[ ४७ ]
श्रीशंकर.
शके १६५१.
श्रीमत्परमहंसादियथोक्तबिरुदांकितशृंगेरीसिंहासनाधीश्वरश्रीमच्छंकराचार्यान्वयसंजाताभिनवश्रीविद्याशंकरभारतीस्वामीकरकमलसंजाताभिनवश्रीविद्या नरसिंहभारतीस्वामीकृतनारायणस्मरणानि :-
स्वस्ति श्रीमतसकलगुणालंकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री अंबाजी त्रिंबक परमभक्तोत्तम यांप्रतिः-- विशेषस्तु. तुमचें कल्याण इच्छित करवीरक्षेत्रीं छात्रसभासमवेत श्री पाशीं राहिलों असों. तदनंतर, आपण प्रत्योत्तर व मठनि॥ ग्रामास अभयपत्रें पाठविली, त्यावरून बहुत समाधान पावलों. तुह्मासारिखे अभिमानी सत्शिष्य असतां आह्मांस कोणे गोष्टीची चिंता काय ? हें संस्थान तुह्मां सद्भक्तांचे आहे. जो परामर्ष कराल तो ईश्वरार्पण होऊन उत्तरोत्तर श्रेयस्कर आहे. खेडेस रक्षपाळ देऊन संरक्षण तुह्मी करालच. परंतु सांप्रत याप्रांतीचे अधिकारी खंडन करिताती, ह्मणोन कळलें. त्यास, नकळत महीची खेडी एकत्र करितील, आणि पैकेचा तगादा लावतील, याकरितां पूर्वसूचना कळावी ह्मणोन लिहिलें असे. खंडणीकरितां समईं महीचे ग्राम वजा करून बोली केली पाहिजे. ह्मणजे निरोपद्रव होईल. नाहीं तरी आपणास संकट पडेल. ऐसियासि, आमचे गांव निराळे करून बोली चुकवणार सत्शिष्य असा. सांप्रत पुण्यतिथीही समीप उरली. त्याचे साहित्यें आपणाविरहित करणार कोण आहे ? वरकड अर्थ रा। बाबदेभट व हरीभट मुद्दा सांगतील त्यांवरून सविस्तर कळेल. दर्शनांतीं सर्व वृत्त निवेदन करूं. सुज्ञांप्रति बहुत लिहिणें नलगे.
लेखना
वधि.