श्रीमोरया
शके १६७२ आषाढ शुद्ध ७
राजश्री दामोधरपंत गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व जयाजि सिंदे दंडवत विनंती उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल विदित करणें. विशेष. तुह्मांकडे जाटाबाबत ऐवजाची हुंडी रुपये ७०००० सत्तर हजार होती. त्यापैकीं पावले रुपये ५०० बाकी रुपये ६९५०० साडे येकूणहत्तर हजार रुपये राहिले. ते सदरहू ते रुपये श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामी यांजकडे देविले असेत ते पावते करून जाब घेणें. छ ५ शाबान * बहुतकाय लिहिणें ? हे विनंती. सुमाईहिदेखमसैनमया अलफ.
( लेखनसीमा )