[ ५१ ]
श्री. शके १६५२ चैत्र शुद्ध ४.
राजे चिमणाजी बावा गोसावी यांसिः-
विनंति उपरि येथील क्षेम ता। छ० २ रमजान बुधवारपर्यंत यथास्थित असे. यानंतर श्रीमंत महाराज राजश्री शंभुछत्रपति आजि रात्रौ कृष्णापार व्होऊन सप्तरुषीस गेले आहेत. तर, तुह्मीं बहुत खबरदार असली पाहिजे. श्रीमंत राजश्री दादोबा यांचे घरीं गेले आहेत. गडचा कुली सुलाक त्याकडे जाला आहे. + तर पत्रदर्शनीं श्रीमंत पंतप्रधान याकडे पत्र रवाना करणें. व रा। अंताजी शिवदेव फौजसुद्धां आले आहेत. यास राखुन असली पाहिजे. पुढें येऊं न देणें. कुली सरकारकुन व गडकरी देखिल सप्तऋषी गड आह्मी भेदले आहेत. तर तुह्मी बहुत प्रकारें सावध राहून त्यांस राखिलें पाहिजे. पत्र वाचून फाडून टाकिलें पाहिजे. बहुत काय लिहणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.