लेखांक २४८
श्री
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी मल्हारजी सावंत पाटील कसबे निंब प्राां वाई यासी आज्ञा केली ऐसी जे का। मजकुरी भवानगीर गोसावी याचा मठ आहे त्यास त्याच्या शिष्यशाखा आहेत त्यासी नसते पेच कुपेच करितोस याकरिता पेशजी आज्ञापत्र सादर केले असता मागती लबाडी करावयास चुकत नाहीस हे गोष्ट कामाची नाही याउपरी सदरहू मठच्या कजीयांत तुवा लबाडी करून पेच केली (या) मुलाहिजा होणार नाही जाणिजे रा। छ २३ रमजान लेखनावधी
रुजू