लेखांक ८३
१५६६
.॥ सदानंद गोसावी मु॥ मौजे नीब प्रती दताजी नाईक देसाई पाा वाई सु॥सन खमस अर्बैन अलफ तुह्मास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद बिाा
मौजे नीब चाा मौजे गोवे चावर
.॥. .॥.
येणेप्रमाणे सालाबाद चालिला आसे हाली साल मजकुरी हुजूरुन खुर्दखत सादर जाहाले की पेसकसीबदल इनाम निमे हक घेणे त्यावरून गोविंदगीर हुजूर जाऊन मालुमाती करून खुर्दखत आणिले की सदरहू इनामासी पेसकसी माफ केली असे यास तसीस न लावणे इनाम बा। भोगवटा सालाबादप्रमाणे दुमाला करणे ह्मणौऊन खु॥ आणिले त्यावरून ठाणासी मिसेली ब॥ खु॥ प्रमाणे
सादर जाहाली असे आता सदरहू पेसकसी हुजरून माफ केली असे तुह्मी आपला इनाम सालाबाद बाा खाऊन सुखे असणे जाणिजे
हे विनती