॥ श्री ॥
शके १६७२ आषाढ वद्य १२
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसी:---
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्रें पाठविलीं ती पावलीं. राजश्री मल्हारजी होळकर व जयाजी सिंदे यांणीं तुह्माकडून साडे चोवीस हजार रुपये देविले होते. त्यास ऐवज आपणाकडे नाहीं ह्मणून तपसीलें लिहिलें तें कळलें. तपसीलवार हिसेब राजश्री मल्हारजी होळकर यांजकडे तुह्मी पा। आहे. त्याचा जाबसाल ते तुह्मांस लिहितील. त्यावरून कळेल. जाटाबाबत हुंड्या तुमचे निसबतीस आल्या. त्याची हुंडणावळी त्यांणी घेतली नसता तुह्मी हुंडणावळी सरकारांतून घेता, याचा अर्थ काय ? या उपरी हुंडणावळीचा ऐवज तुह्मी येणें प्रमाणें पाठऊन देणें. रुपये
५००० पेशजी दोन लक्षाच्या हुंड्या
आल्या त्याची.
३५०० कित्ताहुंडी सत्तर हजाराची
------- तुह्माकडे आल्याचे रुपये
८५००
येकूण साडे आठ हजार रुपये हुंडी पावली बाबत पाठऊन देणें. विलंब न लावणें. छ २५ साबान सु॥ इहिदे खमसैन मयावअलफ.
( लेखन सीमा )
पै॥ छ १ माहे रमजान.
--------------