पत्रांक १६०.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य १
राजश्री वेंकटराव कासी का। पा। सिरोंज गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्ने।। तुकोजी होळकर दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ. राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील राजश्री महादाजी गोविंद यांची बोली सरकारांतून करून त्यास परगणेमजकूर ऐवजी सरंजाम खेडीं नेमून घ्यावयास तुम्हांस अलाहिदा सनद सादर केली आहे, त्याप्रमाणें गांव करार करून घ्या; परंतु सालमजकुरी वसूल घेतला असेल तो फिरून द्यावा म्हणुन मशारनिल्हेनीं रदबदल केली त्यावरून हें पत्र लिहिलें असे. तरी पोमजकूरीं तुमचा अंमल दाखल जाल्यावर तुम्हाकडे वसूल आला असेल तो फिरून पंत-मशार-निल्हेकडे देणे, जाणिजे. छ १७ रजब. बहुत काय लिहिणें