदोबस्ताविशीं पेशजी पांच सात पत्रें तुम्हांस पाठविलीं. त्यांस तुम्हीं एक दोन पत्रें पा।. तेथें लि॥ कीं ‘आम्ही सर्व बंदोबस्त करून घेतों. आपण कोणेविशीं चिंता न करावी’ म्हणोन ऐसियासि आम्हीं तों आपल्या लक्षावरी बेफिकीर आहों. तुम्हांखेरीज दुस-यासी बोलणेयाचा प्रकार किमपि नाहीं. असे असोन अद्यापि आपणाकडून कांहींच बंदोबस्ताचा प्रकार दिसोन येत नाहीं, अथवा पत्रहि येऊन वर्तमान कळत नाहीं. यावरून अपूर्व आहे. या उपरि तरी बंदोबस्ताचा विचार काय केला हें सविस्तर ल्याहावें. आपण जे करतील ते आम्हांस मान्य असे. आपले मनोदयानरूप बंदोबस्त होऊन चार रुपयेचे वरी जाबसाल ठरला तरी आपण मान्य करून लेहून पाठवावें. तूर्त पांच लक्ष पावेतों हुंड्या आपणाकडे पाठवून देऊं. भरंवसा आपला असे. गणोजी कदम तेथें कितेकप्रकारें घालमेल करीत आहेत. तुम्हांसहि भलतेंच समजावितील. तर आपण त्याचे मनास न आणावें. जें करणें तें आपले विचारें करावें. ते आम्हांस मान्य असे. वरकड कितेक राजश्री बाजी नरसिंह यांचे पत्रावरून कळेल. बहुत काय लि।। ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
मधींच लबाडी आपला जीव वाचवावयासी फितूर करीत आहे. तर गणोजीस उत्तम प्रकारें शिक्ष्या करून काहडून देणें ऐंसें निक्षूनतेनें पत्रीं विस्तारयुक्त लि।। आहे.’ यास अंतर सहसा नाहीं. आपणांस त्यापत्राबरोबर हा मजकूर लिहिलाच असे. येथील आमच्या येजमानाचा कायावाचें-करून गणोजीकडे किंचितही अंश नाहीं, ऐंसें असोन तेथें लबाडीनें जाबसाल करितो आणि आपण प्रसंगीं असतां, त्यांसी हरएक जाबसाली पेचून१ माकूल करीत नाहींत हे अपूर्व आहे ! आह्मी तर आपले दिवाणगिरीकरितां इतका बखेडा करून खूळ दूर केलें. ऐंसें असतां आपण चित्त या कामांत घालीत नाहींत आणि जैसें गणोजी बोलतो तैसेंच उगेंच श्रवण करितां, हें काय मर्जीस आपलें आहे हें न कळे. सरकारच्या नजराण्याकरितां वगैरे दूर-अंदेशा ध्यानास आणीत असलात तर आपण व राजश्री विष्णुपंत-बाबा जो दरबारीं सरदारीच्या बंदोबस्तीकरितां नजराणा व दरबार-खर्च वगैरे जो कबूल कराल तो आम्हांस कबूल असे. यासी अनेथा सहसा न जाणावी. जे समयी आपण तेथील निश्चांत (निश्चयांत ) डौल आणून लिहितील तेच समयीं पत्रदर्शनीं पांच लक्ष रुपये रोकडी स्वामीपाशीं पोंहचावितों. मुख्य आपल्या पत्राची मात्र प्रतीक्षा आहे. नाना ! शर्त हेंच की गणोजीने उपमर्द करून राजकारण ओढून न्यावें आणि आपल्या हातचा अर्थ त्यानें साधावा ! मंग काय ? रुपयासी अगे मागें न पाहतां जैसा जैसा डौल दिसेल तैसा तैसा साधून आपल्याच हातें सरदारीचा बंदोबस्त होय तो अर्थ साधिला पो. परंतु हा समय रक्षिल्यानें बहुत उपयोगीं आहे. मुख्य दाय दुसरियास येश घेऊ न द्यावे. आपण तपोनिधी आहेत. आपल्या तेज्यापुढें शूद्राचें सामर्थ्य किती ? चित्तावर धरल्यास हल( कें ? )च असे. आम्ही तर आपल्या भरंवसियावर हरएक प्रकारें निश्चिंत आहों. श्रीमंत राजश्री रावसाहेबांपाशीं व राजश्री बापूंपाशीं भीड खर्चून आपल्या हातें सरदारीचा बंदोबस्त करून घेतला पो. वरकड वर्तमान श्रीमंत राजश्री पाटीलबावाच्या पत्रावरून निवेदन होईल. कितेक अर्थ राजश्री शिवाजी विठ्ठलाच्या पत्रावरून श्रवणगोचर होतील. वरचेवर पत्रीं स्वानंदविलें पो. असेंहि करितां तेथील मर्जी पूर्णत्वेंकरून ऐसीच असली कीं विना पाटीलबावा भेटल्यावांचून बंदोबस्त होत नाही ऐसेंच निःकपटेंकरूनच असलें तर श्रीमंत राजश्री पाटिलसाहेबांस पंचवीस हजार फौजेनसीं आपले आज्ञेनुरूप घेऊन येऊं. परंतु गकारनामकाचे हातें तेथील अनुसंधान तुटे ते कीजे. येथील आमचे फौजेचें वर्तमान तर देशीं सर्वत्राचे घरोघर आह्मा पाशील लोकांच्या चवक्या पाठविल्या आणि 'छंद (फेद ? ) करितात, कबिले धरितात' ह्मणोन येथें वर्तमानेंहि आलीं आहेत. परंतु सर्वत्रांनी सर्व आशा सोडून श्रीमंत राजश्री माहादजी-बावांच्या जीवांचे सोबती जाले आहेत. एकदिल सर्व आहे. भावार्थ कीं श्रीमंत राजश्री पेशव्यांचे पायांशीं एकनिष्ठेनें राहून, वडिलांवडिलीं सेवाचाकरी करून, स्वामींचे सेवेवर देहहि समर्पण केले, ऐशीच धारणा धरून आहेत. सेवेशी श्रुत होय. या लोकीं कीर्ति मेळवावी. मागेंहि मेळविली आतांहि त्याप्रमाणें करावी. या उपरि मर्जी गकारनामकावर असली तर सेवक लोकांस तैसी आज्ञा करावी. दिशी (देशीं ? ) तों जागा नाहीं. मग जिकडे ईश्वर जागा राहावयास देईल तिकडे जाऊं. मग स्वामीच्या मरजीस येईल ते करावें. आम्ही तों स्वामींचे म्हणवितों. परंतु स्वामींच्या मरजीं न आलें! बरें होणार तें सुखैनैव हो. या उपरि स्वामींनी अंतःकरणापासून जें असेल तें सेवकास आज्ञा करावी. हें निदान जाणोन सेवेशीं विनंतिपत्रें लिहिलीं आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हे१ विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २२.
इ. स. १७६५. ता. १७ आगष्ट श्री. १६८७ भाद्रपद शु. १
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
पोष्य राघोराम व राघोमल्हार व बाजी नरसिंह कृतानेक सां। नमस्कार. विनंती येथील कुशल ता। भाद्रपद शुद्ध १ मुक्काम लष्कर नजीक मुकुंदबारी जाणून स्वकीय निजानंदलेखन आज्ञा केली पो।. विशेष. बहुत दिवस जाहले. परंतु पत्र पाठवून सांभाळ न जाला; तर ऐंसी ममता निष्ठुरता सहसा न पों। सदोदित प्रेषित पत्रीं मोद(दा? )वाप्ती केली पो।. इकडील वर्तमान तरः कोट्याची मामलत जाली. मारवाडचीही मामलत चुकली. आतां दरकूच राजश्री मल्हारजी-बावाकडे जात आहों. त्यास प्रस्तुत पुण्याचीं पत्रें राजश्री शिवाजी विठ्ठल यांची आलीं. त्यांत मजकूर कीं “राजश्री माहादाजी गोविंद याचें वर्तमान श्रवण करून श्रीमंत राजश्री दादासाहेब अद्यापवर क्रोधायमानच आहेत. ऐसें संधींत राजश्री गणोजी कदम वे राजश्री अंताजी नाईक व नाना पालेकर ऐसें त्रिवर्ग राजश्री मोरोपंताचे१ सूत्रें करून राजश्री चिंतोपंत२ साह्यभूत करून श्रीमंत राजश्री माहादाजीबावाचे सरदारीचे राजकारण सिद्धीस नेऊं म्हणतात. नजराण्याची ही भानगड त्याचेंच अनुमतें करून बोलत आहेत. आणि तेथें श्रीमंतापाशीं करार करीत आहेत कीं ‘राजश्री माहादाजी बावास आणून भेटवितों’* म्हणून सिद्धांतयुक्त जाबसाल करीत आहेत”३ म्हणोन अनेक प्रकारें तपशीलवार पंत-मा।रनिलेनीं लेखन केलें आहे. त्यांसीं नानासाहेब ! आपण प्रसंगी असतां व राजश्री विष्णुपंत बाबा असतां, गकारनामकानें४ दरबारी पेष५ होऊन स्वामीचे हातचें राजकारण असतां त्यानें यश्याचें अधिकारी होवें हें उत्तम कीं काय ? आम्ही व आमचे येजमान आपले म्हणवीत असतां गकारपूर्वकानें मधींच लबाडी येथील पत्र नसतां करावी आणि आपण सिद्धीस जाऊ द्यावी हें उत्तम नाहीं. गंकारनामक तेथें म्हणत आहे कीं ‘राजश्री पाटीलबावा आमच्या अंत्रांत६ आहे मी त्यासी आणवून भेटवितो’ ऐसें म्हणत आहे, तर स्वामी-दरबारी७ त्याजकडून राजश्री पाटीलबावा आणावयाचा वायेदा करून निश्चयें हाच करावा की ‘जर वायेद्यास आणून भेटविले तर तूं बोलतोस तें सर्व प्रमाण नाहींतर लबाड आहेस’ ऐंसा अपवाद आणून८ माझी दरबारीं पुरकस९ होये तो अर्थ योजिला पो।. राजश्री पाटीलबावांनीं तर पांच सात वेळां श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीस व राजश्री बापूस व राजश्री कृष्ण१०रावजीस वगैरे सर्वत्रांस साफ लेहून पाठविलें स्वदुस्तरें करून की ‘आम्हीं कांहीं गणोजीस जाबसालास पाठविलें नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २१.
इ. स. १७६५ ता. १३ जुलै श्री. १६८७ आषाढ वद्य ११.
राजश्री नारोपंत नाना गोसावी यासः—
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत कृ. विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान पूर्वी दोन चार पत्रीं आपणांस लि।। आहे त्यावरून कळलेंच असेल. सांप्रत मुकुंदवारीनजीक कोटें येथें मुकाम आहे. काटेकराकडील वकील येऊन भेटले. आठा चौ रोजांत येथील मामलतीचा फडशा करून पुढेंहि हिंदुस्थान प्रांते जाणार. आपण प्रसंगीं आहेत. दरवारचा बंदोबस्त करून सनदा वस्त्रें पाठवावीं. राजश्री
विष्णु महादेव यांणीं लि।। होतें कीं, ‘साहा लक्षपर्यंत नाना आम्हीं बोलोन करारांत आणिलें आहे म्हणोन’ ऐसियासी येथील वोढीचा१ प्रकार आहे हें आपणास ठाऊकच आहे. तशांत श्रीमंताची मर्जी रक्षून जें आपलें व विष्णुपंताचे विचारें येईल त्याप्रमाणें मान्य करून देऊन सनदावस्त्रें घेऊन विष्णुपंतास आम्हाकडे पाठवावें. जो ऐवज आपण तेथें देतील तो आम्हीं देऊं. वरकड कितेक घराऊ व + + + + वर्तमान राजश्री अच्युतराव२ याणीं लिहिलें आहे, त्यावरून सविस्तर कळेल. सारांश तेथील बंदोबस्त आपले हातें करून घ्यावा, येथील बहु-नाइकीचा३ प्रकार आहे. दुईमुळें भलताच खुळ करावयासी उभा राहतो ! ऐसियासी आपण दरबारचा बंदोबस्त पक्काकरून घ्यावा. सारांश आमच्या सरदारीचे स्वरूप व तुमचे दिवाण गिरीचे४स्वरूप राखोन येथास्थित चाले तें करावें. वरकड कितेक राजश्री मोरो कृष्ण पाठविले आहेत हें सांगतां सविस्तर कळेल. छ २४ मोहरम* बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २०.
इ. स. १७६५ ता. २ जुलै श्री. १६८७ आषाढ शुद्ध १५
पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे शेवेसीः-
विज्ञापना. विशेष. ‘दाहा३ लक्ष स्त्रो आम्ही देतों या सरदारीचा बंदोबस्त करून द्यावा. त्या दस्तऐवजावरी श्रीमंताची मर्जी लोभावर४ आहे. पैका घेतल्यावांचून बंदोबस्त करून देऊं नये’ म्हणोन लिहिले. ऐशास पेशजी येथील बंदोबस्ताविसीं स्वामीस वारंवार + + + आज्ञा आली ( ? ) कीं ‘जे लिहिणें ते श्रीमंत राजश्री दादासाहेब याजकडे लिहित जाणें. त्यांची कृपा जाहालियावर सर्व बंदोबस्त होईल. पेस्तर उभयतां श्रीमंत येकत्र जालियावर बंदोबस्त करून घेऊं.’ याप्रमाणें आपलीं एत्रें आलीं त्यावरोन पत्रें लिहित गेलों. त्यास ते समय आपला नक्ष राहून शत्रूचा पराभव व्हावा. या पर्यायें दस्ताऐवज५ (जी ? ) न सांपडतां लिहिलीं असतील. परंतु ते समयीं श्रीमंताचे मर्जीस न आलें. ज्या समयीं होणार त्या समयीं जाहाले. दस्ताऐवजीं ही पत्रें म्हणावी तर फारसी आमची नसतील. ते समयीं गणोजी कदम सिरोपस्थ६ होता. त्याणें-कोणाचेंही चालों दिल्हें नाहीं. *झासीचेहि कामास त्याणेच अपाय केला. त्याणें आह्मांस न कळतां हे हस्तऐवज लिहिले असतील. तो फारच बखेडखोर होता. त्यामुळें आम्हीं व बाजी नरसिंह व राघोबा पागे ऐसे एकत्र होऊन त्यास उखळून काढिला. यामुळें घरचें खूळ तुटोन हा प्रकार घडला. स्वामीचे चरणासी एकनिष्ट होतों त्याप्रमाणेंच स्वामीचे कृपेनें येश७ आलें. ईश्वरें हें यश आपल्यास दिल्हें आहे. त्याचा शेवट स्वामींनींच येश घेऊन केला. त्या रीतीनें या सरदारीचा बंदोबस्त क + + + मर्जी लोभावर आहे त्यास थोडक्यासाठीं मर्जी खट्टी होत असेल तर न तोडावी. आपणांस कळेल त्या रीतीनें चार पांच यावर अधिक उणे करार-मदार करून ज्या गोष्टीनें माहादजी-बावाचा या सरदारींत कुरूप (?) राही व आपले दिवाणगिरीचें स्वरूप राहे, या रीतीचा निर्वेधपणें बंदोबस्त करून घेतला पाहिजे. आपले अज्ञेसिवाय दुसरा अर्थ येथील नाही. येथील कोट्याचा दारमदार जाहालियावर उदेपुरास जाऊं. दोही संस्थानच्या खंडण्या (?) तूर्त थोडा बहुत ऐवजहि पाठवितां सरकारांत मदार१ होईल. याप्रों कांहीं तूर्त व कांहीं मुदत करावी. मोरो२ विठल यास माघारें लाविलें म्हणोन चिंतोपंतास विषाद येईल. त्यास मातुश्रीचा३ आग्रह पाहिला. प्रथम मातुश्रीची मर्जी न रक्षिली. तेव्हां इतकी आग लागली. तिणें मकारनामासारिख्यास ऐसे खेळ करून बाईच्या विचारांत तो न राहिला तेव्हां सेवटीं ऐसी जरब दिली, मग आमचा विचार किती ? सध्यांच मोरोपंतास ठेवावें तर खुळ तुटलें ते मागतीं उभें राहातें, यामुळें तूर्त मातोश्रीच्या रंगांत मिळान तिच्या मनोदयाप्रों मोरोपंतास जाऊं दिलें. परंतु मारनिलेसी जातेसमयीं आम्हीं त्या xxxxx गोष्टी कित्येक बोलिलों आहों ते सविस्तर आपणांस सांगतील. यावरून कळेल. सारांप, चिंतोपंतांनीं आपलेविसी निखालस असावें. राजश्री महादजी बावा व आमचें स्वरूप राहे आणि उभयतांचे नांवे खातरजमेचीं पत्रें येऊन या सरदारीचा बंदोबस्त होय ऐशा रीतीनें त्यानीं निखालसपण करावें. येविसीं स्वामी त्यासी बोलून करारमदार करितील त्याप्रमाणें आम्ही वर्तणूक करूं. परंतु त्याचेंच४ मात्र निखालसपण जाहालें पाहिजे. गुदस्तां आह्मांजवळ वचन प्रमाण येक देत५. माहादाजी गोविंदास वचन येक देत. ऐसे करून आपले६ दिवाणगिरीस व या सरदारीस त्यांणी अपाय केला. तेव्हां वचनाचीहि शाश्वतता कैसी वाटेल ? यास्तव याचा पुर्ता बंदोबस्त करून घ्यावा. मग त्यासी बोलणें तें बोलावें. कळलें पाहिजे. झासी वोडसेवालियानें घेतली आहे त्यास श्रीमंत या प्रांतांत येणार असले तर सहजांतच आपलें येणे होईल. नाहींतर आपण फौजसुद्धां यावयाचे करावें. सिंदे होळकर एकत्र होऊन बुंदेलखंडांत छावणी होईल. आपण आलियावर, दोन्ही तिन्ही फौजा एकत्र जाहालियावर, झासीचाहि फारसा xxx कडे गेली हें उत्तमच आहे. त्या xxxxx से मारिले ह्मणजे सहज किल्लाहि सुटेल. त्यास आपण आलियावर आपले प्रतापें सहजांत कार्य होईल. ऐसा प्रकार आहे. स्वामीस कळावें. वरकड सविस्तर राजश्री विष्णुपंत व धोंडोबा नाईक सांगतील त्यावरून कळेल. देसचें कमाविसदारास ताकीदपत्रें येथून पाठविलीं आहेत. जो आज्ञेप्रों पैका देईल त्याजला ठेववलें जाईल. दुसरा करावा (?) तों कोटियाची मामलत जालियावर दोन लाखाची तजवीज करून इंडिया पाठवून देतों कळों दिजे हे विज्ञापना७.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १९.
इ. स. १७६५ ता. २० जून श्री. १६८७ आषाढ शुद्ध २
श्रीमंत राजश्री नाना२ स्वामीचे शेवेसीः-
पोष्य राघो राम व राघो मल्हार व बाजी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल ताग इत छ १ माहे मोहरम मुक्काम नजीक मुकुंदबारी येथें यथास्थित जाणोन स्वकीय कुश्ळोत्तर-लेखन-आज्ञा करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी रोज गुदस्तचीं पत्रें आहेत त्याजवरोन साकल्य अर्थ ध्यानास येईल. सरतेशेवटीं राजश्री अच्युतरावजींहीं लेखन केलें आहेच. सारांश विनंति वारंवार हेंच पत्रीं माहादजी३ गोविंद याचें पारपत्यें व्हावयास कारण मुख्य दिवाणगिरीचे अटीमुळें हें त्याजला व्यसन४ प्राप्त जालें. स्वामीचीही५ आज्ञा होती त्याचप्रमाणे घडोन आलें. स्वामी म्हणतील कीं आम्हीं प्राणपावेतों आज्ञा केली नव्हती. त्यास आह्मीही प्रयत्न करोन मारावें हाही प्रकार नाहीं. याचा परिहार पूर्वपत्रीं साकल्य लेखन केलें आहे. अस्तु होणार कांहीं चुकत नाहीं. सारांश स्वामींनी या गोष्टीचा साभिमान धरोन आपला पक्ष हे पुरते समजोन, सरदारीचा बंदोबस्त करून घ्यावा. यांत आपलाही नक्ष आहे. राजश्री विष्णुपंत आबांनी पत्रें लेखन केलीं होतीं. तेथ मजकूर की; ‘राजश्री नानानीं आह्मीं मिळोन हा उल्लेख केला. त्यास सहालक्षपर्यंत पाहिजेत.’ त्यांनी६ नित्य ( ? ) देशांचे कमाविसदारांस ताकीद पत्रें दिल्हीं आहेत त्याजपासून ऐवज घेऊन बाकी देणें राहील त्याची निशा आपण करोन आह्मावरी चिठ्या कराव्या. येथें आम्ही सरबरा करून देऊं. फडणिसीचा१ प्रकार तरी द्रव्येकरून जेथवर येईल तेथवर करावे. येविशा पूर्वपत्रीं सविस्तर लेखन केलें असें. कळेल तो प्रकार करून उभयतां२ श्रीमंतांचीं कृपा संपादून घेणें हें धनीपणाचें कृत्य आपल्या कडेसच आहे. आम्हीं चाकरी मात्र आपण सांगतील ते करावी. सविस्तर वर्तमान पूर्व पत्रावरून कळो येईल. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १८.
इ. स. १७६५ श्री. १६८७ फाल्गुन
पुरवणी राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः-
स्ने।। माहादजी सिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुषल जाणोन स्वकीय लेखन करीत जावें. विशेष-राजश्री विष्णु माहादेव यांणीं लि।। होतें ‘की साहा लक्षपर्यंत बोलोन करारांत आणिलें आहे सिवाय दरबार खर्च पडेल’ म्हणोन लिहिलें ऐसीयासि येविसी मा।रनिलेस लिहिलें आहे. तरी तुह्मीं व बिष्णु माहादेव मिळोन करारमदार करून सनदावस्त्रें घ्यावीं. दुसरे पत्राचा उजूर न धरावा. क्षेपनिक्षेप विष्णुपंताकडून साहुकरी निशा करून देवावी आणि आम्हांवरी साहुकारी चिठ्या कराव्या. त्याप्रों। ऐवज पावता करूं. कोणेविसी अनमान न करितां प्रसंग संपादून सनदावस्त्रें घेऊन पाठवावीं. माहाल देसीं आहेत तेथील कमावीसदांरास पत्रें पाठविलीं आहेत त्याकडील ही ऐवज घ्यावा. केवळ त्या ऐवजाचे भरवसियावरी न जावें. माघेंपुढें तोहि ऐवज येईल. परंतु प्रसंगास न चुकावें. आपण जो ऐवज सरकारांत देतील तो आम्ही देऊं. चिंतो विठल यांसी विष्णु माहादेव याचे विद्यमानें दाहापर्यंत बोललों होतों. हालीं तुमचे विष्णुपंताचे विचारें येईल ते करावे. *अथपर पर तुह्मीं दुसरे पत्राचा उजूर न धरने. निशा करून सनदावस्त्रें घेनें. आपल्याविरहीत पहलबी१ दुसरा प्रकार नवता व आतांहि दुसरा अर्थ नाहीं. तर कार्य करनें, बहुत काय लि।। हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १७.
श्री.
राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। सखूबाई शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. दरबारच्या बंदोबस्ताविशीं चिरंजीव राजश्री माहादजी शिंदे व राजश्री अच्युतराव व बाजी नरसिंह यांनीं आपणांस लिहिलें आहे तरी तेथील बंदोबस्त करावा. येविशीं अनमान न करावा. देशाच्या माहलचे बंदोबस्ताविशीं तुम्हांस लि।। आहे त्यास श्रीगोदें येथील तालुका बळवंतराव गोपाळ यांजकडे आहे. तो तेथील खर्चाचे बेगमीस ठेविला आहे तरी बळवंतराव गोपाळ खेरीज करून रसदेचा ऐवज सरकारचे भरण्यास घेणें. तुम्हीं तेथें आहां तुमच भरंवसियावरी बेफिकीर असो. तुह्मी श्रीमंतासी जे करारमदार कराल त्याप्रमाणें क्षेपनिक्षेप ऐवज x x x रा। छ २९ जिल्हेज. *बहुत काय लिहिणे ? हे विनंति.