लेखांक १७६
१६२१ आश्विन वद्य ५
श्री दत्तात्रय सदानंद तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषक शके २६ प्रमाथीनाम संवत्सरे अश्विन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती स्वामी याणीं राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी प्रा। वाई यास आज्ञा केली ऐसी जे तपोनिधी सदानंद गोसावी मठ श्री सदानंद वास्तव्य (शिक्का) (शिक्का) का। निंब याणीं हुजूर येऊन विदित श्रीचा इनाम पूर्वापार मौजे उडतर प्रा। कर्हाड येथे जमीन चावर । पाव चावर चालत आला आहे त्यास त्याचे परपरेचे शिष्य तपोनिधी भवानगीर महत आपण आहो त्यावरून मनास आणिता समाधि स्थल जगविख्यात परम रमणी जागा अन्नछत्र भडारे पुण्यतिथी धूपदीप नैवेद्य चालावयाबदल इनाम दिल्हा व भवानगीर महत याणी जिवत समाधी चदीचे मुकामी नवरात्रात नऊ दिवस घेतली परम अनुष्ठानी जाणोन मौजे मा।री पूर्वापार चालत आली जमीन सदरहू प्रा। करार करून दिल्ही तरी या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र परतोन भोगवयीयास गोसावी यास देणे प्रतिवर्षी नूतर पत्राचा अक्षेप न करणे जाणिजे लेखन अलंकार मोर्तब
रुजु सुरनिसी सुरुसुद बार