लेखांक ८१
१५६६ चैत्र वद्य १०
श्रीगुरुपादुका नमस्तुते
स्वस्तिश्री नृपशालीवाहन शके १५६६ वरुसे तारण संवत्सरे चैत्र वदी दशमी वार सोमवार तदिनी तपोनिधी दसनामा संन्यासी ***** शंकरगौरी ॥१॥ गगा मोहनि ॥२॥ मकुंद भारथी ॥३॥ सहजपुरी ॥४॥ आचळगिरी ॥५॥ सहजगिरी अनतसागर ऐसे समस्त यदसनाम श्रीसंभुहून मौजे निंब मठ श्रीतपोधन सदानंद मठ मानभाव हिगलगिरी सामावले मग त्याचे सीश्य गोविंदगिरी यासी तेथे स्तापना करून पट दिले असे यासी कोणी काही ज्ञानीया कुसूर करील तरी श्री गुरुद्रोह घडेल व दसनामद्रोह घडेल गोविंदगिरीचे मठ करून दिले दुसरेस नाही सत्यापासी कोणी काही कुसूर करील तरी त्यासी श्री दतचे आज्ञा असे हस्त
राजेश्री दत्ताजीराजे देसाई मोकदम मोजे मजकूर
बीजी पटेल कृष्णोजी पटेल
(निशाणी नांगर) (निशाणी नांगर)