श्री.
यादी. सोनो बहिरव, राजश्री यादो गोपाळ याच्या बायकोचे भाचे, हे येथें राजश्री गोविंद हरी यांजकडे आपली समजावीस मागावयास आले होते. ते येथें राजश्री निळो केशव यांचे वळखीनें राहावयास आले. ते आश्विन वद्य ११ शनवारीं प्रहर दिवसां आले. आंगीं ज्वराची वेथा होती. तीन दिवस निजेले होते. सोमवारीं तिसरे दिवशीं मध्येरात्रीं देवआज्ञा जाली. मंगळवारीं प्रातःकाळीं आश्विन वद्य अमवाशेस रा। गोविंद हरीस वर्तमान सांगितले. अगोधरहि वेथेचें वर्तमान सांगितलेंच होतें. त्यांनी खर्चास रु॥ २ दिल्हे होते. ते, त्यांचे माणूस लिंगोजी साळोंखी याजपाशीं दिल्हे होते. मुत्य १
पत्रें यादी वगैरे.
पावल्याचें वर्तमान सांगितल्यावर दहा रुपये व एक शेला दिल्ही. त्याचा तपशील.
२ सोमवारीं रात्रीं दिल्हे रु॥ ता। लिंगोजी साळोंखी.
१० मंगळवारीं प्रातःकाळीं त्याच्या साहित्यास दिल्हे रु॥ व शेला १.
----
१२
खर्च
३॥। सा। फांटी सोनोपंताच्या दहनास खंडी १। दर खंडीस रुपये ३ प्रा।.
२ नईस न्यावयास ब्राह्मण तेलंग केले २. त्यांस मजुरी दिल्ही रु॥.
३ वेंकटभट तेलंग अस्ति घेऊन बतीसशिरोळेयास गेला. त्यांच्या घरास, त्यास मजुरी शिवाय पोट.
३। ता। लिंगोजी साळोंखी सोनोपंताचें माणूस.
२ पेसजी.
१। दाहापैकींबाकी.
-----
३।
------
१२
शेला १ पैकीं निमे सोनोपंतावर घातला. बाकी निमे ता। लिंगोजी मा।र.
येणेप्रमाणें रुपयांचा खर्च व शेल्याचा. याशिवाय त्यांचीं पांघुरणें जुनीं ता। लिंगोजी मा।र जबानीनें सांगितलें.
१ पागोटें.
२ आंगडी.
१ शेला.
१ किनखाबी विजार.
१ लेपछिटी.
१ सतरंजी.
---------
७
१ तरवार.
३ भांडीं.
१ तपेलें.
१ पंचपात्री.
१ वाटी पितळी.
------
३
याखेरीज आसन, व सोंवळे, व संधेची पळी, तबकडी, साहाण, खोड, गंधाच्या गोळ्या, तुळशीची माळ, येणेप्रमाणें लिंगोजी मा।र घेऊन त्यांच्या गांवास घेऊन गेला. समेत घोडे तटाणी. कार्तिक शुद्ध १ बुधवार, शके १६६०, कालयुक्तनाम संवछरे, सन ११४८, छ० २९ रजब.