पत्रांक १००.
१७६२ ता. ३० आक्टोबर. श्री. १६८४ कार्तिक शुद्ध १३.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक सुर्याजी गोसावी यांसिः-
श्री।। रघुनाथ बाजीराव आशिर्वाद सु।। सलास सितैन मया व अलफ. मौजे साकेगांव पो माणिकपुंज हा गांव तुम्हांस जाहागीर देखील सरदेशमुखी दिल्हा असे. याचा करार रुपये
२००० इनाम दरसालिना
३००० तैनात देखील पालखी
१२०० कदीम
१८०० जास्ती
-------------
३०००
-----------
५०००
येकण पांच हजार रुपयांचा गांव तुम्हांस दिल्हा असे. सदर्हू गांवचा वसूल आकारामुळें कमी झाला तर कच्चा वसूल मनास आणून, तेथील वावती व मोकासा हरप्रकार ऐवज पुरऊन दिल्हा जाईल. ज्याजती झाल्यास सरकारांत घेतला जाईल. जाणिजे छ १२ रबिलाखर आज्ञप्रमाण.