Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६.
इ. स. १७६५ ता. ३ जुलई. श्रीशंकर. १६८७ आषाढ वद्य १
राजश्री नारोपंत नाना ( राजेबहाद्दर) गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशललेखन करीत असावे. विशेष तुम्हीं छ. १९ जिल्हेचे पत्र पुजियाचे मुक्कामीहून पाठविलें ते छ १० मोहरमी नजीक मुकुंदबारी येथील मुक्कामी पावोन लिहिला मजकूर सविस्तर कळला. ‘दरबारचा बंदोबस्त घेऊन तुम्हांस वस्त्रें सत्वरींच पाठवितों चिंता न करावी’ म्हणोन लिहिले. उत्तम आहे. तुम्हीं प्रसंगीं असतां आम्हांस कोणेविशीं फिकीर आहे असें नाहीं. पूर्वी राजश्री विष्णु माहादेव१ याचीं पत्रें आलीं. तेथें लि॥ होतें कीं ‘सहा लक्ष पर्यंत नाना आम्हीं मिळोन बोलोन पल्यावरी आणिलें आहे’ म्हणोन, ऐसियासि त्या पत्राचीं उत्तंरे व त्याबमोजिव आपणांसहि पत्रें लिहून पा। आहेत. त्यावरून सविस्तर कळेल. माहादजी२ गोविंद याचें वर्तमान तेथें कळल्यावरी काय मजकूर, श्रीमंताची मर्जीचा प्रकार कसा आहे, हें सविस्तर ल्याहावें. आपण दरबारचा बंदोबस्त करून सनदा व वस्त्रें पाठवावीं. श्रीमंतांपाशीं जो करारमदार तुम्हीं कराल याप्रमाणें ऐवज आम्ही देऊं. दरबारचा निखालस जाबसाल होऊन सनदावस्त्रें आली म्हणजे पुढें कामकाजास जावयासी कोणेविशीं चिंता पडणार नाहीं. याकरितां लि।। असे रा।. छ १४ मोहरम *बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
याजकरितां बाजीराव साहेब यांस अटकाव करून आपले जवळ ठेवावें आणि चिमाजीअप्पा यांस परशुरामभाऊ यांचे हवालीं करावें, असें ठरवून पागनीस यांणीं परशरामभाऊ यांस सांगितलें कीं बाजीराव साहेब यांस आह्मीं लष्करांत अटकावून ठेवितों आणि चिमाजी अप्पा यांस तुमचे स्वाधीन करतो; तुह्मी येश्वदाबाईचे मांडीवर देऊन दत्तविधान करून चिमणाजी माधव करावें ह्मणजे सर्वांचे मनोदयानरूप होऊन सारे अनुकूळ होतील; तेव्हां ही गोष्ट परशरामभाऊ यांर्णी कबूल केली आणि बाहरोपंत मेहंदळे यांस साता -यास नानाकडे पाठविले आणि सांगितलें कीं अशी मसलत होत आहे, आपण. यास रुकार देऊन वस्त्रें देवावीं आणि आपण मेणवलीस यावें; बाळोबा तात्या व भाऊ यांची आपली सपनाई होऊन आपली खातरजमा जाली ह्मणजे पुण्यास यावें. असें बोलणें झालें त्यावरून मेहंदळे याजवर नानाची मर्जी रुष्ट जाली. नानानीं विचार केला कीं शिंदे व परशरामभाऊ एक जाले व माधवरावसाहेब यांस दत्तक होणार तेव्हां सा-यांचें लक्ष तिकडे लागेल. ये वेळेस रुकार न दिल्हा तरी आपले माथां अपेश येईल असें समजून वस्त्रें द्यावयास साता-यास बाबूराव आपटे होते त्यांस सांगून आपण वाईस येऊन राहिले. बाजीराव साहेब यांस हातीं न घेतां दत्तविधान केलें हे भाऊचें नानाचें वाकडें येण्याचें कारण.
१ वैशाख शु॥ १३ सोमवार छ. १ जिल्कादी बाजीरावसाहेब यांस शिंदे यांणीं फौजेंत अटकाव करून चिमणाजी अप्पा यांस परशरामभाऊचें हावालीं केलें. त्याणीं जबरदस्तीनें पालखिंत घालोन पुण्यास आणिलें आणि त्रिंबकराव अमृतेश्वर आपटे यांस साता-यास पाठवून शाहूराजे याजपासून वस्त्रें व शिकेकटार आणिली आणि वैशाखवद्य ४ बुधवार छ. १७ जिल्कादी पुण्यांतील वाड्यांत दवलतराव शिंदे येऊन चिमणाजी अपा यांचे दत्तविधान जालें. दत्तविधानाचा शास्त्रार्थ महादेव दीक्षित आपटे व यज्ञेश्वर शास्त्री द्रविड यांणीं सांगितला. दत्तविधान जाल्यावर दरबार जाला. सारे सरदार, मुत्सद्दी, वकील जमा होऊन चिमणाजी माधवराव यांस पेशवाईची वस्त्रें दिल्हीं. चुलते असतां पुतणे यांस दत्तक दिल्हें हे चांगलें जालें नाहीं असें लोक बोलत होते. परशुरामभाऊ यांणीं च्यार लक्षांची जहागीर शिंदे यांस द्यावयाची ठरविली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
दुस-या बाजीच्या राजवटीच्या आरंभाचीं कांहीं विश्वसनीय टिपणें.
शके १७१८ नलनाम संवत्सरे सुरुसन सबातैन मया, व आलफ, सैन १२०६, संवत १८५३, राजशक १२३, इसवी १७९६ व १७९७.
१ बाळोबा पागनीस निसबत शिंदे यांणीं विच्यार केला कीं नाना निघोन गेले. बाजीरावसाहेब यांचा इतदार नाहीं व हे राज्याचे उपयोगही नाहीं व नान बाहेर असतां आपण बंदोबस्त करूं ह्मटलें तरी आपले विचारांत भोसले, होळकर वगैरे सरदार व मुत्सदी येणार नाहीं. हे प्रकर्ण सारें असेंच ठेऊन हिंदुस्थानांत जावें तरी नाना सरदारी बुडवीतील; तेव्हां कोणीतरी श्रीमंतांचे दवलतींतील पुढें करून त्याचे माथा कारभार ठेऊन आपण कांहीं जाहागीर व खर्चास घेऊन येश मिळवावें अशी तजवीज करूं लागले, तेव्हां बहिरोपंत मेहंदळे व राघोपंत थत्ते यांचे मार्फतीनें परशुरामभाऊ यांशीं बोलणें लाविलें. तेव्हां परशरामभाऊ यांनी सांगितलें कीं बाजीरावसाहेब कोणाचे विचारांत चालतील न चालतील ही तुमची खातरजमा झालीच आहे. याजकरितां आःह्मी या कामांत येत नाहीं व आह्मीं सरदार; कारभार आमच्यानें होणार नाहीं. नाना बाहेर आहेत त्यांस तुमचा भरवसा नाहीं, व सर्वांचें लक्ष माधवरावसाहेब यांचे वंशाकडे व नानाकडे आहे. तेव्हां कोणी अनुकूल होणार नाहीं. याजकारतां बाजीरावसाहेब यांस अटकाव करून चिमणाजी आप्पास, माधवरावसाहेब यांस दत्तक दिल्हे तरी सर्वांचें एक लक्ष होईल असें परशराभाऊ यांचे बोलणें नानाचे रुकारानें पडलें. त्यावरून बाळोबा पागनीस यांणीं विच्यार केला कीं उभयतांस त्याचे हवालीं केलें तरी आपले हातीं कांहीं राहात नाहीं;
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
महाराष्ट्र बांधवांस विनंति.
आह्मांजवळ जरी सध्या सुरू केलेलें ४८ पृष्ठांचें मासिक पुस्तक दहा पंधरा वर्षे चालेल इतके कागदपत्र आहेत तथापि महाराष्ट्रांतील अनेक इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या वंशजांपाशीं व आप्तेष्टांच्या घरीं महाराष्ट्राच्या इतिहासाची पुष्कळ सामग्री इतस्ततः माळ्यावर किंवा तळघरांत फुकट रद्दी ह्मणून पडलेली असते; असा आमचा अनुभव आहे. तर तसल्या जुन्या अव्याहत परंपरेच्या घरंदाजांनीं आपली तळघरें, अंबारें आणि माळे वगैरे शोधून किंवा कित्येकांच्या घरीं पिढ्यानुपिढ्या बंद असणा-या पेट्या शोधून महाराष्ट्राच्या इतिहासास उपयोगी पडणारे कागदपत्र कृपा करून आह्मांकडे पाठवावे. आह्मी अशा गृहस्थांस त्यांचे मूळ कागद नकला करून घेऊन परत पाठवूं आणि छापविल्यावर त्यांच्या दोन दोन प्रतीही त्यांस पाठवूं. आमची ही विनंति फुकट जाणार नाहीं आणि महाराष्ट्र इतिहासाच्या सांखळीचे मधलेच चुकलेले दुवे लवकरच जागच्या जागीं येऊन महाराष्ट्राचा सुसंगत इतिहास दहाबारा वर्षांच्या आंत लिहितां येणें शक्य होईल अशी फार उमेद आहे. तर लोकांनीं प्रयत्नपुरस्सर आह्मांस चहुंकडून कच्चीं साधनें ह्मणजे कागदपत्रें पुरवावींत इतकेंच त्यांजपुढें पदर पसरून आमचें मागणें आहे.
मित्ति वैशाख शुद्ध १ शके १८२६.
संपादक.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
विशेषतः ह्या अंकांतील व पुढेंही मधून मधून येणा-या फारसी पत्रांचें लिप्यंतर आणि मराठी भाषानुवाद करण्याचे कामीं रा. रा. कृष्णलाल मोहनलाल जव्हेरी एम्. ए. एल्. एल. बी. ह्या गृहस्थांचें जर संपादकांस साहाय्य मिळालें नसतें तर फारसी भाग सध्यां तरी तसाच ठेऊन पुढें जावें लागतें. कारण जशी सध्याच्या मराठी जाणणारांस जुनी पत्रव्यवहाराची भाषा अगदी अपरिचितत्वामुळें दुर्बोध होते त्याचप्रमाणें जुनी फारसी पत्रेंही दुसरी भाषा फारसी घेऊन बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यासही फारच दुर्बोध होते असा आमच्याच मित्रमंडळींतील कांहीं फारशी पदवीधरांना आह्मीं तीं पत्रें दाखविलीं तेव्हां - आह्मांस अनुभव आला. सारांश रा. रा. जव्हेरी यांचें साहाय्य फारच मोलाचें झाले आहे, आणि तें त्यांनीं केवळ निरपेक्षबुद्धीनें व अत्यंत उत्सुकतेनें केलें आणि पुढेंही ते तसेंच वेळोवेळीं करणार आहेत ह्याबद्दल त्यांचे संपादकांवर अति उपकार होत आहेत. ह्या शिवायही संपादकांस नामदार दाजी आबाजी खरे बी. ए. एल् एल्. बी. रा. रा. सदाशिव रामचंद्र बखले बी. ए. एल. एल्. बी. इत्यादि बरेच विद्याव्यासंगी गृहस्थ कोणत्याही प्रसंगीं साहाय्य करण्यास उत्सुक आहेत ह्यामुळें संपादकांस उत्तेजन येत आहे. सारांश महाराष्ट्र इतिहास मासिक पुस्तकासंबंधीं संपादकीय कर्तव्य शक्य तितकें उत्तम होण्याची व्यवस्था कशी आहे हें वाचकांस आतां जास्त स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाहीं.
महाराष्ट्र इतिहासाच्या प्रत्येक अंकांत ४८ पानें पत्रें इत्यादिकांस दिलीं जातील; व उरलेल्या आठ पानांत मराठी पुस्तकांची पोंच व अभिप्राय. विशेषतः ऐतिहासिक पुस्तकांचें साधार व सोपपत्तिक परीक्षण करण्याचें योजलें आहे. प्रसंगविशेषीं आपल्या इतिहासाचें विवेचन करणा-या आंग्लादि परभाषेंतीलही पुस्तकांची चांचणी घेऊन त्यांची वाचकांस ओळख करून द्यावयाचे कामही यथावकाश करावें असें मनांत आहे. आश्रय चांगला मिळाल्यास ऐतिहासिक स्थलांचेंही सचित्र वर्णन करण्यास ठीक पडेल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
व प्रत्येक तीन रुपयास एक प्रमाणें त्याची इच्छा असेल तर मासिक पुस्तकाच्या प्रती त्याला पाठवूं. अशा आश्रयदात्यांच्या उदारपणानें ऐतिहासिक पुरुषांचे हस्तलेखही प्रकाशलेखनद्वारा आह्मी वाचकांस देऊं. आमच्याजवळ श्रीशिवाजी, संभाजी, शाहू, नानाफडणवीस, बापू गोखले, परशुरामभाऊ पटवर्धन, महादजी, मल्हारबा इत्यादि अनेक जवळ जवळ दीडदोनशें निरनिराळ्या ऐतिहासिक पुरुषांचे हस्तलेख आहेत.
असो. काव्येतिहाससंग्रहाच्या मागें जवळ जवळ वीस वर्षांनीं हा स्वेतिहाससाधनप्रकाशनाचा उद्योग होत आहे. काव्येतिहाससंग्रहानेंच प्रथम आमचा इतिहास विदेशियांनीं लिहिलेल्या स्वरूपांत सत्यापासून किती दूर आहे याची थोडीशी कल्पना करून दिली. त्यावर आजपर्यंत मूळ कागदपत्रांचें यथाकालप्राप्तसाधन घेऊन कित्येकांनीं नाना फडणवीस, महादजी सिंदे, मल्हारराव होळकर अशांची चरित्रें लिहिलीं आहेत. त्या चरित्रलेखांनींही आमचा इतिहास अजून केवळ किती अंधुक आणि अपुरा आहे हें। अधिक स्पष्टपणें प्रत्ययास आणलें. सारांश, स्वेतिहासाचीं साधनें त्यांच्या मूळ स्वरुपांत उजेडांत येण्याची अवश्यकता मराठी वाचकांपैकी प्रत्येक प्रौढ व विचारी गृहस्थाच्या अंतःकरणांत आतां चांगलीच बिंबली आहे. तेव्हां काव्येतिहाससंग्रहाप्रमाणें सध्याच्या वाढत्या प्रमाणावर असणा-या आमच्या वाचनाभिरुचींत ग्राहकांच्या अभावामुळें हा आमचा प्रयत्न अर्धवट राहण्याची पाळी न येईल अशी बरीच उमेद आहे. ती ईश्वराच्या प्रेरणेनें महाराष्ट्र वाचक सफल करोत हेंच त्या दयावनाजवळ मागणें आहे.
संपादकीय कर्तव्यास मुख्यतः रा. रा. जगन्नाथ रघुनाथ घारपुरे, वामन रामचंद्र जोशी, आणि नारायण कृष्ण गद्रे, ह्या तिघांनींच जरी बांधून घेतलें आहे तरी रा. रा. पद्मनाभ भास्कर शिंगणे बी. ए. एल्. एल्. बी. आणि कृष्णलाल मोहनलाल जव्हेरी एम् ए. एल्. एल्. बी. ह्या गृहस्थांचें ह्या पहिल्या अंकापासूनच त्रिवर्गसंपादकांस पूर्ण साहाय्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
पहिला ‘सरकारी, माधवराव नारायण ( पंत पंधान) यांस'; दुसरा सरकारी, ‘नाना (फडणीसास) स;' आणि तिसरा खासगी, ‘ गोविंदराव भगवंत यास', हा तिन्ही मुखांचा पत्रव्यवहार एकाच खर्ड्याच्या लढाईसंबंधीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चालणा-या कारस्थानांचा द्योतक आहे. त्यामुळें एकाच मित्तीर्ची त्याच त्याच बाबतीचीं पत्रें गोविंदराव कृष्ण याचीं माधवराव नारायण पंतप्रधान, नाना फडणवीस आणि गोविंदराव भगवंत या तिघांस गेलेलीं पाहावयास सांपडून ह्या त्रिवर्गांचीं परस्पर नातीं, यांचीं व्यक्तिनिष्ट व अन्यसापेक्ष धोरणें, त्याचप्रमाणें ह्यावेळीं नुकतीच अस्तित्वांत येऊं पाहत असणारी इंग्रजी सत्ता ह्मणजे तराजूनें तरवारीच्या साहाय्यानें मांडलेला बुद्धिबलाचा डाव आपणांस कसा काय फळेल किंवा नडेल ह्याबद्दलचें ह्या मराठी राज्यकार्यधुरंधरांचे संशय इत्यादिकांचे वाचकांस चांगलेंच दर्शन घडेल. त्याचप्रमाणें मराठे सरदारांत ह्यावेळीं परस्परांविषयीं कितपत स्नेहबुद्धि वसत होती, त्यांचें आपल्या स्वामीसंबंधीं कितपत प्रेम होतें आणि ह्या प्रसंगीं ह्मणजे खर्ड्याच्या लढांईत त्यांना एके ठिकाणीं आणण्याचें काम कोणा राज्यकार्यधुरंधरानें आपल्या चातुर्यानें साधलें हें पाहणेंही मोठें कौतुकास्पद असून तितकेंच बोधप्रदही आहे. त्याविषयीं आह्मी आपले ग्रह हा पत्रव्यवहार बराचसा छापून झाल्यावर निश्चयात्मक असे लोकांपुढें स्वतंत्र प्रस्तावनारूपानें मांडणारच आहों. तेव्हां सध्यां अधिक कांहीं लिहित नाहीं. मात्र हा पत्रव्यवहार अव्याहत छापून निघण्याचें काम फार खर्चाचें व श्रमाचें आहे. पैकीं श्रम आमच्याजवळ आहेत. परंतु द्रव्य आमच्या महाराष्ट्र बांधवांनींच सवडींत सवड करून पुरविलें पाहिजे. वार्षिक खर्च केवळ छापण्याचा निघाला ह्मणजे हें काम पडूं न देण्याचें आह्मीं आनंदानें अभिवचन देतों. कोणीं उदार आत्म्यानें जर दहा, वीस, पंचवीस, पन्नास असे रुपये बुडीत खर्चास ह्मणून दिले तर त्यांवा आह्मी मोठ्या आदरानें स्वीकार करूं;
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
अशीं हीं सोडविलेलीं पृष्ठें फिरून चिकटूं नयेत म्हणून त्यांच्यामध्यें एक एक टिपकागदाचें किंवा साध्याही कागदाचें पृष्ठ घालून ठेवावें लागतें. इतकें करूनही हीं पृष्ठें आपलें सर्व हृद्रत बोलून दाखविण्यास समर्थं होत नाहींत, इतकेंच नव्हें, तर कित्येक अगदीं निरक्षर म्हणजे मुकीं झालेलींच जेव्हां ओढळून येतें तेव्हां मनाला किती उदासवाणें वाटत असेल याची कल्पनाच करणें बरे ! कारण ह्या पृष्ठांचें सर्व तोंड मुख्यत्वें जिव्हा ह्मणजे अक्षरवटिका वाळवीनें साफ आमूलाग्र खाऊन टाकलेली असते. आह्मीं सध्यां छापण्यास आरंभ केलेल्या पत्रव्यवहारांतील शके १७१४ किंवा इ स. १७९२ सालच्या पुस्तकाची वरील सारखीच दशा आहे. तें कांहींच बोलूं शकत नाहीं. आणि ह्मणूनच आह्मांस शके १७१५ च्या वैशाखापासून आरंभ करावा लागत आहे. वास्तविक खर्ड्यांच्या लढाईला झालेलें मूळ कारण शके १७१५ च्या पूर्व कालांतील असल्यामुळें त्याचा वास्तविक बोध करून देणें हें काम ह्या मुक्या झालेल्या पुस्तकाकडे होतें. परंतु आज तरी त्याला बोलकें करण्याचे आमचे सर्व उपाय खुंटले आहेत. तथापि निराश न होतां आम्हीं आपलें काम अजून चालूंच ठेविलें आहे. ईश्वरेच्छेनें यश येतांच तें जें काय बोलेल तें महाराष्ट्रबांधवास आह्मी ऐकवूंच.
आमच्याजवळ असलेले सर्व कागद, रा. गोविंदराव कृष्ण काळे यांच्या बारनिशीचे होत. हे गोविंदराव कृष्ण काळे निजामाच्या दरबारीं पेशव्यांचे वकील असत. हे एक उत्तमांपैकीं मुत्सद्धी राज्यकार्यधुरंधर पुरुष होते. ह्याची खात्री वाचकांस त्यांच्या छापल्या जाणा-या पत्रांवरून सहजच होईल. रा. गोविंदराव भगवंत हे रा. गोविंदराव कष्ण यांचे पुण्यास सरकारी फडांत असले विश्वासपात्र कारकून होत. रा. गोविंदराव कृष्ण यांचा आमच्याजवळ असलेला पत्रव्यवहार तीन मुखांचा आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
हीं साधनें अश्रांत परिश्रमानें कधीं उकिरड्यांतून तर कधीं उकिरडेवजी झालेल्या जुन्या वाड्यांतील तळघरांतून अथवा कधींही वापरांत नसणा-या तिस-या, चवथ्या मजल्याच्या माळ्यावरून-उन्हाळ्यांतील कडक ऊन, पावसाळ्यांतील पाऊस व हिवाळ्यातील थंडीचे कडके खाऊन कडकून, भिजून आणि फिरून आकर्षून- केरकचरा व वाळवी यांच्या अखंड मैत्रींत ‘कालोह्ययं निरवधिर्विपुलाचपृथ्वी ' ह्या भवभूतीच्या उक्तीवर विश्वास टाकून बसलेलीं अशीं रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बी. ए. ह्यासारखे पदवीधर उजेडांत आणींत आहेत; त्यांनां अभ्यंगस्नानें घालीत आहेत; त्यांचे रोगग्रस्त भाग प्रसंगीं कळकळीच्या मवाळीनें सुसह्य होणा-या शस्त्रधारांनीं कापून काढून निराळे करीत आहेत; कित्येक ठिकाणीं । मलमें लावीत आहेत; तर कित्येक ठिकाणीं नवे अवयवही कृत्रिम त-हेनें बनवून चिकटवीत आहेत व जुन्यांस रजा देत आहेत. ह्या सर्व गोष्टी केवळ कविकल्पना वाटण्याचा पुष्कळ संभव आहे. परंतु ज्यांनी रा. राजवाड्यासारख्यांस सांपडलेले पत्रांचे गठ्ठे स्वतां पाहिले आहेत त्यांस तसें वाटण्याचे कांहीं एक कारण नाहीं. आह्मीं सध्या येथें जीं कांहीं दहा पांच पुस्तकें आणिलीं आहेत त्यांतील तीन चार पुस्तकें वाळवीनें इतकीं खाल्लीं आहेत, कीं त्या वाळवीच्या किड्यांच्या मृत शरीराची माती त्या पुस्तकांत भिनून एकंदर पुस्तकांची माती–कां? दगडी पाटीच बनली आहे. अशा स्थितींत असलेलीं हीं पुस्तकें फिरून बोलकीं करावयास प्रथम त्यांस युक्तीनें वाफारा द्यावा लागतो. हा वाफारा देतांच त्या प्रस्तराचे पापुदरे कांहीसें सुटे होतात. ते तसे सुटे झाल्यावर लगेंच गर्भाशयांतील शस्त्रक्रियेच्या प्रसंगीं जितक्या हलक्या हातानें आणि कळजीपूर्वक काम करावे लागतें त्यापेक्षांही अधिक हलक्या हातानें आणि कळकळीनें त्या प्रस्तरप्राय पुस्तकाचें एक एक पृष्ठ सोडवावें लागतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
महाराष्ट्र इतिहास.
संकेत.
श्री मत्समर्थसज्जन-,
बर्हन्मेरूशिरःप्रतापगडराचित्यो ।
नति रामदासशिवपर्दि,
स्वधर्मभूरातमहारथींखचित्या।।१।।
महाराष्ट्राचा इतिहास अजून सिद्ध करावयाचा आहे. त्याला साधनीभूत जीं जुनीं राजकीय व धार्मिक व्यवहाराचीं, ( त्या त्या बाबतींतील पुढा-यांची ते ते व्यवहार त्यांच्या हातून घडत असतांना एकमेकांनीं एकमेकांस लिहिलेलीं) अस्सल पत्रें ती, सध्या कोठें सुप्रसिद्ध स्वेतिहाससंशोधक रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, मयूरभक्त लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांसारखें पदवीधर, तसेच रा. दत्तात्रय बळवंत पारसनीस ब्रह्मेंद्र स्वामीचें चरित्र लिहिणारे असे कित्येक सद्वृहस्थ अधिकउणें प्रयत्न करीत आहेत तेव्हां, उपलब्ध होऊं लागलीं आहेत. त्या सर्व उपलब्ध व उपलभ्य साधनांचें जेव्हां प्रकाशन होईल तेव्हां महाराष्ट्राचा आपल्या प्रिय देशाचा व पूज्य पूर्वजांचाखरा खरा इतिहास “धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितं । पूर्ववृत्तं कथायुक्तमितिहासं प्रचक्षते ॥ १ ॥”–ह्या आपणांकडील अत्युदात्त व्याख्येशीं जुळणारा असा कोणा तरी अर्थात् स्वभूमि, स्वभाषा, स्वजन आणि स्वधर्म यांस वाहिलेल्या स्वजनोत्कर्षेछू महापुरुषाकडून लिहिला जाणें शक्य होणार आहे अशी आमची दृढ समजूत आहे. तिला अनुसरूनच सद्य:स्थितींत आह्मी महाराष्ट्र इतिहासाची साधनें जशीं जर्शी तीं आमच्या हार्ती येतील तशीं तशीं छापून प्रसिद्ध करण्याचें आपलें कर्तव्य समजून करीत आहों.