पत्रांक ९९ (अस्सलबाानकल ).
१७७० ता. १८ आगष्ट श्री. १६९२ श्रावण वद्य १२.
राजमान्य राजश्री बाबूराव रामचंद्र गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुमा इहिदे सबैन मया व अलफ. तुह्मांस पेशजी तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेब यांनी आनंदवल्लीस केशो गोविंद याजवळ ठेविलें होतें. त्यास केशो गोविंद याचे हिशेबी शिलक नख्त व ऐन जिन्नस वजनी सुपारी वगैरे बाकी उतरली आहे, ते कोण्हीकडे कसकशी दिल्ही त्याचा फडशा जाला पाहिजे. यास्तव हें पत्र सादर केलें असे. तरी देखत पत्र सदरहू बाकीच्या पावत्या (कबज्या) असतील त्या घेऊन हुजूर येणें. जाणिजे, छ २६ रबिलाखर आज्ञा प्रमाण. मोर्तब.