[ ७ ]
श्री. शके १६३० चैत्र वद्य ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजमान्य राजश्री मोरो प्रल्हाद यासि आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मांकडे सरदेशमुखीच्या मामलियास फडणीस पाहिजे. त्यासी, रुद्राजी केशव हुजूर उमेदवार होते. लिहिणार, कामाचे मर्दाने देखोन त्यासि फडणीसीचा कार्यभाग सांगितला असे. याचे हातें फडनीसीची सेवा घेत जाणें. यासी वतन सालीना, देखीलं चोकर, होन पा। ६०० साहासे रास करार केले असेत. इ॥ पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रमाणें वजा करून उरलें वतन शिरस्ताप्रमाणें पावणें. वतनाचे मोइनप्रमाणें चाकर हाजिर करून लेहवितील, त्या दिवसापासून चाकराचा हक पावीत जाणें. यासी जमान त्रिंबककाकाजी. जमेनिवीस, सुभामानाजी दरेकर, दि॥ राजजी सेनापति, हुजूर घेतला असे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
राजते