(कृष्णाजीचें लिखित २७) पत्रांक १५६.
इ. स. १७३० ता. १ नोव्हेंबर, श्री. १६५२ कार्तिक शुद्ध २.
राजश्री भगवंत राऊ सोमवंशी हवादार व कारकून किल्ले सिंहगड गोसावी यासिः-
॥ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य-स्ने।। नारो शंकर सचीव आशिर्वाद व नमस्कार. सु।। ईहिदे सला-सैन मया अलफ. रा। कोंडाजी पवार याची असामी पेशजी पंचहजारियांत घालून किल्लेमारीं नामजाद ठेविले होते. त्याप्रमाणें सालमारी हुजरून करार करून हें पत्र तुम्हांस सादर केलें आहे. त्यास यांणीं आपले तर्फेनें मालजी दिघा व कृष्णाजी मान्या किल्ले मारीं चाकरी करावयास ठेविले आहेत, तरी तुम्हीं यांजपासून किल्लाचाकरी घेत जाणें. यांच्या बेगमीस मौजे मुडखेल ताा कर्यात मावळ हा गांव किलियाचे निसबतीनें मकासा देविला असे. तरी मौजे माा रचा मुकास-बाबेचा ऐवज यांजकडे वसूल देवणें. रा। मानाजी चाकणे यांस उडरी अगर मुडखेल या दोहीं गांवापैकीं एक गांव त्याचे खातरेस येईल तो देणें म्हणून पेशजी किलियास पत्र सादर केलें आहे. त्यावरी नव जाणें. त्यांजकडे उदरी करार केली असे. देणें. मौजे मुडखेल याजकडे चालवणें. मौजे मा।रच्या ऐवजीं किलियाकडे वसूल जाहला असेल तो वजा करून उरला ऐवज मुकासबाबेचा याकडे देवणें, यांचें चालवणें अगत्य जाणून यांची पेशजीप्रमाणें किल्लेची असामी करार करून यांचे तर्फेनें दांग लोक किल्लाचाकरीस ठेविले आणि मौजेमार यांजकडे मुकासा दिल्हा आहे. तरी लिहिल्याप्रमाणें चालवणें. छ १ जमादिलावल पाा हुजुर.
बार सुरुसुद बार.