पत्रांक ३६.
इ. स. १७६७ ता. ६ जुलई. श्री. १६८९ आषाढ शुद्ध १०
छ मो अनाम देशमुख व देशपांडे पा। सिदंखेड यांसिः-
केदारजी सिंदे सु।। समान सीतैन मया व अलफ. पा।मजकूरचा अंमल पेशजीचे कमाविसदाराकडून दूर करून साल मजकुरापासून २राजश्री ... ... याजकडे कमाविस सांगितली असे. तरी तुह्मीं मारनिलेसी रुजु होऊन अंमल सुरळीतपणें हरएकविसीं दिकत न करणें. जाणिजे छ ९ सफर मोर्तब सुद
बार