पत्रांक ३९ अ.
इ. स. १७६७ ता. १९ सप्तेंबर श्री. शकें १६८९ भाद्रपद वद्य १२
श्रीमंत् राजश्री चिंतोपंत तात्या स्वामीचे सेवेसीः
विनंति सेवक विठ्ठल केशोराव बुरटे सां। नमस्कार विनंति उपर श्रीमंत मातुश्री चिमाबाई शिंदे यांस खासगत खर्चास श्रीमंत राजश्री माधवराव शिंदे१ यांनी आपणांकडून देविले रुपये पंचवीस हजार पैकीं तूर्त स्वामीनीं दिल्हे रुपये १०००० दहा हजार रोख आपण भरून पावलों. छ २४ माहे रबिलाखर मित्ती भाद्रपद वद्य १२ द्वावशी शनवार.
हा।ॐ साक्ष्य
खंडाप्पा चिखले.