पत्रांक १०१. नकल
१७६२ ता. ३० आक्टोबर श्री. १६८४ कार्तिक शुद्ध १३
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक सुर्याजी गोसावी यांसिः-
स्नो रघुनाथ बाजीराव आशिर्वाद सु।। सलास सितैन मया व अलफ. किल्ले त्रिंबक येथील कारखानिसी पेशजीपासून गणेश सूर्याजी याजकडे आहे. त्याप्रमाणें करार असे. तरी तुम्ही मशारनिल्हेचे हातून कारखानिसीचे कामकाज घेऊन वर्तन पावित जाणें. जाणिजे. छ १२ रबिलाखर. आज्ञा प्रमाण.