लेखांक ८७
१५७१ ज्येष्ठ वद्य १३
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवद खाने अलीशान खा। अफजलखान महमदशाही खुलीदयामदौद्यलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखान पा। वाई बिदानद सु॥सन खमसैन अलफ दरीविले गोविंदगीर मुरीद कमलनयन हुजरु येउनु मालूम केले जे अपुले इनामत मळे मौजे गोवा सा। नीबासी सालाबाद धरण कलवायत असे तरी हाली महिमाजी पटेल मौजे मजकूर जाजती करून पणीसी खलील करून दर हफतेसी दोनी रोज घेणे ह्मणुनु बोलत असे साहेबी नजर इनायत फर्माउनु सालाबाद अपुले कलवा कैसे चालत होते त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के गोविंदगीर मुरीद कमलनयनाचे मलेसी सालाबाद तागाईत साल गुदस्ता कलवा पाणी कैसे आलाहिदा चालत होते त्याणेप्रमाणे चालवीजे नवे जिकीर करणे निसबत नाही दरी बाब फरीयाद येऊ ने दीजे बऔलाद वा अहफाद चालवीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजे पा। हुजरु रा। देवीदास मोर्तब सुदु सालगु॥ इस्कील जाली आहे त्याचा उजूर न करणे मोर्तब सूद (शिक्का)
रुजु सुरनिवीस
तेरीख २६ जमादिलोवल सुरु सूद