[ ५ ]
श्री शके १६२४ कार्तिक वद्य ११
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २९ चित्रभानू संवत्सरे कार्तिक बहुल एकादशी सौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं मुकदमानी कसबे सासवड यासी आज्ञा केली ऐसी जेः- विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. आपणांत व भिवंडीकरांत सीमेचा कथळा लागला आहे. त्याचा निवाडा पूर्वी जाहाला असतां, भिवंडीकर कथळा करावया लागले आहेती. प्रस्तुतः मौजे चामळी, व बांदगाऊ, व भवरी, या तीन गावीचे दांडगे भिवंडीकरांनी मेळवून चालोन येऊन कसबे मजकूरचे लोक दाहा जखमी केले; एक खून केला. ये गोष्टीचें पारपत्य करावया आज्ञा केली पाहिजे, ह्मणोन लिहिलें, ते विदित जालें. ऐशास हाली सदरहू तीनही गावींच्या मुकदमांस हुजूर बोलाविलें आहे. आल्यावरी त्यास जें शासन करणें तें स्वामी करतील. जाणिजे. * * निदेश समक्ष.
श्री ०
शिवनरपति श्रीआई
हर्षनिधान आदिपुरुष श्रीराजा
मोरेश्वरसुत शिवछत्रपति स्वामी मर्यादेयं
नीलकंठ कृपानिधी तस्य परशु- विराजते
प्रधान राम त्र्यंबक प्रतिनिधी