लेखांक १९३
श्री १६२५ चैत्र वद्य १२
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २९ सुभानु संवत्सरे चैत्र बहुल द्वादशी मदवासर क्षत्रिय कुलावातंस श्री राजा शिव छत्रपती याणीं मोकदमानी मौजे इडमिडे तर्फ हवेली प्रां। वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौ। मजकूर राजश्री भवानगिरी गोसावी यास इनाम आहे त्यास गोसावी यानी गुदस्ताची बाकी नस्ती काहाडून वसुलाचे तोष्ट लाविले आहे तरी स्वामीनी पारपत्य करावया आज्ञा जाली पाहिजे ह्मणून तुह्मी येऊन हुजूर विदित केले त्यावरून मौजेमजकुरचा हिशेब मनास आणावयाविशी स्वामीनी राजश्री जगजीवन नारायण देशाधिकारी प्रा। वाई यास आज्ञा केली आहे ते रास्ती हिशेब तुमचा मनास आणून हिशेबी जे बाकी निघेल तो ऐवज झाडीयानसी गोसावी याकडे पाववणे व सालमजकूरचे खडणीचा ऐवज सारा गोसावी याकडे पावता करणे पुढे गोसावी याचे रजा तलब वर्तोन कीर्दी मामुरी करून रास्ती गावीचा ऐवज त्याकडे पाववीत जाणे खलेल एकजरा न करणे तुह्मास जाजती काही आजार लागणार नाही जाणिजे निदेश समक्ष
सुरुसुद बार
रुजु