किरकोळ.
पत्रांक १५२.
इ. स. १७६५ ता. ३१ आक्टोबर श्री. १६८७ कार्तिक वद्य ३ (?)
तीर्थस्वरूप राजश्री १तात्या वडिलांचे सैवेसीः—
आपत्यासमान २रघुपतरायानें कृतानेक सां नमस्कार विनंति. येथील कुशल ता। छ १५ जमादिलावलपर्यंत वर्तमान येथास्थीत असे. विशेष. पा। अमळनेर येथे राजश्री नारो कृष्ण यांणी उपद्रव केला, हें वर्तमान पेशजीं सविस्तर लिहीलें आहे, त्याजवरून अवगत जालें असेल. प्रस्तुत राजश्री आपाजी त्रिंबक याचें पत्र पा। मजकुरींहून आलें. त्यांत वर्तमान कीं राजश्री रामाजी आणाजी यांनी परगण्यांत येऊन मुकाम केला. गांवगना स्वार पाठऊन बखेडा आरंभिला आहे. कारकून व हुजरे यांणी ३आट करून अनेक प्रकारचे उपद्रव आरंभिले आहेत. ऐसियासि छावणीचे दिवस. या समयांत हा प्रसंग जाला ! तेणेंकरून नुकसानीची गोष्ट आहे. पंचवीस हजार स्त्रो ध्यावे येविषयीं सरकारची आज्ञा नारो कृष्ण यास आहे. त्यावरून त्यांणीं बहुत च उपद्रव केला. त्यास येविषईचा दरबारीं आपण बंदोबस्त करून रो नारो कृष्ण याचें नांवें ४मनाईपत्र सत्वर पाठवावे. पत्रास दिवसगत लागली, तर माहालीं स्थीत राहणार नाहीं. पंचवीस हजार स्त्रो घ्यावे, हा दुराग्रह राजश्री ५नानाचा असेल तर पुण्यांत सदरहू ऐवजाची निशा द्यावी आणि मनाई लवकर पाठवावी. वरकड कित्येक आर्थ राजश्री राजाराम विठल यांशीं भाषणांत आला आहे. आपणांस विनंती करतील. त्यावरून ध्यानास येईल. राजश्री जानराव कदम व भवानीसिंग फौजसुद्धा आले. त्यांचें देणें एक लक्ष सात हजार स्त्रो निघाले, त्याचे तडजोडींत असों. माहालची अवस्था परस्पंरे आपणांस विदित आहे. देण्याचे पेंच मातबर. सर्व मा।र राजारामपंत विदित करितील. बहुत काय लिहीणें लोभ करावा हे विनंती.