पत्रांक १५३.
इ. स. १७६६ ता. ६ मार्च. श्री. १६८७ फाल्गुन वा १०
राजश्री चिंतो विठ्ठल ६इ। प्रभाकर जोशी राईरीकर गोत्र अत्री सूत्र अश्वलायन सरकानगो सुभे खानदेश गोसावी यांसिः-- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। राजे भारतशाहा हटियाराय संवस्थान कालिभांत मकडाई, सरकार हांडे सुभे मजकूर रामराम. विनंति. उपरि सन ११७५ कारणें इनामपत्र लिहून दिन्हें ऐसे जेः-गंभीरराव कानगो पूर्वी सुभे मजकूरचे होते. त्यांसीं आमचे वडिलांनीं सरकानगोइचें वृत्तीमुळें दाने गांव तीन हजारचे तनखाहचे इनाम करून दिल्हे. उपरांतिक कदीम गंभीरराव यांची अवलाद बुडाली. त्यांनीं दत्तपुत्र घेऊन वृत्तीची स्थापना केली. परंतु कोण्ही जिमीदारीचे कसबांत व कामकाजांत १फहमिदा न जाहला. सबब सदरहू गांव इनाम दिल्हे होते, त्या गांवांचा उपभोग त्यांजकडेस चालिला नाहीं. हालीं तुम्हीं सुभे मजकूरचे कानगोईचे निम्मे वतन खुषखारिदी खंडो गंभीरराव कानगो यापासून केलें, त्याचे खरीदखत मोंगलाई व स्वराज्यांतील सनदा भोगवटियास करून घेतल्यात. त्याप्रमाणें तुमचा कानगोईचा भोगवटा चालूं जाला. संस्थानपैकीं आमचे वडिलांनी पूर्वी कानगो यासी गांव इनाम दिल्हे होते, ते ‘आमचे आम्हांकडेस यावे’ म्हणून तुम्हीं विदित केलें. त्याजवरून मनास आणितां निमे वृत्ति तुम्हीं घेतली तेव्हां तुम्हांकडेस निम्मे तनख्याचे गांव द्यावा, बाजवी रीतीने जाला. परंतु खंडो गंभीरराव कानगो निमे वतनाचे हालीं विद्यमान आहेत. त्यांनीं आम्हांकडील गांव तीन हजार रुपये तनख्याचे तुम्हांस देऊन संस्थान मजकूरचे इनाम गांवासी आम्हांस समध नाहीं ऐसे पत्र तुम्हांस करून दिल्हे. तें पत्र मनास आणून हालीं आम्हीं पुस्त दरपुस्त जमीदारीच करीत आलों व तुम्हीं सरकानगोई वतन खरीदी करून जमीदारच जालेत. सबब आमचे वडिलांनी गांव इनाम दिल्हा त्याचा लोभ आम्ही, त्याचे वंशीचे, आम्हांपासून न व्हावा. आम्हांस व आमचे राज्यास अनिष्ट जाणोन तुम्हांस सदरहू तीन हजार रुपये तनख्याचे गांव बितपशीलः-
२००० मौजे आबसेल गांव एक तनख्या एकूण दोन हजार.
१००० मौजे कांचनगांव गांव एक तनख्या एकूण एक हजार
----------
३०००
सदरहू गांव दोन तपें जून व ज्यां यांची (?) तनख्या एकूण तीन हजार तुम्हांस इनाम कुलबाब व कुलकानू खेरीज हकदार करून देऊन हें इनामपत्र करून दिल्हें असे. तरी तुम्हीं व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें सदरहू गांवाचा उपभोग घेत जाणें, ये विषयीं तुम्हीं अगर आमचे वंशीचा कोण्हीं खलेल करील तो ईश्वराचा अन्यायी. वछ देवीची शपत असे. मि।। १० वद चैत्र सं १८२२ ता। २४ रमजान सन ११७५