लेखांक ८२
१५६६
॥ मोकदमानी मौजे निंब प्रती दत्ताजी नाइक देसाई पा। वाई लेहावया कारणे ऐसे जे सु।। खमस अर्बैन अलफ जोगीग्रगीर गोसावी हुजूर जाऊन खुर्दवत आणिले की मठ व इनाम आपले दुमाला करणे त्याप्रमाणे ठाणाचे ही मिसेली सादर जाली असे तरी बा। खु॥ व मिसेली मठ व इनाम जोगीद्रगिरीचे दुमाला करणे हरकोणी सोदाई करील त्यास ताकीद करीत जाणे जागीद्रगिरीचे मदत करीत जाणे व पटेलाचे घरी कागद व वस्तभाऊ मठीचे असेल ते देणे उजूर न कीजे मो।