लेखांक २५०
श्री
श्रीगणेशायनमा
श्रीमंत तपोनिधी माहाराज राजश्री भवानगीर बावा
महंत स्वामीचे सेवेसी
सेवक शंकराजी कृष्ण दि॥ देशमुखी का। मलेवडी नमो नारायण विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन आज्ञा केली पाहिजे विषेश आपणाकडील आशीर्वादपत्र येत नाही ऐसे उचित नव्हे आह्मी तुमचे स्थापित असो कितेक वर्तमान यादोजी तावरे यानी स्वामीचे सांगितले त्यावरून समाधान जाहले आमचे चित्ती आहे की तुमची स्थापना होवी हे विशी राजश्री बाजीसाहेब स्वारीस जाता आह्मास सागोन गेले आहेत ऐसीयासि स्वामीनी श्रीचे यात्रेस येणे भेटी होईल भेटी अंती अवघे वर्तमान कळो येईल कितेक वर्तमान यादोजी तावरे यास सांगितले आहे तो सेवेसी निवेदन करील चित्तावरी घेऊन अगत्य करून यात्रेस आले पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा निरंतर असो दीजे हे विनंती