लेखांक १५०
श्री १६०९ भाद्रपद
तपोनिधी राजमान्य राजश्री आनंदगिरी गोसावी मो। मठ का। निंब प्रांत वाई प्रती राजश्री संभाजी राजे उपरी तुह्मी पत्र पाठविले पावोन अभिप्राय कळो आला अनछत्रास ऐवज पाहिलेपासून हा कालपर्यंत पावत आला परंतु सांप्रत देशाधिकारी ऐवज पाववायास हैगै करितात तरी ऐवज पावेसा केला पाहिजे ह्मणून लिहिले त्यावरून देशाधिकारी प्रात वाई यास आज्ञापत्र सादर केले असे ते पाववणे याउपरी ते तुह्मास पहिलेपासून पावत आले असेली तेण्हेप्रो। पावते करितील धर्माच्या कार्यास अतर पडणार नाही तुह्मी भुवनगिरी गोसावी याजवळी श्रीचा प्रसाद देऊन पाठविला तो स्वामीस पावोन वदिला निरंतर आपणाकडील कुशल वर्तमान लिहीत जाणे बहुत काय लिहिणे