पत्रांक १६२.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य ४
राजश्री वेंकटराव असी कासी का। पा। सिरोंज गोसावी यांसि अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्नो तुकोजी होळकर दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ
राजश्री चिंतो विठ्ठल याजकडील राजश्री माहादाजी गोविंद यांची बोली सरकारांत करून ह्यास पा।मजकूर ऐवजी जागीर रुपये १४२४९॥ चौदा हजार दोनशें साडेयेकूणपन्नास रुपयांची खेडीं द्यावींसा करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे तरी तुम्ही सालमजकूरीं पा।मजकूर पा। सदरहूचे चौदा हजार दोनशें साडेयेकूणपन्नास रुपयांचे तनखियाचीं खेडीं मशारनिलेचे दुमाले करून देणें येणेंप्रो पेशजीं पत्र दिल्हें होतें तें गैर विल्हे लागले सबब हालीं मुसन्ना सनद हे दिल्ही असे जाणिजे छ १७ रजब. गहूत काय लिहिणें