[६]
श्री. शके १६२९ चैत्र वा। १४
॥ स्वस्तिश्री माहाराज राजश्री शाहुजी राजे साहेब यांणीं राजश्री रखमाजी कीन्हळे यांस आज्ञा केली ऐसी नेः– स्वामीचा अभ्योदय प्रसंग होऊन या प्रांतीं आगमन झाले. हें ऐकतांच तुह्मी आपले जमावनिसी येऊन लांबकणीचे मुक्कामीं स्वामीसंन्निध हजर जालेस. आपला सेवाधर्म तो केला. त्यावरून स्वामी तुमची एकनिष्ठा जाणोन कृपाळू होऊन तुह्मांस दौलत ला हजारी जात दोनी हजार स्वार मुक्रर केली असे.
सीरस्ता बीता।.
खा. जाती वतन सालीना स्वार देनी हजार सीर
दोन हजार होन २००० स्ता बंदी हजारी
येणेप्रमाणें खा।. जाती सालीना दोनी हजार होन व स्वार सदरहूप्रमाणे मुक्रर कलें असें. सरकारसिरस्ता दंडक प्रमाणें सेवा करून, हक पात जाईल. जाणिजे. छ २१ रबिलावल सु॥ समान मया अलफ.
मर्यादेयं.
विराजते.