लेखांक १९२
श्री १६२५ चैत्र वद्य ११
छत्रपती
राजश्री नारो राम हवालदार व कारकून वर्तमान व भावी सा। बारामुर्हे गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक विठल गोपाळ सुभेदार व कारकून सुभा जाउली नमस्कार सु॥ सलास मया अलफ बा। सनद राजश्री स्वामी शक २९ सुभानुनाम संवत्सरे चैत्र बहुल सप्तमी रविवासर पो। छ २४ जिलकाद सादर जाले तेथे आज्ञा की कृष्णागिरी गोसावी लदेसगिरी गोसावी याचे शिष्य वस्ती मौजे धाडेघर याणी हुजूर स्वामीसनिध घेऊनु विनंती केली की लदेसगिरी गोसावी आपले गुरू यास थोरले राजश्री कैलासवासी स्वामी याणी तांदुळ कैली कोठी मापे .। पांच मण धर्मादाऊ दिल्हा होता तेणेप्रमाणे ता। राजश्री संभाजी राजे याचे कारकीर्दी पावेतो चालत आले त्याउपरी सन तिसा मधे लदेसगिरी आपले गुरु याणी समाधी घेतली अशास आपण मठी वास्तव्य करून आहे तरी स्वामीने कृपाळू होऊनु लदेसगिरी यास पाच मण तांदूळ धर्मादाऊ दिल्हा होता तो आपणास चाले ऐसा करून सनद ल्यावयास आज्ञा केली पाहिजे ह्मणौन विदित केले व देशमुख ता। मा।र याची बखैर आणिली त्यावरून मनास आणिता कृष्णगिरी गोसावी भले महताचे शिष्य मठी वास्तव्य करीत आहेत याची स्वस्ता जाली पाहिजे याकरिता स्वामीने कृपाळु होऊनु यास तांदूळ कैली कोठी मापे .।. पांच मण सालीना द्यावयाची आज्ञा केली आहे तरी तुह्मी गोसावी याचे प्रतिवरषी परामर्ष करून पाच मण तादूळ कोठी मापे साल दरसाल स्वस्ती क्षेम असतील तोवरी पावीत जाणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप करीत नव जाणे या पत्राची प्रती लिहून घेऊनु असलपत्र भोगवटीयास गोसावी याजपाशी परतोन देणे ह्मणौन येणेप्रमाणे हुजरुन आज्ञापत्र सादर जाले त्यावरून सुभाहून तुह्मास सनद सादर केली असे तरी जोवरी गोसावी स्वस्तीक्षेम असेल तोवरी परामर्ष करून साल दरसाल सरदहूप्रमाणे पावीत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राचे तालिक लिहून घेऊनु असलपत्र भोगवटीयास कृष्णागिरी गोसावी याजपाशी देणे जाणिजे छ २४ जिलकाद मोर्तब सुद